Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील चेम्बर्समध्ये कामगांरासह अडकून मृत्यू होण्याची दुसरी घटना घडली असतांनाही, महापालिका प्रशासन अशा प्रकारांबाबत गंभीर नसल्याचा आरोप शिवसेनेन केला आहे. सफाई कामगारांना सुरक्षा देण्याच्या केंद्र सरकारच्या गॅझेटचाच महापालिका उल्लघंन करीत असून सातपूरच्या घटनेप्रकरणी प्रशासन प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना गटनेता अजय बोरस्ते यांनी केला आहे. येत्या महासभेत शिवसेना या घटनेचा जाब विचारणार असून सफाई कामगारांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

अजय बोरस्ते आणि माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेवून पालिकेच्या कामकाजावर टीकास्र सोडत प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचक नसल्याचा आरोप केला आहे. चेंबर्समध्ये अडकून सफाई कामगार मृत्यूमुखी पडण्याची ही दुसरी घटना आहे. तरीही कामगारांच्या सुरक्षेरकडे दुर्लक्ष केले जात आहे. कामगारांना मास्क, गमबुट, ऑक्सिजनचे किट देणे बंधनकारक आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सफाई कर्मचाऱ्यांना सेफ्टी टँकमध्ये उतरविणे हा कायद्याने गुन्हा आहे. केंद्र सरकारच्या १८ सप्टेंबर २०१३ च्या गॅझेटनुसार सफाई कर्मचाऱ्यांना सेफ्टी टँकमध्ये उतरविता येत नाही. असे आढळल्यास सबंधिताला २ ते ५ वर्षे शिक्षेची तरतूद आहे. मात्र, या आदेशाकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. मृत्यूनंतर वारशाला नोकरी देवून पळवाट काढली जात आहे. परंतु, सुविधा दिल्या जात नाही. संबंधित कर्मचाऱ्याला सेफ्टी टँकमध्ये कोणाच्या आदेशाने उतरविण्यात आले असा सवाल करत, बोरस्ते यांनी संबंधित अधिकाऱ्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

सफाई कर्मचाऱ्यांच्या पाठीशी शिवसेना असून त्यांच्या हक्कासाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सोबतच येत्या महासभेत जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अग्निशमनचे साहित्य गेले कुठे?

सातपूरची घटना घडल्यानंतर अग्निशमनचे कर्मचारी सुद्धा विना सुरक्षा साधनेच टँकमध्ये उतरले होते. सिंहस्थात अग्निशमनने सुरक्षेसाठी कोट्यवधीची खरेदी केली. मात्र, प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या हातात काहीच दिसत नाही. त्यामुळे खरेदी केलेली कोट्यवधीचे साहित्य कुठे गेले? असा सवाल शिवसेनेने केला आहे. झालेल्या खरेदीचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोकरीचे आमिष दाखवून तरुणाचे धर्मांतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुवेत येथे नोकरीला ‍लावतो, असे आमिष दाखवून नाशिकच्या एका युवकाचे अपहरण करून त्याचे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अपहृत तरुणाच्या बहिणीने सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, एका संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव संधानशिव (वय २८, रा. कापडपेठ, नाशिक) असे अपहृत तरुणाचे नाव आहे. तो दि. ३ सप्टेंबरपासून घरातून बेपत्ता होता. तशी तक्रारही सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. त्याचे कुटुंबीय गौरवच्या ठाणे येथील राहत्या घरी पोहोचले. तेथे त्याचा नवीन मोबाइल मिळून आला.

गौरव संधानशिव याच्या एका मित्राने त्याच्या वर्तणुकीबद्दल धक्कदायक माहिती दिली आहे. त्याच्या बॅगेत कुवेतचे चलन असलेले सुमारे १५० दिनार म्हणजे भारतीय ४१ हजार १०६ रुपये आढळून आले. जुन्या बिलाची पाहणी केली असता तो एका मुस्लिम तरुणाशी वारंवार बोलत असल्याची माहितीही पुढे आली. या तरुणानेच कुवेतमध्ये नोकरी देतो, असे आमिष दाखवून त्याला धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार अपहरणाची फिर्याद देण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्ल्यू नियंत्रणातच

$
0
0

नाशिकः नाशिकमध्ये स्वाइन फ्ल्यूची साथ वाढत नसतानाही तसे चुकीचे संदेश पसरविले जात असल्याचा दावा विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात घबराट निर्माण होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात अन्य ठिकाणांच्या तुलनेत नाशिकमध्ये स्वाइन फ्ल्यूबाबत साधारण परिस्थिती आहे. वैद्यकीय विभागाकडूनही स्वाइन फ्ल्यूला अटकाव करण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा डवले यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मभूमीतच हिंदू महासभेची परवड

$
0
0

साधुग्राममध्ये जागा मिळण्यास विलंब

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : सनातन हिंदू धर्मासाठी एका शतकापेक्षा अधिक काळापासून झटणाऱ्या अखिल भारतीय हिंदू महासभेला साधुग्राममध्ये जागा उपलब्ध होण्यासाठी दुसऱ्या पर्वणीपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कर्मभूमीतच हिंदू महासभेची परवड होत असून, यास थेट भाजप सरकार कारणीभूत असल्याची टीका संघटनेचे सचेतक स्वामी दामोधराचार्य महाराजांनी केली.

साधुग्राममध्ये सेक्टर दोन एफमध्ये ७२१ प्लॉटमध्ये दामोधराचार्य महाराजांचा मुक्काम आहे. याच प्लॉट शेजारील जागेत हिंदू महासभेसाठी जागा देण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यावर बराच खल झाल्यानंतर प्रशासनाकडून यासाठी हिरवा कंदील मिळाला. हिंदू महासभेचा पहिला अंजेडा आजही राममंदिरच आहे. याबरोबरच भोजशाळेचे सरस्वती मंदिर परत घेणे, संपूर्ण भारतात गो हत्या बंदी, कलम ३७० काढून टाकणे आदी विषय हिंदू महासभेच्या अजेंड्यावर असून, त्यावर सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान चर्चा होईल. १५ ते ३१ सप्टेंबर या कालावधीत दुपारी तीन ते सहा या काळात वरील अजेंड्यावर मत-मतांतरे व्यक्त करण्यासाठी साधू-महंत तसेच हिंदू महासभेचे कार्यकर्ते येणार असल्याचे दामोधराचार्य महाराजांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांनी हिंदू महासभेची स्थापना केली होती. आजही नाशिकमध्ये हिंदू महासभेचे अस्तित्व टिकून आहे. मात्र, नवयुवकांचा ओढा वाढवावा लागेल. सध्या स्थानिक संघटनेमध्ये मरगळ आली असल्याचे दामोधराचार्य यांनी स्पष्ट केले. हिंदू महासभेतर्फे होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय संघटक संजय जोशी यांनी नुकतीच साधुग्राममध्ये भेट घेतली. यावेळी, हिंदू महासभेचे जळगाव आणि औरंगाबादचे पदाधिकारी, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक पार पडल्याचे दामोधराचार्य यांनी सांगितले. हिंदू महासभेचे वरिष्ठ नेते संपर्कात असून, लवकरच ते साधुग्राममध्ये दाखल होतील. ​​​​हिंदू राष्ट्राची उभारणी करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू महासभेची स्थापना केली होती. मात्र, भाजपसारख्या पक्षांनी हिंदू राष्ट्राची मूळ व्याख्या राजकीय सत्तेत परिवर्तीत करून टाकली. सत्ता मिळाल्यापासून भाजपने आपल्या धोरणात बदल केला असून, त्याचा मोबादला त्यांना चुकवावा लागेल, असा इशारा दामोधराचार्य महाराजांनी दिला.

पदाधिकाऱ्यांमध्ये मरगळ

हिंदू महासभेचा जन्म याच भूमीत झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर हिंदू महासभेचे काम देशपातळीवर जोरात सुरू आहे. २ फेब्रुवारी २०१६ पर्यंत भोजशाळा येथील सरस्वती देवीचे मंदिर हिंदूना परत मिळाले नाही तर हिंदू महासभेचे बलिदानी पथक आपले कार्य करेल. त्याची जबाबदारी सरकारकडे असेल. देशपातळीवर हिंदू महासभा आक्रमक होत असताना नाशिकमध्ये संघटनेला मरगळ आली असल्याचा दावा दामोधराचार्य महाराजांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारा अन् पाण्याचे महासंकट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या येवला तालुक्याच्या पाठीमागील साडेसाती यंदाही कायम आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्या तीन महिन्यात तालुक्यात अवघा १४१ मिलीमीटर पाऊस झाल्याने दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या येवला तालुक्यासमोर पिण्याच्या पाण्यासह मुक्या जनावरांच्या चाऱ्याचं महासंकट उभं ठाकलं आहे. गावोगावीची शेती उजाड होताना जवळपास ८० टक्के खरिपाच्या पिकांच मातेरं झाल्यानं बळीराजाच्या चेहऱ्यावरची रयाचं गेली आहे.

ऋतू पावसाळा असला तरी वैशाख वनव्यागत उन्हाचे चटके सोसताना हैराण झालेल्या जनतेनं कोरड्याठाक पडलेल्या विहिरी बघत पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला आहे. अवर्षण प्रवणग्रस्त अर्थातच दुष्काळी तालुका अशी नशिबी ओळख निर्माण झालेल्या येवला तालुक्यात गेल्या चार पाच वर्षात पावसानं दगा दिल्यानं मोठ संकट निर्माण झालं. यंदा तर गेल्या तीन महिन्यात वरुणराजानं चांगलीच पाठ फिरवली. तालुक्यातील बळीराजा महासंकट झेलतोय. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात जूनमध्ये ८९.६, जुलैत २४.४ तर ऑगस्टमध्ये २७.५ मिलीमीटर इतकाच पाऊस झाला. जो झाला त्याचा देखील तालुक्याच्या सर्वच भागात समतोल नाही. यातून खरिपाची वाट लागली. सरासरी ४३३ इतकं वार्षिक पर्जन्यमान असलेल्या येवला तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत पाऊस झाला तो अवघा १४१.५ मिलीमीटर. पावसाने यंदा फिरवलेली मोठी पाठ अन् दिलेला दगा याने खरीप हंगामाची पुरती वाट लागल्याने तालुक्यातील 'शेतीचक्र' एकदम कोलमडून पडताना पर्यायाने शेतकरी देखील कोलमडला आहे.

प्रारंभी तालुक्यातील काही भागात जेथे विहिरींना थोडेफार पाणी आहे, तेथील शेतकऱ्यांनी त्या पाण्यावर खरिपाची पिकं तगवण्याचा काहीसा प्रयत्न केला. मात्र, सध्या पाऊसच नसल्याने व गावोगावच्या विहिरींनी कातळ गाठल्याने हे प्रयत्न देखील आता तोकडे पडले आहेत. आकाशाकडे डोळे लाऊन मानपाठ एक झाली तरी आभाळाची माया लाभत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाअभावी तालुक्यातील जवळपास ८० टक्के खरीप आता गेल्यातच जमा आहे. येत्या महिनाभरात पाऊस झाला तरच पुढील रब्बीच्या आशा असून आता तरी मेघराजा बरस रे...अशी आर्त साद तालुक्यातील शेतकरी घालताना दिसत आहे.

११ योजना बंद

येवला तालुक्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत आतापावेतो एकूण ३१ योजना पूर्णत्वास गेल्या असून, त्यातील २० योजना कार्यान्वित झाल्या आहेत. उर्वरित ११ योजनांना पाण्याचा स्रोत नसल्याने घरघर लागली आहे. नव्हेतर या ११ योजना पाण्याअभावी कोरड्या पडल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण नळपाणीपुरवठा योजना विभागाचे कार्यकारी अभियंता नंदनवरे यांनी येवल्यातील आढावा बैठकीत दिली.

परतीच्या पावसाची चाहूल

दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या येवला तालुक्यातील शहर व परिसरात गेल्या काही दिवसात अधूनमधून आकाशात दाटून येताना परतीच्या पावसाची चाहूल लागली असली तरी वरुणराजाने पुन्हा हुलकावणीचा खेळ सुरू केला आहे. दिवसभर घामाघूम करणाऱ्या दमट उष्म वातावरणाने सर्वांनाच नकोनकोसं करतांना नभांनी आकाश दाटले जात असले तरी ढग काही मिनिटातच पांगले जात असल्याने पावसासाठी आसुसलेल्या येवला तालुक्यातील बळीराजाच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडत आहे.

दुष्काळाची दाहकता

गावोगावच्या विहिरींनी गाठला कातळ

खरिपाची ८० टक्के पिके गेल्यातच जमा.

'गंगासागर' साठवण तलावाची तळ गाठण्याच्या दिशेने वाटचाल.

३८ गांवे नळपाणीपुरवठा योजनेच्या पाणीपुरवठ्यात कपात.

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

मुकी जनावरे दावणीवरून वाऱ्यावर सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ.

परतीचा पाऊस झाला तरच पुढील रब्बीच्या आशा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ जाहिरात कंपन्यांना नोट‌िसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थात नियमबाह्यरित्या जाहिरातीची पर्वणी साधणाऱ्या बड्या कंपन्यांना महापालिकेने अखेर दणका दिला आहे. पोल‌सिांनी हात वर केल्यानंतर महापालिकेने केशकिंग, कोकाकोला, युनीनार, एक्स‌सि बँकेसह १२ बड्या कंपन्यांना नोट‌सिा काढून फौजदारी कारवाईचा इशारा दिला असून, २४ तासात जाह‌रिात काढून कंपन्याना खुलासा करण्याचे आदेश दिल्याने कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकारामुळे पोलिसांच्या परवानगीवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 'मटा'ने सर्वप्रथम या कंपन्यांची बनावटगिरी उघडकीस आणली होती.

शहरात खाजगी अथवा शासकीय जाहिरात करावयाची असेल तर, त्यासाठी पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र असे असतानाही टचवुड एजन्सीज, बँक ऑफ बडोदा, वोडाफोन, एक्स‌सि बँक, युनीनार, इंटेक्स, कोकाकोला, केशकिंग, उषा, माझा, एअरटेल, व्हिडीओकॉन या कंपन्यांनी पोल‌सिांच्या मदतीने शहरात जाहिराती लावल्या. पोल‌सिांना परवानगी देण्याचा कोणताही अधिकार नसतांना, पोल‌सिांना केलेल्या प्रतापाचे पितळ 'मटा'ने सर्वप्रथम उघडीस आणले.

दबावतंत्राचा वापर सुरू

टचवुड एजन्सीजच्या मोहजालात अडकलेल्या या कंपन्याचे कारवाईच्या भीतीने धाबे दणाणले आहे. बड्या अधिकाऱ्यांनी आता मिटवामिटवीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईतल्या एका बड्या राजकीय नेत्यांच्या मदतीने पोल‌सिांसह पालिकेवर दबाव टाकला जात आहे. तर तक्रारी मागे घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदगाव येथे पाण्याची चोरी

$
0
0

येवला : येथील गावांतर्गत पाणीपुरवठा होणाऱ्या विहिरीतून शेतीसाठी पाणी चोरी करीत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या पाणी चोरीमुळे गावातील आदिवासी वस्ती टंचाईचा सामना करीत होती. ग्रामपंचायतीने याचा पंचनामा केला आहे. पाणी चोरी होत असल्याने आदिवासी वस्तीवरी पाणीपुरवठा खंडित होत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केळझरचा ‘तो’ ठराव रद्द

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मंजूर असलेल्या केळझर पाणीपुरवठा योजनेबाबत सर्वपक्षीय विशेष सभा बोलविण्याबरोबरच नगरसेवकांनी केलेला ठराव रद्द करण्याचा निर्णय अखेर पालिका प्रशासनाला घ्यावा लागला. पालिकेला आंदोलकांपुढे शरणागती पत्करावी लागली.

सटाणा नगरपरिषदेने केळझर योजना रद्द करण्याचा केलेला ठराव रद्द करावा, या मागणीसाठी पालिका प्रवेशद्वारावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालंचद सोनवणे, अरविंद सोनवणे, भाजपचे साहेबराव सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पालिकेतील जनरल कौन्सिलच्या १९ जूनच्या सभेत केळझर पाणीपुरवठा योजना गुंडाळण्यात येऊन पुनद धरणातून नव्याने पाइपलाइन करण्याचा ठराव संमत झालेला असताना गत सप्ताहात १२ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी नाशिक यांची भेट घेऊन उपरोक्त ठरावाला विरोध केला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पालिका सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा असल्याने संबधित ठराव रद्द करण्यासाठी शहरवासीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर दबाब तंत्राचे हत्यार उपसले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रेस कामगारांच्या सुरक्षेसाठी गतिरोधक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोड येथील प्रेस कर्मचाऱ्यांना आता रस्ता ओलांडतांना सुरक्षितता प्राप्त होणार आहे. कारण चलार्थ पत्र मुद्रणालयासमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूला महापालिकेने गतिरोधक टाकले.

दोन महिन्यापूर्वी प्रेस समोरील के. एन. केला शाळेजवळ कैलास सावंत या कर्मचाऱ्यांचा लष्कराच्या वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी प्रेसच्या गेटसमोरच प्रेसमध्ये नियुक्त औद्योगिक सुरक्षा दलाच्या गोपाल रेड्डी या जवानास वाहनाने धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. सुरक्षा अधिकारी प्रमोद उघाडे, मनुष्यबळ विभागाचे दुर्गाप्रसाद, कामगार नेते सतीश चंद्रमोरे, प्रकाश पगारे, गणेश काळे, जयराम कोठुळे, मोहन रावळे, शिवाजी कदम, संपत घुगे, हरिभाऊ ढिकले, योगेश कुलवधे, संदीप व्यवहारे आदी कामगारांनी नगरसेविका ललिता भालेराव यांना व महापालिकेला गतीरोधक टाकण्याचे पत्र दिले.

त्वरित कार्यवाही

ललिता भालेराव, माजी नगरसेवक संजय भालेराव यांनी महापालिकेत पाठपुरावा करून त्वरित गतिरोधक टाकले. दोन्ही प्रेसमध्ये सुमारे सहा हजार कामगार आहेत. सकाळी सातपासून रात्री बारापर्यंत व बारापासून सकाळी सातपर्यंत अव्यवहातपणे प्रेसचे काम चालते. जेलरोडवर वाहतूक प्रचंड वाढल्याने कामगारांच्याही जीवाला धोका झाला होता.

भीमनगरला गतीरोधक

प्रेसच्या समोरच के. एन. शाळा आहे. तेथील विद्यार्थी आणि भीमनगरमधील रहिवासी जीव मुठीत धरूनच रस्ता ओलांडतात. प्रेससमोर आणि भीमनगर चौकातही गतिरोधक टाकण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी प्रेसपासून शंभर मीटरवरील इंगळेनगर चौकात ट्रकखाली जेलचा कर्मचारी ठार झाला होता. तेथे तसेच सैलानीबाबा चौकात गतिरोधक टाकण्यात आले होते.

प्रेस कामगार, विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रेस तसेच भीमनगर चौकात गतिरोधक तातडीने टाकणे गरजेचे होते. त्यादृष्टीने कार्यवाही झाल्याचा आनंद आहे.

- ललिता भालेराव, नगरसेविका

जेलरोडला वाहतूक वाढली आहे. त्यामुळे प्रेसमधील कामगार आणि जवानांच्या जीवाला धोका झाला होता. एका कामगाराचा बळीही गेला होता. गतीरोधक होण्यासाठी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला.

- सतीश चंद्रमोरे, कामगार नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोमध्ये सर्रास ‌वीजचोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

केंद्र सरकारकडून मेट्रो सिटीमध्ये नाशिकचा समावेश होत असतांना शहरातील सिडको परिसरात सर्रास वीजचोरी केली जात आहे. एका माजी नगरसवेकाचे आ‌शीर्वाद मिळाल्याने परिसरातील झोपडपट्टीत महापालिकेच्या पथदीपांवरून वीज पोचवून लखलखाट करण्यात आला आहे. याबाबत माहिती असूनही प्रशासन डोळेझाक का करीत आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नाशिक शहराचा विस्तार होत असतांना वाढत्या विकासाबरोबरच शहरात चारही बाजूंनी दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. यात सिडको व सातपूर भागात कामगारांची वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कामाच्या शोधात रोजच हजारो कामगार सिडको व सातपूरमध्ये एमआयडीसीमध्ये काम शोधण्यासाठी येत आहेत. यामुळे कामगार त्यांना शक्य होईल त्याठिकाणी भाडेतत्वाने घरे घेऊन राहत आहेत. यातून झोपडपट्ट्यांचाही विस्तार होऊ लागला आहे. या झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्यासाठी राजकीय नेतेही सरसावले आहे. मात्र, यातून महापालिकेच्या साधनसंपत्तीची लूट सुरू झाली आहे. सिडको भागात एका माजी नगरसेवकाने चक्क महापालिकेच्या पथदीपावरून विजेचे कनेक्शन अनधिकृतपणे झोपडपट्टीधारकांना दिले आहे. सुमारे दोनशे झोपड्यांमध्ये प्रकाश पोचविण्याचा पुण्य प्राप्त करून त्याबदल्यात स्थानिक झोपडीवासियांकडून पैसे उकळले जात आहेत. महापालिकेचीच वीज विकण्याचा प्रताप या माजी नगरसेवकाने केला आहे.

सिडकोतील झोपडपट्टीधारकांकडून महापालिकेच्याच विजेची चोरी करून पैसे उकळणाऱ्या माजी नगरसेवकाची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेकडे केली आहे. परंतु, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सर्व माहिती असून देखील त्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप 'राष्ट्रवादी'च्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या प्रश्नाकडे लक्ष देत वीज चोरी थांबविण्याची मागणी केली जात आहे.

भाजीविक्रेत्यांना त्रास

सिडकोमध्ये रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांकडून देखील संबधित माजी नगरसेवक हप्ते वसूली करत असल्याचे रहिवाशी सांगतात. यात सिडको व सातपूरच्या काही भागात राजकीय व्यक्तींचे कार्यकर्ते सर्रासपणे भाजी विक्रेत्यांना दमदाटी करीत पैसे मागतात. या प्रश्नीही पोलिस आणि महापालिका प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणुकींना आखाड्यांची ‘धास्ती’

$
0
0

शाहीमार्गाला फाटा देण्याचा आयोजकांचा प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाहीमार्गावरून मिरवणूक काढून आखाड्यांच्या दबंगगिरीला समोरे जाण्यापेक्षा धार्मिक संस्था आणि खालशांनी पर्यायी मार्गांना पंसती देण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी दिवसभरात चार मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले. त्यात, सर्वांनीच आखाड्यांच्या नादी लागण्यापेक्षा समजदारीचा 'मार्ग' स्वीकारल्याचे दिसले.

शाहीमार्गावरून मिरवणूक काढून आखाडा परिषदेच्या अधिकाराचा भंग केल्याचा आरोप करीत जंगलीदास महाराजप्रणित आत्मा मालिक ध्यानपीठाच्या भाविकांवर तलवारी आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकाराचा सर्वच स्थरातून निषेध करण्यात आला. आखाड्यांच्या दहशतीचा धसका सर्वच धार्मिक संस्था आणि खालशांनी घेतलेला दिसतो. पोलिस प्रशासनाने सुध्दा कारवाईचे अस्त्र थंड बस्त्यात गुंडाळून ठेवल्याने आखाड्यांना मोकळे रान मिळाले आहे. मंगळवारी दिवसभरात साधुग्राममध्ये चार शोभायात्रा आयोजित केल्या होत्या. या सर्व संस्थांनी शाहीमार्गाचा नाद सोडून पर्यायी मार्गाने रामकुंड किंवा कन्नमवार घाटावर जाणे पसंत केले. यामध्ये जगदगुरू नरेंद्रचार्य महाराज, कृष्णाचार्यची महाराज, त्रिदंडी स्वामीजी महाराज सेवा शिबिर ट्रस्ट तसेच श्री अखिल भारतीय रामनुज नगर प्रबंध (आचार्य बडा) यांच्या मिरवणुकीचा समावेश होता. यातील, नरेंद्रचार्य महाराजांच्या भक्तांनी शाहीमार्गाचा वापर केला. उर्वरीत तिन्ही संस्थांना शाहीमार्गाला बगल देऊन आपल्या इच्छित स्थळी पोहचावे लागले.

इस्कॉनची मिरवणूक

सर्व वादांच्या पार्श्वभूमीवर तपोवनात तणावपूर्ण शांतता असताना संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास इस्कॉनच्या भक्तांनी तपोवनातील मुख्य रस्त्यावर मिरवणूक काढली. यात १५ ते २० भक्त सहभागी झाले. रथावर देवातांच्या मूर्ती होत्या. श्रीकृष्णाच्या नावाचा गजर करीत या भक्तांनी साधुग्रामला फेरा मारला.

सर्व वादाला आर्थिक पार्श्वभूमी

शाहीमार्गावर मिरवणूक काढण्याची इच्छा असलेल्या संस्थेला आखाडा परिषदेची मंजुरी घ्यावी लागते. ही प्रक्रिया राबवण्यास इच्छुक असलेल्या संस्थांकडून लाखो रुपयांचे अनुदान मागितले जाते. अनुदान देण्यास नकार देणाऱ्या संस्थांनी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केल्यास दमदाटीचे प्रकार घडतात. शाहीमार्गाच्या मानापेक्षा त्यातील अर्थकारण महत्त्वपूर्ण असून, त्यामुळे सर्वसाधारणः संस्था शाहीमार्गापेक्षा पर्यायी मार्गांनाच प्राधान्य देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्ल्याच्या घटनेतून आखाड्यांचा कुरघोडीचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममध्ये झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या माध्यमातून निर्वाणी अनी आखाडा, निर्मोही अनी आखाडा हे श्री पंच दिगंबर अनी आखाड्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. दिगंबर आखाड्याचे महंतांनी या घटनेस कोण जबाबदार आहेत, याचे पुरावे समोर असून आम्ही काहीही बोलणार नसल्याचे स्पष्ट करीत एकाअर्थी निर्वाणी आखाड्याला दोष दिला.

जंगलीदास महाराजप्रणित आत्मा मालिक ध्यानपीठाच्या भाविकांवर काही दिवसांपूर्वी तलवारी आणि लाठ्या-काठ्यांनी साधुग्राममध्ये हल्ला करण्यात आला. शाहीमार्गावरून मिरवणूक काढल्याने आपल्या अधिकारांचा भंग होत असल्याची आवाई साधूंनी यावेळी उठवली होती. निःशस्त्र भक्तांवर चक्क तलवारी आणि काठ्या घेऊन काही साधूंनी चाल केली. या घटनेचे सर्व महाराष्ट्रात तीव्र प्रतिसाद उमटले. या पार्श्वभूमीवर महंत ग्यानदास यांनी सोमवारी रात्री उशिरा प्रसिध्दपत्रक प्रसिध्दीस दिले. यात, हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन सुरू झाल्यापासून एक आखाडा प्रत्येक कामात खोडा घालत असून, त्यांचेच हे कृत्य असल्याचा दावा, महंत ग्यानदास यांनी केला. विशेष म्हणजे, आपण एका कार्यक्रमासाठी साधुग्रामबाहेर गेलो होतो अन्यथा आपण ही घटना होऊच दिली नसती, असा दावा ग्यानदास महाराजांनी केला. दरम्यान, हे आरोप करताना महंत ग्यानदास यांनी दिगंबर आखाड्याचे नाव घेतले नसले तरी त्याचा तोच रोख असल्याचे दिसते. याबाबत दिगंबर आखाड्याचे श्री महंत कृष्णदास यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. संबंधित संस्थेच्या भाविकांना आपण समजवल्यानंतर त्यांनी पुढे मिरवणूक घेतली. तेथेच त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोर कोण आहेत? ते कोणत्या आखाड्याशी संबंधित आहेत, याचे सर्व पुरावे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आहेत. पोलिस अधिकारी सुध्दा घटनास्थळी हजर होते. त्यामुळे या विषयावर बोलण्यासारखे काहीच नसल्याचे सांगत त्यांनी नथीतून तीर मारला. महंत ग्यानदास मनमानी करतात. अर्वाच्य भाषा वापरतात असा आरोप करीत दिगंबर अनी आखाड्याने महंत ग्यानदास यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला. आखाड्याच्या या निर्णयामुळे महंत ग्यानदास यांचे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्षपद धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर थेट नावे टाळत एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चक्रतीर्थावर भाविकांचे पर्वस्नान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरपासून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र चक्रतीर्थ येथे ओटी एकादशीनिमित्त पर्वस्नान भाविकांच्या अलोट गर्दीत झाले. सुमारे चाळीस हजार भाविकांनी चक्रतीर्थावर स्नानासाठी गर्दी केली होती. भाविकांसाठी जादा बसेसचीही व्यवस्था करण्यात आली होती.

येथून जवळच असलेल्या श्रीराम शक्तीपीठाचे धर्माचार्य महंत सोमेश्वरानंद महाराज यांनी पुरातन काळात गोदावरीचे पवित्र स्थान असलेल्या चक्रतीर्थावर आश्रमाची देवता हनुमानाच्या मूर्तीसह आणि नागासाधूंसह भव्य मिरवणुकीने जाऊन स्नान केले. विशेष म्हणजे चक्रतीर्थ येथे कोणतीही सुविधा नसताना हजारो भाविक रात्री दोन वाजेपासून आजूबाजूच्या टेकड्यांवर ठिय्या मांडून साधू-महंतांच्या दर्शनासाठी प्रतीक्षेत बसले होते. दुपारी बारा वाजेच्या दरम्यान हे स्नान संपन्न झाले. साधूंच्या स्नानानंतर गोदावरीत स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्तात लुप्त झालेली गोदावरी नदी येथून सुमारे १० ते १२ किमी अंतरावरील बेझे चाकोरे येथून प्रवाहीत होते, अशी पुराणकथा आहे. येथे भगवान विष्णूने चक्र मारले व कुंड तयार झाले, अशी देखील आख्यायिका आहे. अर्थात सन १७४६ मध्ये येथे शैव-वैष्णव वाद झाला आणि त्यानंतर येथे स्नान झाले नाही. नाशिक-त्र्यंबक कुंभमेळ्यापूर्वी येथे स्नान होत असायचा असे म्हटले जाते.

धर्माचार्य महंत सोमेश्वरानंद महाराज हे आनंद आखाड्याचे आहेत. पर्वस्नानासाठी येथे आखाड्याचे नागासाधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांना गोदावरीच्या पावनस्नानाची अनुभूती द्यावी म्हणून हे पर्वस्नान आयोजित केले असल्याचे सोमेश्वरानंद महाराज यांच्या शिष्यांनी सांगितले. दिनांक आठ ऑगस्ट रोजी येथे ध्वज उभारण्यात आला होता. येथे शिवलिंगाची स्थापना करण्यात आली असून, तेथे देवतांची पूजा करण्यात आली. गाजरवाडी येथून सुमारे तीन किमी अंतरावर असलेल्या बेझे येथे मिरवणुकीने सर्व साधू व रथात बसलेले महंत, आचार्य पोहचले. तेथे शिलाईमातेचे प्राचीन मंदिर आहे. येथे पालखीत शीलाईमातेची प्रतिमा स्नानासाठी ठेवण्यात आली. तेथून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर चक्रतीर्थ आहे. तेथे मिरवणूक पोहचली. येथे आमदार निर्मला गावित, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे, सभापती शांताराम मुळाणे, सरपंच सुरेश चव्हाण, राजाराम चव्हाण, कार्यकर्ते हरिभाऊ अलवणे आदींनी स्वागत केले. सुमारे चार किमी मार्गावर रांगोळया काढल्या होत्या. कलशधारी महिला भजन तसेच बँड आदी सर्व जल्लोषात झाले. धर्माचार्य सोमेश्वरानंद महाराज यांचा शहरी भागातील भक्त परिवार उपस्थित होता. तसेच, ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित बापू पेंडोळे, सुनील शुक्ल, रत्नाकर जोशी आदींनी येथे पूजा विधी संपन्न केले. त्र्यंबकेश्वर येथील गुरुदेवांचे सेवेकरी रवि अग्रवाल, अभय मोरे, डॉ. मयूर गाजरे, डॉ. काळे आदींसह हजारो भक्तांनी परिश्रम घेतले. आश्रमाचे श्रीनाथ महाराज, सुदर्शन महाराज, आनंद आखाड्याचे गंगागिरी महाराज, गिरीजागिरी महाराज आदींसह साधू उपस्थित होते. धर्माचार्य १००८ महामंडलेश्वर इंद्रदेव महाराज यांनी देखील येथे भेट दिली.

स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांच्या आशीर्वादाने मला ही प्रेरणा मिळाली हे पर्वस्नान आहे. गोदावरीच्या पावनस्पर्शाने भाविकांना पुण्यप्राप्त व्हावे म्हणून हे स्नान आयोजित केले होते. सिमेवर लढणाऱ्या सैनिक बांधवांना स्नानासाठी येणे शक्य नसते. त्यांच्यासाठी रामनाम जप करण्यात येतो. भक्तांच्या सह्योगातून २० लाख रामनाम जप लिखीत करण्यात आला. नऊ लाख स्वतः गुरुदेवांनी केला आहे. या रामनाम जपाच्या वह्या कॅन्टाेन्मेंट बोर्डाचे अधिकारी श्रीकांत दीक्षित यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

ऐनवेळी धावल्या जादा बसेस

चक्रतीर्थावर गर्दी उसळल्यानंतर एस टी महामंडळाने तत्काळ जादा बसेसची व्यवस्था केली. नियमित बसेस सोडून १७५ बसेस सोडण्यात आल्या. यामध्ये १२५ बसेस या नाशिक येथून तर धुळे व संगमनेर येथून प्रत्येक २५ बसेस सोडण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएसएनलचे सेवेसाठी युद्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावर सहा सप्टेंबरला बीएसएनएलची पावणे आठ लाखाची केबल चोरीला गेल्याने इंटरनेट व कालिंग सेवा खंडीत झाली आहे. दुसरी पर्वणी येत्या रविवारी (दि. १३) आहे. तत्पूर्वीच सेवा पूर्ववत करण्यासाठी बीएसएनएलचे मुख्य व्यवस्थापक सुरेश प्रजापती, विभागीय उपअभियंता एस. बी. काळे, श्री. बन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत. साडेतीनशे ग्राहकांची सेवा पूर्ववत करण्यात त्यांना मंगळवारी यश आले.

नाशिकरोड येथील म्हसोबा मंदिर ते स्टार झोन या टप्प्यातील मेनहोलमधील बाराशे पेअर्सची १९८ मीटरची २ लाखाची केबल चोरांनी चोरली. नंतर बिटको कॉलेज गेट ते म्हसोबा मंदिर दरम्यान आठशे पेअर्सची ७८८ मीटरची पावणे सहा लाखाची केबल कापून नेली. चेंबरवजा खड्ड्यात उतरून चोरांनी केबल ओढून नेली. चोरांच्या टोळीने प्लॅन करूनच हे साहस केले. शहरात केबलचोरीची एवढी मोठी घटना प्रथमच घडल्याने अधिकारी व पोलिस चक्रावले आहेत. नाशिकरोड परिसरात बीएसनएलचे पावणे आठ ग्राहक आहेत. केबल चोरीला गेल्याने पंधराशे व्यावसायिक व ग्राहकांची सेवा खंडीत झाली आहे. त्यात इंटरनेट व फोनचा समावेश आहे.

केबल चोरीमुळे सेवा खंडीत झाली आहे. पर्वणीपूर्वी बीएसएनएलची सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर मेहनत घेत आहोत. त्याला निश्चितच यश येईल.

- एस. बी. काळे, उप विभागीय अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालधक्क्यातूनच भाविकांना प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

दुसऱ्या पर्वणीसाठी आलेल्या भाविकांना चार नंबर फ्लॅटफार्मवरून नदीच्या दिशेला सोडले जाईल. परतीच्या भाविकांना देवळालीगावातील गांधी पुतळ्यापर्यंत बसने सोडल्यानंतर मालधक्कामार्गेच त्यांना रेल्वे स्टेशनवर प्रवेश मिळेल. तसे नियोजन मंगळवारी करण्यात आले.

रेल्वे पोलिस दलाचे अतिरिक्त महासंचालक ए. के. सिंग, वरिष्ठ अधिकारी एस. पी. मिश्रा, लोहमार्ग अप्पर महासंचालक डी. कनकरत्ने, अधीक्षक अनंत रोकडे, उपविभागीय अधिकारी माधुरी कांगणे, सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे आदींनी रेल्वे व बसस्थानक, मालधक्का, महात्मा गांधी पुतळा येथे पाहणी केली. नाशिक-पुणे रस्तामार्ग व रेल्वेने येणाऱ्या भाविकांना सकाळी सहानंतर मुंबई नाका महामार्ग व काठेगल्ली त्रिकोणी गार्डनपर्यंत बसने सोडले जाईल. भाविक लक्ष्मीनारायण घाटावर जातील. दसक घाटावर जाण्यासाठी पहाटे तीन ते सहापर्यंत सैलानी बाबा चौकापर्यंत बसने सोडले जाईल. परतीच्या भाविकांना काठे गल्लीपासून देवळाली गावातील गांधी पुतळ्यापर्यंत आणि नाशिक-पुणे मार्गावरील भाविकांना चिंचोली शिवारापर्यंत बसने सोडले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सफाई कर्मचाऱ्याचा नाशिकरोडला मृत्यू

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोड येथे एका अविवाहित सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तुषार सुनील शिंदे (२८, रा. विहीतगाव बुद्धविहारमागे, नाशिकरोड) या त्याने नाव असून त्यांच्याकडे विहीतगाव शेड साफसफाईची जबाबदारी होती. शिंदे हे सकाळी पावणे आठच्या सुमारास सौभाग्यनगर येथे झाडूने साफ सफाई करत होते. अचानक त्यांना चक्कर आली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने युवराज अरिंगळे या सामाजिक कार्यकर्त्याने महापालिका अधिकाऱ्यांना फोन केला. अधिकाऱ्यांनी शिंदे यांना बिटको रुग्णालयात आणि नंतर संदर्भ रुग्णालयात हलविण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शिंदे यांच्यामागे आई, आजी, दोन भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पाणी मिळालेच पाहिजे, अशी मागणी करीत निफाड तालुक्यातील शेकडो शेतकरी मंगळवारी अचानक रस्त्यावर उतरले. दुष्काळाची दाहकता जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सीबीएस समोरील मुख्य रस्ता शेतकऱ्यांनी व्यापल्यामुळे सीबीएस ते मेहेर सिग्नल वाहतूक तब्बल दोन तास ठप्प होती.

पावसाने पाठ फिरविल्याने जिल्हाभरातील पिके करपून गेली आहेत. चाऱ्याअभावी जनावरांचे हाल होऊ लागले आहेत. ग्रामीण भागातील विहीरींनी तळ गाठला असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. पिण्यासाठीच पाणी नसल्याने पिकांसाठी पाणी कोठून आणणार असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्यासाठी वर्तन सोडले जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. निफाड तसेच देवळाली मतदार संघातील सय्यद पिंपरी, चितेगाव, ओणे, ओझर, दिक्षी, जिव्हाळे, दात्याणे, खेरवाडी, कसबे सुकेणे, कोकणगाव, रसलपूर, साकोरे या गावांमध्ये टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गर्दी केली. आमदार अनिल कदम आणि आमदार योगेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. द्राक्ष पिक खराब झाले असून पाणी न मिळाल्यास बागा उध्वस्त होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. निफाडचे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी पाणी सोडणे आवश्यक असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला असताना आणि पालकमंत्र्यांशी शिष्टमंडळाने चर्चा केली. पाण्याचे आवर्तन सोडण्यास दिरंगाई होत असल्याबाबत आमदार कदम यांनी नाराजी व्यक्त केली. अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पालखेड उजवा कालवा तसेच गंगापूर डाव्या कालव्याला पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे अशी मागणी करण्यात आली.

सिंहस्थासाठी आरक्षित केलेल्या पाण्यात तसेच शहरासाठीच्या आरक्षित पाण्यात कपात केली जाईल. तिसरी पर्वणी होताच १९ सप्टेंबर रोजी पाण्याचे आवर्तन सोडण्याचे नियोजन आहे.

- जितेंद्र काकुस्ते, निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुलांची परस्पर विक्री?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतर्फे शहरात उभारण्यात येणाऱ्या घरकुलांचे वाटप करण्यात प्रशासनाला अपयश येत असतांना महापालिकेच्या या घरांचीच आता परस्पर आर्थिक व्यवहार करून विक्री होत असल्याचे समोर आले आहे. आंनदवल्ली परिसरात नवी दिल्लीच्या इंदिरा गृहप्रकल्प योजनेच्या नावाखाली चक्का घरकुलांचे बुकींग करून त्यांच्या वाटपाचीही तारीख जाहीर करून टाकली आहे. महापालिकेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

झोपडधारकांसाठी महापालिकेतर्फे घरकुल योजना राबविली जा‌ते. महापालिकेतर्फे गरिबांना घरकुलांचे वाटप केले जाते. यासाठी रितसर प्रक्रिया असतांना आनंदवल्ली परिसरात काही व्यक्तींकडून घरकुलांची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. नवी दिल्लीच्या इंदिरा गृहप्रकल्प योजनेच्या नावाखाली काही व्यक्ती गरिबांकडून आर्थिक मोबदला घेवून त्यांना ही घरे परस्पर वाटप करण्यात आले आहे. यासंदर्भात काही नागरिकांनी संबंधित संस्थेकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र थेट अतिरिक्त आयुक्तांना पाठवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आनंदवल्ली परिसरात ८५ घरकुलांचे काम सुरू आहे. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेवून पाच ते दहा हजारात घरे विकली जात असल्याची चर्चा आहे. महापालिकेन या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून या प्रमाणपत्र देणा-या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. संबंधितांवर फौजदारी कारवाईचा इशारा महापालिकेने दिला असून पीडितांना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शैक्षणिक वर्ष सुरू होवून दोन महिने उलटले तरी आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी आदिवासी आयुक्तालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आयुक्तालयात ठिय्या मांडत आयुक्तांच्या कार्यालयाच वेढा घातला असून तो रात्री उशीरापर्यंत सुरू होता. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला असून शासकीय यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बुधवारी मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली आहे.

राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेश भत्ता तसेच शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. या संदर्भात विभागाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सहनशिलतेचा बांध फुटला असून मंगळवारी सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी थेट आदिवासी आयुक्तालय गाठत, कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. अचानक सुरू झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाची धांदल उडाली. विद्यार्थ्यांनी थेट आयुक्त सोनाली पोंक्षे वायगंणकर यांच्या कार्यालयाचा आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाचाही ताबा घेतला. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसह शिक्षकही या आंदोलनात सहभागी झाले.

आदिवासी विकास परिषदेचे लक्ष्मण जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. आयुक्त मुंबईला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

आजच्या बैठकीनंतर ठरणार दिशा

विद्यार्थ्यांच्या आक्रमक आंदोलनाची आदिवासी विभागाने गंभीर दखल घेतली आहे. आदिवासी विकास मंत्र्याच्या दालनात बुधवारी (दि. ९) बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय झाले तरच आंदोलन मागे घेवू, अशी माहिती लक्ष्मण जाधव यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेची पोत हिसकावली

$
0
0

नाशिक : पहिल्या पर्वणीला तपोवनात गेलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र महिलेने हिसकावून नेले. आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा हरिश्चंद्र चिंतामणी (३२, रा. बोधलेनगर) हे पत्नीसोबत तपोवनात फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी चोरट्याने पत्नीच्या गळ्यातील ३८ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images