Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

फी न भरल्यानेच दिले दाखले

$
0
0
सातत्याने मागणी करुनही शाळेतील काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी फी भरलेली नसल्यामुळेच त्यांचे दाखले घरपोच केल्याचे स्पष्टीकरण रासबिहारी शाळेमार्फत पत्राव्दारे केला आहे.

म्हाडा सभापतीपदी दराडे

$
0
0
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा)च्या नाशिक विभागीय सभापतीपदी येवला राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र दराडे यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा असणार आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे.

नववर्षाचा जल्लोष पारंपरिक वाद्यांच्या साथीने

$
0
0
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सिन्नर तालुका सांस्कृतिक मंडळातर्फे गुरुवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. संबळ, पिपाणी, हलगी या पारंपरिक वाद्यवृंदांचा सहभाग हे यंदाच्या शोभायात्रेचे वैशिष्ट्य होते.

महात्मा फुले जयंती साजरी

$
0
0
सिन्नर शहरात विविध संघटनांनी रविवारी महात्मा फुले जयंती साजरी केली. सिन्नर शहर शिवसेनेतर्फे सिन्नर बस स्थानकाजवळील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्वागतयात्रांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

$
0
0
नाशिक शहरातील विविध भागांत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सकाळी कॉलेजरोड, इंदिरानगर, सिडको, सातपूर, नाशिकरोड या भागातून स्वागतयात्रा काढण्यात आल्या. यात हजारो नाशिककर सहभागी झाले होते.

श्री भैरवनाथ महाराजांच्या मिरवणुकीत रंगले भाविक

$
0
0
इगतपुरी तालुक्यातील खेड भैरव येथे श्री भैरवनाथ महाराजांची गुरुवारी सागवान लाकडात साकारलेल्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. खेड येथील श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच करण्यात आला. यात्रेच्या निमित्ताने बैलगाडीतून श्री भैरवनाथ व जोगेश्वरी देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.

भूलतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. गुप्ता

$
0
0
भारतीय भूलतज्ज्ञ संघटनेच्या नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. पंकज गुप्ता यांची बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ. प्रशांत देवरे यांची सचिवपदी तर डॉ. मंजिरी मदनूरकर यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.

तहसीलदार भामरे यांच्यावर कारवाई करा

$
0
0
नाशिकच्या तहसीलदार सुचेता भामरे यांच्याविरोधात अनेक तक्रारी असल्याने त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप कायदा आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंबंधीचे निवेदन आघाडीने दिले आहे.

नोंदणी कार्यालय पिनॅकल मॉलमध्ये

$
0
0
नवीन सीबीएससमोरील डॉक्टर हाऊसमध्ये असलेल्या नोंदणी कार्यालयाचे स्थलांतर त्र्यंबक नाका येथील पिनॅकल मॉलमध्ये झाले आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या हस्ते नव्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

पालिका कर्मचा-यांना आयकार्ड सक्तीचे करावे

$
0
0
महापालिका कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत आयकार्ड परिधान करणे सक्तीचे करावे, अन्यथा आयुक्तांच्या घरासमोर घंटानाद आणि भजन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक संघटना आणि ग्राहक संरक्षण चळवळीतील कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

टवाळखोरांसाठी एरिया डॉमिनन्स

$
0
0
बियरबार, सार्वजनिक पार्किंग किंवा चौका-चौकात थांबून हाणामाऱ्या, गैरकृत्य करणाऱ्या टवाळखोराविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी कॉलेजरोड तसेच अंबड एमआयडीसी परिसरात एरिया डॉमिनन्स मोहिम राबवली.

वाहतूक पोलिसाला रिक्षाने उडवले

$
0
0
फ्रंटसिट प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकाला अडवल्याने, त्या चालकाने वाहतूक पोलिसालाच उडवल्याची घटना बुधवारी दुपारी दिंडोरी रोडवरील मेरी कॉर्नर येथे घडली. या घटनेत जबर जखमी झालेल्या वाहतूक पोलिसावर उपचार सुरू आहेत.

'गंगापूर धरण सुरक्षा प्रस्ताव मंजुर करा'

$
0
0
नाशिक शहरासह जिल्ह्याच्या दृष्टिने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गंगापूर धरणाची सुरक्षाव्यवस्था भक्कम करण्याची मागणी आमदार वसंत गिते यांनी केली. त्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठविण्यात आलेला सुरक्षा प्रस्ताव त्वरीत मंजुर करण्याची मागणीही गिते यानी केली.

जळगाव जिल्ह्यात ४५२०० नवीन वाहनांची नोंदणी

$
0
0
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात मार्च २०१३ अखेर संपलेल्या वर्षात ४५,२०० नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत १९ टक्क्यांनी नवीन वाहनांची नोंदणी कमी झाली आहे. मार्चअखेर ७० कोटी ४० लाखांचा महसूल वसुली करण्यात आली आहे.

पंडित चिमलगींच्या गायनाने रसिक मुग्ध

$
0
0
दरवर्षी नवीन वर्षाचा पहिला दिवस संगीतमय होण्यासाठी ऋतुरंग परिवारातर्फे गेल्या १२ वर्षांपासून शास्त्रीय संगीताची मैफल रंगत असते. यंदाही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ऋतुरंग भवन दत्तमंदिर रोड येथे भारतातील ख्यातनाम गायक संजीव चिमलगी यांनी रंग भरले.

राष्ट्रवादी विद्यार्थीची कार्यकारिणी जाहीर

$
0
0
नाशिक शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला आहे. शहराध्यक्ष चिन्मय गाढे यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीससह विभागीय अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.

जुन्या रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर नको

$
0
0
राज्यातील सर्व महापालिकांसह नगरपालिका क्षेत्रातील जुन्या रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीतून वगळण्याची मागणी ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्या कृती समितीतर्फे करण्यात आली आहे. श्रमिक सेनेच्या वतीने या कृती समितीची बैठक नाशिकमध्ये घेण्यात आली.

बिझनेस बॅँकेला २ कोटी ३१ लाख रुपये नफा

$
0
0
नाशिकरोड येथील दि बिझनेस बॅँकेला सरत्या अर्थिक वर्षात २ कोटी ३१ लाख रुपयांचा नफा झाला असल्याचे संचालक मंडळाने सांगितले. सरकारच्या व आयकर खात्याच्या नियमानुसार सर्व तरतुदी वजा जाता बँकेस निव्वळ नफा १ कोटी ९१ लाख झाला आहे.

'पाली' च्या रक्षणासाठी आज रिट दाखल

$
0
0
यूपीएससी परीक्षेत वैकल्पिक विषय म्हणून पाली भाषेसारख्या विषयांच्या आधारे यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा आलेख चढता होता. यंदा मात्र मार्च महिन्यात झालेल्या या परीक्षेतून वैकल्पिक विषयांमध्ये प्रादेशिकसह पाली भाषेलाही हद्दपार करण्यात आले.

'ई-यंत्र रोबोटिक्स'मध्ये प्रणव मुंदडा देशात पहिला

$
0
0
मानव संसाधन मंत्रालय (एमएचआरडी) आणि मुंबई आयआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय 'ई-यंत्र रोबोटिक्स' स्पर्धेत नाशिकच्या प्रणव मुंदडा याने पहिला क्रमांक मिळवला. प्रणव याने बंगळुरूच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' या संस्थेमार्फत या स्पर्धेत भाग घेतला होता.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images