Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

घडवूया स्मार्ट सिटी!

$
0
0

>> पियुष सोमाणी

मागील ४-५ वर्षांत नाशिकसाठी विशेष आनंदाची अशी कुठलीही बातमी आली नाही. किंबहुना गेली कित्येक महिने तयार असलेले विमानतळ मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे सुरू होवू शकलेले नाही. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रोजेक्टमधून नाशिकचे नाव वगळण्यात आले आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉरमधून सुध्दा नाशिक शहराला वगळून औरंगाबादला प्राधान्य देण्यात आले. नाशिकमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे हा प्रोजेक्ट होवू शकत नाही, असे कारण MIDC ने केंद्र सरकारला दिले आहे. त्यामुळे नाशिकला येवू घातलेले दोन्ही प्रोजेक्ट्स, DMICDC आणि स्मार्ट सिटी, शेंद्रा-बिडकीन, औरंगाबाद येथे वळविण्यात आले. मराठवाड्यात आधीच पाण्याचे दुर्भिक्ष असूनही आणि त्यामानाने नाशिक कितीतरी उजवे असतांना दोन्ही मेगा प्रोजेक्ट्स औरंगाबादला मंजूर झालेली आहेत.

एअर कनेक्टिविटीसाठी सुध्दा मुंबई-पुणे नंतर इतर कुठल्याही शहरापेक्षा नाशिकला सर्वाधिक संधी असतानाही केवळ सक्षम राजकीय नेतृत्वाअभावी नाशिकचा विकास होतांना दिसत नाही.

`स्मार्ट सिटी` ह्या विषयावर `डिजिटल इंडिया डायलॉग` म्हणून एक परिषद नुकतीच झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी केंद्रीय शहरी विकास मंत्री वेंकय्या नायडू होते. त्यावेळी त्यांनी नमूद केले, की आजकाल प्रत्येकजण विचारतो की `स्मार्ट सिटी` बद्दल काही सांगा. `स्मार्ट सिटी` कधी होणार? परंतु स्मार्ट सिटी काही सरकार बनवू शकत नाही, जोपर्यंत स्थानिक प्रशासन पुढाकार घेत नाही. त्या शहरातील नागरिक जोपर्यंत खऱ्या अर्थाने `स्मार्ट` होत नाही, तोपर्यंत आपली शहरे `स्मार्ट` होणे अवघड आहे. हे अगदी खरं आहे की खऱ्या अर्थाने सरकार काही स्मार्ट सिटी बनवू शकत नाही आणि कुठल्याही राजकीय

नेत्यांवर अवलंबून न राहता आपण सर्वांनीच पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे. ह्याच कार्यक्रमात मी नायडू आणि अमिताभ कांत (MD, DMICDC) यांच्या निदर्शनास आणून दिले की केंद्र सरकारकडून किती मोठी चूक होत आहे, जिथे प्यायला पाणी नाही, तिथे शेतकरी DMICDC साठी पाणी उचलू देणार नाही. आपल्या नेते मंडळींनी देखील ह्या विषयाला धरून केंद्रीय मंत्री आणि सचिवांना गाठले पाहिजे.

इंडस्ट्रीज, नवीन प्रकल्प आज आपल्याकडे न येण्याचे कारण म्हणजे उद्योगांसाठीच्या जमिनीची उपलब्धता नसणे. MIDC मध्ये साधारण २० ते २५ टक्के इंडस्ट्रीज सुस्थितीत असून, निम्म्याहून अधिक इंडस्ट्रीज एकतर बंद अवस्थेत आहेत किंवा गुंतवणूकदारांनी घेऊन ठेवलेल्या आहेत. ह्या गोष्टी आपण सर्वांनी पुढाकार घेवून MIDC च्या व राज्य शासनाच्या लक्ष्यात आणून दिल्या पाहिजेत. MIDC मध्ये जागांचे भाव एकरी ५ ते ८ कोटी पर्यंत पोहोचले आहेत. नवीन उद्योगाची सुरुवात करण्यासाठी निश्चितच सुदृढ परिस्थिती नाही. १० वर्षांपूर्वी नाशिकमध्ये येवून प्रत्येकाला उद्योग सुरू करण्याची इच्छा होती. पण आज कोणालाही नाशिकमध्ये येवून नवीन उद्योग सुरू करावेसे वाटत नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आकाशाला भिडलेले जमिनींचे भाव आणि कामगार युनियनचा होणारा त्रास.

नाशिकला एक स्मार्ट सिटी बनविण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येणे ही काळाची गरज झालेली आहे. आपण सर्व मिळून केंद्र किंवा राज्य शासनाच्या सहकार्याशिवाय सुध्दा नाशिकला एक स्मार्ट सिटी बनवू शकतो. टेक्नोलॉजीच्या माध्यमातून जिथे शक्य असेल तिथे मी स्वतः पुढाकार घेण्यासाठी तयार आहे. येत्या १० वर्षांमध्ये नाशिकचे शहराचे एका स्मार्ट सिटीमध्ये रुपांतर करून दाखवूया.

(लेखक आयटी उद्योजक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आठवडाभरात परिस्थिती बदला’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणालगत असलेल्या प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील दूरवस्था 'मटा'ने उघडकीस आणल्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. उपसंचालकांनी स्वतः संस्थेला भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली असून आवश्यक त्या सोयी सुविधा आठवड्याभरात उपलब्ध करून द्या, असे आदेश त्यांनी प्राचार्यांना दिले आहेत.

प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ही गंगापूर धरणाला लागून असलेल्या गोवर्धन परिसरात आणि जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मागील बाजूस आहे. वर्षभरापूर्वी ही संस्था तेथे कार्यरत झाली आहे. मात्र, तेथील दुरवस्थेने कळस गाठला असून विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची बाब 'मटा'ने उघडकीस आणली. त्याची तत्काळ दखल घेत शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांनी दुपारी १२ च्या सुमारास थेट संस्थेलाच भेट दिली. तेथील परिस्थिती पाहून सूर्यवंशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संस्थेचे शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांशीही संवाद साधून त्यांनी तेथील अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. किमान पायाभूत सोयी-सुविधाही तेथे का उपलब्ध होऊ शकल्या नाहीत, यासह विविध बाबींची विचारणा त्यांनी प्राचार्य नितीन बच्छाव यांच्याकडे केली. पिण्याच्या पाण्यासह किमान पायाभूत सुविधा येत्या आठवड्याभरात उपलब्ध करून द्या, असे निर्देश उपसंचालकांनी प्राचार्यांना दिले. तसेच, इमारतीचे बांधकाम, बोअरवेल यासाठी निधी उपलब्ध होण्याबाबत आवश्यक तो पत्रव्यवहार करण्याचे आणि त्यासाठी शिफारसपत्र देण्याची ग्वाही उपसंचालकांनी यावेळी दिली. विद्यार्थ्यांना बस उपलब्ध व्हावी यासाठी एसटी महामंडाला पत्र देण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

बोअरवेलचा प्रश्न

गोवर्धन हा परिसर जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या मतदारसंघात येतो. त्यामुळे संस्थेच्या ठिकाणी बोअरवेल देण्याचे त्यांनी मान्य केले त्यानुसार दोनदा त्यांना पत्र दिल्याचे प्राचार्य पवार यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणी केवळ बोलणे झाले. पण, कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, असे चुंबळे यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच गुन्हेगारांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी परिसरातील किशोर सूर्यवंशी मार्गावर गावठी कट्ट्यासह फिरणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांनी सोमवारी पहाटे अटक केली. दरोड्याच्या तयारीत फिरणाऱ्या संशयितांना कोर्टान ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

किशोर सूर्यवंशी मार्गावरील सप्तश्रृंगी मंदिराजवळील मोकळ्या मैदानात काही व्यक्ती बसल्या होत्या. पोलिसांचे वाहन जवळ आल्यानंतर संशयिताच्या हालचाली वाढल्या. पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून एक गावठी बंदूक, दोन जीवंत काडतूसे, एक तलवार आणि एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आली. संशयित दरोडा टाकण्याची तयारी करीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सपनो से भरे नैना...’

$
0
0

अमोघ पोंक्षे, कॉलेज क्लब रिपोर्टर

इटलीहून आलेलं दांपत्य नाशिकच्या आधाराश्रमात दाखल झालेलं आणि त्यांचे डोळे आपल्या दत्तक मुलीला बघण्यासाठी आसुसले होते आणि प्रत्यक्षात ती 'प्रेरणा' (नाव बदलले आहे) समोर आल्यानंतर त्या दांपत्याचा धीर सुटला आणि अतिशय हृदयस्पर्शी असा क्षण नाशिकमधील आधाराश्रमात अनुभवास आला. त्या क्षणांना टिपत या भावूक पण 'प्रेरणादायी' क्षणांनी काळ काही वेळासाठी स्तब्ध झाला होता.

डि. स्टेफेनो लुका आणि बेलो डोनान्तिला हे दांपत्य मूळचे इटलीमधील रोम येथील; मात्र आपल्या साडेचार वर्षाच्या प्रेरणाला घेऊन जाण्यासाठी ते दोघेही आवर्जून नाशिकला आले होते. गेले नऊ महिने कायदेशीर बाबींची पूर्तता करून अखेर त्यांना मंगळवारी प्रेरणाला भेटण्याचा योग आला.

खरं तर ५ वर्षांपूर्वीच त्यांनी इटलीतील संस्थेत आपलं नाव नोंदवत मुलगी दत्तक घेण्याविषयी पुढाकार घेतला होता. मात्र प्रेरणा त्यांच्या आयुष्यात मंगळवारी आली आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकताना दिसत होता. प्रेरणा १ दिवसाची असताना २०१० मध्ये आधाराश्रमात दाखल झाली. पण त्यानंतर तिला 'सिकलसेल' आजार असल्याचे स्पष्ट झाले. गेली साडेचार वर्षे आधाराश्रमने प्रेरणाचा सांभाळ अशा नाजूक परिस्थितीत केला. पण मुंबईतील बाल आशा ट्रस्टकडून या इटलीतील दांपत्याने प्रेरणाला दत्तक घ्यायची इच्छा व्यक्त केली तेव्हा आधाराश्रमातील तिचा सांभाळ करणाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण प्रेरणाला आता कुटुंब मिळणार होतं.

प्रेरणाचा वैद्यकीय इतिहास माहीत करून घेतांना त्यांनी आई-वडील होत प्रेम आणि आधार द्यायची इच्छा व्यक्त केली. हे दांपत्य प्रेरणाशी शाब्दिक संवाद दुभाषीच्या माध्यमातून साधत असले तरी प्रेरणाच्या चेहऱ्यावरील आनंद तिला त्यांच्याकडून मिळत असलेल्या मायेच्या उबेची जाणीव करून देत होता. प्रेरणाला त्या दांपत्याकडून मिळालेलं प्रेम, आपुलकी, विश्वास यामुळे ती ही त्यांच्यामध्ये आनंदाने मिसळून गेली. प्रेरणाला निरोप देतेप्रसंगी आधाराश्रमातील तिचा सांभाळ करणाऱ्यांना अश्रू आवरणं कठीण झाले. मात्र, या चिमुकलीला हक्काचं घर मिळल्याचा आनंद झाल्याची भावनाही तेथील सुमन कोठुळे, रंजना चव्हाण, जया जाधव आणि कुसुम भडांगे यांनी व्यक्त केली.

२०१२ ते २०१५ या दरम्यान परदेशी दांपत्याकडून नाशिकमधील आधाराश्रमातून मुलांना दत्तक घेतली गेल्याची ही चौथी गौरवास्पद घटना आहे. भारतातील आणि खास करून महाराष्ट्रातील लोकांची अनाथ बालकांकडे बघण्याची दृष्टी बदल आहे. त्यांना आधार दिला पाहिजे अशी अपेक्षा आधारश्रमातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आता लवकरच प्रेरणा एक नव आयुष्य इटलीत सुरू होईल आणि ती भविष्यात आनंदी आणि सुखी होईल, अशी आशा बाळगत तिला नाशिकमधील आधराश्रमातून भावपूर्ण निरोप देण्यात आला.

प्रेरणाच्या रुपात आम्हाला मुलगी मिळाली. आम्ही खूप खूश आहोत. तिचे या पुढील आमच्याबरोबरच आयुष्य सुखी आणि आनंदी असेल असा विश्वास वाटतो. यापुढील तिच आयुष्य इतरांसाठी ही प्रेरणादायी ठरेल याची खात्री आहे.

- डि. स्टेफेनो लुका, प्रेरणाचे पालक

आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून या दाम्पत्याने नाशिकमधील प्रेरणाला दत्तक घ्यायची इच्छा व्यक्त केली. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करत आम्ही हा प्रेमाचा दुवा साधण्याचा प्रयत्न केला. आज प्रत्यक्ष प्रेरणाला या दांपत्याच्या हाती देताना आम्हाला चांगल कार्य केल्याचे समाधान आहे.

- सुनील अरोरा, बाल आशा ट्रस्ट, मुंबई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

$
0
0

पाच वर्षातील स्थिती; गत तीन महिन्यांत १२ जणांनी संपविली जीवनयात्रा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवकाळी पाऊस, कर्जबाजारीपणा, गारपीटीसारख्या संकटांपुढे हतबल ठरलेल्या अनेक शेतकऱ्यांनी अखेर मृत्यूला जवळ करीत आपली जीवनयात्रा संपविली आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात १५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी १२ आत्महत्या चालू वर्षातील जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत झाल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा राज्यात चिंतेचा विषय बनला आहे. नापिकी, अवकाळी पाऊस, दुष्काळ यासारख्या आसमानी संकटांशी वर्षानुवर्ष दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून गारपीटीसारख्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचाही सामना करावा लागतो आहे. हाता तोंडाची गाठ पडणे मुश्किल झाल्याने शेतकऱ्यांनी कर्ज काढले. मात्र, हे कर्ज फेडणेही शक्य होत नसल्याने अखेर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जात असल्याचे जिल्हा प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतीसाठी घेतले जाणारे कर्ज चांगले उत्पादन झाले की फेडू असा विचार करून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे. मात्र, पावसाची अनियमितता आणि गारपीटीसारख्या आसमानी संकटांमुळे शेतकऱ्यांच्या एकूण आर्थिक नियोजनावर पाणी फिरत आहे. त्यामुळे कर्जाच्या डोंगरातून बाहेर पडण्याऐवजी शेतकरी अधिक गुंतत गेल्याने त्याने नाईलाजास्तव आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येत आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये जिल्ह्यात १५२ जणांनी स्वत:ची जीवनयात्रा संपविण्याचा मार्ग स्वीकारला आहे. म्हणजेच वर्षाला सरासरी ३१ तर महिन्याला दोन ते तीन आत्महत्या होत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. जानेवारी ते मार्च २०१५ या तीन महिन्यांमध्ये जिल्ह्यात आत्महत्येच्या १२ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये नांदगाव, देवळा, मालेगाव, दिंडोरी आणि निफाड येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे. संजय कारभारी खैरनार या शेतकऱ्यानेही नांदगाव येथे स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. मात्र, या आत्महत्येसंबंधी अद्याप पोलिसांकडून तहसील कार्यालयाला अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये अद्याप या घटनेची नोंद झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी ‌दिली आहे. अशा काही आत्महत्या प्रकरणांचे अहवाल प्राप्त न झाल्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते असा अंदाजही सूत्रांनी वर्त‌विला आहे.

सर्वाधिक आत्महत्या नांदगाव तालुक्यात

नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी नांदगाव तालुक्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे गेल्या तीन महिन्यातील आकडेवाडीवरून दिसून आले आहे. या तालुक्यात आतापर्यंत ५ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. रावसाहेब पल्हाळ (४५) गुणवंत पवार, गंगाराम पगार, दादाजी आहेर, दिपक आहेर अशी त्यांची नावे आहेत. नांदगाव खालोखाल मालेगाव तालुक्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बापू शेवाळे (५२), चंद्रकांत ठाकरे (३८), बाळू लोखे (४०) अशी त्यांची नावे आहेत. तसेच बागलाण तालुक्यातील दिलीप ठाकरे व दादाजी पगार (६५) या दोघा शेतकऱ्यांची जीवनयात्रा संपविली. याशिवाय तसेच सोमनाथ गावले (५०, रा. निफाड), दत्तात्रय घडवजे (४५, रा. दिंडोरी) यांचा शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याची लेक नायब तहसीलदार

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोटर

जामगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि वेगळे काही तरी करण्याची इच्छा बाळगून कसोशीने प्रयत्न करणारी पंकज मगर हिला अखेर यश आले आहे. नुकत्याच जाहिर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली असून ती आता नायब तहसील होणार आहे. पंकजने नाशिकमध्ये परीक्षेची तयारी केली होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील जामगावच्या शेतकरी कुटुंबात तिसरी मुलगी म्हणून पंकजचा जन्म झाला. खरे तर तिच्या जन्मावेळी मगर कुटुंबीय नाराजच झाले. तिसरा तरी मुलगा होईल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, पंकजच्या आजीचे विचार तिला वेगळे ठरले. मुलीलाच मुलाचे नाव का देऊ नये, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी 'पंकज' असे नाव ठेवले. जामगाव येथेच तिचे प्राथमिक शिक्षण झाले. घरची परिस्थिती हलाखीची असली तरी काही तरी वेगळे करण्याचे तिच्या विचाराधीन होते. वडिल दिलीप हे केवळ सातवी पास झालेले असल्याने घरात उच्चशिक्षित आणि मार्गदर्शन करतील, असे कुणीही नव्हते. वायगाव येथील सेंट मेरी हायस्कूलमध्ये तिने पाचवी ते दहावीचे शिक्षण घेतले. कठोर परीश्रमाच्या जोरावर दहावीत ८१ टक्के तर बारावीमध्येही ८७ टक्के गुण प्राप्त केले. त्यानंतर तिने बीएस्सीसाठी गंगापूरच्या मुक्तानंद कॉलेजमध्ये येथे प्रवेश घेतला. बीएस्सी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने एमएस्सीला प्रवेश घेतला. स्पर्धा परीक्षेची फार माहिती नसल्याने तिने बहिणीचे पती मनोज काळे यांची मदत घेतली. चांगली सरकारी नोकरी आणि चांगला रुबाब प्राप्त करता यावा यासाठी तिने अभ्यासाला सुरुवात केली.

इच्छाशक्ती आणि मेहनत याच्या जोरावर तिने पुण्यात मार्गदर्शन घेतले तर बहिणीबरोबर नाशकात राहून तिने अभ्यास केला. आणि पहिल्याच प्रयत्नात पंकजने नायब तहसीलदार पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. पंकजचे यश आम्ही कधीच विसरू शकणार नाही, असे मत तिच्या आई-वडिलांनी व्यक्त केले आहे. मनोज जिजाजींनी केलेल्या अमूल्य मदतीमुळेच मी यश मिळविले, अशी पंकजने प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजची गावातून मिरवणूक

वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी पंकजने घवघवीत यश मिळवले. यामुळे जामगावमध्ये आनंदोत्सव सुरू आहे. गावकऱ्यांनी पंकजवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. तिच्या आनंदात सहभागी होत गावकऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी गावातून पंकजची जंगी मिरवणूक काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दळवटला भूकंपाचा सौम्य धक्का

$
0
0

कळवण : कळवण तालुक्यातील दळवट येथे मंगळवारी सकाळी ८.४७ वाजता २.८ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसल्याने कळवणसह पुनंद खोरे परिसरात खळबळ उडाली आहे. कळवणपासून पश्चिमेला ३५ किमी अंतरावर दळवट हे गाव आहे. या ठिकाणी बारा वर्षांपासून अधून-मधून भूकंपाचे सौम्य धक्के बसत असतात.दळवटपासून पुनंद प्रकल्प व चणकापूर धरण जवळ आहे. शिवाय, हा संपूर्ण डोंगराळ भाग आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सैनिकाचा व्यवस्थेशी लढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पूर्व स्टार, पश्चिम स्टार, संग्राम पदक, जम्मू काश्मीर पदक, २५ इंडीया पदक, माजी राष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन परेड पदक, कलर पदक अशी पदके मिळालेला माजी सैनिक उभे आयुष्य देशासाठी लढला हे वेगळे सांगायला नको. पण पदकांनी छाती भरलेल्या आडगावचे दत्तू मुळूक (वय ६७) या माजी सैनिकाला गेली अनेक वर्ष वेतनासाठी सरकार दरबारी खेटा माराव्या लागत आहेत. या विवंचनेतून आपली कधी सुटका होणार ? असा सवालही त्यांनी केला आहे.

शिपाई दत्तु मुळूक हे २५ फेब्रुवारी १९६६ रोजी ५ मराठा लाईट इन फन्ट्री बेळगाव येथे लष्करात दाखल झाले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या वडीलांनी सेवेतून परतण्याची विनंती केली म्हणून त्यांनी माघारीचा अर्ज दिला. त्यावेळी मुळूक यांना घरी जाण्यास परवानगी नाकारण्यात आली. पुढे त्यांना सेवेतच ठेवून जम्मू काश्मीर सीमेवर धाडण्यात आले. बांगलादेश मुक्ती वाहिनी सोबत काम करताना ते १९७१ च्या युध्दात जखमी झाले. मात्र या घटनेची सरकार दरबारी कुठेही नोंद झाली नाही. फैजाबाद येथे पाकिस्तानी कैद्यावर देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आली. ती बजावत असताना अनेकवेळा शत्रुशी दोन हात केले; मात्र याची कुठेही नोद नाही. लष्करात आठ वर्ष सेवा बजावल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. तुम्हाला तुमच्या गावी गेल्यानंतर जमीन दिली जाईल असे लष्कराकडून सांगण्यात आले. मात्र आजतागात कोणतीही जमीन त्यांना मिळाली नाही.

हक्कासाठी त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक नेत्यांना विनंती केली अर्ज केले. सर्वांनी आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसली. देशाची सेवा करुनही सरकारने त्यांना निवृत्ती वेतन दिले नाही. गेल्या ४० वर्षांपासून त्यांचा निवृत्ती वेतनासाठी लढा सुरु असून, अनेक मान्यवरांना भेटलो; मात्र उपयोग झाला नाही, असे ते सांगतात. १२ डिसेंबर २००० रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांची देखील भेट घेतली होती. परंतु त्यालाही यश आले नाही. आतापर्यंत प्रत्येक पंतप्रधानांकडे अन् संरक्षण मंत्र्यांकडे देखील दाद मागितीली; मात्र यश आले नाही.

येत्या काही दिवसात निवृत्तीवेतन व इतर लाभ मिळाले नाही तर काही दिवसात सर्व पदके सरकारला परत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

लष्कराने लक्ष देण्याची गरज

माझ्याप्रमाणेच अनेक माजी सैनिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या समस्या सरकार आणि लष्कर का लक्षात घेत नाही. प्रत्येक जिल्ह्यात माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नियमीतपणे प्रयत्न व्हायला हवेत. अशा घटनांमधून चुकीचे संदेश जात आहेत. माजी सैनिकांच्या समस्या सुटल्या नाहीत तर पदके परत करण्याचे अपमानास्पद घटना घडतील. ही माझीच नाही तर अनेक माजी सैनिकांची भावना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज टर्मिनल हस्तांतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ओझर विमानतळाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेले अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल बुधवारी (८ एप्रिल) हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)कडे हस्तांतरीत केले जाणार आहे. ओझरहून प्रवासी विमानसेवा नक्की कधी सुरू होते, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

पॅसेंजर टर्मिनलच्या हस्तांतरणात येणाऱ्या किरकोळ तांत्रिक अडचणी दूर करण्यात अखेर प्रशासनाला यश आले आहे. बुधवारपर्यंत टर्मिनलचे हस्तांतरण एचएएलकडे करावे, असे निर्देश राज्याचे अपर मुख्य सचिव पी. एस. मिना यांनी शनिवारी दिले होते. यासंदर्भात मिना यांनी घेतलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, एचएएलचे वरिष्ठ अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. एचएएलच्या ज्या जागेवर अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल उभारले आहे, त्याची सोमवारी प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल बांधकाम विभागाला तत्काळ सादर करण्याची सूचना करण्यात आली. पूर्ण झालेली कामे, अपूर्ण असणारी कामे आणि तत्काळ पूर्ण करता येतील अशा कामांचे विश्लेषण अहवालामध्ये अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तमराव ढिकले यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्याचे धुरंधर व्यक्तिमत्त्व, माजी आमदार, माजी खासदार व सहकारमहर्षी उत्तमराव नथुजी ढिकले (वय ७७) यांचे मंगळवारी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, नातू, पणतू असा परिवार आहे. ढिकले यांची अंत्ययात्रा आज (बुधवारी) सकाळी साडेनऊ वाजता पंचवटीतील ढिकलेनगर येथील पार्वती निवासस्थान येथून निघणार आहे.

मागील काही दिवसांपासून छातीत दुखत असल्याने त्यांना अस्वस्थ वाटत होते. दोन दिवसांपूर्वी अधिक त्रास झाल्याने त्यांना कॉलेजरोडवरील मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. तत्कालीन नाशिक नगरपालिकेचे नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, खासदार तसेच विविध संस्थाचे अध्यक्ष व पदाधिकारी म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द गाजली. काँग्रेस, शिवसेना, मनसे अशा सर्वच पक्षांत ते वावरले. मात्र, कोणत्याही एका पक्षाचा शिक्का त्यांनी लावून घेतला नाही. ढिकले यांनी शिवसेनेकडून खासदारकी भूषविलेली होती. तर २००९ मध्ये मनसेचे आमदार म्हणून ते निवडून आले होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे पुत्र डॉ. सुनील ढिकले मविप्र संस्थेचे उपसभापती आहेत, तर राहुल ढिकले नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैदी कुणाशी करणार मन की बात?

$
0
0


डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्याने नुकतीच गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या दोन महिन्यातील चौथ्या कैदीने आपली जीवनयात्रा संपविली. कारागृहातील वातावरण, कैद्यावर असलेला मानसिक ताणतणाव याचा पुन्हा नव्याने विचार करण्याची या निमित्ताने गरज निर्माण झाली आहे.

अवनखेड (ता. दिंडोरी) येथील प्रल्हाद भगवंत रोकडे (२७) असे आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याला अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी अटक केली होती. त्याला कोर्टाने प्रारंभी पोलिस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी दिली होती. तेव्हापासून तो जामीन मिळण्याच्या प्रतीक्षेत होता. मात्र, तशी शक्यता दिसत नसल्याने प्रल्हादने चादर फाडून तिच्या चिंध्या तयार केल्या. मंडल क्रमांक सातच्या बॅरेक क्रमांक दोनमधील शौचालयातील खिडकीच्या गजाला चिंध्याचा दोर बांधून गळफास घेतला.

बंदिगृहातील तणाव

कारागृहातील बहुतांश कैदी तणावाखाली असतात. त्यांना काही ना काही संकटांचा सामना करावा लागतच असतो. कैद्याचा कैद्यावर हल्ला, गँगवार, हाणामाऱ्या, आत्महत्या, पलायन, कैद्यांकडे मोबाइल आणि निरोधची पाकिटे सापडणे, जेलमधून सुपारी देणे, आजारी पडून किंवा हृदयविकाराने कैद्याचा मृत्यू हे नित्याचेच झाले आहे. गेल्या २२ जुलै रोजी याच कारागृहात नाना नामदेव पाटील या ४७ वर्षीय गुजरातच्या कैद्याने स्वच्छतागृहावरील पाचशे लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत जीव दिला. गेल्या २९ एप्रिलला मेवा झावरे या कैद्याने वायरच्या घासणीच्या गळफास घेतला. त्याची तीनच महिन्यांनी सुटका होणार होती. त्याच्या अगोदरच्या आठवड्यात एका कैद्याने लोखंडी बारवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मार्च २०१४ मध्ये एक कैदी टॉवलेचा दोर करून पंधरा फूटाच्या भिंतीवर आकडा टाकून फरार झाला. अशा परिस्थितीत मुक्त कारागृहाची संकल्पना येथे साकारणे अवघड आहे.

ताण घालवण्यासाठी

तुरुंगातील कैद्यांवरील मानसिक ताण हलका व्हावा यासाठी त्यांना महिन्यातून दोनवेळा दूरध्वनीव्दारे कुटुंबीयांशी संवादाची सुविधा प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रथमच नाशिकरोड कारागृहात सुरू झाली आहे. योजनेंतर्गत कैदी रक्ताच्या नातेवाईकांशीच महिन्यातून दोन वेगवेगळ्या वेळी दूरध्वनीवर पाच मिनिटे संवाद साधू शकतो. तरीही आत्महत्येच्या घटना घडत आहेत.

आम्ही जेलमध्ये नेहमी कार्यक्रम घेत असतो. प्रशासनाचा कारभार चांगलाच आहे. संगतीने कैदी बिघडू शकतो. मानसिक संतुलन बिघडलेल्या, खचलेल्या कैद्यांना मानसिक आधाराची, समुपदेशनाची गरज असते. ती योग्यवेळी पूर्ण करावी. - डॉ. प्रशांत भुतडा

हवा मानसिक आधार, उपचार

कैदी कारागृहातून पळून जातात? त्यांना आत्महत्या का कराविशी वाटते? ते हिंसक का होतात? असे अनेक प्रश्न आहेत. स्वयंसेवी संस्थाच्या तपासणीत अनेक कैद्यांना विविध आजार आढळले. आजारपणामुळे कैद्याचे निधन होणे, त्याने आत्महत्या करणे हे त्याला मानसिक उपचारांची गरज असल्याचे दर्शविते. या कारागृहातून विक्रमी भाजीपाला होतो. उत्कृष्ट दर्जामुळे येथील सतरंजी, फर्निचर आदी वस्तू परदेशात नावलौकिक कमावून आहेत. कैद्यांचे तसेच प्रशासनाचे प्रबोधन गरजेचे आहे. कैद्यांसाठी योगा, सांस्कृतिक कार्यक्रमही होत असतात पणे ते प्रयत्न अपुरे पडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोडीकडे लक्ष द्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

महापालिका आयुक्तांनी नाशिक शहरातील बेकायदा वृक्षतोडीकडे वैयक्तिक लक्ष द्यावे, वृक्ष तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भात पर्यावरणप्रेमी अश्विनी भट यांनी नाशिक नागरी कृती समितीतर्फे याचिका दाखल केली आहे.

शहरात अवैध वृक्षतोड सुरू आहे. सातपूर येथे नुकतेच ७० वृक्ष तोडण्यात आले. आपल्या परवानगीशिवाय नाशिकमध्ये वृक्षतोड करू नये, असे आदेश न्यायालयाने दिलेले असतानाही वृक्षतोड सुरूच आहे. न्यायालयाचा अवमान होत असतानाही आयुक्त गंभीर नाही असे चित्र निर्माण झाल्याने न्यायालयाने महापालिकेच्या वकिलांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिका आयुक्त कारवाई का करत नाही, वृक्षतोडीकडे त्यांचे लक्ष आहे का, अशी संतप्त विचारणा करून वृक्षतोड प्रकरणी कायदेशीर कारवाई करा, असे आदेश न्या. नरेश पाटील आणि न्या. अचलिया यांच्या खंडपीठाने दिले.

श्रीमती भट यांनी शहरातील अवैध वृक्षतोडीबाबत महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी केल्या, पुरावेही दिले. कारवाईबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. सरकारी कामात टाळाटाळ करणे हा गुन्हा असल्याने भट यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. महापालिका आयुक्तांनी कामात कुचराई करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी व दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी भट यांनी केली आहे. परंतु, आयुक्तांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. या सर्व घडामोडी पुढील सुनावणीत उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणणार असल्याचे भट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

STP ला सरकारी फटका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळा काही महिन्यांवर आलेला असताना गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) लवकरात लवकर उभारणे गरजेचे झाले आहे. परंतु, पिंपळगाव येथील प्रकल्पासाठी भूसंपादन अधिकाऱ्याने भूसंपादनाची प्रक्रियाच बेकायदा केल्याने आता नव्या कायद्याच्या अनुषंगाने चारपट नुकसानभरपाई देऊन ही जमीन घेण्याची वेळ सरकारवर येणार आहे. याविषयी सरकारला भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबई हायकोर्टाने आठवड्याभराची मुदत दिली आहे.

आधीच प्रदूषणाचा फटका बसत असलेल्या गोदावरी नदीचे प्रदूषण कुंभमेळ्याच्या वेळी वाढणार असल्याने राजेश पंडित यांनी जनहित याचिका केलेली आहे. यासंदर्भात सांडपाणी नदीत सोडण्यापूर्वी त्यावर आवश्यक प्रक्रिया होण्याची गरज अधिक निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने नाशिक महापालिकेचे चार ते पाच एसटीपी आहेत. परंतु, त्यातील काही सक्षमपणे सुरू नाहीत. या पार्श्वभूमीवर गंगापूर आणि पिंपळगाव येथे दोन एसटीपी प्रस्तावित करण्यात आले. परंतु, या दोन्हीच्या बाबतीत जी मोठी जमीन आवश्यक आहे, त्याबद्दल भूसंपादन अधिकाऱ्याने कायदेशीर प्रक्रिया अवलंबत सुनावणीची संधी न देताच आदेश काढल्याचा दावा करत जमीन मालकांनी रिट याचिका केल्या. यातील गंगापूरचा वाद नंतर मिटला. परंतु, पिंपळगावचा विषय प्रलंबित आहे.

कारवाईची शक्यता?

हा सारा घोळ भूसंपादन अधिकाऱ्याच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे झाला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याची चौकशी होऊन कारवाई व्हायला हवी. त्याविषयी विचार करा, असेही खंडपीठाने मुख्य सरकारी वकिलांना यावेळी सांगितले.

'आठवडाभरात भूमिका स्पष्ट करा'

भूसंपादन अधिकाऱ्याचे असे काही निर्णय पूर्वी हायकोर्टाने रद्द ठरवले असताना या अधिकाऱ्याने त्याच चुकांची पुनरावृत्ती केल्याचे महादू बोराडे व रामदास बोराडे यांच्या रिट याचिकांवरील सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले. दरम्यानच्या काळात भूसंपादनाचा नवा कायदा लागू झाला आहे. त्यामुळे आता सरकारला पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागेल आणि नव्या कायद्याप्रमाणे अधिक नुकसानभरपाई द्यावी लागेल. याशिवाय सरकारसमोर पर्यायच नसल्याने एक आठवड्यात भूमिका स्पष्ट करा, असे न्या. अभय ओक व न्या. ए. पी. भंगाळे यांच्या खंडपीठाने सरकारी वकिलांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रिरत्न महोत्सव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उपनगर व्यायाम शाळेसमोरील आंबेडकर चौकात गुरुवार (दि. ९) पासून १७ एप्रिलपर्यंत त्रिरत्न महोत्सव होत आहे. साहेब बहुउद्देशीय सामाजिक न्यायमंच आणि धीरजभाऊ पगारे वाचनालयातर्फे होणाऱ्या या महोत्सवात विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजक विजय पगारे आणि डॉ. प्रशांत घोडेराव यांनी दिली.

भारत खेडकर यांच्याहस्ते सायंकाळी पाचला महोत्सवाचे उदघाटन झाल्यानंतर कॅरम स्पर्धा होईल. साहित्यिक प्रा. गंगाधर अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (१०) सायंकाळी सातला कविसंमेलन होईल. प्रसिद्ध खंजिरीवादक मीरा उमप-औरंगाबादकर शनिवारी (दि. ११) सायंकाळी सातला प्रबोधन गीते सादर करतील. रविवारी (दि. १२) दुपारी साडेचारला भीमश्री कुस्ती स्पर्धा होतील. पूर्व प्रभाग सभापती प्रा. कुणाल वाघ, गोरखनाथ बलकवडके, पिंटू तांबोळी, डॉ. भास्कर म्हरसाळे, राजेंद्र लोणारी आदींची प्रमुख उपस्थिती राहील. सोमवारी (दि. १३) अभिनेते यासीन खान, पी. कुमार यांच्या उपस्थितीत सायंकाळी सातला संबळ स्पर्धा होईल. बुधवारी (दि. १५) आणि गुरुवारी (दि. १६) सायंकाळी सातला राजेश जाधव आणि कलावंतांचा आर्केस्ट्रा तसेच भीमगीते, नृत्याच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होईल. संजय चव्हाण, अशोक पगारे, शेखर कापडे, विजय पगारे, भीमा आव्हाड, रवी लोखंडे, योगशे जाधव, निखील रोकडे आदी संयोजन करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कादवा’ अध्यक्षपदी पुन्हा श्रीराम शेटे

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी श्रीराम शेटे यांची, तर व्हा. चेअरमनपदी उत्तमबाबा भालेराव यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मुकेश भोगे यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन, व्हा. चेअरमनपदाच्या निवडणुकीसाठी नवनिर्वाचित संचालकांची बैठक झाली. यावेळी चेअरमनपदासाठी श्रीराम शेटे यांचा, तर व्हा. चेअरमनपदासाठी उत्तमबाबा भालेराव यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यानंतर सभासदांचा आभार मेळावा होऊन यात नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना श्रीराम शेटे म्हणाले की, साखरेचे भाव जरी कोसळले असले तरी शासनाने उसाला हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळे हमीभाव देणे कारखाने व शासनाची संयुक्त जबाबदारी आहे. त्यामुळे शासनाला याबाबत भूमिका घ्यावी लागणार असून, कादवाने यापूर्वीही हमीभावापेक्षा अधिक भाव दिला असून शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत कारखान्याच्या हितासाठी सर्व सभासदांनी ऊस लावावा, असे आवाहन कादवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.

आभार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थापक संचालक भाऊ पाटील वडजे होते. पुढे बोलताना श्रीराम शेटे यांनी यापूर्वीही साखर कारखाने अनेक वेळा अडचणीत आले असताना शरद पवार यांनी वारंवार शासकीय मदत मिळवून मदत केली आहे. या शासनालाही मदत करावी लागणार आहे. कादवाला शासनाने केवळ एक वर्षाचा कर माफ केला तरी हमीभाव देणे शक्य होणार असल्याचे सांगितले.

सभासदांनी आपले काम बघून आपल्याला पुन्हा संधी देत आमच्यावर जबाबदारी टाकली आहे. ती आम्ही निश्चित पूर्ण करीत सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही श्रीराम शेटे यांनी स्पष्ट केले. यावेळी व्हा. चेअरमन उत्तमबाबा भालेराव, कृउबा सभापती दत्तात्रेय पाटील, संस्थापक संचालक किसनलाल बोरा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, साहेबराव शिवले, माजी संचालक संपतराव पाटील, तानाजी पगार, संपतराव कोंड, गुलाब बागमार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. लक्ष्मण महाडिक यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...आणि दहा लाख रुपये मिळवा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा/लासगलाव

गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. गावपातळीवरील या निवडणुकीत लाखो रुपये खर्च केले जात आहेत. यामुळे ज्या गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होईल, त्या गावाला पाच ते दहा लाख रुपये सिंचनासाठी दिली जातील, अशी घोषणा बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे. बागलाण तालुक्यातील ३८ ग्रामपचांयतीच्या २२ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. दहा सदस्यांच्या आतील ग्रामपंचायतीस पाच लाख तर, दहापेक्षा जास्त सदस्य असलेल्या ग्रामपचांयतीस दहा लाख रुपयांचा निधी सिंचनासाठी प्राधान्याने देण्यात येईल, असे आ. चव्हाण यांनी सांगितले.

गावातील शांतता अबाधित राखून विकास साधण्यासाठी निवडणुका बिनविरोध करण्याची तसेच आदर्श आणि समाजपयोगी परंपरा कायम राखण्यासाठी ही घोषणा करीत असल्याचे आ. चव्हाण यांनी नमूद केले.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी

निफाड तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्‍या शेवटच्या इच्छुक उमेदवारांनी समर्थकांसह अर्ज भरण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी एकच गर्दी केल्याने निफाडला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. लासलगाव, ओझर, या मोठ्या ग्रामपालिकेसह विंचूर, देवगाव, उगाव, नांदुरमध्यमेश्वर, खेडलेझुंगे, म्हाळसाकोरे, करंजगाव, टाकळी यांसह अनेक महत्वाच्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होत आहेत. येत्या १० एप्रिलला उमेदवारी अर्ज माघारीची शेवटची मुदत असल्याने त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. त्एकीकडे प्रबळ उमेदवारांना सोबत घेऊन पॅनल निर्मितीच्या तयारीला वेग आला असतानाच दुसरीकडे मात्र आपल्याच नेत्यांच्या राजकीय तालमीत तयार होऊन उमेदवारी मिळण्याची शक्यता नसलेल्यांनी त्यांच्या विरोधातच दंड थोपटण्याची तयारी सुरू केली आहे. लासलगाव ग्रामपालिकेच्या सहा वार्डातील एकूण १७ जागांसाठी ११६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज प्रतिज्ञापत्रासह दाखल केले आहेत. ओझर मधून २१२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून निफाड तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तब्बल २ हजार ८५९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असल्याची माहिती निफाडचे तहसीलदार डॉ. संदीप आहेर यांनी दिली आहे. पोटनिवडणुकीसाठी ११ उमदेवारी अर्ज दाखल झाले आहेत.

दिग्गजांनी भरले उमेदवारी अर्ज

लासलगाव ग्रामपालिकेसाठी शेवटच्या दिवशी सरपंच नानासाहेब पाटील, माजी सरपंच जयदत्त होळकर, कुसुम होळकर, संतोष ब्रह्मेचा, चंद्रशेखर होळकर, सुनील आब्बड, डी. के. जगताप, संतोष पलोड, ज्ञानेश्वर पाटील, योगेश पाटील, राजेंद्र चाफेकर, वेदिका होळकर, बेबीताई पानगव्हाणे, हर्षद पानगव्हाणे आदींसह अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने लासलगावमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुबलक पाणीसाठा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

उन्हाचा तडाखा जाणवत असताना मालेगाव, माळमाथा तसेच चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात ५ हजार ९६५.६० दशलक्ष घनमीटर साठ्यापैकी २ हजार ९६५.६० दशलक्ष घनमीटर साठा शिल्लक आहे. मन्याड धरणातही १११.४० दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त साठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात मालेगावसह चाळीसगावकरांना पाणीटंचाईची झळ कमी बसण्याची शक्यता आहे.

एप्रिल महिन्यास सुरुवात होताच तालुक्याचे तपमान ४० अंशाच्यावर गेले आहे. उन्हाची दाहकता जाणवू लागली असून मे, जून महिन्यांमध्ये उन्हाच्या तीव्रतेने आणखीनच भर पडण्याचे चिन्हे दिसत आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून गिरणा धरणातील पाणीसाठा हा पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. मालेगाव, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तीन तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गिरणा धरणात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे.

गिरणा धरणावर पाच नगरपालिका १५७ गावे अवलंबून आहेत. १४५ किमी लांब वाहणाऱ्या या नदीत गरजेच्या तीन पट पाणी सोडावे लागते. तेव्हाच शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचते. गिरणा धरणातील पाण्याच्या नियोजनानुसार आतापर्यंत रब्बी पिकांसाठी दोन आवर्तने सोडली असून पिण्याच्या पाण्यासाठी एक आवर्तन दिले आहे. आता पुढील महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी एक आर्वतन सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेनत यावर्षी पाणीसाठा कमी असून, काटकसरीने व साठ्याचे योग्य नियोजन केल्यास यंदा पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे निर्दशनास येत आहे.

साठा

गिरणा धरणात ५ हजार ९६५.६० दशलक्ष घनफूट साठ्यापैकी मृतसाठा सोडून हजार ९६५.६० दशलक्ष घनफूट साठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये ३ हजार १२८.८० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. मन्याड धरणातही १११.४० दशलक्ष घनफूट साठा शिल्लक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...नंतर पोटनिवडणूक घ्या!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

बहिणीच्या नावाचे खोटे कागदपत्र सादर करून बिनविरोध निवडून आलेल्या आदिवासी महिलेने सरकार व निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे. कारवाईच्या भीतीपोटी राजीनामा देणाऱ्या त्या महिलेवर कारवाई केल्याशिवाय रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेऊ नये, अशा मागणी पिंपळगाव डुकरा ग्रामस्थांनी केली आहे.

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथे २२ जून २०१४ रोजी ग्रामपंचायत निवडणुकीत शशिकला कुंदे यांनी खोटे कागदपत्र सादर करून तिची बहीण संगीता कुंदे हिच्या नावाने निवडणूक लढवली होती. त्यांची बिनविरोध निवडही झाली होती. सरपंचपदाची निवड झाल्याबरोबर कुंदे यांनी कारवाईच्या भीतीने तातडीने राजीनामा दिला होता. त्यासंदर्भात सर्व पुरावे व कागदपत्रे शासनाला देऊनही आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. आता पुन्हा नव्याने २२ एप्रिल २०१५ रोजी याच वार्ड

क्रमांक एकमध्ये पोटनिवडणूक होत आहे.

पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया रद्द करून कायद्यानुसार कुंदे यांच्यावर महाराष्ट्र राज्य व केंद्रीय नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन पिंपळगाव डुकरा ग्रामपंचायतीचे सदस्य विलास झनकर, इंदुबाई वाघचौरे, राजाबाई जाधव, परशराम वाघचौरे व ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार महेंद्र पवार यांना देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी लवकरच आवर्तन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जिल्हाधिकारी कुशवाह यांनी पाणीटंचाई लक्षात घेऊन तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश संबंधित विभागला दिले असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. सटाणा शहराला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. यामुळे चणकापूर धरणातील आर्वतन लवकर सोडण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे निवदेनाद्वारे केली होती.

एप्रिल महिना सुरू होताच शहरात चार ते पाच दिवसाआड पाणी कमी दाबाने मिळते. यामुळे महिलांना ऐन उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. शहरासाठी किमान २२ लक्ष लिटर पाण्याची गरज असून, त्यासाठी पूर्णपणे नद्यांच्या आवर्तनावर अवलंबून रहावे लागते. विशेषत्वाने शहरासाठी गिरणा नदी पात्रातील विहिरीवरून अधिक पाणीपुरवठा होतो. गेल्या काही दिवसांपासून पालिकेचे जलस्त्रोत कमालीचे खालवल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी जिल्हाधिकारी कुशावह यांच्याकडे करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कुशवाह यांनी तातडीने संबंधित विभागाला सूचना करून धरणातून ४०० दशलक्ष पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रावेरमध्ये घोड्यांची टप टप

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, रावेर

शोले सिनेमात 'चल धन्नो' म्हणत ऐटीत धावणाऱ्या टांग्याची सवारी अनेक शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात पहावयास मिळायची. परंतु रिक्षा, टॅक्सीने या टांग्याची जागा घेतल्याने घोडागाडीचा वापर कालबाह्य झाला. असे असले तरीही रावेर रेल्वे स्टेशन परिसरात काही व्यावसायिकांनी टांग्याची परंपरा आजही जपली आहे.

रावेर शहर ते रेल्वेस्टेशन दरम्यान आज ही १० ते १५ टांगे रोज धावतात. जवळपास ४ किलो मीटरच्या अंतरासाठी पाच रुपये भाडे आकारले जाते. घाईगर्दीच्या जमान्यात प्रत्येकाला लवकर पोहचण्याची घाई असल्याने रिक्षाला प्रवाशी पसंती देतात. परंतु यंग सिनियर्स अथवा लहान मुलांकडून आजही टांग्याच्या प्रवासाला पसंती दिली जाते. इतर शहरात टांगे नामशेष झाल्याने रावेर शहरात येणाऱ्यांना टांग्यातून रपेट मारण्याचा मोह आवरला जात नाही.

साधारणतः ८ ते १० वर्षांपूर्वीपर्यंत ५० ते ६० टांगे रावेर ते स्टेशन, रावेर ते बऱ्हाणपूर, रावेर ते यावल, सावदा, फैजपूर या बाजाराच्या गावी नागरिक टांग्याने ये-जा करीत असत. हीच टांग्याची परंपरा आजही कायम ठेवणारे टांगामालक रेल्वे स्टेशन परिसरात पहावयास मिळतात. रिक्षा अथवा इतर खासगी प्रवासी वाहनांच्या दरापेक्षा टांग्याने प्रवासाचे भाडे कमी आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची टांग्यालाच पसंती असते.

प्रवासी कमी हौशी जास्त

ऑटो रिक्षा आल्याने दररोजचे प्रवासी लवकर पोहचण्यासाठी ऑटो रिक्षाला पसंती देतात. त्यामुळे रावेर ते स्टेशन दरम्यान प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. रिक्षाचे भाडे १० रुपयांपर्यंत असतांना टांग्याला पाच रुपये देतात. एका वेळी तीन ते चारच प्रवासी टांग्यात बसू शकतात. दिवसभरात चार ते पाच फेऱ्या होतात. दिवसाला २०० रुपयांपर्यंत पैसे मिळतात खर्च मात्र १०० ते १५० रुपये एका घोड्यासाठी होतो. हौशी प्रवाशी साधारणतः दिवाळी, उन्हाळी सुट्या, लग्न सराईमध्ये येतात. त्यामुळे इतर दिवस मात्र या व्यवसायात मंदी असते.

तीस ते चाळीस वर्षांपासून टांग्यांचा व्यवसाय करीत आहे. आमच्याकडे चार घोडे आहेत. टांग्याला पहिल्या सारखे भाडे मिळत नाही. माल वाहतूक रिक्षांना बाजाराच्या दिवशी पसंती दिली जाते. खर्च जास्त व आवक कमी अशी परिस्थिती या व्यवसायात निर्माण झाली आहे. - सुनील परदेशी, घोडामालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images