Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

`ते` जगतात डरकाळ्यांच्या दहशतीखाली!

$
0
0



बिबट्याच्या वावराने रोकडोबावाडी परिसर भयग्रस्त

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

देवळाली गावाजवळील रोकडोबावाडी येथील डोबी मळ्यात वर्षभरात तिसऱ्यांदा बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. येथे आणखी तीन बिबटे असल्याने नागरिक दिवसाही दहशतीखाली वावरत आहेत. कोणाची तरी भेदक नजर २४ तास रोखली असल्याचा आभास सर्वांना होत आहे.

रोकडोबावाडीजवळील डोबी मळा हे देवळालीगावचे शेवटचे टोक आहे. अडीचशे लोकांची येथे वस्ती आहे. शेतक-यांची जमीन १९३९ साली महायुद्धाच्या काळात लष्कराने ताब्यात घेतली. १९६५ मध्ये अल्पभूधारक झाल्यामुळे शेतकरी चारा, ऊस हीच पिके घेतात. शस्त्रसाठ्यासाठी ताब्यात घेतलेली जागा लष्कराने वापरलीच नाही. चार पाच किलोमीटरच्या या क्षेत्रात कोणीच जात नाही. येथे विपुल प्रमाणात वन्य प्राणी आढळतात. एकूण पंधरा एकर क्षेत्रात ऊस असल्याने बिबट्याला लपण्यास चांगली जागा आहे. शेजारीच वालदेवी नदी आहे. रोकडोबावाडी, देवळाली कॅम्प, बान्स स्कूल, पाथर्डी, भगूरपर्यंत बिबट्याचे साम्राज्य आहे.

त्रिशुळ, कु-डीचा आधार

डॉ. तुषार बुवा, एमडी करत असलेले नितीन बुवा, निलेश बुवा ऊस तोडायला गेले असता त्यांना शेतातून गुरगुरण्याचा आवाज आला. त्यांनी बैलजोडी तेथेच सोडून घर गाठलं. नंतर सगळ्यांनी एकत्र जाऊन सुतळी बाम्ब फोडून बिबट्याला पळून लावले व बैलांना आणले. लाठ्या-काठ्या नेऊ नका, बिबट्या जुमाननार नाही, शस्त्राला बिबट्या घाबरतो, असा सल्ला वनविभागाने दिला आहे. तेव्हापासून भाले, त्रिशूळ, कोयते, कु-हाडी घेऊनच शेतकरी शेतात जात आहेत. तीन बिबटे पकडले तरी बिबट्यांच्या डरकाळ्या आजही घुमत असतात, त्याची पावले शेतात उमटत असतात. त्यामुळे सायंकाळी किंवा पहाटे कोणी घराबाहेर पडत नाही. बिबट्याला टक्कर देण्यासाठी राटव्हिलर या खतरनाक जातीची टफी, स्विटी ही कुत्रे पाळल्याची माहिती निलेश बुवा यांनी दिली.

कुत्री, मोर झाले गायब

डोबी मळ्यातील कुत्री-मांजरं दोन वर्षांपासून गायब होऊ लागली. तीनशे चारशे मोर होते. तेही कमी झाल्याने नागरिक चक्रावून गेले. बिबट्याच्या फॅमिलीने त्यांचा फडशा पाडल्याचे समजल्यावर ते जाम हादरले. गोरखनाथ बुवा यांच्या चुलीच्या शेडमधून बिबट्याने कुत्र्याला उचलले. नातवांना बिबट्या कधी उचलेल याचा नेम नसल्याने वडिलधा-यांना दिवसरात्र त्यांच्यामागे काठी घेऊन फिरण्याची ड्युटी करावी लागते. शेतावर गेलेला कुंकवाचा धनी सुखरुप परत येऊ दे, अशी प्रार्थना घरातील बाई न चुकता करत असते.

बिनचाकाचा पिंजरा

बिबट्याला पकडण्यासाठी लोकांनी वनविभागाकडे पिंजरा मागितला. तो त्यांनी एकलहरे येथून स्वखर्चाने टेम्पोतून आणला. हा पिंजरा जळका व बिन चाकाचा होता. लष्करी जवानांच्या मदतीने तो उचलून आठ दिवस विविध ठिकाणी लोकांनी ठेवला. तेव्हा कुठं छोटा बिबट्या अडकला. लोकांनी घाबरतच पिंजरा उचलून ट्रकमध्ये चढवला. आणखी तीन बिबटे आहेत, तेव्हा चाकाचे पिंजरे द्या, अशी विनंती लोकांनी केली. परिमंडळ अधिकारी एम. एस. गोसावी यांनी ती मान्य केली आहे.

घरचं झालं थोडं...

परिसरात बिबट्याचा वावर सुरू असल्याने नागरिकांनी मोठ्या बॅट-या आणल्या आहेत. रात्री पथदीपांचा मोठा आधार होतो. परंतु, बाहेरुन गुंड वस्तीवर येतात. पथदीप फोडून अंधारात दारू पिऊन निघून जातात. महापालिकेने चांगल्या दर्जाचे व जाळ्या असलेले दिवे बसवावेत, पोलिसांनी गुंडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वनविभागाने बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करुन आम्हाला दिलासा द्यावा. आमच्या पोराबाळांचं, जनावरांचं रक्षण करुन आर्शीवाद घ्यावेत. - शकुंतला बुवा

बिबट्यांना मारुन, पकडून ही समस्या सुटणार नाही. माणूसच त्यांच्या मुळावर उठला आहे. शासनाने माळरानावर जंगल करुन बिबट्यांची व्यवस्था करावी. - त्र्यंबकनाथ बुवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खाद्यपदार्थांच्या गाड्याच टवाळखोरांचे अड्डे!

$
0
0



सातपूरला नागरिक त्रस्त; भररस्त्यावर होते मद्यपान, पोलिसांचा कानाडोळा

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर भागात ठिकठिकाणी असलेल्या अंडाभुर्जी व चायनिज खाद्यपदार्थांच्या गाड्या टवाळखोरांचे अड्डेच बनले आहेत. अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा विभागात सुळसुळाट झाला असून, त्यामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. महापालिका व पोलिस प्रशासनाने अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी सातपूरकरांकडून होत आहे.

नाशिक शहरातील एक महत्त्वाचा भाग म्हणून सातपूर गावाची ओळख आहे. सातपूरकरांनी औद्योगिक वसाहतीसाठी सर्वांत मोठे योगदान दिले आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत सातपूर गावालगत असलेल्या आनंदवली, गंगापूर, पिंपळगाव बहुला, अंबडगाव याभागात नागरीवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या लोकवस्तीत अनेक भागातून कामगार वास्तव्यास सातपूर भागात आले आहेत. वाढत्या शहरीकरणात सध्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, तो ठिकठिकाणी अनधिकृतपणे उभ्या राहत असलेल्या अंडाभुर्जी व चायनिज व इतर खाद्यपदार्थांच्या गाड्यांचा. सायंकाळी सातनंतर सातपूरच्या मुख्य रस्त्यांवर कुणाची तमा न बाळगता या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मद्यपींचा अड्डाच भरलेला असतो.

सर्वाधिक गाड्या लिकर बारच्या बाजूला

खाद्यपदार्थांच्या सर्वाधिक गाड्या लिकरबार व बियरशॉपींच्या बाजूलाच लावलेल्या दिसतात. दुकानातून मद्य आणून गाड्यांजवळ मद्यपान केले जाते. दोन दिवसांपूर्वीच अशोकनगरला लिकर विक्रेता व अंडाभुर्जी विक्रेत्याचा वाद झाला होता. गाड्यांवर भांडणाचे प्रकार दररोजच होतांना दिसतात.

येथे थांबतात फेरीवाले...

सातपूर भागातील एमआयडीसी भिंतीलगत, सातपूर कॉलनी कार्नर, पपया नर्सरी कमानी खाली, समृद्धनगर कॉर्नर, अशोकनगर सिद्धिविनायक हॉल, शिवाजीनगर कार्बन नाका, धृवनगर बस थांबा इत्यादी ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्या लागलेल्या असतात. विशेष म्हणजे भुर्जी व चायनिजच्या गाड्यांवर विनापरवाना मद्य विक्रीचा व्यवसाय देखील काही जण करत असतात. शिवाजीनगर कार्बन नाक्यावर तर एका अनधिकृत फेरीवाल्याने सर्वच प्रकारचे मद्यांचे ब्रँड ठेवले आहेत. त्यातच या ठिकाणी चायनिज चालकाला संरक्षण म्हणून काही पोलिस देखील मदत करत असतात.

राजकीय नेत्यांचे पाठबळ

सातपूर भागातील काही ठराविक राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या खाद्यपदार्थांच्या गाड्या लागतात. काही रहिवाशी संबंधित राजकीय नेत्याला अनधिकृत असलेल्या अंडाभुर्जीची गाडी हटविण्याची मागणी देखील करतात. परंतु, केवळ आश्वासन देऊन पुढारी रहिवाशांना तात्पुरता दिलासा देतांना दिसतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खांडबहालेंची पुन्हा ग्लोबल भरारी!

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे तरुण संशोधक-उद्योजक सुनील खांडबहाले यांची मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या स्लोन फेलो इन इनोव्हेशन अॅण्ड ग्लोबल लिडरशिपसाठी अमेरिका येथे निवड झाली आहे.

एक वर्ष कालखंडाचा हा एक्झिक्युटिव्ह एमबीए प्रोग्राम असून, दरवर्षी प्रदीर्घ प्रक्रियेंतर्गत जगभरातील एकूण १२० लोकांची यासाठी निवड केली जाते. १ टक्क्याहूनही कमी स्वीकृती असलेल्या अतिशय स्पर्धात्मक अशा या प्रोग्रामसाठी फॉर्च्युन ५०० कंपन्यांचे प्रमुख, व्यवस्थापक इच्छुक असतात. या स्लोन एमबीए प्रोग्रामसाठी दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. सामाजिक कार्यात रमलेले सुनील खांडबहाले यांचा एकूणच जीवनप्रवास व माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचे मोलाचे योगदान बघून अमेरिकेच्या लेगाटम सेंटरने त्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, एमआयटीने डीन्स शिष्यवृत्ती, मास्टरकार्ड फाउंडेशन फेलोशिप तसेच मॅग्रोहिल एज्युकेशन व भारताच्या के. सी. महिंद्र

ट्रस्ट आदींनी त्यांना विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती देऊ केल्या असून, उर्वरित रकमेसाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. जूनपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आज (ता.२८) रोजी ते अमेरिकेला रवाना होतील. त्यांनी सुरू केलेल्या भारतीय भाषा तंत्रज्ञान आधारित खांडबहाले डॉट कॉम, ग्लोबल प्रॉस्पेरिटी फाउंडेशन व कुंभमेळा आधारित कुंभथाँनसाठी ते वेळोवेळी भारतात परत येतील.

माजी विद्यार्थ्यांमध्ये यांचा समावेश...

खांडबहाले यांची निवड झालेल्या या फेलोशिपच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये नोबेल पारितोषिक विजेते व युनायटेड नेशन्सचे प्रमुख कोफी अन्नान, मायक्रोसोफ्टचे कार्यकारी अध्यक्ष जॉन डब्ल्यू थॉम्प्सन, गुगलचे संचालक व फोर्ड मोटर्सचे माजी कार्याध्यक्ष अॅलन मुली, सागीया राष्ट्राचे गव्हर्नर अब्दुलात्तीफ ए अल ओथमन, शांघाय एअरपोर्ट अध्यक्ष सिव हियांग ली आदी मान्यवरांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसीलदारांच्या संपाबाबत संभ्रम

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुरगाणा येथील रेशन धान्य घोटाळ्याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील सात तहसीलदारांना निलंबित केल्यानंतर महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार २८ पासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, बुधवारी रात्री उशिरापर्यंत संघटनेकडून भूमिका स्पष्ट न झाल्याने संभ्रम कायम आहे. तहसीलदार संपाच्या निर्णयावर ठाम असल्याचे महसूलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले असले तरी राज्याचे मुख्य सचिव गुरूवारपासून जिल्हा दौऱ्यावर असल्याने तहसीलदार संपावर जाणार की मॅटच्या निर्णयाची वाट पहाणार याकडे लक्ष लागले आहे.

सात तहसीलदारांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे. कोणतीही चौकशी न करता ही कारवाई करण्यात आल्याने संघटनेने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. सात दिवसांच्या आत कारवाई मागे घेतली नाही तर राज्यभर कामबंद आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला मॅटमध्येही आव्हान देण्यात आले आहे. त्यावर २९ ला निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, या निर्णयाची वाट न संघटनेने संपावर जाण्याचे निश्चित केल्याचे बोलले जात होते. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय गुरूवारपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत असल्याने संपावर जावे की थांबावे याबाबत रात्री उशिरापर्यंत महसूल संघटनांमध्ये खलबते सुरू होती. विशेष म्हणचे दबावतंत्र कायम ठेवण्याचे संघटनांचे धोरण असले तरी त्यावर स्पष्टपणे काही न बोलता मौन पाळणेच संघटना पदाधिकाऱ्यांनी पसंत केले आहे.

नागरिकांना फटका

तहसीलदारांनी पुरवठा विभागाशी संबंधित कामे बंद केल्याचे विपरीत परिणाम सामान्य नागरिकांना भोगावे लागत आहे. त्यातच तहसीलदार गुरूवारपासून खरोखरच संपावर गेल्यास महसुलची कामे ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. दरम्यान, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेचाही संपावर जाण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतंत्र विदर्भ भाजपच्या अजेंड्यावर

$
0
0




म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा टोलवला असला तरी प्रदेश त्यांच्याच पक्षाच्या प्रवक्त्यांनी स्वंतत्र विदर्भाच्या मुद्द्यावर भाजप कायम असल्याचा दावा केला आहे. छोट्या राज्यांची निर्मिती हा एनडीए सरकारचा निर्णय आहे. त्यामुळे स्वंतत्र विदर्भाचे आश्वासन राज्य भाजपने दिले असून, तेच कायम असल्याची भूमिका प्रदेश प्रवक्ते व प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर यांनी मांडली. त्यामुळे प्रवक्त्यांनीच राष्ट्रीय अध्यक्षांची भूमिका खोडून काढली आहे.

भाजपच्या जनकल्याण पर्वाच्या निमित्ताने भाजप कार्यालयात भातखळकर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकारांशी बोलतांना भातखळकर यांनी प्रदेश भाजप स्वतंत्र विदर्भावर ठाम असल्याचा दावा केला. राज्य भाजपची ही अधिकृत भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. एनडीए सरकारने गेल्या वेळेस तीन राज्यांची निर्मिती केल्याचा दाखलाही त्यांनी दिला. विधानसभेन एकमताने ठराव केल्यास स्वंतत्र राज्य निर्मिती होवू शकते, अशी पुश्तीही त्यांनी जोडली. दरम्यान, यावेळी भातखळकर यांनी वर्षपूर्ती निमित्ताने भाजप सरकारच्या कामगिरीचा आढावा सादर केला.

शिवसेनेशी सलोखा कायम

जनकल्याण पर्वाच्या उपक्रमात शिवसेना कुठे दिसत नसल्याच्या मुद्द्यावर भातखळकर यांनी शिवसेना आमच्या सोबत असून, त्यांच्याशी सलोख्याचे संबध असल्याचा दावा केला. वर्षभरातनंतही नवरा बायकोत कुरबुरी होतात. मात्र संबध कायम असल्याचा दाखला देत, केंद्रीय मंत्री अनंत गिते या उपक्रमात सहभागी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्याण समितीच्या अध्यक्षपदी सानप

$
0
0




नाशिक : राज्य सरकारने विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात नाशिकला प्रतिनिधीत्व मिळाले नसले तरी, समितीच्या रुपाने नाशिकला प्रथमच राज्य सरकावर प्रतिनिधीत्व मिळाले आहे.

मुंबईत विधानभवन येथे झालेल्या विधानमंडळ समित्यांच्या उदघाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आ. सानप यांच्या नावाची घोषणा केली. या समितीवर एकूण १५ सदस्य असून, यात विधानसभेचे ११ व विधान परिषदेचे ४ सदस्य आहे. शासनाने आपल्या यंत्रणाखाली असलेल्या सेवांमध्ये व पदावर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, उमेदवारांना शासनाने ठरवून दिलेल्या टक्केवारीप्रमाणे नोकर्‍यामंध्ये त्या प्रमाणात प्रतिनिधीत्व आणि पदोन्नती दिली जाते किंवा नाही आदी बाबी पाहण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाराचारमुक्ती हेच मोठे काम

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काँग्रेसने गरिबांच्या नावावर राजकारण करून देशाला घोटाळ्यांशिवाय दुसरे काही दिले नाही. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने भ्रष्टाचार मुक्त सरकार देशाला दिले आहे आणि हीच सरकारची मोठी उपलब्धी असल्याचा दावा भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केला आहे. वर्षभरात गरिबांच्या कल्याणासाठी विविध योजना आणल्या असून, परदेशातही भारताची प्रतिमा उंचावल्याचा दावा त्यांनी केला आहे.

भाजपच्या वतीने जनकल्याण पर्वाच्या निमित्ताने महाकवी कालिदास कलामंदिरात जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, आ.देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, पुष्पा शर्मा, गोपाळराव पाटील, नगरसेवक दिनकर पाटील, सुनील बागुल यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

मोदी सरकारच्या वतीने वर्षभर गरिबांच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा पाढा यावेळी रहाटकर यांनी वाचला. देशात ६० वर्षांचे जुलमी सरकार गेल्यानंतर लोकांना जादूच्या कांडीप्रमाणे बदल हवे होते. नरेंद्र मोदी लोकांची अपेक्षा पूर्ती करण्यात यशस्वीही ठरले आहेत. परदेशात भारताची प्रतिमा उंचावली आहे. जगात भारत विश्वगुरू होवू शकतो, असा विश्वास मोदींनी निर्माण केला आहे.

जनधन, अटल पेन्शन, सुरक्षा योजनांसारख्या योजनांमुळे गरिबांना फायदा झाला आहे. काँग्रेस पक्ष हा गरिबांसोबत कधीच नव्हता. गरिबांवर राजकारण करत घोटाळ्यांची देणं देशाला दिली. मात्र, मोदी सरकारच्या वर्षभराच्या कारकिर्दीत देशात एकही घोटाळा झाला नाही. घोटाळ्यांना तिलांजली दिली आहे. एक विचारधारेने आम्ही देशाचा विकास करीत असल्याचा दावाही रहाटकर यांनी केला आहे.

दानवेसंह दोन आमदारांची पाठ

भाजपच्या मेळावा हा प्रदेशाध्यक्ष रावसाहेबन दानवे यांच्या उपस्थितीत होणार होता. मात्र, सकाळी ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे दानवेंच्या जागी रहाटकर यांना पाचारण करण्यात आले. दानवेंचा दौरा रद्द झाल्याने पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांचा जोश काही अंशी कमी झाला. तर या मेळाव्याकडे दानवेंपाठोपाठ आमदार सीमा हिरे, डॉ.राहुल आहेर यांनी पाठ फिरवली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको-सातपूरचा पाणीप्रश्न तापला

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिडको आणि सातपूर प्रभागातील कृत्रिम पाणीटंचाई, प्रभाग समित्यांना अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीच्या विषयावरून सिडको-सातपूरच्या नगरसेवकांनी बुधवारी महापौरांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रभागातून पाणी पळवण्याच्या, अधिकाऱ्यांच्या बेलगाम उत्तरांचा आलेला अनुभवच नगरसेवकांनी महापौरांसमोर कथन केल्यानंतर महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले. तर नगरसेवक दुबळे पडत असून, लबाड आणि बोगस अधिकारी महापालिकेत असल्याचा आरोप स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी केला.

सिडको आणि सातपूरच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर बुधवारी महापौर अशोक मुर्तडक यांच्या दालनात नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी सभागृह नेते सलिम शेख, मनसेच्या अर्चना जाधव, बापू सोनवणे, माकपचे गटनेते तानाजी जायभावे, काँग्रेसचे लक्ष्मण जायभावे, मनसे गटनेता अनिल मटाले, यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते. आपल्या प्रभागातील पाणी पळविले जात असल्याचा आरोप अर्चना जाधव यांनी केला. गेल्या तीन दिवसांपासून आपल्या प्रभागात पाणी येत नसून अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता यू. के. पवार यांना पाचारण करण्यात आले. यावेळी इंजिनीअर्सची संख्याच कमी असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यामुळे चिडलेल्या महापौरांनी गोल गोल उत्तरे देवू नका असे त्यांना सुनावले. जे अधिकारी काम करीत नसतील, त्यांच्या तत्काळ बदल्या करा असे फर्मान त्यांनी सोडले. कृत्रिम पाणीटंचाई केली जात असल्याचा आरोप जायभावे, सोनवणे यांनी केला.

पाण्याचे नियोजन केले जात नसल्यानेच पाणीटंचाई होत असल्याचा दावा नगरसेवकांनी केला. त्यामुळे तत्काळ टँकर्स उपलब्ध करण्याचे आदेश महापौरांनी यावेळी दिले. पाणीप्रश्नासोबतच प्रभाग समित्यांच्या बैठकांना दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवरही बैठकीत खल झाला.

'लबाड, बोगस अधिकारी'

कामकाज करण्याच्या बाबतीत नगरसेवक दुबळे पडत आहेत. आपण कमी पडत असल्याचा लाभ अधिकारी घेत असल्याची टीका स्थायीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी केली. महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांच्यासारखे लबाड आणि बोगस अधिकारी व कर्मचारी कुठेच नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


`सिल्क अँड कॉटन` प्रदर्शन सुरू

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक.

ग्रामीण हस्तकला विकास समितीतर्फे वस्त्रउद्योग मंत्रालय यांचा 'सिल्क अँड कॉटन फॅब ऑफ इंडिया' या प्रदर्शनाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. हे प्रदर्शन पंचम हॉल हॉटेल ग्रीन व्ह्यू, शरणपूर लिंक रोड नाशिक येथे दि. ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहे. प्रदर्शनास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या प्रदर्शनात भारतातील उत्कृष्ठ विणकरांनी तयार केलेल्या प्राचीन व पारंपरिक पध्दतीच्या रेशिम व सुती, डिझायनर सूट, ड्रेस मटेरियल, होम फर्निशिंग व साड्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.

याशिवाय तामिळनाडू येथील कोईम्बतूर कॉटन, कांजीवरम सिल्क, कर्नाटकमधील म्हैसूर सिल्क, जॉजेट साडी, बंगलोर सिल्क, आंध्र प्रदेशातील कालामकरी, मंगलगिरी ड्रेस मटेरियल, बिहार येथील भागपुरा सिल्क ड्रेसमटेरियल, ब्लॉक हॅण्डप्रिंट सिल्क साडी आदी प्रकारचे कॉटनचे कपडे प्रदर्शन आणि विक्रीसाठी नाशिककरांसाठी उपलब्ध असणार आहेत. हे प्रदर्शन दि. ३१ मे पर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ वा. पर्यंत सुरू राहणार असून, नाशिककरांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक अध्यक्षपदाची निवडणूक तीन जूनला

$
0
0




म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, ३ जूनला जिल्हा बँकेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपची निवड होणार आहे.

सकाळी ११ ते २ या वेळेत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, निवडणुकीची घोषणा होताच अध्यक्षपद मिळवण्यासाठी कोकाटे आणि हिरे गट सक्रिय झाला असून, विजयासाठी अकरा संचालकांचे गणित जमवण्यासाठी हालचाली सुरू केला आहेत. तर पाच संचालकांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याने सत्तेची चुरस वाढली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार अपूर्व हिरे आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे या दोघांच्याही पॅनलला पूर्ण बहुमत मिळाले नाही. हिरे गट बहुमताच्या जवळ असला तरी, विजयी आकडा गाठण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर कोकाटे यांनीही अध्यक्षपद मिळवण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. संचालक केदा आहेर, सुहास कांदे, आमदार अनिल कदम, हलकंदर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

कोणत्याही गटात नसलेल्या काही संचालकांनी हिरे आणि कोकाटे या दोघांनाही विरोध केल्याने ऐनवेळी अध्यक्षपदी तिसराच व्यक्ती येण्याचीही शक्यता आहे. येत्या ३ जूनला अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून सकाळी ११ ते ११.३० नामनिर्देशन पत्र दाखल केले जाणार आहेत. ११ ते ११.४५ या वेळेत छाणणी, ११.४६ ते १२ या दरम्यान अर्ज माघारी घेतले जाणार आहेत. १२ ते १२.४५ दरम्यान मतदान घेतले जाणार आहे. त्यांनतर मतमोजणी होणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप माळोदे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकरांच्या वृक्षप्रेमाची साक्ष

$
0
0



प्रशांत भरवीरकर, नाशिक

अनेक फुले फूलती। फुलोनिया सुकोन जाती।। कोणी त्यांची महती गणती ठेविली असे।। मात्र अमर होय ती वंशलता। निर्वंश जिचा देशाकरिता।।

हे विचार आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे. स्वातंत्र्याच्या लढ्यातील अग्रणी सैनिक म्हणून ओळख असलेले सावरकर प्रचंड विज्ञानवादी होते. त्याचीच एक झलक म्हणजे आधाराश्रमाच्या मागच्या बाजूला सावरकरांन‌ी लावलेले निंबोणीचे झाड. आता या झाडाचे भल्यामोठ्या वृक्षात रूपांतर झाले आहे.

स्वातंत्र्याचे अमर्याद विचार देणाऱ्या सावरकरांचे इतर विचारही सुप्रसिध्द आहेत. त्यातच त्यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन, त्यांनी सांगितलेले गायीचे महत्त्व तसेच यांत्रिक कामाच्या पध्दतीवर त्यांनी केलेले भाष्य सर्वश्रृत आहे. परंतु सावरकरांचे झाडांवरही विलक्षण प्रेम होते. त्यावेळी काळाची पावले ओळखून 'झाडे लावा, झाडे जगवा' या संदेशाला त्यांनी बळ दिलेले दिसते.

साहित्यातून वृक्षवल्लीची आस्था प्रकट करूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी प्रत्यक्ष वृक्षरोपणही करून कृतीशीलता दाखवून दिली. त्याचाच एक भाग म्हणून अंदमानातून सुटका झाल्यावर २६ जुलै १९३७ मध्ये त्यांनी आधाराश्रमाच्या मागच्या बाजूला असलेल्या 'तिवारी महल'च्या अंगणात निंबोणीचे झाड लावले. 'तिवारी महल'चे मालक किसनलाल चक्रपाणी उर्फ के.सी. तिवारी हे सावरकरांचे जिवश्च कंठश्च मित्र. अभिनव भारतच्या पाच संस्थापकांपैकी एक असलेल्या तिवारींच्या महलमध्ये सावरकरांचा अनेकदा मुक्काम होत असे. विशेष म्हणजे काँग्रेस अधिवेशनाला आलेले अनेक दिग्गज राजकारणी धुरंधर नेते त्याकाळी तिवारी महलमध्ये मुक्काम ठोकत असत. के. सी. तिवारींच्या घरी मुक्कामी असल्यानंतर सावरकर नेहमीच झाडे व त्यांच्या पालनपोषणाविषयी त्यांच्याशी चर्चा करीत. यातून प्रेरणा घेऊन तिवारी यांनी महलच्या मागील बाजूस अडीचशे स्क्वेअर मीटरवर वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली. यात वड, औदुंबर, फणस, खिरण्या या झाडांचा प्रामुख्याने समावेश आहे. आजही ही झाडे सुस्थितीत असून सावरकरांनी लावलेला वृक्ष मात्र तिवारी महलच्या दर्शनी भागात असून आजही तो जाणा-येणाऱ्यांना त्यांच्या वृक्षप्रेमाची खूण पटवून देतो.

मागील सिंहस्थामध्ये रस्त्याला अडचण होते म्हणून सावरकरांनी लावलेले हे झाड तोडण्याचे आदेश देण्यात आले होते; परंतु त्यावेळी आधी नाशिक कोर्ट व नंतर हायकोर्टात जाऊन हे झाड चंडालिया, नाझरे अॅड. भावसार व आम्ही वाचवले. त्यावेळी आम्हाला दीड दोन लाख रूपये खर्च आला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आम्हाला दिलेला हा अनमोल ठेवा आम्ही आजही प्राणपणाने जपण्याचा प्रयत्न करीत आहोत. - योगेश तिवारी, झाडाचे सध्याचे पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेश घ्या पण, नोकरीची खात्री नाही!

$
0
0



डी. एल. एड.साठी एमएससीईआरटीची भूमिका; कॉलेजेसमध्ये भरमसाठ जागा, तुलनेत नोकऱ्या कमी

गायत्री काळकर, नाशिक

हमखास नोकरी, १०० टक्के कॅम्पस प्लेसमेंट अशी आकर्षक पॅकेजेस देणाऱ्या शिक्षण संस्थांच्या या युगात जर कोणी 'प्रवेश घ्या, पण नोकरीची खात्री नाही', अशी जाहिरात करीत असेल तर त्याला वेड्यात काढले जाईल. पण असे करण्याची वेळ आपल्या राज्याच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेवर अर्थात 'एमएससीईआरटी'वर आली आहे. कॉलेजमधील भरमसाठ जागा आणि नोकऱ्यांसाठी तुटपुंजी पदे हे वास्तव आता डोईजड झाल्यामुळेच ही परिस्थिती ओढावली आहे.

एखाद्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी त्याची जाहिरात वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द केली जाते. प्रवेशाची इत्यंभूत माहिती देणाऱ्या या जाहिरातींमध्ये विद्यार्थी मिळविण्यासाठी बहुतांशवेळा नोकरीची हमी दिली जाते. पण 'एमएससीईआरटी'ने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या प्राथमिक शिक्षण पदविका (डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन, डी. एल. एड.) या अभ्यासक्रामाच्या जाहिरातीमध्ये 'संबंधीत अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना नोकरी मिळेलच याची खात्री नाही', असे जाहीर करण्यात आले आहे. तसेच गेल्या दोन वर्षातील शिक्षक पात्रता परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची ९,८०, ६८९ ही संख्याही यामध्ये नमूद केली आहे. संबंधित अभ्यासक्रमाच्या पदवीधरांची बेरोजगारी अवस्था या जाहिरातीतून ठळकपणे दिसून येत आहे. जाहिरातीतही नोकरीची संधी नसल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकडे विद्यार्थी आपसूकच पाठ फिरविण्याची शक्यता आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये शिक्षण होण्याच्या महत्त्वाकांक्षेने, डीएड. बीएड. अशा पदव्या मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची बेरोजगारी या विषयाचा चावून चोथा झाला आहे. या अभ्यासक्रमांच्या उपलब्ध असलेल्या भरमसाठ जागा आणि नोकरीसाठी उपलब्ध असलेल्या मर्यादित जागा यांच्यातील मोठी तफावत या परिस्थितीला कारणीभूत ठरली आहे. राज्यभरातील डीएड कॉलेजची संख्या कमी करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी 'डीएड' कॉलेजची तपासणी करण्याचा घाटही सरकारने घातला होता. पण या जाहिरातीमुळे तर विद्यार्थ्यांअभावीच ही कॉलेजेस बंद पडतील अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

मागेल त्या संस्थेला अभ्यासक्रम चालविण्याची मान्यता देणाऱ्या सरकारला आता ही कॉलेजेस म्हणजे नाकापेक्षा मोती जड असा प्रकार झाल्याचे दिसून येत आहे.

अभ्यासक्रमाबाबत कोणत्याही विद्यार्थ्याची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना आम्हाला सरकारमार्फत करण्यात आली होती. त्यामुळे अशी माहिती प्रसिध्द करण्यात आली. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरी न मिळाल्यास अनेक विद्यार्थी मोर्चे काढतात, विविध स्तरातून याबाबत विचारणा होत असते. अनेकदा अभ्यासक्रमाची तसेच सरकारची बदनामीही होते. त्यामुळे सत्य परिस्थितीचा उल्लेख या जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. सध्या शिक्षक भरतीची कोणतीही प्रक्रिया सुरू नाही. विद्यार्थ्यांना केवळ सूचना म्हणून ही माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही कॉलेजचे किंवा संस्थेचे नुकसान करण्याचा यामध्ये उद्देश नाही. - एन. के. जरग, संचालक, एमएससीईआरटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेबसाईटस् पुन्हा कोलमडल्या

$
0
0


विद्यार्थी अन् पालकांच्या पदरी पुन्हा निराशा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इयत्ता बारावीच्या निकालाच्या उत्सुकतेवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कारभाराने बुधवारी पाणी फेरले. निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांतच सरकारी वेबसाटसने नांगी टाकल्याने विद्यार्थी व पालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये १२ वीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. हा निकाल पाहण्यासाठी मंडळाने www.maharesult.nic.in, www.hscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com, या तीन वेबसाईट उपलब्ध करुन देण्यात आल्या. निकालाची मोठी उत्सुकता असल्याने विद्यार्थी व पालकांनी मंडळाकडून देण्यात आलेल्या या तिन्ही वेबसाईटस उघडल्या. पण, निकाल जाहीर होऊन अवघी १५ मिनिटे होत नाही तोच या सर्व वेबसाईट क्रॅश झाल्याचे पहायला मिळाले. परिणामी, विद्यार्थ्यांना व पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. उत्तर महाराष्ट्रातून जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली होती. या सर्वांनाच वेबसाट क्रॅश होण्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक विद्यार्थी सायबर कॅफे, काही जण स्मार्ट फोनद्वारे प्रयत्न करत होते. मात्र, त्यास यश येत नव्हते.

राज्यभरातून लाखो विद्यार्थी व पालक निकाल पाहणार हे माहिती असूनही मंडळाकडून त्याची योग्य ती खबरदारी घेण्यात आली नाही. त्यामुळेच वेबसाईट क्रॅश झाल्याचे दिसून येत होते.

अखेर रेडिफचा आधार

मंडळाने उपलब्ध करुन दिलेल्या वेबसाईट उपयुक्त ठरत नसल्याने अखेर विद्यार्थी व पालकांनी www.rediff.com/exam या वेबसाईटला प्राधान्य दिले. या वेबसाईटवरुन तातडीने निकाल उपलब्ध होत असल्याचे दिसून येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकालाचं 'सोशल' सेलिब्रेशन!

$
0
0



फेसबुक, व्हॉट्सअपवर आनंदाचं आदान-प्रदान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुठलाही सण असो वा आनंदाचा प्रसंग तो सोशल मीडियावर आवर्जून शेअर केला जातो. बारावीचा निकाल जाहीर झालेला बुधवारचा दिवसही त्याला अपवाद ठरला नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांनी हा आनंद फेसबुक, व्हॉट्सअपवर शेअर केला.

दहावी बारावीचा निकाल हा प्रत्येक घरातील चर्चेचा विषय असतो. कारण आपल्या घरातील, शेजारी किंवा नात्यातील दरवर्षी कुणीतरी ही परीक्षा देणारा असतो. त्यामुळे निकालाची उत्सुकता प्रत्येकाला असते. पूर्वी हा निकाल सर्वांपर्यंत साधारण दोन दिवस तरी जात असत. मात्र सोशल मीडियाने गेल्या काही वर्षात सर्वांनाच एकत्र आणले आहे. त्यामुळे बुधवारी काही मिनिटांतच हा निकाल सर्वांपर्यंत पोहोचला आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.

वेबसाईटवरून निकाल कळल्यानंतर आपोआप व्हॉट्सअप ग्रुपवर तो शेअर केला गेला. कुणाचा धाकटा भाऊ तर कुणाची बहीण बारावी परीक्षेत उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याने हा आनंद नेटीझन्सनेही शेअर केला. त्यामुळेच व्हॉट्सअप, फेसबुकवरही दिवसभर बारावी परीक्षेच्या निकालाचे वर्चस्व पहायला मिळाले. फेसबुकवरील काही गमतीदार पोस्टनेही यावेळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. तसेच अनेकांच्या व्हॉट्सअप डीपीवरही बारावीतील यशाचे कौतुक करणारे स्टेटस अपडेट झाल्याचे दिसून आले.

फक्त अभिनंदनाच्याच नाही तर यानंतर करिअर कुठल्या क्षेत्रात करायचे असा सल्लाही मागवण्यात आला. तर काहींनी आपल्या लहान भावंडाचे कौतुक करत परंपरा जपल्याच्याही पोस्ट यावेळी शेअर केल्या. एकंदरीत बारावी निकालाचा आनंद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर साजरा झाल्याचे चित्र होते. फेसबुकवर दोन दिवस आधीपासूनच निकालाची आठवण करून देणा-या पोस्ट टाकल्या जात होत्या, तर व्हॉट्सअपवरही मॅसेज फिरत होते. निकाल जाहीर झाल्यानंतर पास झालेल्यांचे अभिनंदन तसेच अनुत्तीर्ण झालेल्यांना प्रोत्साहन देणारे मेसेजेस एकमेकांना पाठविले जात होते. त्याचबरोबर पुढील संधीसंबंधीही मार्गदर्शन केले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकांक्षापुढती गगन ठेंगणे...

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुणाला रहायला व्यवस्थित घर नाही, कुणाला अभ्यासासाठी घरात लाईटच नाही तर कुणाला पुढील शिक्षणाचीच नाही तर एकवेळच्या जेवणाचीही भ्रांत पडलेली पण डोळ्यात मात्र भव्यदिव्य स्वप्न, काहीतरी बनून दाखविण्याचे. आशेचा दिवा अजिबात मंदावलेला नाही. अशांसाठी 'मटा'तर्फे चालविण्यात येणारा सामाजिक उपक्रम म्हणजेच 'हेल्पलाइन'. २०१३ मध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली होती त्यांनी समाजाने केलेल्या मदतीची बूज राखत आज बारावीत देदीप्यमान असे यश मिळवले आहे. या यशामुळे एकप्रकारे त्यांनी समाजाला त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड करण्याचे संकेतच दिले आहे. रूपेश गांगुर्डेला बारावीत ९०.२० टक्के...अमृता निकमला ८३ टक्के...निकिता देवरगावकरला ७८ टक्के मिळाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत या विद्यार्थ्यांनी दहावीत असताना चांगले मार्कस मिळवले असल्याने व त्यांना पुढील शिक्षणासाठी मदतीची गरज असल्याने मटा हेल्पलाइनमध्ये त्यांची निवड झाली. आज त्याचे चीज करीत या विद्यार्थ्यांनी पुढील यशाची वाटचाल सुरू ठेवली आहे.

मदतीची बूज राखली

रूपेश गांगुर्डे हा हरहुन्नरी मुलगा. केवळ आईला मदत करता यावी, यासाठी त्याने त्याच्या अनेक इच्छा-आकांक्षांवर पाणी सोडले. पाचवीपासून यशाची शिखरे गाठणाऱ्या त्याला दहावीला ९४.१८ टक्के इतके गुण मिळाले. मेडिकलला जाण्याचे त्याचे स्वप्न होते. दहावीमध्ये आर्थिक दृष्ट्या कमजोर म्हणून त्याला पुढील शिक्षण घेणे अवघड झालेले असताना 'मटा'ने त्याला साथ दिली. समाजाने ओघवत्या हाताने त्याला मदत केली आणि आज त्याने बारावीला ९०.२० टक्के इतके मार्कस मिळवत समाजाने केलेल्या मदतीची बूज राखली.

'मटा'ची अमृताला साथ

अमृता निकम ही नाशिकरोड येथील भीमनगरात राहणाऱ्या उत्तम नामदेव निकम यांची मुलगी. दहावीपर्यंतचे शिक्षण अत्यंत खडतर परिस्थितीत होऊनही तिने पहिल्या पाचात नंबर कधी सोडला नाही. अत्यंत हुशार म्हणून वाखाणली जात असतानाच अनेक इच्छा-आकांक्षांना तिला मोडता घालावा लागला. पैशांअभावी तिने कोणतीही वेगळी ट्युशन लावली नाही, परंतु यशाने मात्र तिलाच निवडत तिच्या गळ्यात माळ टाकली. दहावीला तिला ९२.३६ टक्के मिळाले, तिला सीए व्हायचंय. परंतु आपल्या आधाराशिवाय ते शक्य नव्हते म्हणून 'मटा'ने तिला साथ दिली. पुढील शिक्षणासाठी एक चांगली रक्कम तिला मिळवून देत आधार दिला आज तिला ८३ टक्के गुण मिळाले आहे. तिला सीए करायचे असून सीपीटी ची तयारी ती करीत आहे.

निकिताची तयारी सुरू

अभ्यासाला जागा नाही, कशीबशी जागा मिळवली तर घरात लाईटचा पत्ता नाही अशा अवस्थेत निकिता देवरगावकरने दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के मार्क मिळवले. कुटुंबाची स्थिती हलाखीची असली तरी तिने धीर सोडला नाही. इच्छाशक्ती, अभ्यासाची चिकाटी आणि सातत्याने प्रयत्न या जोरावर निकिताची शैक्षणिक कारकिर्द सुरू आहे. तिला सीए व्हायचे असल्याने तिची चिकाटी व मेहनत पाहून तसेच तिचे गुण लक्षात घेता 'मटा'ने तिला मदत मिळवून दिली. तिला बारावीला ७८ टक्के मिळाले असून ती सीपीटीसाठी तयारी करीत आहे.

चैतालीचे नशिब उजळले

चैताली तुंगारने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत दहावीच्या परीक्षेत ९२.६० टक्के मार्क मिळवले. तिला इंजिनीअर व्हायचे होते. तिच्या वडिलांना जेमतेम साडेतीन हजार रुपये पगार, त्यामुळे चैतालीची आईही सिन्नर येथील माळेगावच्या एका कंपनीत कामाला जाते. हा पैसा तिच्या शिक्षणासाठी पुरेसा अजिबात नाही. 'मटा'ने तिला हेल्पलाइनसाठी निवडले व तिचे नशिबच उजळले. सध्या ती उच्च शिक्षण घेत असून मदतीसाठी नेहमी ऋणातच राहणे पसंत करतेय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकचा निकाल ८८.१३ टक्के

$
0
0




नाशिक : नाशिक विभागाचा निकाल राज्यात सर्वात निचांकी म्हणजेच ८८.१३ टक्के लागला आहे. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस कला, वाणिज्य, विज्ञान व एचएससी व्होकेश्नल या शाखांतील नाशिक विभागातून १ लाख ४० हजार ९९६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ४० हजार ८२४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यातील १ लाख २४ हजार ११५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८८.१३ इतकी आहे. येत्या ४ जूनला सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांना मार्कशीटचे वाटप संबंधित कॉलेजमध्ये करण्यात येणार असल्याचे मंडळाचे नाशिक विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले आहे.

बारावीचा निकाल लागणार म्हणून शहरात बुधवारी सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकांमध्येही हुरहूर दाटली होती. १ वाजता निकाल जाहीर झाला तेव्हा सायबर कॅफे, कॉलेजरोड आदी ठिकाणी विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तर काहींना अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला. पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना मार्कशीटची ४ जूनपर्यंत वाट बघावी लागणार आहे. नाशिक विभागात यंदाही मुलींनी बाजी मारली असून, ९०.२३ टक्के तर मुलांचा ८४.८२ टक्के निकाल लागला आहे. दुपारी १ वाजता निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबियांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकारला जशास तसे उत्तर देऊ’

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र आणि राज्य सरकार उद्योगपती आणि बिल्डरांना जमिनी देण्यासाठी बळाचा वापर करणार असेल तर यापुढे या सरकारला मिळेल त्या साधनाने त्यांच्याच भाषेत प्रतिकार करू, असा इशारा खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

आम्ही कोणत्याही सरकारचे भाट नसून, नरेंद्र मोदी सरकारची वर्षभराची कारकीर्द शेतकऱ्यांसाठी निराशाजनक राहिल्याची टीका त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी येत्या ९ जूनपासून नाशिकमधून भूमि बचाओ अभियान सुरू करणार असून, या अभियानासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही आमंत्रित करण्यात आल्याची माहिती शेट्टी यांनी दिली आहे.

इंडिया बुल्सकडून सुरू असलेल्या जमीन संपादनाच्या कारवाई विरोधात शेतकऱ्यांच्या बैठकीसाठी शेट्टी नाशिकमध्ये आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्राच्या भूमिअधिग्रहण कायद्यासह विविध मुद्यांवर टीका केली. बाजारभावाच्या चौपट मोबदला आणि संरक्षण वगळता शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन अधिग्रहीत करू नये, अशी स्वाभिमानीची भूमिका आहे. मात्र, तरीही बिल्डर आणि उद्योगपतींसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात आहे. सिन्नरचा सेझ आणि इंडिया बुल्ससाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने घेतल्या जात आहेत. त्यामुळे स्वाभिमानीच्या वतीने येत्या ९ जूनला नाशिकमध्ये भूमिबचाओ अभियान सुरू केले जाणार आहे. या मेळाव्यात उत्तर महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त शेतकरी येणार आहेत.

मोदींची वर्षपूर्ती निराशाजनक

केंद्रातील नरेंद्र मोदीची वर्षभरातील कामगिरी ही शेतकऱ्यांच्याबाबतीत तरी निराशाजनक राहिल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाचले शिक्षण संस्थेचे संकुल

$
0
0


सुप्रीम कोर्टाने फेटाळली विरोधातील याचिका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ग्रामिण शिक्षण प्रसारक मंडळाच्या ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलाच्या विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे ब्रह्मा व्हॅली या संस्थेला दिलासा मिळाला आहे. याचिकेसंदर्भातील कोर्टाच्या निकालाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना माहितीस्तव निवेदनाद्वारे दिल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी दिली.

अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथील संस्थेच्या संकुलाबाबत पर्यावरण संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याने चार वर्षांपूर्वी ही याचिका हाय कोर्टात दाखल केली होती. मात्र, या कोर्टाने याचिका रद्द केल्याने नंतर या पदाधिकाऱ्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. अंजेनेरीच्या शैक्षणिक संस्थेचे बांधकाम अनधिकृत असल्याने ते पाडून टाकण्यात यावे, असा मुद्दा नाशिक जिल्हा पर्यटन मंचचे अध्यक्ष प्रकाश चौधरी यांनी याचिकेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. २०११ मध्ये ही याचिका दाखल करण्यात आली होती.

याबाबत न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान २० डिसेंबर २०११ रोजी ही याचिका फेटाळण्यात आली होती. या याचिकेत आक्षेप घेण्यात आलेल्या मुद्द्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने संस्थेला शैक्षणिक प्रयोजनार्थ गट नं. ५९२ ब क्षेत्र १४ हे. आर इतक्या जागेचे वितरण रद्द करण्यात यावे, संबंधित जागेवरील बांधकाम पाडण्यात यावे, या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या.

संस्थाध्यक्ष व विश्वस्त मंडळाने राजकीय बळाचा उपयोग करून प्रादेशिक विकास आराखड्यातील जमिनींवर शैक्षणिक संकुल उभारल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. याचबरोबरीला नियमांचे सर्रास उल्लंघन करीत ग्रामपंचायतींचा ठराव वा कुठलेही ना हरकत प्रमाणपत्र संस्थेने घेतलेले नाही, कायदेशीर बाबींच्या पालनाशिवाय जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले आहे, परस्पर बांधकाम करण्यात आले, शासनाच्या परवानगीशिवाय शैक्षणिक संस्थेच्या बांधकामासाठी कोट्यवधींचे कर्ज घेण्यात आले अशा आरोपांचा यामध्ये समावेश होता. हाय कोर्टापुढे झालेल्या सुनावणीत ही याचिका रद्द करण्यात आली होती.

या निकालास याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. तेथे दिल्ली खंडपीठासमोर झालेल्या अंतिम सुनावणीत मुंबई हाय कोर्टाचा निकाल कायम ठेवत चौधरी यांची याचिका गुणवत्तेच्या आधारावर फेटाळली गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रॉम्प्टनमधील संपाचा सुटेना तिढा!

$
0
0



कामगार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेतनवाढीच्या कराराहून संपाच्या भूमिकेत शिरणाऱ्या सीटूप्रणित युनियने आता याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. बुधवारच्या द्वारसभेत अधिकारी अन् मंत्र्यांवर अविश्वास दाखविणाऱ्या संपकर्त्या युनियनला अद्यापही जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रश्नी मध्यस्थी होण्याचा आशावाद वाटतो आहे. संपकरी कामगारांकडून व्यवस्थापनाकडे केल्या गेलेल्या मागण्या पुन्हा मांडत सीटूच्या वतीने डॉ. डी. एल. कराड, आर. एस. पांडे आणि एस. के. ठोंबरे यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. याप्रश्नी आता त्यांनी मध्यस्थी करावी, अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

क्रॉम्प्टन ग्रीव्हज या कंपनीच्या कामगारांना १७ हजार रूपयांच्यापेक्षा जास्त पगार मिळत नसल्याचा सीटूप्रणित युनियनचा दावा धादांत खोटा असल्याचा दावा आयटकप्रणित युनियनने एका प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून केला आहे. कामगारांचा पगार हा नव्या वेतन करारानुसार सुमारे ३० हजारांपेक्षाही जास्त असल्याचे ग्रीव्हज कॉटन अॅण्ड अलाईट कंपनीज एम्प्लॉईज युनियनने म्हटले आहे. क्रॉम्प्टन ग्रीव्हजच्या कामगारांना संपावर जाण्यासाठी प्रवृत्त करण्यात येऊन त्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोपही आयटकप्रणित युनियनने केला आहे. कामगारांच्या वाढीव पगाराबाबत पेमेंट स्लीपसारखे पुरावेही साक्षी असल्याचा दावा युनियनने केला आहे. बुधवारी संपकरी कामगारांच्या प्रतिनिधींनी कामगारांशी संवाद साधताना कंपनीच्या वतीने देण्यात येणाऱ्या वेतनाचा ऊहापोह केला होता. यामध्ये १७ हजारांच्या मर्यादेपलीकडे कामगारांना वेतन नसल्याचे सीटूप्रणित युनियनचे म्हणणे आहे. तर हा दावा खोडून काढताना कामगारांच्या वेतनाने आता ३० हजार रूपयांचा टप्पा ओलांडल्याचा दावा आयटकप्रणित युनियनने केला आहे.

दोन्हीही युनियन्स त्यांच्या मुद्द्यावरून मागे हटण्यास तयार नसल्याने अद्यापपर्यंत संपावर आशावादी तोडगा निघू शकलेला नाही. परिणामी, औद्योगिक वसाहतीमधील लघुउद्योगांनाही याचा फटका बसत असून, हजारो व्हेंडर्सही या संपाच्या प्रभावाखाली आले आहेत. संप मिटविण्यासाठी औद्योगिक संघटनांच्या बरोबरीनेच पोलिस प्रशासानासारखे घटकही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

नरसय्या आडम यांचा इशारा

संपकरी कामगारांच्या मागण्या विचारात घ्याव्यात, अन्यथा संघर्ष तीव्र करू असा इशारा सीटूच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नरसय्या आडम यांनी दिला. क्रॉम्प्टन ग्रीव्हजच्या संपकरी कामगारांशी संवाद साधताना गेटवर आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, की व्यवस्थापनाने कामगारांचे मत विचारात न घेतल्यानेच संप करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. संपकरी कामगारांनी त्यांच्या हक्कांसाठी हा मार्ग निवडला आहे. अशावेळी त्यांना डावलण्यात येऊ नये. चर्चेच्या माध्यमातून हा संप मिटणे शक्य असताना कुठल्याही अधिकारी व मंत्र्यांनाही यासाठी वेळ नाही, हे कामगारांचे दुर्दैव आहे. मात्र, हार न मानता प्रसंगी आम्ही रस्त्यावरही उतरू पण मागण्यांशी तडजोड करणार नाही, अशी भूमिका यावेळी आडम यांनी मांडली. युनियनमागील संख्याबळ जाणून घेण्यासाठी गरज पडल्यास गुप्त पध्दतीने घ्यावे, असे आवाहन करताना यात सीटूप्रणित युनियनलाच जास्त मते मिळतील असा दावाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्रावशी, HPT, KTHM अव्वल

$
0
0

बारावीच्या परीक्षेत शहरातील कॉलेजेसचे यश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांनी या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.

केटीएचएमचा

९४ टक्के निकाल

मविप्र संचलित केटीएचएम कॉलेजने बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. केटीएचएमचा ९४ टक्के निकाल जाहीर झाला आहे. विज्ञान शाखेचा ९८.०३ टक्के निकाल लागला आहे, तर उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम (एचएससी व्होकेशनल) शाखेचा ९८.२२ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेतील मयांक अग्रवाल याने प्रथम क्रमांक (९४ टक्के) मिळवला असून, हितेंद्र पाटील (९२.५०) याने द्वितीय क्रमांक मिळवला आहे, तर चंद्रा चौधरी हिने एचएससी व्होकेशनलमध्ये ८५ टक्के, तर आश्विनी बोराडे हिने ८२ टक्के गुण मिळवत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे यश मिळवले आहे.

फ्रावशीचा अकॅडमीचा १०० टक्के निकाल

फ्रावशी अकॅडमीच्या ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी सलग आठव्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. वाणिज्य शाखेत गरिमा बेदी हिने ८९.६९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला, तर विवेक सरीन यास ८६ टक्के (द्वितीय), तर सिमरन भंडारी हिला ८४.७७ टक्के गुण मिळाले असून, तिचा तृतीय क्रमांक आला आहे. विज्ञान शाखेत आशना अग्रवालने ८९.३८ टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक मिळवला. प्रीती शर्मा ८३.३८ टक्के, तर राधिका धेडिया हिने ८३.०८ टक्के गुण प्राप्त करत अनुक्रमे द्वितीय तृतीय क्रमांकाचे यश मिळवले.

डे केअर सेंटरचे यश

ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर ज्युनिअर कॉलेजचा ९५ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत शंतनू नाईक याने ६९.५४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर वासुमती जामनेरकर हिला ६६. ९२ टक्के, तर अपूर्व खातळे याने ६६.६२ टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला. ६० विद्यार्थ्यांपैकी ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ९१ टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेचा ९५.४५ टक्के निकाल लागला आहे. संज‌िवनी देशमुख हिला ८४ टक्के गुण मिळाले असून, प्रथम क्रमांक मिळाला आहे. निकिता नारगले ७९.२३, तर वर्षा सरकटे ७७.८५ टक्के गुण मिळवून द्वितीय तृतीय क्रमांकाचे यश मिळवले.

बागड बंधूंचे यश

आरवायके विद्यालयातील बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी पीयूष बागड ८६ .३० टक्के, सुयश बागड याने ८६.१५ टक्के गुण मिळवित यश मिळवले आहे. या बागड बंधूंचे प्राचार्य व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

डॉन बॉस्कोचे यश

डॉन बॉस्को विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतील ५६, तर वाणिज्य शाखेतील ६६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विज्ञान शाखेत कुंदन पाटील हा ७४.५० टक्के गुण, तर वाणिज्य शाखेत अरुण बाबू हा ८५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तीन वर्षांपासून शाळेने निकालाची परंपरा कायम राखली. विद्यार्थ्यांना रेक्टर फादर ज्यूड डीमेलो, प्राचार्य ब्लिझ फर्नांडीस यांचे मार्गदर्शन लाभले. विज्ञान शाखेत कल्याणी कुलकर्णी व ओतलानी अक्षना या दोघी ७३.३६ टक्के गुण मिळून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या, तर वाणिज्यचा मोहम्मया रिद्धी ८३ टक्के फ्लॉरिस तबीता ८२ टक्के गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

पंचवटी कॉलेजचे यश

पंचवटी कॉलेजनेही घवघवीत यश मिळविले आहे. कॉलेजच्या विज्ञान शाखेचा ९९.७१, कला ८१.४६ तर वाणिज्यचा ८३ टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेत नीरज डहाके ९३.३०%, यश चोरडिया ९१. ३८%, पृथ्वीराज चुंभळे ९१. ३८% गुण मिळाले. तर वाणिज्य शाखेत आकाश सूर्यवंशी ८३, दीपाली कदम ७८, तर संदीप दराडेने ७६.७६ % गुण मिळवले. कला मोतीराम भोये ७६. ३०, मनोज अवतार ७४. १५ % मिळविले आहेत.

एचपीटीचा निकाल

९८ टक्के

एचपीटी आर्टस अँड आरवायके सायन्स कॉलेजच्या विज्ञान शाखेचा ९८.५५ टक्के निकाल लागला आहे. तर आर्टस शाखेचा ८९.६० टक्के, तर एचएससी व्होकेशनलचा ९७.१४ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत ८८४, आर्टसचे १८१, तर व्होकेशनलचे ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रिद्धी जोशी हिला ९२.९२, रोहन शेवडे ९२.९२, नागेश सिंग याने ९२.४६ गुण मिळवले आहे. आर्टस शाखेत गांधाली सापरे हिस ९१.३८, मल्लिका पढी हिने ८९.८५ टक्के तर श्रद्धा पूर्णपात्रे यास ८७.०८ टक्के गुण मिळवून यश मिळवले आहे. एचएससी व्होकेशनलमध्ये हेत्वी राठोड ८२ टक्के, तर पूजा प्रसाद ७३. ५३ तर लक्ष्मी विश्वकर्मा ७२.६१ टक्के गुण मिळवले आहेत.

सर डॉ. गोसावी कॉलेज

सर डॉ. मो. स. गोसावी विज्ञान आणि वाणिज्य कनिष्ठ विद्यालयाने बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले आहे.

विज्ञान शाखेचा ९९.२२ टक्के तर वाणिज्यचा ९४.८२ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत रोहित तुलसियानी यास ८८.३१ टक्के, मयुरी आचार्या हिला ८४.७६ टक्के गुण मिळाले. वाणिज्य शाखेत फाल्गुनी बाभुळकर हिला ७९.८५ टक्के, तर अंकिता अग्रवाल हिला ७९.२४ टक्के गुण मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images