Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शिवसेनेचे जिल्ह्यात अभियान

$
0
0

नाशिक:

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनचे 'शिव संपर्क अभियान' सुरू आहे. शिवसेना शिव संपर्क अभियानांतर्गत २६ व २७ फेब्रुवारी रोजी शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना उपनेते अनंत नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवस या नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यकत्यांसह पदाधिकाऱ्यांची होणाऱ्या बैठकीत संघटनात्मक रचनेचा आढावा घेतला जाणार आहे.

गुरुवारी (दि. २६) कळवण, येवला, नांदगाव, मालेगाव, मालेगाव बाह्य, चांदवड, सटाणा (बागलाण) या विधानसभा मतदारसंघात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिवसेनेच्या संघटनात्मक रचना व मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतील. यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी आहेर तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख, शिवसेना तालुका प्रमुख, शिवसेना उपतालुकाप्रमुख, गण व गट प्रमुख उपस्थित राहतील. शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी दिंडोरी, निफाड, सिन्नर, इगतपुरी, देवळाली, नाशिक मध्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या विधानसभा मतदारसंघातील आढावा घेतील. ही माहिती शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.


‘लॉ’चे एकाच दिवशी दोन पेपर

$
0
0



पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर केले असले तरी लॉ शाखेचे दोन पेपर एकाच दिवशी ठेवण्याची करामत विद्यापीठाने केली आहे. त्यामुळे लॉ चे विद्यार्थी चिंतेत असून, हे वेळापत्रक बदलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने निवेदनही दिले आहे.

पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार नेहमीच चर्चेत राहतो. यंदाही विद्यापीठाने लॉचे दोन पेपर एकाच दिवशी ठेवून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यापीठाच्या वेबसाईटवर आगामी परीक्षांचे वेळापत्रक जाहिर झाले असून, त्यात ही बाब उघड झाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष चिन्मय गाढे, महेश सोनवणे, अमोल सरोदे, दीपक भुसाळ आदींच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाच्या उपकेंद्राचे समन्वयक रावसाहेब शिंदे याची भेट घेतली. तसेच, यासंबंधीचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, विद्यापीठाने लॉच्या १२ वी नंतरच्या ५ वर्षांच्या अभ्यासक्रमांचे आणि पदवीनंतर ३ वर्षांच्या अभ्यासक्रमांचे एप्रिल-मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचा गेल्या सेमिस्टरचा राहिलेला पेपर आणि यंदाच्या सेमिस्टरचा पेपर हे दोन्ही एकाच दिवशी नियोजित करण्यात आले आहे. बीसीएल-४ या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाचे २८ एप्रिल रोजी ११ ते २ या वेळेत मागील सत्राचा फॅमिली-२ या विषयाचा ३ ते ६ या वेळेत न्यायतत्वशास्त्र असे दोन पेपर एकाच दिवशी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोघांपैकी एका विषयाचाच अभ्यास करता येणार आहे. तसेच, या दोन्ही विषयांपैकी एका विषयात तो विद्यार्थी अनुत्तीर्ण राहण्याची शक्यता आहे.

विद्यार्थींचे हे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पेपर एकाच दिवशी न ठेवता वेगवेगळ्या दिवशी ठेवावेत, अशी मागणी राविकाँने निवेदनात केली आहे. तसेच, याप्रकरणी विद्यापीठाचे

परीक्षा नियंत्रक अशोक चव्हाण यांच्याशी शिष्टमंडळाने दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. तसेच, त्यांच्याशी याप्रकरणी चर्चा केली. याची दखल घेऊन हे पेपर वेगवेगळ्या दिवशी नियोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

प्रतीक्षा अतिरिक्त जलद‍ रेल्वेची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

अनेक वर्षांनंतर सुरेश प्रभू यांच्या रुपाने महाराष्ट्रातील रेल्वे मंत्री लाभले आहेत. त्यामुळे आगामी रेल्वे बजेटमध्ये उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना नवीन रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा लागून आहे. यामध्ये खान्देशातील जळगाव-भुसावळकडे जाण्यासाठी सकाळी जलद रेल्वे गाडीची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार का, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी सर्वांत मोठे जंक्शन म्हणून भुसावळ रेल्वे स्टेशन ओळखले जाते. परंतु, असे असतांनाही उत्तर महाराष्ट्रात किंबहुना भुसावळकडे जाणाऱ्या मार्गावर काही मोजक्याच रेल्वेगाड्या थांबतात. मुंबईकडे जातांना किंवा मुंबईहून नाशिक-जळगावकडे येतांना बहुतांशवेळा प्रवाशांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. जलद धावणाऱ्या मोजक्या गाड्या सोडल्या तर प्रवाशांना रेल्वेच उपलब्ध नाही. मनमाड स्टेशनवरच जलद धावणाऱ्या गाड्या थांबतात. परंतु, पुढील नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव या महत्त्वाच्या स्टेशनवर बहुतांश जलद रेल्वे गाड्यांना थांबाच देण्यात आलेला नाही. तेथे जाणारे किंवा तेथून जळगाव, भुसावळ किंवा मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एखाद-दोन गाड्यांवरच अवलंबून राहवे लागते. यामध्ये पहाटे पाचला रेल्वे प्रशासनाने भुसावळ पॅसेंजरची व्यवस्था केली आहे. परंतु, या गाडीचीही वेळ जळगाव परिसरातील प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरत आहे. अनेकदा ही पॅसेंजर निघून गेल्यावर प्रवासी नाशिकरोड स्टेशनवर पोहचते. त्यामुळेच जळगावकडे ये-जा करण्यासाठी मुंबई ते भुसावळदरम्यान स्वतंत्र जलद रेल्वे गाडीची मागणी तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित आहे. परंतु, आतापर्यंतच्या रेल्वेमंत्र्यांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांच्या अपेक्षांची पूर्तता केलीच नाही. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्याने महाराष्ट्राच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी नवीन जलद एक्सप्रेस मिळण्याची आशा बाळगून आहेत.

रेल्वेचा प्रवास जीव टांगूनच

सद्यस्थितीत नाशिकहून मुंबईकडे असो वा भुसावळकडे रेल्वेने जातांना प्रवाशांना जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो. यात एक्सप्रेस गाड्यांमध्ये तर बसण्यासाठीच नव्हे तर व्यवस्थित उभे राहण्यासाठीही जागा मिळत नाही. त्यात सुटीच्या दिवसांमध्ये तर एक्सप्रेसने प्रवास करणे म्हणजे नरक यातनाच सहन करण्यासारखे आहे. अनेकदा रेल्वेत बसण्यासाठी जागा मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये संघर्ष होतात. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासाठी विशेषत: नाशिकसाठी किमान एक तरी स्वतंत्र रेल्वे मिळावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.







शहराची सुरक्षा ऐरणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेसारख्या अत्यंत वर्दळीच्या परिसरात सुयोजित हाईटस इमारतीच्या आवारात पेट्रोल बॉम्ब सापडल्याने नाशिकच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बॉम्ब नाशक पथकाने वेळीच दक्षता घेऊन तो निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला असली तरी येत्या काळात पोलिसांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे.

पोलिसांकडून सध्या ठिकठिकाणी मॉकड्रील सुरू आहे. गेल्या आठवड्यात त्र्यंबकरोडवरील एका शाळेत अतिरेकी घुसल्याचा बनाव रचत मॉकड्रील करण्यात आले होते. त्यावेळी तेथील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. शहरातील अन्य भागांतही यापूर्वी अशा प्रकारचे मॉकड्रील घेण्यात आले आहे. त्यामुळे आताही मॉकड्रीलच सुरू असल्याचे बहुतांश नागरिकांना वाटत होते.

पोलिस बॉम्ब निकामी करीत असताना तसेच परिसरातून दूर जाण्याचे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांकडून केले जात असतानाही बऱ्याच नागरिकांचा तेथे सहज वावर होता.

वाहतुकीचा फज्जा

ऐन वर्दळीच्या वेळी हा प्रकार घडल्याने राजीव गांधी भवन चौकात वाहतुकीचा खोळंबा झाला. सीबीएसपासून ते कॅनडा कॉर्नरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी चौकात धाव घेतली. नागरिकांच्या आणि वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुकीचा फज्जा उडाला.

वकीलवाडीत बेवारस बॅग

सुयो‌जित ट्रेड संकुलमधील बॉम्ब निकामी करतो न करतो तोच सायंकाळी एमजीरोड लगतच्या वकीलवाडी परिसरातही बेवारस बॅग आढळल्याची मा‌हिती बॉम्बशोधक पथकाला मिळाली. पथकाने घटनास्थळी धाव घेऊन कार्यवाही केली. मात्र, त्यामध्ये संशयादस्पद काहीच आढळून न आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पेट्रोल सारख्या ज्वालाग्राही पदार्थाचा वापर करण्यात आल्याने एक्सप्लोजिव्ह अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करीत आहोत. हा बॉक्स कोणी पाठविला असेल, त्यामागील कारणे काय आहेत, याचा शोध घेत आहोत.

- हेमंत सोमवंशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सरकारवाडा

आजपासून राष्ट्रीय प्रो उत्सव

$
0
0

के. के. वाघ पॉलिटेक्निकमध्ये आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

के. के. वाघ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रो उत्सव या राष्ट्रीय स्पर्धेला गुरुवारपासून (२६ फेब्रुवारी) प्रारंभ होत आहे. दोन दिवसीय स्पर्धेत विविध राज्यांमधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर होणार आहेत. या स्पर्धेचा 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर आहे.

इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन्स विभागाच्यावतीने प्रो उत्सवचे आयोजन केले जाते. विभागाच्या वैविध्यपूर्ण कामामुळेच दोन प्रकल्पांना आजवर २ पेटंटही मिळालेली आहेत. गेल्या १० वर्षांपासून प्रो उत्सवचे आयोजन केले जात असून, त्यात राष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रकल्प सादर होत असल्याचे विभागप्रमुख डॉ. बी. व्ही. गवळी यांनी सांगितले आहे. आजवर प्रो उत्सवमध्ये ११०० प्रकल्प, ४५०० विद्यार्थी आणि ८००० अभ्यागतांनी हजेरी लावली आहे. यंदाही ओडिशा, गोवा, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड अशा विविध राज्यातील कॉलेजेसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर होणार आहेत. एकूण ८० प्रकल्प प्रो उत्सवसाठी निवडण्यात आले असून, त्याचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर या दोन्ही क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती या प्रकल्पांचे परीक्षण करणार आहेत. विजेत्या प्रकल्पांना ५० हजारांहून अधिक किंमतीची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. गुरुवारी सकाली १० वाजता प्रो उत्सवचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, प्राचार्य प्रकाश कडवे, उपप्राचार्य बी. व्ही. गवळी आदी उपस्थित राहणार आहेत.

हे असेल आकर्षण

यंदाच्या प्रो उत्सवमध्ये माइंड कंट्रोल व्हीलचेअर, व्हॉईस ऑपरेटेड कार आणि त्रिमीतीय प्रिंटर हे प्रकल्प आकर्षण राहणार आहेत. अत्यंत कल्पकतेने हे प्रकल्प विद्यार्थ्यांनी तयार केले असून त्याची माहिती दिली जाणार आहे.

सिंहस्थात आपत्कालीन फ्युजन सेंटर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान आपत्काल‌ीन परिस्थितीत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसह वि‌विध विभागांच्या खाते प्रमुखामध्ये समन्वय रहावा यासाठी कमाडन्ट कंट्रोल सेंटर म्हणजेच फ्युजन सेंटर स्थापनच्या सुचना राज्यसरकारने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. गत कुंभमेळ्यातील चेगंराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूम‌ीवर दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ वाढविण्यासाठी या सेंटरचा उपयोग होईल, असे म्हटले जात आहे.

फ्युजन सेंटरमध्ये जिल्हाधिकारी, पोल‌सि आयुक्त, महापालिका आयुक्तांसह प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. निर्णायक स्थितीत हे सेंटर उपयुक्त ठरल्यास शाही मार्गावर झालेल्या चेंगराचेंगरीसारखे प्रकार घडणार नाहीत व घडल्यास तातडीने मदत काय करता येईल यासाठी संवादवाहिनी गरजेची होती. त्यातच यंदाच्या सिंहस्थावर घातपात, दहशतवाद व पुराचाही धोका आहे. त्यामुळे राज्यसरकार सुरक्षेच्या बाबतीत गंभीर असून आपत्काल‌ीन परिस्थिती हातळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखत आहे. आपत्काल‌ीन कक्षासोबत आता सिंहस्थाशी संबंध‌ति जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी व खाते प्रमुखामंध्ये समन्वय राहण्यासाठी परदेशातील फ्युजन सेंटरची कल्पना नाशिक सिंहस्थात वापरली जाणार आहे.

प्रांताला लाच घेताना अटक

$
0
0

महसूल विभागातील लिपिकही ताब्यात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव येथील झोडगे शिवारातील ८० गुंठे जागेला बिनशेतीची परवानगी देण्यासाठी पावणे तीन लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी सव्वा दोन लाख रुपये स्वीकारताना बुधवारी मालेगावचे उप‌विभागीय अधिकाऱ्यासह एका लिपिकाला अटक करण्यात आली आहे. मालेगाव उप‌विभागीय कार्यालयात बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

संदीप गुलाबराव पाटील असे त्या अधिकाऱ्याचे तर ज्ञानेश्वर शांताराम बागडे असे लिपिकाचे नाव आहे. तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावे झोडगे शिवार येथे दोन हेक्टर जमीन आहे. त्यापैकी ८० गुंठे जमीन त्यांना बिनशेती करायची होती. त्यासाठी त्यांनी १० फेब्रुवारी २०१३ रोजी अर्ज केला होता. बिनशेतीची परवानगी मिळावी यासाठी त्यांचा पाटील आणि बागडे यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र पाटील यांनी दोन लाखांची तर बागडे यांनी त्यासाठी ७५ हजार रुपयांची मागणी केली होती. एवढी रक्कम देणे शक्य नाही त्यामध्ये काही सवलत द्यावी अशी विनंती तक्रारदाराने दोघांना केली होती. त्यानुसार पाटील यांनी दीड लाख रुपयांत हे काम करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार बुधवारी सकाळी सापळा रचण्यात आला. पाटील यांच्यासाठी दीड लाख रुपये आणि स्वत:साठी ७५ हजार रुपये अशी सव्वा दोन लाखांची रोकड स्वीकारताना बागडे यास रंगेहाथ पकडण्यात आले.

सावरकर वाड्यात ‘वंदे मातरम्’

$
0
0

पुण्यतिथीनिमित्त सावरकर प्रेमींची जन्मस्थळाला भेट

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

'ने मजसी ने परत मातृभूमीला', 'अनादी मी अनंत मी', 'वेद मंत्राहून आम्हा वंद्य वन्दे मातरम्' अशा अनेकाविविध गीतरचनांमधून स्वातंत्र्याची ज्योत धगधगती ठेवणारे विनायम दामोधर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त भूगर येथील सावरकर वाड्यात सावकरप्रेमींनी आदरांजली अर्पण करण्यासाठी गर्दी केली.

स्वा. सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या वाड्यामध्ये आत्मार्पण दिनानिमित्त बागेश्री नाशिक व संस्कारभारती भगूर आयोजित 'अनादी मी अनंत मी' या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चारुदत्त दीक्षित, राजेंद्र सराफ, प्रज्ञा दणके, निवेदिता रहाणे, मृण्मयी कापसे, शर्वरी पद्मनाभी आदींनी कार्यक्रम सादर केला. यानिमित्त भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर यांचासह पुरातत्व विभागाचे अधिकारी श्रीकांत घारपुरे, रमेश कुलकर्णी, अमोल गोटे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष एकनाथ शेट्टे, राष्ट्रसेविका समितीच्या जिल्हाप्रमुख गीता कुलकर्णी, भाजपचे गिरीश पालवे, रामदास आंबेकर, पत्रकार संघाचे सुधाकर गोडसे, वंदे मातरम् समितीचे पदाधिकारी, डॉ. मृत्युंजय कापसे, तानाजी करंजकर, भगवान कटारिया, प्रवीण आडके, दीपक कणसे, बी. डी. करंजकर, विलास भालेराव, संजय निकम आदींनी सकाळी सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली. या आत्मार्पण दिनानिमित्त भगूर मधील सर्व शाळा व राज्यभरातून सावरकर प्रेमींचा ओघ दिवसभर चालू होता.


आज ‘जनस्थान’ सोहळा

$
0
0

ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यंदाचे मानकरी; कालिदास कलामंदिरात सोहळा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय साहित्यातील मानाच्या ज्ञानपीठ पुरस्काराचे प्रतिबिंब समजला जाणारा जनस्थान पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी (दि. २७) महाकवी कालिदास कलामंदिरात रंगणार आहे. दुपारी चार वाजता होणाऱ्या या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिला जाणार आहे. यंदाच्या पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अरुण साधू आहेत.

प्रतिष्ठानतर्फे होणाऱ्या या सोहळ्यात अध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार देण्याची प्रथा आहे. मात्र, यंदा मंत्रालयातून स्वत:हून विचारणा झाल्याने मुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत. त्यांची भाषणासाठी पूर्णवेळ उपस्थित असून त्यांनी या कार्यक्रमात रस दाखवल्याने संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच प्रतिष्ठाननेही कार्यक्रमात अमूलाग्र बदल घडवला असून पूर्वी सहा वाजता होणारा हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांना पूर्णवेळ थांबत‌ा यावे यासाठी दुपारी चार वाजताच सुरू होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक असतील.

कवी कुसुमाग्रज यांनी आपल्याल्या मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेतून जनस्थान पुरस्कार सुरू करण्याची सूचना केली होती. त्यानुसार हा पुरस्कार सुरू करण्यात आला. यंदा पुरस्काराचे १३ वे वर्ष आहे. जनस्थानला साहित्यविश्वात मानाचे पान असून एक लाख रुपये, सन्मानच‌िन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मराठी साह‌ित्यक्षेत्रात व‌िशेष कामग‌िरी करणाऱ्या आण‌ि महाराष्ट्राच्या सांस्कृत‌िक जीवनावर ठसा उमटव‌िणाऱ्या ज्येष्ठ साह‌ित्य‌िकाची प्रत‌िष्ठानच्या वतीने न‌िवड करण्यात येते. एक वर्षाआड हा पुरस्कार देण्यात येतो.

आजवर प्रदान करण्यात आलेल्या जनस्थान पुरस्काराच्या यादीमध्ये व‌िजय तेंडूलकर, व‌िंदा करंदीकर, इंद‌िरा संत, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगुळकर, श्री. ना. पेंडसे, मंगेश पाडगावकर, बाबुराव बागुल, ना. धों. महानोर, महेश एलकुंचवार आण‌ि भालचंद्र नेमाडे या द‌िग्गजांचा समावेश आहे. कुसुमाग्रजांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा पुरस्कार महाराष्ट्रात अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो.

पुरस्कारमूर्ती अरुण साधू यांचा परिचय

पत्रकारितेपासून सुरू झालेली अरुण साधू यांची कारक‌ीर्द स्तंभलेखक, कथाकार, कादंबरीकार, व‌िज्ञानलेखक, इत‌िहास लेखक म्हणूनही पुढील कालावधीत बहरत गेली. नागपूर येथे झालेल्या ८० व्या अख‌िल भारतीय मराठी साह‌ित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषव‌िले होते. १९७२ मध्ये त्यांनी ल‌िहिलेली 'मुंबई द‌िनांक' आण‌ि १९७७ मध्ये ल‌िहिलेली 'स‌िंहासन' या दोन कादंबऱ्यांनी मराठी समाज मनावर व‌िशेष प्रभाव टाकला. याबरोबरच 'सत्तांध', 'बह‌िष्कृत', 'व‌िप्लवा', 'मुखवटा', 'त्र‌िशंकू' आदी सामाज‌िक व वैज्ञान‌िक कादंबऱ्यांनीही साह‌ित्य वर्तुळाचे लक्ष वेधले होते.

विद्यार्थिनींना सुरक्षेचे धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

विद्यार्थिनींना शाळेत जातांना किंवा घरी परततांना रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी सातपूर येथील जनता विद्यालयात सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे यांनी विद्यार्थिनींना सुरक्षेची काळजी घेण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच रस्त्यावर कुण्या व्यक्ती किंवा रोडरोमिओचा त्रास झाल्यास तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात कळविण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुलींनी शाळेत येता-जातांना संशयास्पद कुणी आढळल्यास त्याची माहिती शाळेत दिली पाहिजे. तसेच रोजच्या शाळेच्या वेळात रोड रोमिओंकडून होणाऱ्या त्रासाबाबतची माहिती तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात कळविली पाहिजे. कुणाच्या धाकापोटी मुलीने तिच्यावर होणारा अन्याय लपविल्यास त्रास देणार जास्तच प्रबळ होत असतो. यासाठी कुठेही वाईट प्रकार निर्दशनास आल्यास त्याबाबत शाळेला किंवा पोलिसांकडे माहिती कळविली पाहिजे. याबाबत गुप्तता पोलिसांकडून ठेवली जाणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले.

मुलींनी देखील स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे. तसेच चुकीचा व्यक्तीची माहिती पोलिसांकडे तत्काळ देता येईल याबाबत मुलींनी सर्तकता बाळगली पाहिजे, असे गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक हेमंत सावंत, माधवी वाघ, एस. यू. कोकणी, आर. सी. भोसले, मुख्याध्यापक बाळासाहेब पवार यांसह विद्यार्थींनी उपस्थित होत्या.

कारागृह कृषी उत्पादनात अव्वल

$
0
0

फणिंद्र मंडलिक

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहाने राज्यात शेती उत्पादनात प्रथम क्रमांक मिळविला आहे. भौगोलिक क्षेत्र कमी असूनही उत्पादनात प्रथम क्रमांक मिळवणारे राज्यातले हे एकमेव कारागृह आहे या कारागृहात तयार होणारा भाजीपाला राज्यातील इतर कारागृहात पाठविण्यात येत असून त्यामुळे सरकारची रोजची १ ते दीड लाखाची बचत होत आहे. नाशिकरोड कारागृहाने या वर्षी अन्नधान्य उत्पादनाच्या माध्यमातून खर्च वजा जाता ३५ लाख रुपये कमविले आहे. कारागृहाला महाराष्ट्र सरकारकडून नुकतेच गौरविण्यात आले.

नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारगृहात विविध वस्तूंचे उत्पादन होत असते त्यात प्रामुख्याने शेती व्यवसायाचे उत्पादन अधिक आहे. कारागृहाच्या परीसरात एकशे दहा एकर शेती असून त्यात विविध प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्यांचे उत्पादन होत असते. या ठिकाणी पालेभाज्यांमध्ये पालक, राजगिरा, तांदुळका, मेथी, शेपू, कांदेपात, कोथंबीर, कडीपत्ता, करडई या भाज्यांचा समावेश आहे तर कांदा, बटाटा, मुळा, बिट, सलगम, नवलकोल, कोबी, टमाटे, दुधी भोपळा, गवार, गिलके, भेंडी, मिरची या भाज्याचे प्रमुख उत्पादन होत असते. नाशिकरोड कारागृह हे स्वत:ची गरज भागवून दुसऱ्या कारागृहाची गरज भागवत आहे. मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह या कारागृहांची भाजीपाल्याची गरज भागवून स्वत: स्वयंपूर्ण आहे. कारागृह परीसरात गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून पिकविण्यात येणारे गहू राज्यातील कारागृहांमध्ये वितरीत करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी पिकविण्यात येणारा कांदा, बटाटेही कारागृहांची गरज भागवितात.

मनपाला लुबाडणाऱ्यांवर खटला

$
0
0

नुकसान भरपाईसाठी स्पीक कंपनीला खेचले न्यायालयात

विनोद पाटील, नाशिक

यंत्रणेतील लिकेजचा गैरफायदा घेवून महापालिकेला लुबाडणाऱ्या खाजगी ठेकेदारांसह कंपन्या विरोधात महापालिका आक्रमक झाली आहे. स्पीक सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीच्या अपूर्ण कामामुळे आठ वर्षापासून मिळकत करापासून वंचित असलेल्या महापालिकेने आता या कंपनीला थेट न्यायालयात खेचण्याची तयारी सुरू केली आहे.

महापालिकेच्या वतीने शुक्रवारी ७० कोटीच्या नुकसान भरपाईचा दावा नाशिक न्यायालयात दाखल केला आहे. महापालिकेला लुवबाडणाऱ्या ठेकेदार आणि कंपन्याचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असून कर्मचाऱ्यांना वेतनाव्य‌तिरिक्त विकासकामे ठप्प आहेत. सिंहस्थाचे दायित्व आल्याने महापालिकेची आर्थिक अवस्था डामाडोल आहे. गत काळात प्रशासनासह सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलेल्या चुकीच्या कामांचा आणि कराराचा फटका महापालिकेला बसला आहे. खत प्रकल्प, एलईडी, फाळके स्मारक, पेलिकन पार्क संदर्भात चुकीचे करार करण्यात आल्याने महापालिकेला ठेकेदांराना जास्तीचे पैसे द्यावे लागलेत आहेत. त्यामुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटकाही बसला आहे.

नव्या आयुक्तांनी मात्र असे चुकीचे करार शोधून त्यांच्या विरोधात आता थेट न्यायालयीन लढाईच सुरू केली आहे. त्याचा पहिला दणका महापालिका हद्दीतल्या मिळकतींचा सर्व्हेक्षणासाठी नियुक्त केलेल्या हैद्राबाद स्थित स्पीक सिस्टीम्स लिम‌टिेड या कंपनीला बसला आहे. या कंपनीला २००७ मध्ये शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचे काम दिले होते. यासाठी कंपनीला चार कोटी रुपये अदाही करण्यात आले होते. मात्र संबंधित कंपनीने त्रुटीचा फायदा घेत अर्धवट काम सोडून पोबारा केला. वारंवार स्मरणपत्रे देऊनही कंपनीने सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे स्थायी समितीने या कंपनीला सन २०१३ मध्ये ब्लॅकलिस्ट केले होते. त्यासंदर्भातील नोटीसही पालिकेने बजावली होती.


इतर ठेकेदारांना बसणार चाप

आतापर्यंत महापालिका ठेकेदारांसह खाजगी कंपन्याना पोसण्याचे काम करीत होती. पेलिकन पार्कसह कमानीच्या कंत्राटामध्ये महापालिकेविरोधात ठेकेदार न्यायालयात गेल्याने कोट्यवधी रुपये ठेकेदारांनाच भरपाई द्यावी लागणार आहे. मात्र, महपालिकेच्या इतिहासात प्रथमच महापालिका एखाद्या ठेकेदाराला नुकसान भरपाईसाठी न्यायालयात खेचत आहे. महापालिकेतर्फे अशा चुकीच्या करारांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधातही न्यायालयात जाण्याची चाचपणी सुरू केली आहे.


मेक इन हेल्थहब नाशिक!

$
0
0

रमेश पडवळ, नाशिक

देशातील दिग्गज साखळी हॉस्प‌िटल्स, मल्टी आणि सुपरस्पेशालिटी हॉस्प‌िटल्स व तज्ज्ञांच्या मांदियाळीमुळे नाशिकने आरोग्य सुविधांबाबत देशातील उदयोन्मुख शहरांमध्ये प्रवेश करण्याचा बहुमान मिळविला आहे. प्राचीन काळापासून दुर्मिळ वनऔषधीसाठी प्रसिद्ध असलेले नाशिक आता दुर्मिळ शस्त्रक्रियांमुळे जगभरात दबदबा निर्माण करीत आहे. शहरातील स्पेशालिस्ट डॉक्टरांमुळे देश-परदेशातील पेशंटचा नाशिककडे ओढा वाढला आहे. त्यामुळे नाशिकला हेल्थहब हा नावलौकिक मिळवून देण्याच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू झाली आहे.

नाशिकचा आरोग्य क्षेत्रात झपाट्याने विकास होत असून, दुर्मिळ शस्त्रक्रियांमुळे वैद्यकीय क्षेत्राकडून शहरातील स्पेशालिस्ट डॉक्टारांची दखल घेतली जात आहे. गेल्या काही वर्षात शहरात असाध्य अन् संशोधनाला चालना देणाऱ्या शस्त्रक्रिया शहरात यशस्वीरित्या पार पडल्या. यामुळे उपचारच नव्हे तर एज्युकेशन व रिसर्च इन्स्ट‌िट्यूट म्हणूनही नाशिकमधील हॉस्प‌िटल्स नावलौकिक मिळवित आहेत. क्युरी मानवता कॅन्सर सेंटरचे संचालक डॉ. राज नगरकर यांनी एका पेशंटवर नुकतीच केलेली रॅडीकल हेमॅटेक्टोमी ही जगातील पहिली शस्त्रक्रिया असल्याचा दावा केला जातो. या शस्त्र‌क्रियेमुळे काविळ असतानाही एखादी शस्त्रक्रिया होऊ शकते हे त्यांनी सिद्ध केल्याने त्यांच्या या शस्त्रक्रियेची दखल जगभरातून घेतली जात आहे.

डॉ. इंदोरवाला हॉस्प‌िटलमध्ये महाराष्ट्रातील पहिली बाहा इम्पलांट शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील बाहा इम्पलांटची गरज असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पीआरपी (प्लेटलेट रीच प्लाझमा) उपचारासाठी खेळाडूंना पुणे-मुंबईकडे जावे लागत होते. डॉ. मिलिंद पिंपरीकरांनी ही सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध केल्याने खेळाडूंनाही त्यासाठी इतरत्र धाव घ्यावी लागणार नाही. अपोलो हॉस्प‌िटलचे कार्डीयाक सर्जन डॉ. अभयसिंग वालिया व कार्डीओलॉजिस्ट डॉ. सुधीर शेतकर यांनी हृदयाची गुंतागुंतीची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने आता अशा शस्त्रक्रियांसाठी परदेशात जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. तर गुडघा बदलीच्या सर्जरीसाठी अपोलोने मिनीमली इन्वेसिव नेव्ह‌िगेशन टेक्नॉलॉजीचा वापर सुरू केल्याने शस्त्रक्रियेत तंत्रशुद्धता आणली आहे. डॉ. देवदत्त चाफेकरांनी नेफ्रोप्लसचे पहिले सेंटर शहरात सुरू करून डायलेसिस घेणाऱ्यांना दिलासा दिला आहे.

वोक्हार्ट हॉस्प‌िटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल कैचे हे कोरोनरी आर्ट बायपास ग्राफिंग प्रकारची शस्त्रक्रिया करणारे भारतातील दुसरे तज्ज्ञ ठरले आहेत. तर याच हॉस्प‌िटलने टीबीचा संसर्ग असलेल्या महिलेवर गुडघा प्रत्यारोपन करून दुर्मिळ शस्त्रक्रियेचा मान मिळविला आहे. डॉ. जी. बी. सिंग यांनी फुप्फुसाच्या आजारावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. सोपान हॉस्प‌िटलचे डॉ. संजय वराडे यांनी पक्षाघातावर प्रभावी उपचार पद्धती शहरात उपलब्ध केली आहे. तर लोटस हॉस्प‌िटलचे डॉ. प्रीतेश जुनागडे यांनी बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट सुविधा देशविदेशातील पेशंटला शहरात उपलब्ध करून दिली आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नलिनी बागुल यांनीही अॅनिमिओ पॅच शस्त्रक्रिया यशस्वी केली होती. नाशिकमधील सिव्ह‌िल व सुपर स्पेशालिटी हॉस्प‌िटलनेही दुर्बिणीच्या साहाय्याने परक्युटँनिअस नेफ्रलिथोटॉमी (पीसीएनएल) ही अवघड व दुर्मिळ शस्त्रक्रिया नाशिकचा वैद्यकीय क्षेत्रातील दबदबा वाढविल्याने नाशिक आता हेल्थहबच्या दिशेने झेपावत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.






.अन् त्यांनी जिंकले परिस्थितीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोघांच्या घरात अठरा विश्वे दारिद्रय... एकवेळच्या जेवणाची भ्रांत... दहा बाय दहाची चंद्रमोळी झोपडी... दोघांचे आई-वडील हातमजूर... घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नाही. अशातही अशिक्षित आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी असंख्य अडचणी सहन केल्या. मुलंही त्यांच्या विश्वासाला पात्र ठरली. मुकेश व सागर दोन्ही अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहेत. दोघांना कॅम्पस मुलाखतीत अनुक्रमे वार्षिक ७.५० व ४.५० लाख पॅकेजच्या नोकऱ्या प्राप्त झाल्या. मुकेश व सागरचे हे दैदिप्यमान यश पाहून आई-वडील, गुरुजन मित्र, आप्त व सहकारी यांना अभिमान वाटत आहे.

नाशिकमधील के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी पदवीच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षणारा मुकेश भारसाकळे मुळचा अकोल्याचा. दहा बाय दहाच्या घरात त्याचे आई-वडील राहतात. दोन्हीही हातमजुरी करतात. मुकेशला एक भाऊ व बहीण असून ते दोघेही उच्च शिक्षण घेत आहेत. मुकेशचे दहावीपर्यंत शिक्षण अकोला येथेच झाले. दहावीला ७८ टक्के गुण प्राप्त केल्यावर त्याने अकोला येथे कम्प्युटर डिप्लोमा केला. शिक्षणासाठी आई-वडिलांना सावकारी कर्ज काढावे लागले. पुढे त्याला के. के. वाघ संस्थेत अभियांत्रिक‌ीसाठी (कॉम्प्युटर) प्रवेश मिळाला. मात्र, राहण्याचा प्रश्न होताच. आडगाव येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलां-मुलींच्या शासकीय वसतिगृहात गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळाला. यामुळे निवास व भोजनाचा प्रश्न मार्गी लागला. मुकेशने नव्या जोमाने अभ्यास करत चांगले गुण प्राप्त केले. शेवटच्या वर्षी कॅम्पस मुलाखतीत त्याला पुण्याच्या निवडिया (NIVDIA) या कंपनीत वार्षिक ७.५० लाखांचे पॅकेज प्राप्त झाले. महाविद्यालयात त्याच्या एकट्याचीच निवड झाली हे विशेष.

सागर तानाजी चुंगे हा के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकलच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. तुळजापूरमधील वडगाव (काटी) हे त्याचे मूळ गाव. त्याचेही आई-वडील दोघेही शेतमजूर आहेत. सागरचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदच्या शाळेत झाले. दहावीत ८९ टक्के गुण मिळवून तो केंद्रात प्रथम आला. त्याला शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर येथे तीन वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. पदविकेमध्ये ८५ टक्के गुण प्राप्त केल्यानंतर के. के. वाघ महाविद्यालयात प्रवेश मिळाला. अभियांत्रिकीच्या पदवीसाठीची फी भरण्यास त्याच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी मदत केली. सागरची कॅम्पस मुलाखतीत जिंदाल स्टील वर्कस् लिमिटेड, रायगड या कंपनीत वार्षिक ४.५० लाख रुपयांच्या पॅकेजसाठी निवड झाली आहे.





रुद्राक्षांचे कलम यशस्वी!

$
0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

द्राक्ष नगरी असलेल्या नाशिक आता दुर्मिळ अशा रुद्राक्षाच्या झाडांचे कलम यशस्वी झाले आहे. नाशकात पाच तर त्र्यंबकेश्वरमध्ये केवळ एक रुद्राक्षांचे झाड असून रुद्राक्षांचे कलम करण्यासाठी इंजिनीअर अविनाश शिरोडे यांनी अथक प्रयत्न केले. आता या यशामुळे रुद्राक्ष झाडांची संख्या नाशिक शहर परिसरात वाढण्याची चिन्हे आहेत.

कैलास मानससरोवर यात्रेदरम्यान शिरोडे यांना नेपाळ येथील सूत गिरणीच्या कारखानदारांनी १९९६ मध्ये रुद्राक्षाची ११ रोपे भेट दिली होती. त्यातील पाच रोपे यांनी नाशिक येथील औरंगाबाद नाका परिसरातील घराच्या आवारात लावली. तर उर्वरित सहा रोपे त्यांनी नातेवाईक व मित्रांना दिली. मात्र, ही सहा रोपे जगू शकली नाहीत. तर शिरोडे यांच्याकडील पाचही रोपे अतिशय डेरेदार आहेत. या झाडांना कुठलेही औषध किंवा खत देण्यात आले नाही. केवळ पुरेसे पाणी देण्यात आले. रुद्राक्षांची आणखी झाडे असावीत या उद्देशाने शिरोडे यांनी वारंवार विविध प्रयोग करून पाहिले.

रुद्राक्ष जमिनीत टाकणे, फांदी पुरणे, पाने, फुले यांच्यासह विविध प्रयत्न त्यांनी केले. त्यात यश आले नाही. अखेर त्यांनी इंटरनेटवर कठीण कवचाच्या फळांबाबत माहिती वाचली. त्यानुसार त्यांनी एअर लेइंग टेक्निक (गुटी कलम) करण्यात निश्चित केले. त्यासाठी त्यांनी स्थानिक कृषी तज्ज्ञांचाही सल्ला घेतला. त्यानुसारच त्यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये तीन झाडांच्या फांद्यावर ३५ गुटी कलम केले. त्यानंतर ते दररोज या कलमाचे निरीक्षण करू लागले. कलमात बांधलेल्या शेवाळातून प्लास्टिकच्या आवरणातून पांढऱ्या-पिवळ्या रंगाची दाठ व नंतर मुळे दिसू लागली. मात्र, दोन महिने झाली तरी त्यात कुठलाही विकास होत नव्हता. शेवाळे सुकले असेल म्हणून काही कलमांना इंजेक्शनद्वारे पाणी देवून पाहिले. अखेर ६०-६२ दिवसानंतर काही ठिकाणी पिवळी गाठ दिसायला लागली आणि शिरोडे यांची आशा जागृत झाली. ३५ पैकी १२ कलमे सुकली पण उर्वरित कलमांच्या ठिकाणी मुळे विकसित होत असल्याचे पहायला मिळाले. अखेर ८१ दिवसांनी २३ कलमे झाडापासून कापली आणि त्यांचे पिशवीत रोपण केले. सुरक्षित वातावरणात ती वाढावी यासाठी ती पॉलिहाऊसमध्ये ठेवण्यात आली. योग्य ती काळजी घेतल्यानंतरही ५ रोपे सुकल्याचे डिसेंबरमध्ये आढळून आले. उर्वरित १८ रोपांपैकी ३ रोपेही काही दिवसांनी सुकली. त्यामुळे आणखीनच तणाव निर्माण झाला. आता १५ रोपांनी चांगले बळसे धरले असून त्यांना आता पानेही फुटली आहेत. त्यामुळे येत्या काळात रुद्राक्षांची झाडे नाशकात वाढण्याचा विश्वास निर्माण झाला आहे.


नाशिकचीही झोळी रितीच

$
0
0

कोणतीही नवीन गाडी नाही; 'व्यवस्था' बदलण्यावर रेल्वेमंत्री प्रभूंचा भर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कोणत्याही नव्या गाड्यांची घोषणा न करता मूलभूत सेवा सुधारण्यावर भर दिला असून सर्वेक्षण करूनच नव्या गाड्या सुरू केल्या जातील, असे सांगितले आहे. कोणत्याही प्रदेशाला झुकते माप न देता व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी उचललेले योग्य पाऊल असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

रेल्वे अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राच्या वाटेला काही मिळाले नाही. यंदा सिंहस्थामुळे नाशिकच्या पदरात काही तरी मिळेल अशी अपेक्षा होती; परंतु तीही फोल ठरली. यंदाच्या रेल्वे बजेट मध्ये ९ गाड्यांचा वेग ताशी ११० ते १३० किलोमीटरवरून ताशी १६० ते २०० किलोमीटर एवढा करणार असून त्यामुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे. तसेच प्रवास करतांना काही अडचण आल्यास रेल्वेची १३८ क्रमांकाची हेल्पलाईन ग्राहकाभिमुख कशी होईल व तिची वापर कसा चांगल्या पध्दतीने करता येईल यावर भर दिला जाणार आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रक्षक नसलेल्या मानवविरहीत रेल्वे क्रॉसिंगवर ऑडियो-व्हिज्युअल अलार्म बसवण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आहे. आरक्षणातील भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी प्रवाशांना १२० दिवस आधी आरक्षण करण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच पेपरलेस तिकीटसेवा, गाडी आगमन-प्रस्थानाबाबत SMS अलर्ट, या सुविधांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

दर्जा सुधारावर भर

लोकप्रिय आणि महत्त्वाच्या गाड्यांचा वेग वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. अर्थसंकल्पात नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रदेशाला झुकते माप दिले असे कुणालाही म्हणता येणार नाही. अनेक रेल्वे स्टेशनवर अस्वच्छता असते, त्या करता स्टेशनांवरील स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारणार असून ठिकठिकाणी बायो टॉयलेटची व्यवस्था करण्याची योजना तयार करण्यात येणार आहे. रेल्वे स्वच्छतेवर आणि रेल्वे खानपान सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी काही खासगी कंपन्यांची मदत घेतली जाणार असल्याचे सुतोवाच प्रभू यांनी केले आहे.

योजना खर्चात

दुपटीने वाढ

रेल्वे स्टेशनवर वाय-फाय सेवेचा विस्तार करणार असल्याने त्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्यात येणार आहे. कोकण रेल्वेमध्ये ५० हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच रेल्वेचा योजना खर्च दुपटीने वाढवणार असून यंदा ५२ हजार कोटींवरून १ लाख ११ हजार कोटींवर जाणार आहे.

महाराष्ट्राच्या वाट्याला निराशा

केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्प महाराष्ट्राची घोर निराश झाली आहे. रेल्वेला सर्वाधिक महसूल महाराष्ट्रातून मिळतो. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती. केंद्रातील रेल्वेमंत्री महाराष्ट्रातील असल्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेसाठी व महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी झुकते माप मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र ती साफ फोल ठरली आहे.

- छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री



बुलेट ट्रेनला हिरवा कंदिल

महाराष्ट्रातील वर्धा-नागपूर तिसऱ्या मार्गासाठी लवकरच नवी योजना अमलात येणार आहे. आर्थिक राजधानी मुंबईपासून ताशी २०० किलोमीटर वेगाने ट्रेन धावणार असून २०१५ च्या मध्यापर्यंत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसंदर्भात अहवाल सादर करण्यात येणार आहे. अपंगांसाठी व्हिलचेअरचं बुकिंग ऑनलाइन करता येणार ६ हजार ६०० किलोमीटर ट्रॅकचं तातडीनं विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

‘स्थायी’वर आठ सदस्यांची निवड

$
0
0

मनसेचे चार, राष्ट्रवादीचे तीन, तर काँग्रेसच्या एका सदस्याची वर्णी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शुक्रवारच्या विशेष महासभेत स्थायी समितीच्या रिक्त होणाऱ्या आठ नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. गटनेत्यांनी नावे दिल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी महासभेत नूतन सदस्यांच्या नावांची घोषणा केली. दरम्यान, स्थायीच्या विद्यमान पाच सदस्यांनी कार्यकाल कमी केल्यावरून आपल्याच पक्षाविरुद्ध बंडाची भूमिका घेतली आहे.

स्थायी समितीच्या या रिक्त होणाऱ्या आठ जागांवर नव्याने सदस्य निवडीसाठी शुक्रवारी महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत निवड करण्यात आली. मनसेचे चार, राष्ट्रवादीचे तीन तर काँग्रेसच्या एका सदस्यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीसाठी सदस्यामंध्ये मोठी चुरस होती. गटनेत्यांनी आपापल्या पक्षांची नावे सुचविल्यानंतर महापौरांनी नावांची घोषणा केली. मनसेच्या वतीने नगरसेवक अनिल मटाले, सर्वाधिक चुरस असलेल्या काँग्रेसच्या एकमेव जागेवर नगरसेविका विमलताई पाटील यांना संधी देण्यात आली आहे.

पाच सदस्यांचे पक्षाविरुद्ध बंड

दरम्यान, इतर सदस्यांनाही स्थायीवर संधी मिळावी यासाठी शिवसेना, मनसे व शहर विकास आघाडीने सदस्यांचा एक वर्षाचा कालावधी निश्चित करून उर्व‌रित सदस्यांचे राजीनामे घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे स्थायीतील उर्वरित आठ सदस्यांची धाकधूक वाढली असून, यातील पाच सदस्यांनी थेट पक्षालाच आव्हान देण्याचे ठरविले आहे. मनसेच्या सविता काळे, शिवसेनेच्या वंदना बिरारी, सचिन मराठे, अपक्ष आघाडीचे पवन पवार आणि रिपाइंचे सुनील वाघ यांनी नगरसचिवांना पत्र दिले असून, आमच्या सहमतीशिवाय राजीनामे स्वीकारू नये, अशी मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेना, मनसे आणि रिपाइं समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. स्थायीवर दोन वर्षासाठी सदस्यांची नियुक्ती केली जाते. मात्र नियुक्तीच्या वेळेसच गटनेत्यांकडून सदस्यांचे राजीनामे घेवून ठेवले जातात. पक्षाला गरज वाटल्यास परस्पर या सदस्यांचे राजीनामे सादर केले जातात. मात्र, या सदस्यांनी आपल्याला दोन वर्षाचा कार्यकाल मिळावा यासाठी हट्ट धरला आहे. या पक्षांनी इतर सदस्यांना संधी देण्याच्या हेतून कार्यकाल एकच वर्षाचा ठरवला आहे. त्यामुळे पक्ष आणि सदस्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

नवनियुक्त सदस्य

अनिल मटाले, रत्नमाला राणे, संगीता गायकवाड, यंशवंत निकुळे (सर्व मनसे), शिवाजी चुंभळे, नीलिमा आमले आणि छाया ठाकरे (राष्ट्रवादी), विमल पाटील (काँग्रेस).

निवृत्त होणारे सदस्य

मनसेचे राहुल ढिकले, शीतल भामरे, अर्चना थोरात, दीपाली कुलकर्णी, काँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे, 'राष्ट्रवादी'च्या शोभा आवारे, राजेंद्र महाले,

रुपाली गांवड.

अंबड लिंकरोडवर कसरत

$
0
0

रस्ता रुंदीकरणात वाहनांमुळे खोळंबा

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

शहरात होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर महापालिकेकडून सर्वच प्रमुख रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामध्ये अंबड लिंकरोडवरील रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांचा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे रुंदीकरणात रस्त्यावरील उभ्या वाहनांमुळे चालकांना कसरत करत वाहने न्यावी लागत आहेत. त्यामुळे महापालिका व पोलिस प्रशासनाने रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या या वाहनांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

महापालिकेत अनेक वर्षांपासून अंबडलिंकरोडवरील अनधिकृत भंगार मार्केटचा विषय गाजत आहे. यात महापालिकेने अंबडलिंकरोडचे रुंदिकणारचे काम जोमाने हाती घेतले आहे. परंतु, सद्या अंबड लिंकरोडवरून प्रवास करतांना वाहनचालकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. याचे कारण म्हणजे महापालिकेने हाती घेतलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणात अनेक ठिकाणी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. त्यातच अनधिकृत भंगार मार्केटच्या व्यावसायिकांनी वाहने उभ्या राहणाऱ्या जागेवर भंगाराचे साहित्य ठेवले आहे. यामुळे रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करत वाहने चालवावी लागतात. यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाने रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी कामगार व उद्योजकांनी दिली आहे.

महापालिका अनधिकृत भंगार मार्केट हटविण्यात अपयशी ठरले आहे. महापालिकेने आता अंबडलिंकरोड रस्ता रुंदिकरणाचे काम हाती घेतले आहे. निम्यांहून अधिक रस्त्याचे रुंदिकरण झाले आहे. परंतू आता रुंदीकरणात रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे अडथळा निर्माण होत आहे. याकडे महापालिका व पोलिस प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.

- व्हिनस वाणी, संचालक, निमा

सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींना जोडणारा महत्त्वाचा अंबड लिंकरोड आहे. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. परंतु, भंगार मार्केटच्या व्यावसायिकांची वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने यावर कारवाई केली पाहिजे.

- दिनेश बच्छाव, वाहनचालक

रिंगरोडची अवस्था विद्रुप

सातपूर आणि अंबड या दोन्ही औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या अंबडलिंकरोड या रिंगरोडची विद्रुप अवस्था झालेली आहे. यात अनधिकृत भंगार मार्केटमधील व्यावसायिकांनी भंगाचे साहित्य रस्त्यांच्या कडेला ठेवलेले असते. यामुळे अनेकदा देश, विदेशातून येणाऱ्या उद्योजकांना अंबडलिंकरोडवरून जातांना वेगळ्याच नाशिकचे दर्शन होते. अनधिकृत भंगार मार्केट महापालिका प्रशासन हटवणार कधी असा सवाल उद्योजक उपस्थित करतात. अनधिकृत भंगार मार्केट हटल्यास येथील जागेवर सुंदर रहिवाशी वसाहत निर्माण केली जाऊ शकते. यासाठी महापालिकेने अनधिकृत भंगार मार्केट काढण्याची मागणी उद्योजकांकडून केली जात आहे.

वक्फच्या सीईओंना हटवणार नाही

$
0
0

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; वक्फ विश्वस्तांचे सरकराला साकडे

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

राज्य वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सय्यद एजाज हुसेन यांनी घेतलेल्या वक्फ बोर्ड हिताच्या निर्णयांमुळे भूखंड माफियांच्या हस्तक्षेपास पायबंध बसला. यामुळे संतापलेल्या माफियांनी सय्यद यांना हटविण्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे. मात्र, सय्यद यांना वक्फ बोर्डवरून सय्यद यांना दूर केले जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

वक्फ बोर्ड सीईओ पदावरून सय्यद यांना हटविण्यासाठी भूखंड माफियांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्यासह बोर्डातील काही समस्यांकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून सय्यद यांनी बदलीसाठी अर्ज केला होता. भूखंड माफियांची वक्फ बोर्डाच्या मिळकती आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनींवर डोळा आहे. त्यांच्या वारंवार होणाऱ्या हस्तक्षेपाला सय्यद यांनी चाप बसविला होता. त्यामुळे भूखंड माफियांसह बोर्डाच्या काही सदस्यांची कोंडी झाली. यामुळे अशा उपद्रवी मंडळींकडून सय्यद यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. यासंदर्भात 'मटा'ने वृत्त देत सद्यस्थिती उघडकीस आणून दिली.

राज्यातील वक्फ मिळकतधारक, वक्फ विश्वस्त व मुस्लिम धर्मगुरुंनी वक्फ हिताचे निर्णय घेणाऱ्या सय्यद यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला हटवू नये, अशी मागणी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची मुंबईत जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. वक्फ बोर्डाचे सीईओ सय्यद यांना पदावरून हटविले जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी औकाफ बचाव समितीच्या शिष्टमंडळाला दिले. प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठीशी माझे सरकार असल्याचा दावाही त्यांनी केला. सीईओ सय्यद यांच्या बदलीच्या विनंती अर्जावर निर्णय घेत राज्य सरकारने त्यांची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात न्यायाधिश म्हणून बदलीचे आदेश काढले होते; मात्र नंतर मुस्लिम वक्फ विशवस्तांच्या भावना बघता सय्यद यांना सीईओ म्हणून पदमुक्त करण्यात आले नाही.

'मटा'ने एका प्रामाणिक अधिकाऱ्यावर होत असलेल्या अन्याय संदर्भातील वृत्त प्रसिध्द करून भूखंड माफियांच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेत सीईओ सय्यद यांना हटविणार नसल्याचे स्पष्ट केले.

- शेख शाकीर अब्दुल शकुर,

कनव्हीनर औकाफ बचाव अक्शन कमिटी, मालेगाव

कंपनीने चोरले शेतकऱ्याचे पाणी

$
0
0

वणी पोलिसांत गुन्हा दाखल

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

लखमापूर शिवारातील एका कंपनीने धरणातून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला छिद्र पाडून पाणी चोरल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्याने वणी पोलिसांत केली आहे.

लखमापूर येथील प्रकाश दत्तात्रय देशमुख यांनी वणी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार देशमुख यांची १९९८ पासून ओझरखेड धरणातून शेतीला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन आहे. या पाइपलाइनमधून येणाऱ्या पाण्याचा दाब सन २०१० पासून खूप कमी झाला. या प्रकरणी पाण्याचा पंप बदलून सुद्धा पाण्याचा दाब वाढला नाही. नंतर ठिकठिकाणी खड्डे खोदून पाइपलाइनचा दाब तपासून बघीतला. परंतु, हेग्जागाॅन प्रा. लि. या कंपनीच्या आवारात खड्डा करून बघीतले असता त्या ठिकाणी पाइपलाइनच्या खालच्या बाजुने छिद्र पाडून नळीने पाणी चोरी झाल्याचे निदर्शनास आलेे. या संदर्भात कंपनी प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी कंपनीने पाणी चोरी केली म्हणून शेतीचे उत्पन्‍न घटले, अशा आशयाचा तक्रार अर्ज कंपनी प्रशासनाविरुद्ध वणी पोलिसांत प्रकाश देशमुख यांनी दाखल केला आहे. या तक्रार अर्जावरून चौकशी करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे वणीचे पोलिस निरीक्षक मिलिंद खोडवे यांनी सांगितले.

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images