Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बेपत्ता युवकाचा सांगाडा आढळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गत दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेहाचा कुजलेला सांगाडा सुकडनाला नजीकच्या असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या शौचखड्याच्या टाकीत आढळून आल्याने सदरचा प्रकार घातपाताचा की काय असा सवाल पोलिसांपुढे उभा ठाकला आहे.

शहरातील सुकडनाला परिसरातील सार्वजनिक शौचालय पाडण्याचे काम गत दोन दिवसापासून सुरू होते. शौचालयाचे शौच खड्याच्या टाकीचे काम करीत असताना कामगारांना टाकीच्या वरच्या दिशेन पाय आढळून आले. कामागर बाळू बागुल यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी टाकीतून मृतदेह बाहेर काढून शोध घेतला असता परिसरातील रहिवाशी असलेला किरण भिका पवार (वय ३२) यांचा मृतदेह असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यांच्या खिशातील चावी, किचन काढून घरातील कुलूपास लावून कुलूप उघडण्यात आले. यावरून त्याची प्राथमिक ओळख पटली असून, त्याच्या डीएनए उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, सटाणा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सटाण्यात अतिक्रमण हटविण्याची मागणी

$
0
0

सटाणा : शहरातील गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेला साठफुटी रोडवरील बाधित अतिक्रमणधारकांनी एक महिन्याच्या आत रस्ता काढण्यासाठी मार्ग मोकळा करण्यास सहकार्य केले नाही तर सटाणा नगरपरिषद नियमानुसार कार्यवाही करेल, असा गंभीर इशारा सटाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बागंर यांनी दिला आहे.

सटाणा नगरपरिषदेच्या सभागृहात साठफुटी मार्गावरील बाधित १३ मालमत्ताधारकांसह पालिका प्रशासनाने बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी मुख्याधिकारी बोलत होते. साठफुटी रस्त्याच्या प्रश्न शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण झालेला आहे. यावेळी झालेल्या चर्चेनुसार ज्या १३ मालमत्ताधारकांनी आपले अतिक्रमण अथवा जागा मोकळी करून दिल्यास पालिका प्रशासन सबंधितांना एफ एसआय, टि.डी.आर अथवा नुकसानभरपाई देण्यासाठी पालिका प्रशासन कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्याधिकारी डॉ. बांगर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोमॅटोच्या दरात तेजी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची आवक वाढत असून, मंगळवारी (दि. २५) तब्बल एक लाख १३ हजार ९३५ क्रेट टोमॅटोची आवक झाली. मोठ्या प्रमाणात आवक होऊनही भाव तेजीत राहिले. किमान ५१, कमाल ३५१ तर सरासरी २६१ रुपये प्रती क्रेट भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो हंगाम यशस्वीपणे सुरू झाला आहे. देशभरातून शेकडो व्यापारी येथे दाखल झाले आहेत. देशांतर्गत तसेच परदेशातूनही टोमॅटोला मागणी होत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खरेदीसाठी स्पर्धा होत आहे. पिंपळगाव येथून टोमॅटो उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, गुजरात, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, सिलिगुडी आदी ठिकाणच्या बाजारपेठेत रवाना होत आहे.

देशांतर्गत बाजारपेठेसह पाकिस्तान, बांगलादेश, दुबई, सिंगापूर, मलेशिया, नेपाळ आदी देशांमध्ये टोमॅटोची निर्यात होत आहे. परदेशात निर्यात सुरळीत सुरू राहिल्यास टोमॅटो संपूर्ण हंगामात तेजीत राहील, असा अंदाज आहे. दरम्यान, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी भागात प्रचंड पावसामुळे स्थानिक टोमॅटो उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आलेले नाही. बंगळुरू परिसरातील टोमॅटो हंगाम संपल्यासारखाच आहे. त्यामुळे ना‌शिक विभागातील टोमॅटोला मागणी वाढली आहे.

बंगळुरू भागात गेलेले व्यापारी लवकरच पिंपळगाव बाजार समितीत दाखल होतील. हे व्यापारी आल्यानंतर खरेदीसाठी मोठी स्पर्धा होण्याची शक्यता असून, बाजारभाव वाढण्याचीही दाट शक्यता आहे. यामुळे कांदा टोमॅटो उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. पिंपळगाव बाजार आवारात टोमॅटा आवक वाढल्याने व्यापारी, आडतदार, कामगार यांची लगबग वाढली आहे. शेतकऱ्यांना तातडीने टोमॅटोची रक्कम ‌मिळावी, यासाठी बाजार समिती प्रशासन विशेष काळजी घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाहेरगावी जायचंय, १० किमी पायी चला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या वाहतुकीसाठी राज्य मार्ग प‌रिवहन महामंडळ सज्ज झाले आहे. शहरात तीन हजार बसेस आणि सुमारे दहा हजार कर्मचारी अधिकारी सिंहस्थ काळात कर्तव्यावर असणार आहेत. अर्थात असे असले तरी नाशिकहून बाहेरगावी जाणाऱ्या भाविकांना अंतर्गत वाहनतळांपर्यंत पायपीट करीत जाण्याशिवाय गत्यंतर नाही. ही पायपीट अगदी दहा ते बारा किलोमीटरपर्यंतची असणार आहे.

‌सिंहस्थ काळात प्रवासी वाहतुकीची सर्व भिस्त एसटी महामंडळावर आहे. त्यामुळे ठराविक रस्त्यांवर केवळ एसटी बसेसच दिसणार आहेत. प्रवाशांसाठी एक दिवसाचा प्रवासी पास उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यासाठी भाविकांना प्रत्येकी शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. रात्री बारा ते रात्री बारा अशा २४ तासांसाठी हा पास असणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशा दोन्ही ठिकाणी हा पास उपयुक्त ठरणार आहे. याखेरीज बाह्य वाहनतळ ते अंतर्गत वाहनतळ प्रवासासाठी भाविकांना ३० रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे. तसेच बसेसमध्येही शंभर रुपयांचे तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक पर्वणीसाठी तीन लाख पासेस बनविण्यात आले आहेत.

साडेसात हजार चालक वाहक नाशकात...

शहरात एकाचवेळी तब्बल साडेसात हजार चालक आणि वाहक कार्यरत राहणार आहेत. तीन हजार बसेससाठी सहा हजार चालक वाहक शहरात दाखल झाले आहेत. त्यांना आराम मिळावा यासाठी आणखी दीड हजार चालक वाहक उपलब्ध असणार आहेत. याखेरीज पर्यवेक्षण करणारे, मेन्टेनन्सचे काम पहाणारे दीड हजार अधिकारी, कर्मचारी नाशकात तळ ठोकून आहेत. बसेस स्वच्छ करणे व तत्सम कामे कंत्राटी तत्वावर देण्यात आले असून त्यासाठी एक ते दीड हजार कर्मचारी राबणार आहेत. बसेसमध्ये इंधन भरण्यासाठी अंतर्गत वाहनतळ ते बाह्य वाहनतळ या दरम्यान पेट्रोलपंप आरक्षित करण्यात आल्या आहेत. तेथे बसेस इंधन भरू शकतील.

डोंगरे वसतीगृहावर पार्किंग

अंतर्गत वाहनतळे एकमेकांशी न जोडल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पायपीट करावी लागणार आहे. सिडको, सातपूरला राहणाऱ्या एखाद्या नागरिकास पुण्याला अथवा धुळ्याला जायचे असेल तर त्यास डोंगरे वसतीगृहावर वाहन उभे करून सिन्नर फाटा किंवा निलगिरी बागेपर्यंत पायी चालत जावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूरध्वनी सेवा बंद; साधू-महंतांचे हाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ काळात सुरळीत दूरध्वनी सेवा पुरविण्याचा बीएसएनएलचा दावा मंगळवारी पुरता फोल ठरला. साधुग्राम परिसरातील महापालिकेच्या विभागीय कार्यालयांचे दूरध्वनी अचानक बंद झाले होते.

साधुग्राममध्ये प्रत्येक सेक्टरप्रमाणे विभागीय कार्यालये स्थापन करण्यात आली आहे. त्या कार्यालयांचे नंबर आखाड्यांच्या प्रमुखांना दिले आहेत. काही अडचण आल्यास दूरध्वनी करून विभागीय कार्यालायाकडे तक्रार करण्यास सांगितले होते. मात्र, विभागीय कार्यालयांचे फोन बंद झाल्याने तक्रार कुणाकडे करायची, असा प्रश्न साधू-महंतांना पडला आहे. त्याचप्रमाणे याचा परिणाम साधुग्राममधील एटीएमवरही झाला. यातील काही एटीएम तात्पुरते बंद झाले होते. साधुग्राममध्ये भाविक येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक साधुंना आपल्या खालशांचे पत्ते माहीत नाहीत. फोन बंद असल्याने आपल्या खालशांचे पत्ते शोधण्यास अडचण येत होती. त्याचप्रमाणे मंगळवारी पाऊस झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले होते. याबाबत कुणाकडे तक्रार करायची, असा प्रश्न नागरिकांना पडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्यानदास अखेर नरमले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाण्यात काठी मारली तर पाणी काही वेळासाठी दुभंगते, पुन्हा ते एक होते तसेच या भांडणाचे आहे. हे भांडण काही काळापुरते आहे ते लवकरच मिटणार आहे. अध्यक्ष म्हणून भलेही मला स्नान करू देणार नसतील तर मी एका आखाड्याचा महंतही आहे. त्यामुळे त्या अधिकाराने शाहीस्नान करणार असल्याचे सांगून महंत ग्यानदास मंगळवारी बॅकफुटावर आले. अध्यक्षपदावर बोलण्याबाबत मात्र त्यांनी नकार दिला. अखिल भारतीय पंच रामानंद निर्वाणी आखाड्याचे महंत असल्याने त्या अधिकाराच्या पार्श्वभूमीवर आपण शाहीस्नान करणार असल्याचा पुनरूच्चार मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महंत ग्यानदास यांनी केला.

अर्वाच्य भाषा, ढिसाळ नियोजन आणि श्री दिगंबर पंच आखाड्याबाबत वारंवार समोर आलेली नकारात्मक प्रवृत्ती यामुळे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांना दिगंबर आखाड्याने दिलेला पाठिंबा काढला असल्याचे आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास शास्त्री यांनी रविवारी जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच महंत ग्यानदास माध्यमांना सामोरे गेले.

अध्यक्षपदावर बोलण्याची गरज नसल्याचे सांगत महंत ग्यानदास म्हणाले, की शाहीस्नानच करण्याची गोष्ट असेल तर मी एका आखाड्याचा महंत आहे. अनि आखाड्याचे महत्त्व अधिक आहे. अध्यक्ष तर फक्त काम करण्यासाठी असतो. महंत पद महत्त्वाचे आहे. ग्यानदास पुढे म्हणाले की, शाहीस्नान निश्चित आहे. तो होणारच. आपआपसात भांडण सुरूच असतात. परमेश्वर सर्वांना सदबुध्दी देणार आहे त्याच्या कृपेने सर्व चांगले होणार आहे. भाऊ-भाऊ एकमेकांमध्ये भांडत नाहीत का? आणि हे भांडण आजचे थोडेच आहे हे तर पाच सहा महिन्यांपासून सुरू आहे. त्यावर काहीतरी तोडगा निघेलच. आम्ही येथे फक्त संदेश देण्यासाठी आलेलो आहोत, आम्ही साधू आहोत, घरदार सोडून येथे आलेलो आहोत. त्यामुळे भांडणाच्या भानगडीत आम्ही पडत नाही.

आखाड्यांचा क्रम ठरलेला

शाहीस्नान कोणत्या पध्दतीने होणार याबाबत सर्व काही आधीच ठरलेले आहे. तो कागद पोलिसांकडून अद्याप प्राप्त झालेला नाही, तो मिळाल्यावर क्रम सांगणार असल्याचे महंत ग्यानदास यांनी सांगितले.

रामजन्मभूमी वाद अयोध्येतच मिटवू

राम जन्मभूमी वाद नाशिकला मिटवणार का, या प्रश्नावर ग्यानदास म्हणाले, की मुस्लिम बांधवांना येथे येणे शक्य नाही. त्यामुळे अयोध्येतच त्यांना बोलावून घेऊन त्या वादाविषयी चर्चा करू. राम जन्मभूमी वादातील याचिकाकर्त्याचे मतपरिवर्तन केल्याचा आरोप ग्यानदास यांच्यावर साधू मंडळींनी केलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीचा निकाल २५ टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा नाशिक विभागीय मंडळाच्या माध्यमातून जुलै-ऑगस्ट २०१५ या कालावधीत पार पडलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेत नाशिक विभागाचा निकाल २५.४९ टक्के लागला. विभागातून या परीक्षेसाठी १२ हजार ७४० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी ३ हजार २४७ विद्यार्थी यात उत्तीर्ण झाले. मंगळवारी दुपारी ऑनलाइन हा निकाल जाहीर करण्यात आला.

एकूण २५ केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी १२ हजार ८३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १२ हजार ७४० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले. पैकी ३ हजार २४७ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. नाशिक विभागाची ही उत्तीर्णतेची टक्केवारी २५.४९ टक्के आहे. राज्यभरातही १ लाख ३९ हजार ३२९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. पैकी ३५ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याचाही निकाल २५.३७ टक्के लागला.

नाशिक जिल्ह्यातून ६ हजार ६४३ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ६८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याची टक्केवारी २५.३३ आहे. धुळे जिल्ह्यातून १ हजार ४१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी २३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे हे प्रमाण १६.२२ टक्के आहे. जळगावमधून ४ हजार ६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी १ हजार ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जळगावचा निकाल २६.३८ टक्के आहे. नंदुरबारमधून ६११ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. २६१ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. नंदुरबारचा निकाल ४२.७२ टक्के लागला. ३१ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेसाठी अर्ज करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांनी काढले बजेटचे वाभाडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकीय महासभेला नगरसेवकांनी प्रभाग समितीचे स्वरूप दिले. नाशिकच्या विकासाला दिशा देण्याच्या महत्त्वाच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्याऐवजी वार्डातील समस्याच त्यांनी पुढे केल्याने अंदाजपत्रकीय सभाच भरकटली. निधी आणि वार्डातील समस्यांवरून नगरसेवक आक्रमक झाल्याने अंदाजपत्रकावर ठोस चर्चाच झाली नाही. विशेष म्हणजे एलबीटी बंद झाल्याने महापालिकेचे उत्पन्न घटले असताना पर्यायी उपाययोजना चर्चा करण्याऐवजी नगरसेवकांनी अंदाजपत्रकाचे वाभाडे काढत ते फसवे असल्याचा आरोप केला.

महापालिकेच्या सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे स्थायी समितीने मंजूर केलेले १७६९.९२ कोटीचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी महापालिकेत सादर केले. तब्बल चार महिने उशिरा झालेल्या या अंदाजपत्रकावर सखोल चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, नगरसेवकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचायला सुरुवात केल्याने अंदाजपत्रकाची मूळ चर्चाच बाजूला राहिली. सर्वच सदस्यांनी आपल्या वार्डातील कामे रेंगाळल्याचा टाहो फोडत दोन लाखांच्याही फाईल्स मंजूर होत नसतील तर या अंदाजपत्रकाचा काय फायदा असा सवाल केला. अरविंद शेळके, शोभना शिंदे, शीतल भामरे, शिवाजी गांगुर्डे, कन्हैय्या साळवे, विलास शिंदे, वत्सला खैरे, रत्नमाला राणे, विक्रांत मते, शिवाजी सहाणे, दिनकर पाटील, उद्धव निमसे, वैशाली दाणी, राहुल दिवे, यशंवत निकुळे या सर्वांनीच आपल्याच वार्डातील कामांचा पाढा वाचला. मोठे टेंडर निघतात, मात्र नगरसेवक निधीचेही काम मंजूर होत नसल्याने सदस्यांनी बजेटचे वाभाडे काढले. त्यामुळे अंदाजपत्रकावरील चर्चाच पूर्णपणे भरकटली. एकाही सदस्याने अंदाजपत्रकातील निधी, त्यावरील खर्चावर चर्चा केली नाही. आपल्यावर कसा अन्याय झाला असाच टाहो सर्वांनी फोडला. सिंहस्थामुळे पंचवटीतच कामे झाल्याने सिडको-सातपूरमध्ये काहीच कामे झाली नसल्याचा आरोप सिडको सातपूरच्या नगरसेवकांनी केला.

निधीवाटपात अन्याय

सभेत सदस्यांनी निधी वाटपात अन्याय झाल्याचा आरोप केला. भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांना निधी दिला नसल्याचा आरोप संभाजी मोरुस्कर यांनी दिला. स्थायी समितीच्या सदस्यांनाही निधी दिला नसल्याने शहराचा सर्वांगिण विकासासाठी समतोल निधी दिला पाहिजे, असे मत सदस्यांनी व्यक्त केले. या अंदाजपत्रकात इतर विभागांवर अन्याय करण्यात आल्याचा आरोपही सदस्यांनी केला. त्यामुळे पुढील काळात पंचवटी विभाग वगळता इतर विभागाच्या कामाला प्राधान्य देण्याची मागणी केली.

'उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुख'

आपले अंदाजपत्रक सादर करताना स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळेची बोबडी वळल्याने चांगलाच वाद निर्माण झाला. आपल्या भाषणात त्यांनी नेत्यांची नावे घेताना शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेनेचा जिल्हाप्रमुख केला तर, मनसेचा उल्लेख महाराष्ट्र निर्मूलन सेना असा केला. नेत्यांच्या नावांची नियमावली चुकीची वाचली. यावरून सभागृहात गोंधळ सुरू झाला. शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या नावाला, तर भाजपने नेत्यांच्या क्रमवारीवर आक्षेप घेतला. त्यावरून अजय बोरस्ते आणि चुंभळे यांचा खडाजंगी झाली. अखेर महापौरांनी दुरुस्तीचे आदेश दिल्यानंतर वाद मिटला.

रस्ते दुरुस्तीचा गोंधळ

शहरात काही प्रभागामंध्ये चांगल्या रस्त्यांवरही डागडूजी करून त्यांना रिसर्फेसिंग करून चकाचक करण्यात येत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. दुसरीकडे शहरात खड्ड्यांचे राज्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. चांगल्या रस्त्यांवर वारंवार कामे केली जात असून, त्याच्यात काय नागरिकांचे चेहरे बघायचेत का असा सवाल नगरसेवकांनी केला.

इंद्रदेवालाही बजेट समजणार नाही

नगरसेवक विक्रांत मते यांनी अंदाजपत्रकाची चिरफाड करताना त्यातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. महापालिकेच्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गोलमाल आहे. बजेट चार नव्हे चौदा हजार कोटीचेही मंजूर होऊ शकतो. प्रत्यक्षात कामे करताना काहीच होत नाहीत. छापायचा खर्च वाया जातो. प्रत्यक्षात इंद्रदेवालाही हे बजेट समजणार अशा गडबडी यात आहेत. बॅलन्सशीट शिवाय हे बजेट मंजूर केले जाते. त्यामुळे या बजेटलाही अर्थ नसल्याचा आरोप त्यांनी केला.

माजी महापौरांची गुगली

महापौर पदावरून पायउतार झाल्यानंतर महासभेत केवळ हजेरी लावणाऱ्या व भाजपच्या वाटेवर असलेले मनसेचे माजी महापौर अॅड. यतीन वाघ यांनी आज पक्षालाच अडचणीत आणण्याची खेळी खेळली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भाजप सरकारने जास्त निधी दिल्यानेच व त्यांच्या प्रयत्नानेच शहराचा विकास झाला. त्यामुळे भाजप सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या मागणीने सत्ताधाऱ्यांची भंबेरी उडाली. सोबतच भाजप गटनेता संभाजी मोरूस्कर यांनीही त्यास दुजोरा दिला. महापालिकेचे काम असताना राज्य सरकारला श्रेय देऊन मनसेलाच कोंडीत पडकण्याची गुगली वाघ यांनी टाकली.

लांडे पैसे घेतात!

महासभेत सदस्य लक्ष्मण जायभावे यांनी मुख्य लेखाधिकारी राजेश लांडे यांच्यावर ठेकेदारांकडून पैसे गोळा करत असल्याचा आरोप केला. लांडेनी या कामासाठी चार माणसे नियुक्त केल्याचे सांगून बिले मंजूर करताना कंत्राटदारांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. आयुक्तांनाही याची कल्पना असल्याचा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्वणी काळात शाळांना नऊ दिवस सुटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ पर्वणी काळात शहरांतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने तीनही पर्वण्यांमध्ये सर्व शाळांना नऊ दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांमार्फत तसे पत्र शिक्षण उपसंचालकांना पाठविण्यात आले आहे. यंदाच्या सिंहस्थात प्रत्येक पर्वणीला सुमारे ८० लाख ते १ कोटी भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. तसे झाल्यास शहरातील सर्व रस्ते भाविकांच्या गर्दी ओसंडून वाहणार आहेत.

२९ ऑगस्ट रोजी पहिली शाही पर्वणी असून, २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ पासूनच नो व्हेईकल झोनची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या काळात भाजीपाला, दूध, वृत्तपत्र विक्रेते तसेच दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. मात्र शाळांबाबतचे नेमके धोरण स्पष्ट होत नव्हते. बहुसंख्य शाळा, महाविद्यालये शहराच्या मुख्य परिसरातच आहेत. हजारो विद्यार्थी सकाळ आणि दुपारच्या सत्रात शाळेत येतात.

पर्वणी काळात अंतर्गत वाहतूक बंद राहणार असल्याने शाळेत कसे जावे याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्येही संभ्रम होता. म्हणूनच विभागीय आयुक्तांनी शिक्षण उपसंचालकांना दिलेल्या पत्रानुसार नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथील शाळांना तीन दिवसांची सरकारी सुटी जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक पर्वणीला तीन दिवस याप्रमाणे तीन पर्वण्यांना नऊ दिवसांची ही सुटी असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत अंत्यसंस्कारासाठी घेतले जातात पैसे

$
0
0

म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेच्या स्मशानभूमीमध्ये मोफत अत्यंसस्कार योजनेत दुःखी कुटुंबाकडूनच लाकडांसाठी पैसे घेतले जात असल्याचा आरोप नगरसेवक विक्रांत मते यांनी पुराव्यानिशी सभागृहात केला. आडगाव स्मशानभूमीत हा प्रकार घडत असल्याचा आरोप करीत लाकडांसाठी घेतलेल्या पैशांच्या पावत्याच सादर केल्याने या योजनेतील भ्रष्टाचार समोर आला आहे. महापौर आणि आयुक्तांनी तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत नगरसेवक विक्रांत मते यांनी महापालिकेच्या स्मशानभूमींमध्ये चाललेल्या गैरप्रकार पुराव्यानिशी उजेडात आणले. मते यांनी आडगाव स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार योजनेत मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून पैसे घेतले जात असल्याचे पुरावे सभागृहात सादर केले. मृत व्यक्तीच्या अत्यंसंस्कारासाठी मोफत लाकडे दिले जात असतानाही मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून प्रतिव्यक्ती १८०० ते २ हजार रुपये घेतले जातात. यासाठीची रितसर पावतीही दिली जात असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी सभागृहात केला. त्यांच्या या खुलाशाने सभागृहही आवाक झाले. २१ जुलै रोजी दिलेली एक पावतीच त्यांनी महापौर व आयुक्तांना सादर केली. त्यामुळे महापौर अशोक मुर्तडक, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेत तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले.

पाणीबिल दीड लाख

मते यांनी घरपट्टी व पाणीपट्टी विभागातील भोंगळ कारभारावरही टीका केली. महापालिकेचे वॉटर ऑडिट न झाल्याने मोठ्या प्रमाणार घोळ सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. एका सोसायटीचे मीटर खराब झाल्याने महापालिकेने त्यांना चक्क एक लाख ४८ हजाराचे पाणीबिल पाठविले. महापालिकेच्या हिशेबानुसार या सोसायटीने दोन कोटी लिटर पाणी वापरल्याचा सिद्ध होते. प्रत्यक्षात तसे नसतानाही भोगंळ कारभाराने नागरिक भरडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाडीवऱ्हेजवळ अपघातात महिला ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई- आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हेजवळ टायर फुटल्याने कार उलटून झालेल्या अपघातात एका भाविक महिलेचा मृत्यू झाला, तर सहाजण गंभीर जखमी झाले. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. गीता पुष्करलाल पुरोहित (वय ६१) असे मृत्यू महिलेचे नाव आहे. पुष्करलाल पुरोहित (वय ६४), नरेंद्र सिंह शेखावत (वय ४८), शशी शर्मा (वय ३४), कौर शेखावत (वय ७०), राजेंद्र शेखावत (वय ६१), महेश शर्मा (वय २५, सर्व राहणार कल्याण, मुंबई) जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व भाविक कल्याण सिहंस्थ कुंभमेळ्यासाठी सकाळी खासगी गाडीने नाशिकमध्ये येत होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास वाडीवऱ्हे गावाजवळ गाडीचे अचानक टायर फुटले. त्यामुळे कार उलटली. गीता पुरोहित जागीच ठार झाल्या, तर अन्य भाविक गंभीर जखमी झाले. वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनचे निरीक्षक मनोहर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. यावेळी घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदाजपत्रकाला मंजुरी

$
0
0

महासभेत खल; नगरसेवक निधी ३० वरून ५० लाख

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आठ तासाच्या मॅरेथॉन चर्चेनंतर महासभेने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी स्थायी समितीने सादर केलेल्या १७६९.९७ कोटींच्या वार्षिक अंदाजपत्रकाला दुरुस्ती आणि उपसूचनेसह मंजुरी दिली. महापौरांनी या अंदाजपत्रकीय सभेत अनेक लोकप्रिय घोषणा केल्या असून, त्यात नगरसेवकांचा विकासनिधी ३० वरून ५० लाखांपर्यंत केला. तसेच सिंहस्थासाठी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या वाढीव निधी हा नगरसेवकांच्या अतर्गत कामांसाठी खर्च करण्याचे गाजर दाखविले. शहरात ठिकठिकाणी बहुमजली पार्किंग उभारण्याची घोषणा करण्यात आली.

चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी अंदाजपत्रकीय महासभेला मुहूर्त मिळाला. स्थायी समितीने सुचविलेल्या ३३२ कोटींच्या वाढीव कामांसह सुमारे १७६९.९७ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. त्यावर आठ तास मॅरेथॉन चर्चा करण्यात आली. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी २, १८६. ६७ कोटींचे अंदाजपत्रक शुक्रवारी स्थायी समितीला सादर केले होते. त्यात सिंहस्थासाठी ७४८ कोटींचा निधी धरण्यात आला होता. मूळ अंदाजपत्रक १४३७.६७ कोटींचे होते. त्यात स्थायी समितीने ३३२.३० कोटींची वाढ सुचवली होती. त्यामुळे हे अंदाजपत्रक १७६९.९७ कोटीपर्यंत पोहचले होते.

नगरसेवकांनी सुचवलेल्या विकासकामांवर आठ तास चर्चा चालली. अखेरीस स्थायी समितीने व नगरसेवकांनी सुचवलेल्या उपसूचना व दुरुस्त्यांसह त्याला मंजुरी देण्यात आली. खेडी विकासासाठी दोन कोटीचा निधी देण्यात आला. तसेच सभागृहनेता, विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सभापतींच्या निधीतही वाढ करण्यात आली. धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि बौद्धस्मारक वर्धापन दिन साजरा करण्यासाठी प्रत्येकी पाच लाखाचा निधी आरक्षित करण्यात आला. ग्रथांलय उपक्रमासाठी २५ लाख निधीची तरतूद करण्यात आली.

सिंहस्थ कामांसाठी वाढीव निधी मिळवण्याची जबाबदारी आयुक्तांवर टाकण्यात आली असून, सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. हा निधी नगरसेवकांच्या अतंर्गत कामांसाठी खर्च करण्याची महापौरांनी घोषणा केली. शहरात ठिकठिकाणी महापालिकेने संस्थांना दिलेल्या भूखंडावर बहुमजली पार्किंग उभारण्याची घोषणा केली. या संस्थांकडे असलेल्या अतिरिक्त जागांवर या पार्किंग उभारल्या जाणार आहेत. मखमलाबाद आणि मायको सर्कल येथे उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे.

बडगुजर व गेडाम यांच्यात वाद

भूसंपादनाच्या एका विषयावरून आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांच्यात खडाजंगी झाली. या वादात महापौर अशोक मुर्तडक यांनी बडगुजर यांचा माईक बंद केल्याने बडगुजरांचा तिळपापड झाला. आयुक्त, महापौर आणि बडगुजर यांच्यात शाब्दीक चकमक होऊन सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शिक्षण समितीचे बजेट

या अंदाजपत्रकीय सभेत शिक्षण समितीचे सुमारे ८३ कोटी ५५ लाखांचे बजेट सादर करण्यात आले. त्यात सभापतींनी १५१ कोटींची प्रस्तावित तरतूद केली असली तरी, ते ८३.५५ कोटीलाच मान्यता दिली. यात शासनाचा वाटा ३२ तर महापालिकेचा वाटा ५० कोटींचा असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भारत भारती’चा १६ भाषांमधून संवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लाखोंच्या गर्दीत हरविलेला आपला माणूस शोधताना शब्दांअभावी भिरभिरणाऱ्या नजरा, आपत्काल‌ीन प्रसंगात स्वत:च ओळख पटविताना स्थानिक भाषेचा जाणवणारा अडसर असो किंवा ऐनवेळी दवाखान्यात भर्ती व्हावे लागल्यावर भाषेच्या अभावाने संवादात येणारा व्यत्यय असो. सिंहस्थात जाणवणारा हा संभाव्य पेच सोडविण्यासाठी 'भारत भारती' ने पुढाकार घेतला आहे. या संस्थेचे विविध भाषी ५०० कार्यकर्ते २४ तास अखंड संवाद सेवेतून पर्वणीची खिंड लढविणार आहेत. यासाठी भारत भारतीने हेल्पलाइन उपलब्ध करून दिली आहे.

विविध राज्यांतून सिंहस्थासाठी नाशिकमध्ये मोठ्या संख्येने भाविक येण्यास सुरूवात झाली आहे. पर्वणीच्या दरम्यान नाशिकमधील पाहुण्यांची संख्या लाखोंच्या घरात असणार आहे. या कालावधीत आपत्कालीन प्रसंगापासून तर अत्यावश्यक सेवांपर्यंत नागरिकांना पोहचण्यासाठी प्रादेशीक भाषा हा संवादातील प्रमुख अडथळा ठरतो. हा भाषिक तिढा सोडविण्यासाठी भारत भारतीचे बहुभाषिक हेल्पलाइन सेंटर खास सिंहस्थासाठी कार्यरत झाल्याची माहिती भारतीचे अखिल भारतीय संयोजक विनय पत्राळे यांनी दिली. या हेल्पलाइनच्या शुभारंभा‌वेळी पोलिस उपायुक्त विजय पाटील नाशिक शाखेचे संयोजक प्रदीप पेशकार, सहसंयोजक राजेंद्र फड, निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, अंजु सिंगल यावेळी उपस्थित होते.

मदतीसाठी हेल्पलाइन

‌सिंहस्थात देशभरातून भाविक येणार असल्याने केवळ भाषिक ‌अडचणीमुळे मदत मिळविण्यात व्यत्यय येऊ नये म्हणून भारत भारती या संस्थेतर्फे नाशिकमध्ये संवादासाठी १६ भाषांमध्ये (मल्याळम, तेलुगु, कन्न, तामिळ तर उत्तरेतील भाषांमध्ये पंजाबी, हरीयाणी, भोजपुरी, मध्य भारतातून गुजराथी, राजस्थानी, हिंदी, पूर्व भारतातील आसामी, बंगाली, उडीया) संवाद साधणारी हेल्पलाइन भाविकांना उपयोगी ठरणार आहे. अडचणीच्या काळात ९०२११०२२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कॉलसेंटरवर एकाच वेळी १२० कॉल्स घेण्याची क्षमता आहे. याशिवाय या कॉल सेंटरचा समन्वय पोलिस यंत्रणेशीही असणार आहे. हेल्पलाईनच्या माध्यमातून पोलिस मदत मिळेल. कुंभमेळ्यात या धर्तीवर हा उपक्रम पहिल्यांदा नाशिकमधूनच राबविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रावण सरींचे जोरदार आगमन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही दिवसांपासून उघडीप देणाऱ्या पावसाने मंगळवारी पुन्हा दमदार हजेरी लावली. मृग तसेच आद्र नक्षत्रातील पावसाने दडी मारल्यानंतर पुनर्वसू नक्षत्राकडे डोळे लावून बसलेल्या नाशिककरांना श्रावणात बरसलेल्या या सरींनी दिलासा दिला आहे. दमदार पुनरागमन करणाऱ्या या पावसाने सिंहस्थासाठी येणाऱ्या भाविकांबरोबरच बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांचेही हाल केले.

जूनच्या सुरूवातीपासून पावसाने नाशिककरांवरील नाराजी स्पष्टपणे दाखवून दिली. म्हणूनच यंदा येथील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहीले आहे. सिन्नर, येवला, नांदगाव, बागलाण यांसारखे तालुके पाण्यासाठी आसुसले असून, तेथील पिकांनी केव्हाच मान टाकली आहे.

दाटून येणारे ढग अखेर मंगळवारी बरसले. शहरवासियांची सकाळच पावसाच्या दर्शनाने उजाडली. दिवसभर पावसाची ‌रिपरिप सुरू होती. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठपर्यंत ५३.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामध्ये इगतपूरीत २४.०, पेठ येथे १०.०, त्र्यंबकेश्वर येथे ७.०. सुरगाणा येथे ७.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

भाविकांचे हाल ...

या पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाणी साचले होते. हातगाडीधारक, पथारीवाले यांची या पावसाने धांदल उडविली. सर्वाधिक हाल झाले ते बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांचे. रेनकोट अभावी पोलिसांचे अतोनात हाल झाले. पावसामुळे अनेक पोलिस आडोशोच्या आश्रयाला गेल्याचे पहावयास मिळाले. साधुग्राममध्ये आलेल्या भाविकांचीही पावसाने निराशा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेवर दरोडा

$
0
0

जिल्हा बँकेच्या रानवड शाखेतून दोन कोटींची लूट

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव/ पिंपळगाव बसवंत

निफाड तालुक्यातील रानवड साखर कारखान्याच्या जिल्हा बँक शाखेवर सोमवारी मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. चोरट्यांनी गॅस कट्टरच्या सहाय्याने बँकेतील लॉकर फोडून ग्राहकांचे सोन्याचे दागिने व रोकड लुटून नेली. सोने व रोख रक्कम असा दोन कोटींचा ऐवज चोरीला गेल्याचा अंदाज आहे. पिंपळगाव बसवंत पोलिसांकडून दिवसभर पंचनामा सुरू असल्याने लंपास झालेल्या रक्कम तसेच सोन्याबाबत अधिकृतरित्या माहिती मिळू शकली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची रानवड साखर कारखाना येथे शाखा आहे. ही शाखा रानवड कारखान्यापासून साधारण पाचशे मीटर अंतरावर निर्जनस्थळी आहे. याबाबीचा फायदा घेऊन अज्ञात दरोडेखोरांनी सोमवारी मध्यरात्री बँकेच्या मागील बाजूच्या खिडकीची लोखंडी जाळी कापून बँकेत प्रवेश केला. स्ट्राँगरूपमधील तिजोरी तसेच ७५ पैकी ४४ लॉकर गॅस कटरने कापून सोन्याचे दागिने व रोकड मिळून सुमारे दोन कोटी रूपयांचा ऐवज लुटल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी बँकेची रोकड ठेवलेली तिजोरीही फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता बँकेचे व्यवस्थापक पी. एम. निकम हे तीन ल‌पििकांसह बँक उघडून आत गेले असता दरोड्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर नाशिक ग्रामीणचे पोल‌सि उपअधीक्षक सी. एस. देवराज यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करून तपासबाबत सूचना दिल्या. नाशिकहून ठसा तज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून निफाड तालुक्यात चोर आल्याच्या अफवांनी कळस गाठला असून, अनेकांनी घरात मौल्यवान वस्तू व रोकड घरात न ठेवता लॉकरमध्ये ठेवण्याला प्राधान्य दिले होते. दरोड्याचे वृत्त कळताच बँकेत ठेवीदार व लॉकरधारकांनी दिवसभर बँकेत गर्दी केली होती. जिल्हा बँकेचे चेअरमन नरेंद्र दरोडे व निफाडचे संचालक दिलीपराव बनकर यांनी रानवड कारखाना येथील शाखेला भेट देऊन दरोड्याची माहिती घेतली. तसेच लॉकरधारकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. लॉकरधारकांनी नरेंद्र दराडे यांना घेराव घालत सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरा, लॉकरचा विमा, बँकेची निर्जन जागा आदींबाबात त्यांना धारेवर धरले. या प्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत चोरीला गेलेल्या ऐवजाचा आकडा सांगितला जात नव्हता. एका पोलिस अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर, एक कोटी ८० लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेल्याचे सांगितले. ना सुरक्षारक्षक; ना सीसीटीव्ही कॅमेरा

जिल्हा बँकेच्या रानवड कारखाना शाखा येथे सुरक्षारक्षक नाही. तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याचे समोर आले आहे. बँक अतिशय निर्जनस्थळी असूनही सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्हीबाबत बँकेने दुर्लक्ष केले. बँकेच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटीचा फायदा उचलत अतिशय नियोज‌ति पद्धतीने हा दरोडा टाकण्यात आला आहे. रानवड येथे जिल्हा बँकेवर पडलेल्या धाडसी दरोड्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

दरोड्यात लॉकरधारकांची रक्कम व दागिने चोरीला गेले आहेत. संबंधितांना पोलिस तपासानंतर भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल. सध्या तातडीने सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.

नरेंद्र दराडे, अध्यक्ष, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँक अधिकाऱ्यांना सुरक्षेसंदर्भात सूचना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

निफाड तालुक्यातील रानवड येथे जिल्हा बँक शाखेवर पडलेल्या दरोड्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन दक्ष झाले असून, लासलगाव व परिसरातील बँक व एटीएम सुरक्षितता जाणून घेण्याच्या दृष्टीने लासलगाव पोलिसांनी परिसरातील सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुरक्षिततेसंदर्भात विशेष सूचना केल्या आहेत.

रानवड येथील बँक दरोड्याच्या घटनेनंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या बैठकीत लासलगावचे एपीआय आर. बी. सानप यांनी बुधवारी लासलगाव पोलिस स्थानकात शहरातील विविध बँकांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेतला.

सीसीटीव्ही यंत्रणा, सिक्युरिटी अलार्म, शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांची नेमणूक आदींसह डझनभर सूचनांचे पत्रक देऊन त्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना एपीआय आर. बी. सानप यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईशी एकजुटीने लढा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड शहरातील पाणीसंकटाचा सामना करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी पक्षाने केलेल्या आवाहनाला विरोधकांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच, पाणीटंचाई दूर करण्यासाठी शहराला टँकरने पाणीपुरवठा करण्याचा झालेला निर्णय बुधवारी पार पडलेल्या पालिकेच्या विशेष पाणी सभेचे वैशिष्ट्ये ठरले.

निसर्गाने शहराकडे फिरवलेली पाठ आणि पोलिस बंदोबस्ताअभावी लांबलेले आवर्तनाचे पाणी यामुळे मनमाड शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. यामुळे पक्षभेद, वैचारिक मतभेद दूर ठेवण्याचे पालिकेतील सत्ताधारी पक्षाने केलेले आवाहन आणि विरोधी पक्षाने त्वरित पाणीप्रश्नी कोणतेही राजकारण न करता पाणीसंकटाशी एक दिलाने सहकार्य करण्याची ग्वाही दिली. शहर पाणीटंचाईच्या गंभीर संकटात सापडले असताना सर्व पक्ष एकत्रित येऊन उपाययोजना करून शहरातील नागरिकांच्या पाठीशी उभे राहतील, असा सूर व्यक्त झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सकाळी अकरा वाजता पाणीप्रश्नावरील विशेष सभेला सुरुवात झाली. नगराध्यक्ष मैमुना तांबोळी, उपनगराध्यक्ष ललिता अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा सुरू झाली. शहरात अभुतपूर्व पाणीटंचाईचे सावट असून, त्यावर धरणातील गाळ काढणे, बंद कूपनलिकांची त्वरित दुरुस्ती करणे, टँकरने पाणी वाटपचे योग्य नियोजन करणे, सुरू बांधकामाबाबत स्थगितीचा निर्णय घ्यावा अशा विविध सूचना माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, योगेश पाटील, नगरसेवक संतोष बळीद, प्रवीण नाईक, रवींद्र घोडेस्वार, प्रमोद पाचोरकर, धनंजय कमोदकर, नगरसेविका संगीता पाटील, सविता गिडगे यांनी मांडल्या. पालिका प्रशासनतर्फे सतीश जोशी, राजेंद्र वैजापूरकर, विसपुते यांनी सभेचे संयोजन करून विविध शंकांचे निरसन केले.

आरोप-प्रत्यारोपाऐवजी सकारात्मक चर्चा घडल्याने पाणीप्रश्नी सर्व एकत्र झाल्याचे चित्र होते. पालखेड आवर्तनाचे पाणी दोन सप्टेंबरला सोडण्यात येणार असल्याची माहिती सतीश जोशी यांनी सभागृहास दिली. महत्त्वाच्या सभेस मुख्याधिकारी डॉ. मेनकर गैरहजर का, या संतोष बळीद यांच्या प्रश्नावर टँकरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते नाशिक येथे गेल्याचे सतीश जोशी यांनी सांगितले. माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे, बाळासाहेब पाटील यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. महत्त्वाच्या पाणीटंचाई विषयावरील विशेष सभेस २९ पैकी १४ नगरसेवक अनुपस्थित होते.

मोर्चा काढणार नाही

आम्ही सत्तेत असताना पाणीटंचाई काळात विरोधकांनी मोर्चे काढले. पाण्याचे राजकारण केले. पण, आम्ही आज विरोधात असलो तरी राजकारण करणार नाही, मोर्चा काढणार नाही, असे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे यांनी स्पष्ट केले. आमदार पंकज भुजबळ देखील या प्रश्नी तातडीची उपाययोजना करण्यास प्रयत्नशील असल्याचे पगारे यांनी सांगितले. पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, नगराध्यक्ष तांबोळी यांच्यासह सर्व जण पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहेत, असे संतोष बळीद यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बडा उदासीन’चे दिमाखात ध्वजारोहण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे बडा उदासीन आखाड्याचे ध्वजारोहण मोठ्या दिमाखात पार पडले. मध्य प्रदेशातील उज्जैन कुंभमेळ्याचे प्रभारी मंत्री तथा बांधकाममंत्री कैलास विजय वर्गीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच शासकीय अधिकारीही मोठ्या संख्येने ध्वजारोहणास उपस्थित राहिले. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मेळाधिकारी महेश पाटील, प्रातांधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार नरेशकुमार बहिरम आणि मुख्याधिकारी निवृत्ती नागरे खास करून उपस्थित होते.

ध्वजाची सकाळी पूजा झाली. त्यानंतर विश्वास देवळीकर आणि पुरोहितांनी मंत्रघोषात ध्वजाची पूजा कलशस्थापना आदि सोपस्कार केले. या प्रसंगी आखाड्याचे सचिव तथा मेळाप्रबंधक रघुमुनी महाराज, कोठारी प्रेमानंद महाराज, शिवानंद महाराज, डॉ. बिंदूजी महाराज, महंत धर्मप्रकाश महाराज, रामचरणदास महाराज, मंगलमुनी, देवीदास आदिंसह आखाड्याचे साधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज आणि सर्व आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष भाजपाचे तालुका अध्यक्ष मंदिराचे विश्वस्त कैलास घुले आणि त्यांचे सहकारी यांनी येथे सर्व व्यवस्था पाहिली व कार्यक्रम यशस्वी केला.

त्र्यंबकच्या कुंभमेळ्यासाठी दहा आखाडे आहेत. त्यात सात संन्याशी, दोन उदासीन आणि एक निर्मल आखाडा आहे. निर्मल आखाड्याच्या व्यतिरिक्त सर्व आखाड्यांचे ध्वजरोहण पूर्ण झाले आहे. निर्मल आखाड्याने बुधवारी शाहीप्रवेश सोहळा झाला. सर्व आखाड्यांच्या ध्वजारोहणास साधूंची मांदियाळी अनुभवास आली. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती आभावानेच जाणवली. काही आखाड्यांमध्ये ध्वजारोहणानंतर हजेरी लावली तर काहींनी पाठ फिरविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेशवाईला वरुणराजाची साथ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा यांची बुधवारी शाही पेशवाई मिरवणूक निघाली होती. अधूनमधून श्रावणसरींची बरसात करीत वरुणराजाने मिरवणुकीच्या उत्साहामध्ये रंग भरला. ढोलताशांच्या गजरामुळे आसमंत दुमदुमला आणि नागासाधूंनी केलेल्या 'हर हर महादेव'च्या गर्जनांमुळे वातावरण भारावले.

पेशवाईत रथ सहभागी झाले. त्यामध्ये महामंडलेश्वर आचार्य महंत विराजमान झाले होते. त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली. मिरवणुकीचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यामध्ये आखाड्याचे पुरोहित रतीशबापू दशपुत्रे यांनी रतन गल्ली येथे स्वागत केले. सुवासिनींनी औक्षण केले. साधुंना अल्पोपहार वाटप करण्यात आले. तसेच तेथनू पुढे काही अंतरावर ग्राहक पंचायतीचे तालुका संघटक नरेंद्र पेंडोळे यांनी साधू-महंतांवर पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले.

श्री पंचायत निर्मल आखाडा यांची दुपारी शाही प्रवेशाची मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष व निर्मल आखाड्याचे राष्ट्रीय सचिव श्री महंत बलवंतसिंह उपस्थित होते. तसेच राजेंद्रसिंह महाराज सामाजिक कार्यकर्ते बेहेरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्र्यंबक परिसरात सुरू असलेल्या पावसाच्या सरींचा मिरवणुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. अधून मधून कोसळणाऱ्या पावसामळे मिरवणुकीच्या जल्लोषात अधिक वाढ होत गेली.

पेशवाईचा आजही असणार जल्लोष

त्र्यंबकेश्वरचे रस्ते गुरुवारी‌ही (दि. २७) साधूंनी फुलणार आणि ढोल ताशांनी शहर दाणाणून जाणार आहेत. पंचदशनाम जुना आखाडा आणि बडा उदासीन आखाडा यांच्या पेशवाई मिरवणुका आहेत. याशिवाय आवाहन आखाडा, अग्नी आखाडा, अटल आखाडा अशा एकूण पाच आखाड्यांच्या मिरवणुका होणार आहेत. यामध्ये जुना आखाड्याची मिरवणूक नेहमीप्रमाणे लक्षवेधी ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शंभरपेक्षा अधिक महामंडलेश्वर आणि हजाराच्या संख्येत नागा साधू उपस्थित राहणार आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये बँडपथक, रथांची सजावट करणारे आणि फुलांचे हार पुरविणारे यांची दमछाक होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिंचोली शिवारात चारशे बस दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावर चिंचोली शिवारात कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची पार्किंग आणि बस वाहतूक व्यवस्था सज्ज झाली आहे. येथे पुणे विभागाच्या चारशे बस येण्यास प्रारंभ झाला आहे. चारशे बसचालक, वाहक आणि पाऊणशे अधिकारी येथे आले आहेत.

कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांची खासगी वाहने सिन्नर घाटाखालील मोह गावाजवळ थांबविली जातील. मोहगावाजवळ २५ एकरमध्ये खासगी पार्किंगची व्यवस्था झाली आहे. मैदान सपाटीकरण आणि रस्ते बांधून दिवे लावण्यात आले आहेत. लाकडी बॅरिकेड्सही उभारण्यात आले आहेत. गगनगिरी विश्वमानव सेवाश्रम प्रतिष्ठानच्या जागेत हे पार्किंग विकसित केले जात आहे. तीन ते चार हजार वाहनांची पार्किंगची सोय येथे होईल.

पार्किंगच्या विरुद्ध बाजूला खासगी बिल्डरच्या चाळीस एकर जागेत तात्पुरते बसस्थानक उभारले जात आहे. चारशे बस येथून सोडल्या जातील. पुणे विभागातील बस येथे येत आहेत. पुणे १००, सोलापूर ७५, सांगली ७५, कोल्हापूर ७५ आणि सातारा ७५ अशा बस येत आहेत. भाविकांसाठी रुग्णवाहिका, फिरते शौचालये, स्नानगृह, निवार शेड, मार्गदर्शन केंद्र आदी सुविधा आहेत. संपर्कसाठी मोबाईल टॉवर तर पोलिसांना निगराणीसाठी वॉच टॉवर आहे. पोलिस चौकी आणि सीसीटीव्हीही आहेत.

पर्वणी २९ तारखेला असली तरी २८ ऑगस्टला सकाळी सहाला खासगी वाहनांसाठी नाशिक-पुणे रस्ता बंद केला जाईल. मुंबईला जाणारी वाहतूक सिन्नरहून घोटीमार्गे, तर धुळ्याला जाणारी वाहतूक सिन्नरमार्गे वळवली जाईल. चिंचोली शिवारातून बसने भाविकांना सिन्नरफाटा बाजार समितीत आणले जाईल. तेथून ते पायी रामकुंड अथवा दसकच्या गोदा घाटावर जातील.

एसटी कर्मचाऱ्यांना नाश्त्याची पाकिटे येणार आहेत. त्यावर अवलंबून न राहता आम्ही गावाकडून भाकरी आणि चटणी मागविली आहे. ही भाकरी दहा दिवस टिकते. चवही कायम राहते.

- विठ्ठल आटकळ, पार्किंग व्यवस्था प्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images