Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रेल्वेतून पडल्याने जवानाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यातील चौगाव येथील सैन्यदलातील जवान अमोल कृष्णा शेवाळे यांचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी औरंगाबाद येथील जवाहर नगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

औरंगाबाद येथील म्हाडा कॉलनीलगत असलेल्या रेल्वे रूळावर सकाळी सात वाजेच्या सुमारास नागरिकांना त्यांचा मृतदेह आढळला. ही बाब पोलिसांना समजल्यानंतर उस्मानपुरा ठाण्याचे कर्मचारी ए. जी. मिसाळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह घाटी रुग्णालयात हलविला. नाशिक येथे जाताना रेल्वेतून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टोल कामगार पुन्हा सेवेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

निफाडचे विभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर पीएनजी टोल व्‍यवस्थापनाने स्थानिक सुरक्षा कामगारांना पुन्हा सेवेत घेतले आहे. यामुळे पंधरा दिवसापासून ठप्प झालेली टोल वुसली शनिवारी सायंकाळी सुरू झाली.

पीएनजी टोल कंपनीने टॉप्स सिक्युरिटी एजन्सीमार्फत दोन वर्षाच्या करारावर कामगारांची भरती केली होती. मात्र, पंधरा एप्रिलपासून टोल कंपनीने सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करतानाच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाबरोबर करार केला. कामगारांनी कामबंद आंदोलन, निदर्शने, धरणे व उपोषण आदी मार्गांचा अवलंब करीत टोल प्रशासनाशी संघर्ष केला. शेवटी कामगारांच्या संघटित शक्तीपुढे नमते घेत टोल कंपनीने टॉप्स सिक्युरिटी बरोबर झालेल्या करारास सहा महिने मुदतवाढ दिली. त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी चर्चा करून कामगार आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक सुरक्षा कामगारांना कायमस्वरूपी सेवेत दाखल करून घेण्याचे आश्वासन टोल प्रकल्प व्यवस्‍थापक राजेश विचारे यांनी दिल्यानंतर कामगारांनी उपोषण मागे घेतले.

शनिवारी सायंकाळी आंदोलन मागे घेतल्यानंतर पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर टोल वसुली सुरू झाली. टोल प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेत महाराष्ट्र प्रदेश टोल संघटनेचे अध्यक्ष पांडूरंग भडांगे, प्रदेश सरचिटणीस अजय लोढा, कार्याध्यक्ष रामेश्वर भावसार, पिंपळगाव टोल युनियनचे अध्यक्ष सुधीर डांगळे सहभागी झाले होते. यावेळी कामगारांच्या वतीन पंधरा मागण्या करण्यात आल्या. सर्व मागण्या टोल व्यवस्‍थापनासमोर मांडण्यात येतील व याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे विचारे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांकडून ३१५ रिक्षांवर कारवाई

$
0
0

जड वाहनांमागे टेललॅम्प लावण्याचा निणर्य

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी तब्बल ३१५ रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उचलला. परवाना नसणे, गणवेश परिधान न करणे, फ्रंटसिट वाहतूक करणे आदी कारणामुळे ही कारवाई करण्यात आली.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिस, प्रादेशिक परिवहन विभाग व संबंधित पोलिस स्टेशनमार्फत अवैधपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या वाहनचालकावर कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी शहर वाहतूक शाखेने दिवसभरात सर्व प्रकाराच्या ४२५ वाहनांवर कारवाई केली. त्यात ३१५ रिक्षांचा समावेश होता. परवाना नसणे, गणवेश परिधान न करणे, कागदपत्रे नसणे किंवा अपूर्ण असणे, नियमापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे अशा विविध कारणांमुळे ही कारवाई झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांशी पोलिस संवाद साधत असून, भाविकांना सिंहस्थ काळात कोणताही त्रास होऊ नये, अशी यामागची अपेक्षा असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या कारवाईमुळे ‌रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांच्या या कारवाईचे प्रवाशांकडून स्वागत होत आहे.

दरम्यान, शहर परिसरात होणारे अपघात रोखण्यासाठी जड वाहनांच्या पाठीमागे टेललॅम्प लावण्याचा निर्णय ना​शिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

शहरात झालेल्या दोन भीषण अपघातानंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अनेकदा जड वाहनांमागे लावलेले टेल लॅम्प बंद असतात. परिणामी पाठीमागून येणाऱ्या वाहनांना समोरील वाहनांचा अंदाज येत नाही. शहर परिसरात झालेल्या अपघाताच्या घटनानंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. वाहनाला टेल लॅम्प, रेडियम रिफ्लेक्टर लावावेत, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. ही कामे करण्यासाठी वाहतूकदारांना ठराविक वेळ देण्यात आली असून, त्यानंतर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मायेच्या ओलाव्याने द्या; घरांना घरपण

$
0
0

अभय बाग यांचे आवाहन; वसंत व्याख्यानमालेचा समारोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माणसे मोठी होताहेत पण, त्यांची मने मात्र छोटीच राहत आहेत. ज्या आई-वडिलांच्या छत्राखाली मूल मोठे होते, त्याच छत्राला आज ते विसरत आहे. उभी हयात लेकरांच्या भवितव्यासाठी कारणी लावणाऱ्या आई-वडिलांना अंतर देऊ नका. मायेच्या ओलाव्याने मुक्या होत चाललेल्या घरांना घरपण द्या, असे आवाहन अभय बाग यांनी केले.

गोदेकाठी यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या समारोपाचे सत्र बाग यांनी गुंफले. 'मुकी झालेली घरे' या विषयावर बाग यांनी विचार मांडले. यावेळी महिनाभर व्याख्यानमालेच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा गौरवही आयोजकांच्या वतीने करण्यात आला.

बाग म्हणाले, सद्यस्थितीत सामाजिक समस्यांमध्ये ज्येष्ठांना कुटुंब व्यवस्थेकडून मिळणारी वागणूक हा विषय एक सामाजिक समस्या बनला आहे. बहुतांश ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मुलांच्या स्वैर वागणुकीमुळे एकलकोंडे बनले आहेत. अनेकदा त्यांना या बाबींच्या परिणामी आयुष्याच्या संध्याकाळी नैराश्य, एकटेपणाची भावना यासारख्या प्रश्नांशी झुंजत दिवस ढकलावे लागत आहेत. कुटुंब व्यवस्थेचा आधारस्तंभच आज संकटात सापडला असेल तर समाज व्यवस्थेतील इतर प्रश्न कसे सुटतील, असाही सवाल यावेळी बाग यांनी उपस्थित केला.

ज्या आई वडिलांनी मुलांसाठी उभी हयातभर खस्ता खाल्ल्या. परिस्थितीची बिकट आव्हाने झेलली. त्यांच्या धडपडीची अन् योगदानाची जाणीव जिवंत ठेवून ज्येष्ठांच्या संगोपणास मुलांनी प्राधान्य द्यावे. मोठ्या मनाने त्यांच्या समस्या समजावून घेत त्यांच्याप्रतीचा आदरभार जपावा अन् त्यांच्याशी मायेचे दोन शब्द आत्मियतेने बोलावे. मुलांकडून मनाच्या श्रीमंती शिवाय इतर कुठल्याही भौतिक श्रीमंतीची अपेक्षा आयुष्यभर जीवाचे रान करणाऱ्या आई वडिलांना नसते. हे लक्षात घेऊन मायेच्या ओलाव्याने घरांना घरपण द्या, असे आवाहनही बाग यांनी यावेळी केले.

व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, महेश हिरे, माजी मंत्री शोभा बच्छाव, चंद्रशेखर शहा, मधुकर झेंडे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते महिनाभर व्याख्यानमालेस उपस्थित राहणाऱ्या श्रोत्यांमधून उत्कृष्ट पुरूष श्रोता म्हणून रमेश आम्ले, उत्कृष्ट स्त्री श्रोता म्हणून पुण्याच्या आदिती जाधव तर उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून भूषण काळे यांना यावेळी गौरविण्यात आले. याशिवाय व्याख्यानमालेच्या आयोजनात योगदान देणाऱ्यांचाही प्रातिनिधीक गौरव करण्यात आला. यामध्ये योगेश बागले, संतोष कुलकर्णी, नंदू गवांदे, बापू गायधनी, सुनील बिरारी, सुनील देशपांडे आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवरायांचे स्मारक तत्काळ उभारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तत्काळ उभारण्याचे काम हाती घ्या, अन्यथा छत्रपतींचे नाव घेऊन निवडून दिलेल्या युती सरकारला मराठा समाज धडा शिकवेल, असे प्रतिपादन विजयसिंह राजे महाडिक यांनी केले.

अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या राज्यस्तरीय दहाव्या अधिवेशनात ते बोलत होते. डीजीपीनगर येथील माऊली लॉन्समध्ये आयोजित अधिवेशनास राज्यभरातील संघटनेचे शेकडो कार्यकते उपस्थित होते. अधिवेशन-शिबिराचे आयोजन संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज गायधनी, मनोज बोराडे व तुषार मटाले यांनी केले होते. महाडिक पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक तत्काळ उभारा, अन्यथा मराठा समाज युती सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

शिवचरित्राचे गाडे अभ्यासक नितीन बानगुडे पाटील यांनी देखील छत्रपतींच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला. शिवचरित्रकार साहित्यिक डॉ. दिलीप धानके, मनीषा माने, सुनील मोरे व वामनराव भिलारे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी समाजातील कर्तृत्वान महिला व पुरुषांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिजाऊ महिला क्रांती संघटना, शंभुराजे युवा क्रांती संघटना, संभाजी ब्रिगेड, मराठा विद्यार्थी सेना आदी संघटनांनी परिश्रम घेतले.

अधिवेशनातील ठराव

राज्यस्तरीय अधिवेशनात सरकारकडे दहा मागण्या मांडण्याचा ठराव करण्यात आला. यात प्रामुख्याने मराठा समाजाला आरक्षण, यशवंतराव चव्हाण, क्रांतीसिंह नाना पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, शिवजयंतीला प्रत्येक ग्रामपंचायतीला सरकारने ५० हजार रुपयांचा निधी द्यावा, तंटामुक्ती ग्राम योजनेचे प्रवक्ते दिवंगत आर. आर. पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा यांसह अनेक मागण्यांचा ठराव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता कराची विक्रमी वसुली

$
0
0

दोन महिन्यात २१ कोटी जमा; जूनमध्येही दोन टक्के सवलत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालमत्ताधारकासांठी महापालिकेने सुरू केलेल्या सवलत योजनेला एप्रिल आणि मे महिन्यात भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. एप्रिल पाठोपाठ मे महिन्यात सुद्धा सवलत योजनेत महापालिकेच्या तिजोरीत तब्बल अकरा कोटी रुपये जमा झाले आहेत. दोन महिन्याचा हा आकडा २१ कोटीवर गेला आहे. गेल्या वर्षी एप्रिल व मे या दोन महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत केवळ तीन कोटीची रक्कम जमा झाली होती. मात्र या वर्षी तब्बल १७ कोटी अशी अतिरिक्त रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाल्याने पालिकेची दिवाळी झाली आहे.

नागरिकांनी मालमत्ता कर वेळेवर भरण्यासाठी पाच, तीन आणि दोन टक्के अशी सवलत योजना सुरू केली आहे. एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरल्यास पाच टक्के, मे म‌हिन्यामध्ये भरल्यास तीन टक्के आणि जून महिन्यामध्ये भरल्यास दोन टक्के बिलात सवलत दिली जाणार आहे. एप्रिल महिन्यात पाच टक्के बिलात सवलत मिळाल्याने शहरातील ४१ हजार ४४३ मिळकतधारकांनी १० कोटी ७६ लाख ९६ हजार ६४७ रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत.

एप्रिलनंतर मे महिन्यातही तीन टक्के सवलत योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. मे महिन्यातही ४० हजाराच्या वर मालमत्ताधारकांनी १० कोटी २३ लाखाची रक्कम जमा केली आहे.

शेवटच्या दिवशी तब्बल दीड कोटीची रक्कम तिजोरीत जमा झाली. त्यामुळे एप्रिल आणि मे अशा दोन महिन्यात तब्बल २० कोटी ९७ लाखांची रक्कम पालिकेला मिळाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात एक कोटी ७४ लाख रुपये जमा झाले होते. मात्र, या वर्षी त्यात ९ कोटीची वाढ झाली आहे. तर, गेल्या वर्षी एप्रिल आणि मे महिना अशा दोन महिन्यात तीन कोटी १० लाख रुपये जमा झाले होते. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी महापालिकेला १७ कोटी अशी विक्रमी रक्कम आगाऊ मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिडको परिसरातील हनुमान चौक येथे राहणाऱ्या वृध्द दाम्पत्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची बाब रविवारी सकाळी उघडकीस आली. पांडूरंग शिंदे (वय ६५) आणि मंजुळा शिंदे (वय ६०) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

महाराणा प्रतापचौकाजवळील हनुमान चौकात राहणाऱ्या शिंदे दाम्पत्याने रविवारी पहाटे दीड ते सकाळी ९ वाजेच्या दरम्यान आपल्याच खोलीत आत्महत्या केल्याची बाब सकाळी उघडकीस आली. आई वडिलांच्या खोलीत कोणतीही हालचाल नसल्याची पाहून मुलगा खोलीत गेला असता हा प्रकार समोर आला. शिंदे दाम्पत्यास तीन मुली व एक विवाहीत मुलगा आहे. याबरोबर घटस्फोटीत मुलगीही येथेच राहते. खालच्या मजल्यावर मुले व वरील मजल्यावर वृध्द दाम्पत्य वास्तव्यास होते. वायरमन म्हणून निवृत्त झालेल्या ​पांडूरंग शिंदे यांना तसेच त्यांच्या पत्नीस काही वर्षांपासून ब्लड प्रेशर, डायबेटीस तसेच थॉयराईडचा आजार सतावत होता. त्यातच काही दिवसांपूर्वी जीना चढताना मंजुळा शिंदे पडून त्यांचा हात दुखावला होता. या आजारपणाला ​शिंदे दाम्पत्य वैतागले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. शिंदे यांनी पंख्याला दोर बांधून आत्महत्या केली. तर मंजुळा ​शिंदे यांचा मृतदेह अंथरुणावरच पडलेला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास अंबड पोलिस करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारची इतकीही ऐपत नाही का?

$
0
0

शंभर कोटीचे टोल तातडीने बंद करण्याची राज ठाकरेंची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यसरकारने काही टोल बंद करण्याची घोषणा केली असली, तरी त्याबाबत मी समाधानी नाही. टोल धोरणात युती सरकार पारदर्शकता का आणत नाही, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तर शंभर कोटीच्या आतील टोल बंद करता येत नाहीत, इतकीही ऐपत सरकारची नाही का? असाही टोला ठाकरेंनी लगावला.

नाशिक शहरातील विकास कामाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरेंनी भाजपा-शिवसेना युती सरकारच्या टोलधोरणावर अप्रत्यक्ष टीका केली. सध्या बंद होणारे टोल हे मनसेच्या आंदोलनाचे परिणाम आहेत. पंरतू सध्याच्या सरकारकडूनही टोल बंद करण्यासंदर्भात 'तारीख पे तारीख' सुरू असल्याचेही ते म्हणाले. टोलच्या धोरणात पारदर्शकता दिसत नसून, सरकारची एवढी ऐपत नाही का की, शंभर कोटीच्या आतील टोल तातडीने बंद करता येत नाहीत. महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि एन्ट्री पॉईंटसरवरच टोल असायला हवेत. परंतू सरकार टोलमध्ये पारदर्शकता आणत नाही, अशी खंतही ठाकरे यांनी व्यक्त केली.

शेंडेंची बदली बिल्डरमुळे

महापालिका नगररचना विभागाचे सहसंचालक विजय शेंडे यांच्या बदलीवरूनही ठाकरेंनी फडणवीस सरकारवर टीका केली. शेंडेची बदली ही चुकीची असून बिल्डरधार्जिनी आहे. चांगल्या अधिकाऱ्यांची बदली केली जात असेल, तर चांगली कामे कशी होणार असा सवाल करत राजकीय दुश्मनीतून आडून शहरावर सूड उगवला जात असल्याचे ते म्ह्णाले.

सिंहस्थाचे पैसे कुठेत?

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी न देणाऱ्या केंद्रासह राज्य सरकारवरही राज ठाकरेंनी टीका केली आहे. सिंहस्थ कामांचा मनपावर ओझे पडत आहे. केंद्राचे पैसे अजून तरी आले नाहीत, तर राज्य सरकारकडून हळूहळू पैसे येत आहेत. त्यामुळे महापालिका किती दिवस खड्ड्यात जाणार? केंद्र आणि राज्याकडून निधी येत नसल्याने कामावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगीतले.

टोलवा टोलवी...

टोलचे कॅश व्यवहार तात्काळ बंद करा.

रोजच्या वाहनांच्या संख्येची नोंदणी करा

वाहनांची संख्या वाढतेय; मात्र टोल तेवढाच

टोलमध्ये दररोज होतेय बनवेगिरी

एटीएममशीन सारखी व्यवस्था निर्माण करा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थांबा, नाशिकचे चित्र पालटेल!

$
0
0

म. टा.खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिच्या वाढत्या शहरीकरणामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर होणार असतांनाही, नव्या विकास आराखड्यात पार्किंग प्लॉटकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पार्किंगवर तोडगा काढण्यासाठी शहरातील मोठ्या मैदानांखाली पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना आपण नव्या विकास आराखड्यात करणार असल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. बॉटनिकल गार्डनचे काम दहा दिवसात सुरू होणार असून रस्त्यांची कामेही अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे काही दिवसातच नाशिकचे चित्र पालटेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

राज ठाकरे यांनी रविवारी शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी, सिंहस्थासह महापालिकेची कामे उत्तम प्रकारे सुरू आहेत. रस्त्यांच्या कामाचें फिनीशिंग सुरू आहे. दोन तीन महिन्यात ही कामे पूर्ण होतील त्यामुळे काही दिवसातच शहराचे चित्र पालटलेले दिसेल. शहराच्या आतील भागातील स्वच्छतेलाही प्राधान्य दिले जात आहे. काही बिल्डरांकडून काही डेब्रिज जागेवरच सोडून दिले जाते. त्यामुळे हे शहरातील डेब्रिज काढण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत. ट्रक लावून हे डेब्रिज हटवले जाणार आहे. बॉटनिकल गार्डनचे कामही दहा दिवसातच सुरू होणार आहे. तर गोदापार्कचे कामही अंतिम टप्प्यात असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे लवरकरच नाशिकचे चित्र पालटलेले दिसेल असे त्यांनी यावेळी सांगीतले.

बादलांशी चर्चा करणार

रामकुंडावरील भाजीबाजाराच्या जागेवर पंजाब सरकारची मालकी आहे. त्यामुळे या जागेवर कुठेलेही काम करता येत नाही. काही काम करायवयाचे असेल तर पंजाब सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. येत्या १० तारखेला पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल पुण्यात येणार आहे. त्यावेळी आपण या जागेबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

२५ घंगाळांची खरेदी

राज ठाकरे यांनी सराफ बाजाराचा दौरा करताना एका सराफाच्या दुकानात प्रवेश केला. त्या दुकानातील आकर्षक भांडी पाहून त्यांनी यावेळी घंगाळची खरेदी केली. सराफाला २५ घंगाळची ऑर्डरही त्यांनी दिली. तर काही तयार घंगाळ आपल्यासोबत नेले.

न्यायालयाचे राज्य

छोट्या छोट्या गोष्टींनाही स्थगिती देणाऱ्या न्यायालयाच्या कामकाजावरही ठाकरेंनी आक्षेप घेतला असून, महापालिका, राज्यसरकारचे कामकाज सध्या न्यायालयच चालवित असल्याची टीका त्यांनी केली आहे. झाडे तोडण्यासह विविध छोटया छोट्या गोष्टींवरही न्यायालयाकडून काही ही झाले तरी, स्थगिती दिली जाते.

गाडीला अपघात

राज ठाकरे यांच्या दौऱ्यात त्यांच्या ९ क्रमांकाची आवडती लॅन्ड क्रुझर गाडीला औरगांबादकडील रिंगरोडवरील एका पुलावर अपघात झाला. शहरात राहुल ढिकले यांच्या गाडीने या पुलावर मागून लॅन्ड क्रुझरला धडक दिली. त्यामुळे कारचे मागच्या बाजुचे बरेच नुकसान झाले. तर ढिकले यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोड परिसरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले. पोलिस उपायुक्त विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहाळदे आणि सहकाऱ्यांनी नुकतेच रात्री उशिरापर्यंत मोहिम हाती घेतली. सिन्नरफाटा, स्टेशनवाडी, गोदरेजवाडी या गुंडगिरी अधिक असलेल्या भागात ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी मद्याच्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले तसेच काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तीन पोलिस अधिकारी व १५ कर्मचारी यांनी या मोहिमेत भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅसेट टॅलेण्ट स्कॉलर’ला गवसणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतातील आघाडीच्या मूल्यांकन आणि संशोधन कंपन्यांपैकी एक असलेल्या एज्युकेशन इनिशिटीव्ह (ईआय) व अमेरिकेतील ड्यूक युनिव्हर्सिटी टॅलेन्ट आयडेन्टीफिकेशन प्रोग्राम (ड्युक टीआयपी) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 'ड्यूक टिप असेट टॅलेंट सर्च' या क्रांतिकारी उपक्रमात नाशिकमधील तीन विद्यार्थी चमकले आहेत. चार्वी काब्रा, यश चांडक व दिव्य ब्रह्मेचा यांना 'अॅसेट टॅलेण्ट स्कॉलर' पुरस्काराने स्मानित करण्यात आले आहे.

'ड्यूक टिप असेट टॅलेंट सर्च'चे निकाल नुकतेच जाहीर केले. ऑगस्ट २०१४ मध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात नाशिकच्या २८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यातील विस्डम हाय इंटरनॅशनल हायस्कूलच्या चार्वी काब्रा हिला गणित विषयात, यश चांडक व दिव्य ब्रह्मेचा यांना विज्ञान विषयात 'अॅसेट टॅलण्ट स्कॉलर्स' होण्याचा मान मिळाला आहे.

अॅसेट ही वैज्ञानिक पद्धतीने तयार करण्यात आलेली मूल्यांकन चाचणी असून ती विद्यार्थ्यांच्या इंग्लिश, गणित व विज्ञान या विषयांमधील बलस्थानांचा आणि कमजोरींचा शोध घेण्यासाठी या मूल्यांकन पद्धतीचा वापर केला जातो. गणित, विज्ञान व इंग्लिश या विषयांमध्ये असामान्य बुद्घिमत्ता असलेल्या गुणवान विद्यार्थ्यांचा शोध घेणे या उद्दिष्टानी उपक्रमाचे आयोजन केले जाते. या टॅलण्ट स्पर्धेत ३४७ बुद्धिमान विद्यार्थ्यांनी बाजी मारली. हा टॅलेण्ट सर्च प्रोग्राम म्हणजे ईआयच्या अॅसेट या पेटण्टधारी मूल्यांकन चाचणीचे प्रारुप होते. २००१ पासून दरवर्षी भारत, दुबई, कुवैत आणि सिंगापूरमधून साडे तीन लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देत आले आहेत. यावर्षी ३२०० विद्यार्थी सहभागी झाले होते. जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांनी अॅसेट चाचणीला बसून या तीन विषयांमधील आपली गुणवत्ता सिद्ध केली.

नाशिकमधील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविताना एज्युकेशन इनिशिएटीव्हज प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर राजगोपालन म्हणाले, की या स्पर्धेला नाशिकमधून चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. या वर्षीच्या परीक्षेत अधिक कठीण प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांच्या क्षमतेला तपासले गेले असल्याचेही ते म्हणाले.

अशी आहे 'ईआय' संस्था

'एज्युकेशन इनिशिएटीव्ह्ज प्रा. लि.' (ईआय) ही शैक्षणिक संशोधन आणि मूल्यांकन संस्था आहे. आपल्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढीस लागावा याकरता आयआयटी आणि आयआयएम-ए अल्युम्नायच्या ग्रुपने ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेला दक्षिण आशियातील आघाडीची मूल्यांकन तज्ज्ञ अशी ओळख मिळाली आहे. स्पॅनिश बॅन्किण्टर फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन आणि हफिंग्टन पोस्ट हे अमेरिकन वृत्तपत्र अशा दोन आंतरराष्ट्रीय स्त्रोतांकडून ईआयला भारतातील पहिल्या २५ शैक्षणिक प्रयोगकर्त्यांमध्ये स्थान दिले गेले आहे. शालेय शिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानामध्ये सुधारणा करून आणणे आणि त्याच्या दर्जात वाढ करणे यावर लक्ष केंद्रित करणारी ही देशातील सर्वात मोठी व एकमेव शासनेतर संस्था आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदा स्वच्छतेसाठी जल सत्याग्रह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

गोदावरी नदीची सध्या गटार गंगा झाली आहे. सिंहस्थ जवळ आला आहे पण प्रशासन अजूनही नदीच्या स्वच्छतेबाबत ठोस निर्णय घेतांना दिसत नाही. साफसफाईचा फक्त फार्स निर्माण करीत आहे. गोदावरीचे पाणी अतिशय निर्मळ झाले पाहिजे, गोदावरी गटारमुक्त झाली पाहिजे अशी मागणी निर्मल गोदा अभियान समितीने केली आहे.

रविवारी निर्मल गोदा अभियानचे वतीने 'जल सत्याग्रह' रामकुंड येथे करण्यात आला. गटार मुक्त गोदावरी करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत. कागदावर नियोजन करू नये. नदीत वेगवेगळ्या गटारीतून अतिशय घाण पाणी सोडण्यात येते. त्यामुळे पाणी खराब होते व भाविकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. गटारीकरण व प्रदुषणामुळे पिण्याचे पाणी, जलजीवन, शेतीचे नुकसान होत आहे. 'नमामि गंगेसाठी' २० हजार कोटी मंजूर झाले आहेत. गंगेलाही न्याय मिळाला पाहिजे, असेही यावेळी सांगितले. यावेळी नितीन शुक्ल यांनी सांगितले, की प्रशासनाने गोदावरी नदी निर्मल करण्यासाठी अधिक पाणी सोडून स्वच्छ करणेच चुकीचा निर्णय घेतला आहे. अधिक पाणी सोडल्याने निर्मल होणार नाही त्यासाठी गटारी बंद करणे गरजेचे आहे. प्रशासनाने हायकोर्टाचा अपमान केला आहे. अनेक घाट निर्माण करण्यापेक्षा 'रामकुंड, लक्ष्मण कुंड व परिसरातील सर्व भाग सुंदर करावा. सर्व भाविकांना स्वच्छ व निर्मल पाण्याने स्नान करता येईल असे नियोजन करावे, अशी मागणी नितीन शुक्ला, भारती जाधव, निखील सिन्हा, अनिल सिंग, हेमंत जाधव, गौरव क्षत्रिय, सौरव नागपुरे, जगबीरसिंग यांनी केली.

गोदावरी स्वच्छता प्रकल्पास फक्त ७० कोटी रुपये खर्च येणार आहे. ते पैसे दिले असते तर कायमचा प्रश्न मिटला असता.

- हेमंत जाधव

प्रशासनाने गोदावरीची गटारगंगा तातडीने उपाययोजना करवून थांबवावी. प्रशासनाने नागरिकांची फसवणूक केल्यामुळे मी निषेध म्हणून मुंडन केले आहे.

- नितीन शुक्ल

गोदेच्या पाण्यात स्नान करण्यासाठी अनेक भाविक येतात. मात्र, नदीच्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आरोग्य बिघडते. त्यामुळे नदीची नियमित साफ-सफाई करण्यात यावी.

- भारती जाधव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-पेमेंटने कर भरल्यास जादा सूट

$
0
0

विनोद पाटील,नाशिक

नाशिक महापालिकेने मनुष्यबळावरील अतिरिक्त ताण कमी करून पेपरलेस कारभाराच्या दिशेने पाऊल टाकायला सुरूवात केली आहे. मालमत्ता कर सवलत योजनेत शहरातील मालमत्ता धारकांनी ई-पेमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याने महापालिका आता ई-पेमेंटला एक टक्का अतिरिक्त सवलत देण्याचा विचार करते आहे. गेल्या दोन महिन्यात तब्बल सहा हजार मालमत्ताधारकांनी ई-पेमेंटचा वापर केला आहे. त्यामुळे कर विभागाने तयार केलेल्या या प्रस्तावाला आयुक्तांनीही संमती दिल्याने लवकरच स्थायी समितीवर मंजुरीसाठी हा प्रस्ताव येणार आहे. विशेष म्हणजे वर्षभर ही सवलत राहणार असून, सध्याच्या सवलत योजनेत एक टक्क्यांनी वाढ होणार आहे.

महापालिकेच्या क्षेत्रात तीन लाख 98 हजार मालमत्ता धारक असून, पाणीपट्टीचे ग्राहक एक लाख ९० हजार एवढे आहेत. या सर्वांना महापालिकेच्या वतीने वार्षिक बिल हे घरपोच दिले जाते. त्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेवर मोठा ताण येतो. मालमत्ता कर आणि पाणीपट्टीचे बिल अदा केल्यानंतर ग्राहक महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये येऊन बिल भरतात. त्यामुळे या विभागीय कार्यालयामंध्ये रांगा लागतात. आतापर्यंत एप्रिलमध्ये कर भरल्यास पाच, मेमध्ये तीन व जूनमध्ये दोन टक्के कर सवलत मिळत होती. या योजनेला ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन महिन्यात तब्बल २१ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. मात्र, यामुळे या कार्यालयांवरचा ताण अधिकच वाढला आहे.

दोन महिन्यात मालमत्ता कर सवलत योजनेत सहा हजार २१० नागरिकांनी ई-पेमेंट पद्धतीने कर भरला आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने कर भरणाऱ्यांची संख्या जास्त वाढल्याने महापालिकेच्या यंत्रणेवरील ताण वाचला आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने कर भरणाऱ्यांना अतिरिक्त प्रोत्साहन देण्यासाठी बिलात आणखी एक टक्क्याची अतिरिक्त सूट देण्याचा प्रस्ताव विविध कर संकलन विभागाने तयार केला आहे. या प्रस्तावाला आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनीही अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे महापालिकेच्या सूट व्यतिरिक्त ऑनलाईन भरणासाठी अतिरिक्त सवलत ग्राहकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे ही योजना वर्षभर राबविली जाणार असल्याने मालमत्ताधारकांनाही रांगांशिवाय व विशेष सवलतीत कर भरता येणार आहे.

ई-पेमेटचे ६२१० ग्राहक

महापालिकेन सुरू केलेल्या मालमत्ता कर सवलत योजनेत ई-पेमेंट पद्धतीचा तब्बल सहा हजार २१० मालमत्ताधारकांनी लाभ घेतला आहे. या ऑनलाइन पद्धतीतून महापालिकेच्या तिजोरीत तब्बल एक कोटी ८५ लाख रुपये जमा झाले आहेत. ई-पेमेंटमुळे साडेपाच लाखाच रिबेट महापालिकेला द्यावे लागले आहेत. ई-पेमेंटला वाढलेला हा प्रतिसाद पाहूनच महापालिका प्रशासनाने ई-पेमेंट सूट योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच स्थायीवर ठेवला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज आले, कुणी नाही पाहिले!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शहरातील विकासकामांची पाहणी 'मनसे' स्टाईलच केली. दोन-तीन ठिकाणे सोडली तर बहुतांश ठिकाणची पाहणी त्यांनी आपल्या आलिशान एसी गाडीत बसूनच केली. विशेष म्हणजे सिंहस्थातील सर्वात वादग्रस्त ठरलेल्या आणि ८२ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या साधूग्रामची पाहणीसुद्धा त्यांनी गाडीतूनच केल्याने त्यांच्या प्रतिक्षेतील साधूही अवाक् झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी ठाकरे आले पण कोणी नाही पाहिले अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

नगरसेवकांसह अधिकाऱ्यांच्या हमखास सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारीच ठाकरे यांचा दौरा असल्याने नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांमध्येही उत्साह दिसत नव्हता. तर ठाकरे यांनीही आपले दौऱ्याचे सोपस्कार आपल्या सोयीने पार पाडले. नियोजित दौऱ्याला फाटा देत सकाळी साडे नऊ वाजता त्यांनी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकपासून सुरुवात केली. त्यानंतर कामटवाडा पूल, एबीबी सर्कल, मखमलाबाद रोड, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, साधुग्राम आणि रामकुंड, सराफ बाजार असा दौरा केला. त्यात जॉगिंग ट्रॅक, कामटवाडा पूल, मखमलाबाद रोड सोडता, उर्वरित ठिकाणांची गाडीत बसूनच पाहणी केली. उन्हाचाही चढलेल्या पाराचा परिणाम त्यांच्या दौऱ्यावर झाला. रिंगरोडसह साधूग्राम त्यांनी उभ्या उभ्या गाडीतून पाहिला. साधुग्रामला ठाकरे तर गाडीच्याही बाहेर आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी थांबलेल्या साधूंना त्यांची भेट होवू शकली नाही. त्यामुळे ठाकरे आले पण आम्ही नाही पाहिले अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तर रामकुंडावर त्यांचे बॅण्डबाजा वाजवून कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यानंतर थेट विश्रामगृहावर जावून अधिकारी आणि काही संस्थाशी चर्चा केली. त्यानंतर विश्रामासाठी हॉटेल एक्सप्रेस इनकडे प्रयाण केले.




नगरसेवकांनी फिरविली पाठ

रविवारच्या दौऱ्यात राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे अनेक नगरसेवकांनी पाठ फिरवली. महापौर अशोक मुर्तडक, सभागृहनेते सलिम शेख, जिल्हाध्यक्ष शशिकांत जाधव, सुदाम कोंबडे, गटनेता अनिल मटाले यांच्यासह नऊ ते दहा नगरसेवकच ठाकरे यांच्या दौऱ्याला उपस्थित होते. त्यामुळे नगरसेवकांच्या नाराजीची पुन्हा चर्चा सुरू झाली. अनेक नगरसेवक कामे होत नसल्याने नाराज आहेत. तर अनेकांवर गिते समर्थक असल्याचा शिक्का मारल्याने वर्तमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे मनसेत सध्या किती नगरसेवक आहेत, हे सांगणेही अवघड झाले आहे.

श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न

रामकुंडावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या टोलमुक्तीच्या निर्णयाबद्दल ठाकरे यांच्या उपस्थितीत वाजत गाजत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. हा कार्यक्रम रस्त्या ऐवजी रामकुंडावर घेण्यात आल्याबद्दल रामकुंडावरीलच लोकांनी आश्चर्य व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरची झाली तिखट

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

स्वयंपाकासाठी आवश्यक असलेला गरम लाल व काळा मसाल्यासोबतच लोणच्याच्या मसाल्याची तयारी घरोघरी सुरू असल्याने सर्वत्र या मसाला ठसका बसत असतो. मात्र, यंदाच्या अवकाळी पाऊस व मिरचीच्या कमी उत्पादनामुळे भाव तडकल्याले गृहिणींना मसाला चांगलाच तिखट लागत आहे.

वर्षभर पुरेल एवढा मसाला तयार करून डब्यात ठेवण्याची प्रथा फार पूर्वपार सुरू आहे. या मसाल्यासाठी मिरची हा प्रमुख घटक असून, अवकाळी पावसाचा फटका बसल्याने मिरचीचे दर कडाडले आहेत. बाजारात लाल मिरची विक्रीसाठी आली असून, नंदूरबार सर्वाधिक आवक होत आहे. चटकदार मसाला जेवणात महत्वाचा मानतात. मसाल्यासाठी खोबरे, खसखस, जिरे, हिंग, बाज्या अशा अनेक प्रकारचे मसाल्याचे पदार्थ वापरतात. लाल मिरचीचे तर चव अधिक स्वादिष्ठ असले. चांगल्या प्रतीची मिरची वापरून नागरिक मसाल्यासाठी गर्दी करतात.

यंदा बाजारात नंदुरबार भागातून अनेक प्रकारच्या मिरची दाखल झालेल्या असून मिरचीच्या दरात २० टक्के वाढ झाल्याने भाव चांगलेच वाढले आहेत. शंभर रुपयापासून साडेतीनशे रुपयांपर्यंत मिरची विक्रीस असून, देठाच्या व बिनदेठाच्या मिरचीच्या भावात वीस ते तीस रुपयांचा फरक आहे. नंदुरबार, जळगाव, गटूंर, आंध्रप्रदेश मधून मिरची बाजारात आली आहे.

मिरची बरोबर हळकूंड, जिरे, सुंठ, वेलची या पदार्थांना मागणी वाढली आहे. मसाला घरी बनवितांना मसाल्याचे सर्व पदार्थ चुलीवर मोठ्या कढईत भाजावे लागतात. त्यांनतर ते कांडप मशीनद्वारे दळून आणावे लागतात. यंदा कांडप मशीन व्यावसायिकांनी पाच रुपये दर वाढवून दिल्याने प्रती किलोचा भाव २५ ते ३० रुपये आहे.

मिरची दर

जळगांव कापरा- २१० रुपये, बेडकी २९० रुपये, रसगुल्ला २२० रुपये, काश्मीर ३४० रुपये, पाफडा १७० रुपये, गावरानी २४० रुपये, अकुंर २५० रुपये, लवंगी २१० रुपये.

मसाल्याचे दर

खोबरे १८० रुपये, हिंग २४० रुपये, जिरे २४० रुपये, तेल ११० रुपये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाइक रॅलीत मंगळूरचा के. पी. अरविंद विजेता

$
0
0

नवोदितांमध्ये नायर, टोके, ठाकूरला म्हसकर ट्रॉफी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये रविवारी झालेल्या एमआरएफ टू व्हीलर रॅलीचे विजेतेपद बेंगलुरूच्या के. पी. अरविंद याने पटकावले. फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्टस क्लब्स ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि नाशिक येथील पीट स्टॉप मोटर स्पोर्टस क्लबतर्फे झालेल्या या संपूर्ण स्पर्धेवर बेंगलुरूच्या रायडर्सने वर्चस्व राखले. स्कूटर गटात नाशिकच्या शमीम खानने, तर टू स्ट्रोक बाइक गटात आदित्य ठक्करने प्रथम क्रमांक मिळविला.

स्पर्धेत नवोदितांमध्ये पुष्कर नायर, धवल टोके, कमलेश ठाकूर विविध गटांत अंजली म्हसकर ट्रॉफीचे मानकरी ठरले. रॅलीला हॉटेल एक्स्प्रेस इनचे महाव्यवस्थापक ब्लान्की डेरील यांच्या हस्ते सुरुवात झाली. या वेळी शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक राजेंद्रकुमार परदेशी, आयोजक प्रदीप म्हसकर, एमआरएफ कंपनीचे मुरली, मधुसूदन, के. प्रशांत, श्रीकांत करानी, रवी श्यामदासानी, प्रणीत पेरुमल, राष्ट्रीय विजेता श्याम कोठारी आदी उपस्थित होते.

स्पर्धेसाठी एकूण ६० किलोमीटरचे अंतर होते. हॉटेल एक्स्प्रेस इनपासून रॅलीला सुरुवात झाली. घोटी- वैतारणा रोडवरील धनोली- वाळविहीर या १५ किलामीटरच्या चार फेऱ्या होत्या. रॅलीचा थरार पाहण्यासाठी नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.

स्पर्धेचा निकाल

विजेते : १) के. पी. अरविंद, मंगळूर, २) व्ही. एस. नरेश, बेंगलुरू, ३) अब्दुल वाहीद, बेंगलुरू

इम्पोर्टेड बाइक : १) के. पी. अरविंद, मंगळूर, २) धवल टोके, पुणे ३) आशिष रैराणे, पुणे

१३० सीसीपेक्षा अधिक : रोहित गौडा, बेंगलुरू

१३० ते १६५ सीसी बाइक : १) सोहेल अहमद, बेंगलुरू, २) के. सचिन, बेंगलुरू, ३) निशित झवेरी, नाशिक

१६६ ते २६० सीसी : १) व्ही. एस. नरेश, बेंगलुरू, २) अब्दुल वाहिद, बेंगलुरू, ३) युवा कुमार, बेंगलुरू

२६० ते ५०० सीसी : १) यशराज राठोड, इंदूर, २) विश्वास एस. डी. बेंगलुरू

स्कूटर : १) शमीम खान, नाशिक, २) हितेन ठक्कर, नाशिक, ३) सय्यद आसीफ्र अली, भोपाळ

स्टार ऑफ नाशिक (टू स्ट्रोक बाइक) : १) आदित्य ठक्कर, नाशिक, २) परविंदर सिंग, ३) अमित सूर्यवंशी

गटनिहाय अंजली म्हसकर ट्रॉफ्री (नवोदितांसाठी) :

स्कूटर : पुष्कर नायर

इम्पोर्टेड बाइक : धवल टोके

मोटारसायकल : कमलेश ठाकूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसाल्याची मिरची झाली तिखट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

स्वयंपाकासाठी आवश्यक असलेला गरम लाल व काळा मसाल्यासोबतच लोणच्याच्या मसाल्याची तयारी घरोघरी सुरू असल्याने सर्वत्र या मसाला ठसका बसत असतो. मात्र, यंदाच्या अवकाळी पाऊस व मिरचीच्या कमी उत्पादनामुळे भाव तडकल्याले गृहिणींना मसाला चांगलाच तिखट लागत आहे.

वर्षभर पुरेल एवढा मसाला तयार करून डब्यात ठेवण्याची प्रथा फार पूर्वपार सुरू आहे. या मसाल्यासाठी मिरची हा प्रमुख घटक असून, अवकाळी पावसाचा फटका बसल्याने मिरचीचे दर कडाडले आहेत. बाजारात लाल मिरची विक्रीसाठी आली असून, नंदूरबार सर्वाधिक आवक होत आहे. चटकदार मसाला जेवणात महत्वाचा मानतात. मसाल्यासाठी खोबरे, खसखस, जिरे, हिंग, बाज्या अशा अनेक प्रकारचे मसाल्याचे पदार्थ वापरतात. लाल मिरचीचे तर चव अधिक स्वादिष्ठ असले. चांगल्या प्रतीची मिरची वापरून नागरिक मसाल्यासाठी गर्दी करतात.

यंदा बाजारात नंदुरबार भागातून अनेक प्रकारच्या मिरची दाखल झालेल्या असून मिरचीच्या दरात २० टक्के वाढ झाल्याने भाव चांगलेच वाढले आहेत. शंभर रुपयापासून साडेतीनशे रुपयांपर्यंत मिरची विक्रीस असून, देठाच्या व बिनदेठाच्या मिरचीच्या भावात वीस ते तीस रुपयांचा फरक आहे. नंदुरबार, जळगाव, गटूंर, आंध्रप्रदेश मधून मिरची बाजारात आली आहे.

मिरची बरोबर हळकूंड, जिरे, सुंठ, वेलची या पदार्थांना मागणी वाढली आहे. मसाला घरी बनवितांना मसाल्याचे सर्व पदार्थ चुलीवर मोठ्या कढईत भाजावे लागतात. त्यांनतर ते कांडप मशीनद्वारे दळून आणावे लागतात. यंदा कांडप मशीन व्यावसायिकांनी पाच रुपये दर वाढवून दिल्याने प्रती किलोचा भाव २५ ते ३० रुपये आहे.

मिरची दर

जळगांव कापरा- २१० रुपये, बेडकी २९० रुपये, रसगुल्ला २२० रुपये, काश्मीर ३४० रुपये, पाफडा १७० रुपये, गावरानी २४० रुपये, अकुंर २५० रुपये, लवंगी २१० रुपये.

मसाल्याचे दर

खोबरे १८० रुपये, हिंग २४० रुपये, जिरे २४० रुपये, तेल ११० रुपये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ साहित्यिक भावना भार्गवे यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या साहित्य-संस्कृती व शिक्षण क्षेत्रातील अग्रणी भावना दत्तात्रय भार्गवे (वय ८४) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. 'कलायतन' या सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीच्या स्थापनेपासून सार्वजनिक जीवनास प्रारंभ करणाऱ्या भावनाताईंचा लोकहितवादी मंडळ, सार्वजनिक वाचनालय, कुसुमाग्रज प्रतिष्ठान या संस्थांशी अनेक वर्षे विविध पदांच्या माध्यमातून संपर्क आला. पद्मश्री दादासाहेब गायकवाड या त्यांच्या चरित्रात्मक खंडास राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. कथा, कादंबरी, चरित्र ही त्यांच्या लिखाणाची ओघवती शैली होती. त्यांचा शिक्षणाशी नजीकचा संबंध आला. त्यांच्या पश्चात पती, दोन कन्या, मुलगा, सून, जावई असा परिवार आहे. साहित्यिक प्रा. डॉ. वृंदा भार्गवे यांच्या त्या मातोश्री होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नसराईत शटल झाली ‘वऱ्हाड स्पेशल’

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड

मनमाड-इगतपुरी शटल ही रेल्वेगाडी लग्नसराईच्या दिवसात केवळ प्रवासी रेल्वे राहिली नसून, ती आता चक्क वऱ्हाड स्पेशल झाल्याचे मंगलमय चित्र सध्या दिसत आहे. महागड्या चार चाकी गाड्या तसेच लक्झरी बसेसऐवजी अगदी किफायतशीर किमतीत वरपित्याला परवडेल अशा माफक दरात मनमाड-इगतपुरी आणि इगतपुरी-मनमाड या शटल गाड्यांनी वऱ्हाड नेण्याकडे कल वाढला आहे.

मनमाड-इगतपुरी शटल ही मनमाड-लासलगाव-निफाडपासून इगतपुरी रेल्वेस्थानकापर्यंत सर्व सामान्यांची खिशाला परवडेल अशी आवडती गाडी आहे. सर्वत्र लग्नाची धामधूम असताना या शटल रेल्वेनेच मनमाड-इगतपुरी दरम्यान ग्रामीण भागाशी निगडित रेल्वे नजीकच्या गावात वऱ्हाड नेणे सोयीस्कर समजून अनेक लग्नात या शटलने महत्वाची भूमिका बजावल्याचे प्रवासी सांगतात. शटलला वऱ्हाड स्पेशलचे रूप प्राप्त झाल्याने नवरी नटली आणि शटलने सासरी निघाली असे सूर विविध रेल्वेस्थानकात गुंजले नसतील तर नवलच!

डोळ्यात आसवे आणणारा, मुलीला निरोप देण्याचा म्हणजे बिदाईचा कार्यक्रम सुद्धा शटलच्या वेळापत्रकानुसारच उरकला जात आहे. सर्वसामान्यांची शटल वर पित्यासाठी वरदान ठरत आहे. मुलाच्या लग्नाला पाहुणे मंडळी घेऊन जायची म्हणजे महागड्या प्रवास खर्चाऐवजी शटलच बरी याचे पित्यालाही समाधान वाटतेय. सतत लेट होणारी, प्रवाशांचा अंत पाहणारी असे जरी शटलबद्दल म्हटले जात असले आणि सामान्यांची रेल्वे म्हणून तिच्याकडे पाहिले जात असले तरी वऱ्हाडी आणि वर - वधू यांच्या काही मिनिटांच्या प्रवासामुळे शटल सुद्धा व्हीआयपी वाटू लागली आहे.

बायकोचे नाव घेतो...

लग्नसराईत शटलचा प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्याचबरोबर विविध किस्से गाडीत घडत आहेत. शटलने प्रवास करणाऱ्या वऱ्हाडींच्या आग्रहाखातर रेल्वेडब्यात नवरदेव नवरीत चक्क उखाणे घेण्याची चढाओढ रंगली. एका ज्येष्ठ व्यक्तीने शटलचे नाव उखाण्यात घ्या असे फर्मान सोडले. हौशी आणि कल्पक नवरदेवाने चक्क 'संसाराचा पुढील प्रवास करेल हसून आणि माझ्या बायकोचे नाव घेतो शटलमध्ये बसून' असे नाव घेवून शटलमध्ये एकच धम्माल उडवून दिली. हा किस्सा शटलमध्ये सध्या आवर्जून चर्चीला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील तीन धरणे कोरडी

$
0
0

जळगाव जिल्ह्यात पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा

म. टा. वृत्तसेवा, जळगाव

जळगाव जिल्ह्यात पाण्याची समाधानकारक असलेली स्थिती काहीशी पालटू लागली आहे. जूनला प्रारंभ होत असताना पाच टँकरच्या सहाय्याने पाच गावांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे, तर तीन मध्यम प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा संपला आहे. अन्य मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा पाहता पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मे संपत असताना ४४ पर्यंत गेलेले तापमान, त्यामुळे जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा झपाट्याने आटत असल्याचे चित्र आहे. आज जिल्ह्यात जामनेर तालुक्यात एक, जळगाव तालुक्यात आसोदा येथे दोन, तर देव्हारी येथे एक असे तीन आणि अमळनेर तालुक्यातील डांगर येथे एक, असे पाच टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊस लवकर न आल्यास टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

अमळनेर तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी अमळनेरच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र, बोरी मध्यम प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा संपलेला आहे. मन्याड आणि अग्नावती मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपलेला आहे. हिवरा मध्यम प्रकल्पात आज केवळ २.७६ टक्के, बहुळा १३.९२ टक्के, भोकरबारी १४.५१ टक्के, तोंडापूर १६.७७ टक्के, अंजनी २९.४७ टक्के साठा आहे. मात्र, या तुलनेत अन्य मध्यम प्रकल्पांची स्थिती समाधानकारक आहे. सुकी ५४.९० टक्के, अभोरा ५६.१३ टक्के, मोर ५१.९३ टक्के, गूळ ६२.३५ टक्के पाणीसाठा आहे. चोपडा शहराला सध्या पाणीटंचाई जाणवत असल्याने गूळ प्रकल्पामधून आवर्तन सोडण्यात आलेले आहे.

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात आज ७२.९४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ७४.२६ टक्के पाणीसाठा होता. तापी नदीवरील हतनूरमध्ये पाणी स्थिती चांगली आहे. आज या धरणात ६०.२९ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी १ जूनला ४८.५५ टक्के पाणीसाठा होता. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांचा विचार करता ३३.५ टक्के पाणीसाठा आहे. यंदा पावसाळा लवकर असल्याने प्रशासनावर फारसा ताण येण्याची शक्यता नाही. परंतु पावसाळा लांबल्यास टंचाईत भर पडून, पाण्याची मागणी वाढणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्ष

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार आजपासून पाटबंधारे विभागाने पूरनियंत्रण कक्ष सुरू केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्तीव्यवस्थापन कक्ष सुरू झालेला आहे. या कक्षाने पावसाळापूर्व तयारीस प्रारंभ केला आहे. अन्य विभागांचे अद्याप नियंत्रण कक्ष स्थापन केल्याचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास आले नाहीत.

गिरणा धरणात ९.५७ टक्के साठा

१५८ गावे आणि पाच नगरपालिका यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात आज केवळ ७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच दिवशी ९.५७ टक्के साठा होता. यामुळे पावसाला उशीर झाल्यास जळगाव जिल्ह्यासह मालेगाव शहर व काही गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>