Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पतीसोबतच घेतला जगाचा निरोप!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पतीचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासाने पत्नीचे निधन झाल्याची व एका घरातून दोन अंत्ययात्रा काढण्याची वेळ मुलांवर आली. मनाला चटका लावणारी ही घटना नांदगाव येथे घडली. पती वियोगाने पत्नीनेही जगाचा निरोप घेतला आणि पती-पत्नीच्या अतूट नात्याची चर्चा मंगळवारी नांदगावमध्ये होती.

नांदगाव येथील सुवर्णकार समाजातील निंबा फकिरा विसपुते (वय ६९) हे आजारी असल्याने त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. पतीच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या पत्नी सुमन (वय ६५) यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. सुमन विसपुते यांना खासगी दवाखान्यात नेण्यात आले मात्र, दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली. पतीवियोगाने पत्नीने अवघ्या काही तासात जीवनयात्रा संपवली. विसपुते दाम्पत्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पतीच्या निधनानंतर लगेच पत्नीनेही जागचा निरोप घेतल्याने नांदगावात पती-पत्नीच्या अतूट नात्याची चर्चा झडत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन दिवसानंतर झाले बजरंगीदासांवर अंत्यसंस्कार

$
0
0

नाशिक : अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागरात दोन दिवसापासून खितपत पडलेल्या बजरंगी दास (वय ६०) या साधूचे ठिकाण शोधण्यात पोलिसांना मंगळवारी यश आले. ओळख पटल्यानंतर बजरंगी दासांवर दोन दिवसानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेल्या साधूंपैकी तीन ते चार साधूंचा वेगवेगळ्या कारणाने नाशिकमध्ये मृत्यू झाला. भटके समजल्या जाणाऱ्या साधूंची ओळख पटवणे पोलिसांसमोर सर्वांत मोठे आवाहन ठरते. उपचार सुरू असताना बजरंगीदास मृत्युमुखी पडले. यानंतर, आडगाव पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली. बजरंगी दासांच्या मृत्यूनंतर तब्बल दीड दिवसांनी त्यांच्या राहण्याचा ठावठिकाणा पोलिसांनी शोधून काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत बचत गटाच्या महिलांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देतो असे सांगून सिडकोतील १०० हून अधिक महिलांना सुमारे साडेआठ लाखांचा गंडा घालण्यात आला. महिलांनी अंबड पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.
रविकांत रत्नाकर जोशी, गौरी रत्नाकर जोशी आणि अश्विनी शिवकुमार वाजपेयी अशी संशयितांची नावे आहेत. सन २०१२ ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत पाटीलनगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देतो, असे आश्वासन देऊन सभासद शुल्क म्हणून त्यांच्याकडून पैसे गोळा केले. मात्र, त्यांना कर्जच उपलब्ध करून देण्यात आले नाही. संशयित पसार झाल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत दहीहंडीवेळी पोलिसाला धक्काबुक्की

$
0
0

नाशिक : सिडकोतील राणाप्रताप चौकातील दहिहंडीच्या कार्यक्रमात झालेला वाद मिटविणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की करून त्याचा शर्ट फाडण्यात आला. सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास हा प्रकार घडला. दहीहंडीच्या कार्यक्रमात काही तरुणांची आपापसात भांडणे झाली. ही भांडणे सोडविण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यावेळी पोलिस शिपाई डंबाळे यांचा शर्ट फाडून सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मांतर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

$
0
0

नाशिक : कुवेत येथे नोकरीचे आमिष दाखवून नाशिकच्या युवकाचे अपहरण आणि धर्मांतर केल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिसांकडे दाखल आहे. या प्रकरणाच्या तपासात मुंबई गुन्हे शाखेने लक्ष घातले असून, नाशिक गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी मुंबईला रवाना झाले आहे.

गौरव संधानशिव (वय २८) या तरुणाचे अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिसांनी दाखल केला आहे. त्याचे धर्मांतर घडवून आणल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करीत असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली. ते म्हणाले, मंगळवारी दुपारपासून गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुंबई गुन्हे शाखेनेही या प्रकरणात लक्ष घातले आहे. नाशिक गुन्हे शाखेचे पथकही मुंबईकडे रवाना झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलभरोसाठी जनतेला साद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात दुष्काळाचे भयावह संकट असून, सरकारकडून कुठलेही ठोस नियोजन होताना दिसत नाही. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह होत असलेल्या जेलभरो आंदोलनात जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राष्ट्रवादी भवनात मंगळवारी दुष्काळ आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यात १४ सप्टेंबर रोजी हे आंदोलन होत आहे. मात्र, दि. १३ सप्टेंबर रोजी नाशिक शहरात कुंभपर्वणीची गर्दी असल्यामुळे नाशिक शहरात १५ सप्टेंबर रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्या राज्यात दुष्काळाचे सावट आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. शासनाकडून कुठल्याही ठोस उपाययोजना किंवा नियोजन होताना दिसत नाही. राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांची कर्ज, वीजबिल माफ करावे, बँकांनी व वीज मंडळाने सक्तीची वसुली थांबविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चाऱ्यासाठी चारा छावण्या प्रशासनाकडून सुरू करण्यात किंवा दावणीला चारा देण्यात यावा, दुष्काळी भागात मागणीप्रमाणे पाण्याचे टँकर देण्यात यावे, अन्नसुरक्षा योजना लागू करावी, शेतकऱ्यांना रोजगार हमी अंतर्गत कामे द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना दुष्काळ मदत शासनाने जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील इतरही दुष्काळग्रस्त भागात मदत द्यावी असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

जलसंपदा विभागाने मनमाड, नांदगाव, येवला शहरासाठी आवर्तन सोडले आहे. परंतु, यापुढे आवर्तन मिळेल की नाही याबाबत प्रशासनाकडून साशंकता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी जपून वापरावे असा सल्ला देखील त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड, मालेगाव, बागलाणमध्ये पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुमारे दीड महिन्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने मंगळवारी निफाड, मालेगाव, बागलाण तसेच जिल्ह्याच्या इतर भागातही हजेरी लावली. यामुळे बळीराजासह सर्वांनाच दिलासा मिळाला. मालेगाव तालुक्यात वीस मीमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. दिवसभराच्या प्रचंड उष्म्यानंतर पावसाने सायंकाळच्या सुमारास हजेरी लावली. दुष्काळ आणि टंचाईच्या भीषण परिस्थितीला तोंड देत असतानाच मंगळवारचा दिवस तालुक्यातील शेतकरीपासून सगळ्यांसाठीच वरुणराजाच्या आगमनाने दिलासादायक ठरला. यामुळे पिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. रब्बीच्या पिकांसाठी परतीचा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीआरटीएस-मेट्रोची गरज

$
0
0

Vinod.Patil@timesgroup.com

नाशिक : नाशिक शहराची वाटचाल महानगराकडे होत असून, शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करता प्राधान्यक्रमाने सर्वात आधी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करण्याचे मोठे आव्हान आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडी, पार्किंग, प्रदूषण, वेळ आणि पैशाचा अपव्यय या सर्वांवर परिणामकारक उपायासाठी मेट्रो किंवा बीआरटीएस एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी नाशिकमध्ये त्याची चाचपणी होणे गरजचे आहे. मेट्रोची उभारणी महागडी असल्याने शहरासाठी मेट्रोपेक्षा बीआरटीएस हा सक्षम उपाय आहे. आयडीडीपी संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार नाशकात बीआरटीएसला वाव असून, तीन मार्गावर पहिल्या टप्प्यात ही योजना राबवली जाऊ शकते. यासाठी एक हजार कोटी रुपये उभारण्याचे मोठे आव्हान आहे.

शहराचा विस्तार झपाट्याने होत असून, सन २०४१ मध्ये लोकसंख्येचा आकडा ५२ लाखांच्या वर जाणार आहे. सध्याचे रस्ते आणि वाहतूक व्यवस्था एवढ्या वाढीव लोकसंख्येचा भार सहन करू शकत नाही. शहरातील प्रमुख्य रस्त्यांच्याही मर्यादा असल्याने वाढत्या लोकसंख्येचा सामना करण्यासाठी आताच सक्षम वाहतूक व्यवस्था उभी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून बीआरटीएस अर्थात बस रॅपीड ट्रान्झिट सिस्टीम. बीआरटीएस ही प्रणाली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी रस्त्यांवरील वाहनांसाठी लागणाऱ्या जागेच्या योग्य विभाजनाचे सूत्र मांडणारी पद्धती आहे. वाहतुकीची कोंडी कमी करून परिवहन व्यवस्था गतिमान करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे कार्य या प्रणालीद्वारे केले जाते. बीआरटीएसची मेट्रो रेल्वेशीही तुलना केली जाते. मात्र मेट्रो रेल्वेच्या तुलनेत बीआरटीएसच्या उभारणीला खर्च कमी येतो. शिवाय कमी खर्चात गतिमान, सुरक्षित प्रवास ही या प्रणालीची वैशिष्ट्ये आहेत. यासाठी महापालिकेची स्वतःची परिवहन सेवा असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी नाशिक महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बससेवा स्वतःच्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

जगात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नाशिक सोळाव्या क्रमांकावर आहे. शहराच्या नियोजनबद्ध विकासात सक्षम सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचे महत्त्व अबाधित आहे. त्यामुळेच सक्षम सार्वजनिक वाहतूक-परिवहन व्यवस्थेसाठी शहरातील काही सामाजिक, स्वयंसेवी संस्था, आर्किटेक्ट, इंजिनीअर्स पुढे सरसावले आहेत. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी बीआरटीएस प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयटीडीपी या संस्थेने सर्व्हेक्षण करून महापालिकेसमोर सादर केला आहे. गुजरातमधील अहमदाबादच्या धर्तीवर हा प्रकल्प नाशिकमध्ये राबविता येऊ शकतो, असा अहवाल महापालिकेला सादर केला आहे. त्यासाठीची तयारीही तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी चालवली होती. मात्र, काही पक्षांनी विरोध केल्याने हा प्रस्ताव थंड बस्त्यात पडला. सार्वजनिक बससेवेसाठी अहमदाबादसह इंदूरच्या बससेवेचाही अभ्यास करण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून या प्रस्तावावर नुसतीच चर्चा सुरू आहेत. आयटीडीपी संस्थेने महापालिकेला दिलेल्या प्रस्तावानुसार नाशिक शहरात ६४ कि.मी. लांबीचा बीआरटीएस प्रकल्प राबविण्याची योजना आहे. पहिल्या टप्प्यात नाशिकरोड ते सीबीएस तसेच सीबीएस ते त्र्यंबकरोड व सीबीएस ते गंगापूररोड या दरम्यान २३ कि.मी. लांबीच्या प्रकल्प साकारला जाऊ शकतो. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी अभियानांतर्गत हा प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित आहे.

महामंडळाचा विरोध

सद्यस्थितीत शहरातील वाहतूक सेवेचा भार हा राज्य परिवहन महामंडळावर आहे. बससेवा शहरात चालवली जात असली तरी त्यांना सर्वाधिक फायदा हा बीआरटीएसच्या तीन मार्गांवरच आहे. महामंडळ हे नफ्याचे मार्ग सोडणार नाही. उर्वरीत तोट्याच्या मार्गांवर महामंडळ सेवा सुरू ठेवण्यास नकार देईल. पालिकेने अगोदरच जेएनयुआरएम अंतर्गत बससेवा चालविण्यासाठी महामंडळाला ना हरकत दाखला दिला आहे. महापालिकेला केवळ बीआरटीएस ऐवजी पूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था चालवावी लागणार आहे. त्यामुळे बीआरटीएससाठी महामंडळाच्या विरोधाचाही सामना करावा लागू शकतो.

निधीची अडचण

बीआरटीएस प्रकल्प तीन मार्गावर सुरू करण्यासाठी किमान एक हजार कोटींची आवश्यकता आहे. यासाठीची ७० टक्के रक्कम केंद्र आणि राज्य सरकार देणार असले तरी, उर्वरीत ३० टक्के म्हणजे ३०० कोटींचा निधी उभा करण्याचे खडतर आव्हान आहे. नाशिक महापालिकेची सध्याची आर्थिक अवस्था ही अत्यंत बिकट आहे. तीनशे कोटींचा निधी उभा करणे महापालिकेला शक्य नाही. जकात आणि एलबीटी बंद झाल्याने पगाराचेही वांधे होणार आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकावरच्या निधीवरच हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकणार आहे. सध्याची स्थिती पाहता एवढा निधी उपलब्ध होणे शक्य नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नागरिकांसाठी होणार नियम शिथिल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

पहिल्या शाही पर्वणीदरम्यान नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. यामुळे नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पोलिस आयुक्तांनी भद्र‌काली पोलिस ठाण्यात आढावा बैठक बोलावली होती. यावेळी नागरिकांनी विविध अडचणी मांडल्याने पोलिस आयुक्तांनी दुसऱ्या शाही पर्वणीत बंदोबस्त शिथिल करण्याचे आश्वासन दिले.

दुसरी शाही पर्वणी तेरा सप्टेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त पहिल्या पर्वणीत झालेली गैरसोय व आलेल्या अडचणींसंदर्भात धार्मिक गुरू, नागरिक, लोकप्रतिनिधी, विक्रेते, व्यापारी, व्यावसायिक आदींचे अनुभव जाणून घेण्यासाठी भद्रकाली पोलिस ठाण्यात आयुक्त एस. जगन्नाथन यांनी आढावा बैठक बोलावली होती. पर्वणी काळात अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची मुभा मिळावी, शहरांतर्गत वाहने फिरण्यासाठी कोणतेच प्रतिबंध नसावे, दूध बाजारात सकाळी व सायंकाळी दूध विक्रीची परवानगी असावी, गल्ली बोळात बॅरिके‌डिंग लावून रस्ते बंद करण्यात येऊ नये, सिंहस्थ पास असलेल्या व्यक्तीला कोठेच अडविण्यात येऊ नये, भाविकांना अन्नदानासाठी अन्नछत्राला ठिकठिकाणी स्टॉल उभारू द्यावे, या अन्नछत्रसाठी अन्नसुरक्षा विभागाची परवानगीची अट शिथिल करावी, अशा विविध मुद्यांवर बैठक गाजली.

पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी मनोगत जाणून घेऊन दूध विक्रेत्यांना सकाळी व सायंकाळी एक तास अगोदर दूध बाजारात प्रवेश दिले जाईल, अमरधाम येथे अंत्यसंस्कारसाठी बंदोबस्ताच्या दृष्टीने विचार केल्यानंतर निर्णय घेऊ, गल्ली बोळातील बॅरिकेडिंग कमी करण्याचे प्रयत्न करू, शहरांतर्गत फिरण्यासाठी शहर बससेवा व रिक्षांचा पर्याय उपलब्ध करून देऊ, लोकप्रतिनिधी व इतर समाजसेवकांना दिलेले सिंहस्थ पास हे त्या त्या ठिकाणी ग्राह्य मानून प्रवेश दिला जाईल, पर्वणी काळात सर्व दुकाने, हॉटेल्स उघडी राहतील याचे नियोजन राहील. बाह्य पार्किंगपासून भाविकांची पायपीट कमी करण्यासाठीचे प्रयत्न राहणार असून, नाशिकरोड येथून रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी व्दारका, काठेगल्ली येथपर्यंत वाहनाने येण्याची सोय केली जाईल, असे पोलिस आयुक्तांनी उपस्थित नागरिकांना आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणींमध्ये फ्री स्टाईल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्वच क्षेत्रांमध्ये मुलांच्या तोडीस तोड ठरणाऱ्या मुलींनी कॉलेज कॅम्पसमधील दादागिरीवरही मंगळवारी ठसा उमटविला. मुलींच्या एका गटातील आपसातील वादांचे रुपांतर थेट मुलींच्या टोळीयुध्दात झाल्याने बीवायके कॉलेजबाहेरील बघे अवाक् झाले होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत हा गोंधळ मिटविला.

मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमाराला बीवायके कॉलेजच्या मागील गेटबाहेर अचानक झालेल्या गोंधळामुळे रस्त्यावरील गर्दी घोळक्याच्या दिशेने वळाली. येथे चक्क मुलींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरू होती. तीन ते चार मुलींच्या टोळक्याने एका मुलीला गेटबाहेर रोखून मारहाण केली. हा प्रकार रोखण्यासाठी मध्ये पडू पाहणाऱ्या नागरिकांना दूर सारण्याचे अन् हा गोंधळ सुरू ठेवण्याचे काम मारहाण करणाऱ्या मुलींचे मित्र करीत होते. दरम्यान वाढत चाललेल्या गोंधळानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकारातील मुलींना पोलिसांना बोलविण्याचा दम भरत रोखले. दरम्यान, मारहाण झालेल्या मुलीनेही काही वेळ अगोदर इतर मुलींच्या सहाय्याने या तीन ते चार मुलींच्या गटाला मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून समजते. या प्रकारातील सर्वच मुली या कॅम्पसमधील विद्यार्थीनी असल्याचे त्यांच्या युनीफॉर्मवरून लक्षात येत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या प्रकारामुळे या कॉलेजमधील मुलींमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

दरम्यान सोमवारीही काही वादाच्या मुद्यावरून एचपीटी कॅम्पसमधील तीन मुलींनी एका मुलास चोप दिला होता. तर मंगळवारी याच कॅम्पसमध्ये चॉपर बाळगणाऱ्या विद्यार्थ्यालाही संस्था प्रशासनाने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. कॉलेज परिसरात घडणाऱ्या या घटनांमुळे कॅम्पस दहशतीखाली आहे. पोलिसांनी शहरातील सर्वच कॉलेज कॅम्पसमध्येही पेट्रोलिंग सुरू करून कॅम्पसमधील दहशत मोडीत काढावी, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांमधून व्यक्त होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परतीचा दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा अधिक ओढ दिलेल्या पावसाने परतीच्या वाटेवर असताना पुनरागमन करून उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. तब्बल दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने बुधवारी दिवसभरात शहर व उपनगरांसह जिल्ह्यात ठिकठिकाणी चांगली हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांसह सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. खरीपाच्या पिकांना दिलासा मिळावा तसेच पाणीटंचाईचे सावट दूर होण्यासाठी पावसाचा जोर अधिक वाढावा अशी प्रार्थना बळीराजासह सामान्य जणही करीत आहेत.

यंदा शहर व जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत अवघे सहा ते आठ दिवस पावसाने हजेरी लावली आहे. त्यातही तीनवेळा तुरळक सरीच कोसळल्या आहेत. जून व जुलैचा शेवटचा आठवडा वगळता अद्यापपर्यंत एकदाही दमदार पाऊस झालेला नाही. पावसाची सर्वत्र ओढ असताना परतीचा पाऊस दिलासा देईल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवारी दुपारी शहराच्या विविध भागात तसेच येवला, लासलगाव, निफाड, सटाणा, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर येथेही पावसाची चांगला जोर होता. लासलगावला अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी तुंबल्याचे दिसून आले. परतीच्या पावसाने शेतीला फार दिलासा मिळणार नसला तरी धरण साठ्यात वाढ होऊन आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. रामकुंड परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे तेथे सिंहस्थासाठी निर्माण करण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधा कोसळल्याचे पहायला मिळाले.

पर्वणी नियोजनाची चिंता

यंदाच्या सिंहस्थातील दुसरी शाही पर्वणी येत्या रविवारी होत आहे. या दिवशी पाऊस राहिल्यास त्याचा परिणाम सिंहस्थ नियोजनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनही काहीसे चिंतेतच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरला श्रावण सरींची हजेरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे गुरुवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने करपण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. त्याशिवाय, दोन दिवसांवर आलेल्या दुस-या शाही पर्वणीसाठीही उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने भाविकांची मात्र तारांबळ उडाली.

अचानक आलेल्या श्रावण सरींनी वातावरणात गारवा निर्माण झाला असून, भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे निर्माण होऊ पाहत असलेल्या आरोग्याच्या समस्याही दूर होण्यास मदत होणार आहे. या पावसाने शेतात कोमेजलेल्या पिकांना जीवदानच मिळाले. भात, नागलीबरोबरच भाजीपाल्यासाठीही हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. मात्र, संपूर्ण पावसळ्यात पावसाचे घटलेले प्रमाण पाहता कृषि अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी यंदा उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त केली आहे. तालुक्यात यावर्षी ऑगस्ट अखेर ९४० मिमी पाऊस झाला आहे. मात्र, मागील वर्षी तोच पाऊस १०६६ मिमी होता.

अर्थात केवळ ऑगस्ट महिन्यात गतवर्षी ४१४ मिमी पाऊस झालेला होता. यंदा तो १२६ मिमी इतकाच आहे.केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असलेल्या नागली वरई आणि भात यांना वाढीच्या अवस्थेत कमी पाऊसाने चांगलाच फटका बसला आहे. काही दिवसांपासून कडकडीत ऊन व बदलते तापमान यामुळे या पिकांच्या वाढीवर व उत्पन्नक्षमतेवर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे करपासारख्या रोगाचा प्रादुर्भावही वाढतो आहे.

चार दिवस बरसणार पाऊस?

नाशिक : नाशिक जिल्हाभरात बुधवारी दिवसभरात ७० मिमी पावसाची नोंद झाली असून येत्या चार दिवसात पावसाचा मुक्काम कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. त्यातच परतीच्या पावसाच्या सरी बुधवारी कोसळल्याने या पावसाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. नाशिकमध्ये ३६.१, इगतपुरीत १४, दिंडोरी १, त्र्यंबकेश्वर ३, मालेगाव २, चांदवड ५.४, बागलाण ५, निफाड १.६ आणि येवल्यात २ अशा एकूण ७०.६ मिलीमीटर पावसाची बुधवारी नोंद झाली. पिंपळगाव बसवंत येथेही पावसाने चांगली हजेरी लावली. नाशिक शहरातही अधून मधून काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने समाधानाचे वातवरण होते.

बळीराजा सुखावला

आगामी चार दिवस परतीचा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून, हा पाऊस झाल्यास जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट काही प्रमाणात दूर होऊ शकते, तसेच पिण्याच्या पाण्याचे संकटही काही प्रमाणात दूर होणार आहे. परतीचा पाऊस पडावा यासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणे कोरडी, चाराही मिळेना!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या दोन-तीन वर्षांत पावसाने फिरवलेली पाठ आणि केवळ नावापुरताच झालेला पाऊस यामुळे मालेगाव तालुक्यात यंदा देखील दुष्काळाची धग सोसावी लागणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्या तीन महिन्यात तालुक्यात सरासरीच्या ४८ टक्के म्हणजे अवघा २३२ मिलीमीटर पाऊस झाल्याने दुष्काळाच्या भीषण परिस्थितीला तालुक्याला सामोरे जावे लागते आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेले शेतीचे पीक करपून वाया जाते आहे तर पिण्याच्या पाण्यासह मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिकच गंभीर होतो आहे. तालुक्यातील सुमारे ७० टक्के खरिपाची पिके पाण्याभावी नष्ट झाली आहेत. गावोगावी दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून, शेतीतले पीक डोळ्यादेखत जळताना पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे.

जूनच्या सुरुवातीला पेरणीपुरता आलेला पाऊस नंतर मात्र गायब झाला आहे. त्यामुळे शेतीसोबतच पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शहर व तालुक्याला पाणीपुरवठा करणारी धरणे, तलाव, विहिरी यांनी तळ गाठला असून, शेतीला नाही तर किमान पिण्याला तरी पाणी भविष्यात राहील का? अशी परिस्थिती ओढवली आहे. यंदा तर गेल्या तीन महिन्यांत वरुणराजानं चांगलीच पाठ फिरवली आहे. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात जूनमध्ये १५४ मिमी, जुलैत १७.०० मिमी तर ऑगस्टमध्ये ६१.०० मिमी इतकाच पाऊस झाला.

त्यातही मोठ्या प्रमाणात असमतोल राहिला असल्याने जूनच्या प्रारंभी मोठ्या आशेने खरीपाची पेरणी केलेल्या पिकांची पाण्याअभावी करपून वाया जाण्याची वेळ आली आहे. सरासरी ४८० इतकं वार्षिक पर्जन्यमान असलेल्या मालेगाव तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत अवघा २३२ मिलीमीटर म्हणजे निम्म्याहून देखील कमी पाऊस झाला आहे. पावसाने दिलेली ही हूल मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरली असून, त्यामुळे शेतीचे अर्थकारण पुरते कोलमडले आहे .

जूनच्या प्रारंभी मालेगाव तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने मागील वर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्याचे झालेले नुकसान यंदा खरीप हंगामात भरून निघेल अशी आशा शेतकऱ्याला होती. प्रारंभी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी महागडी बी बियाणे, खते विकत घेत पेरण्याही केल्या; मात्र त्यानंतर पावसाने चांगलीच दडी मारल्याने शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला अन् दुबार पेरणीचे संकट त्याच्यावर ओढवले. आता तर जवळपास ७० टक्के पिके करपून वाया जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकीकडे शेतीची अवस्था अशी झालेली असतांना तालुक्याला आणि शहराला पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न भेडसावू लागला आहे. तालुका आणि शहराला पाणी पुरवणारे गिरणा धरण आटले असून, ३ टक्क्यांपेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने पाणीपुरवठा योजनांनी पाणिकपतीचा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. शहराला दोन दिवसाआड तर तालुक्यात अनेक गावांना आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच पायपीट नागरिकांना करावी लागते आहे. गावातील अनेक विहिरींना तलावांनी तळ गाठला असून, पिण्याचा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूप धारण करणार असल्याची चिन्हे आहेत.

यंदाचा पावसाच्या मोसमातील हा अखेरचा महिना सुरू असल्याने किमान परतीच्या पावसाने तरी काही दिलासा मिळेल या आशेन शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. गावोगावी हाताला काम नसल्याने हताश झालेला शेतकरी शेतमजूर रिकामाच बसून आहे तर शहरातील व्यापार उलाढाल देखील मंदावली असल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण परसले आहे. सर्वसामान्य नागरिक पावसाअभावी भाजीपाला पिकाचे उत्पन्न कमी झाल्याने महागाईला सामोरे जायचे कसे, अशा गर्तेत सापडला आहे .

चाऱ्याची मागणी

तालुक्यातील भीषण टंचाईचा परिणाम मुक्या जीवांवर देखील झाला आहे. जनावरांना चारा व पिण्याचे पाणी उपलबद्ध करून देण्यासाठी शेतकर्‍यांना चांगलीच दमछाक करावी लागते आहे त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी करपून वाया जाणार्‍या उभ्या पिकातच चर्‍यासाठी आपली जनावरे सोडून दिल्याचे देखील प्रकार घडत आहेत . पंचायत समितीकडे अद्याप चारा छावणी साठी प्रस्ताव आलेला नसला तरी दुष्काळाची दिवसेंदिवस वाढणारी तीव्रता लक्षात घेता तालुक्यातील अनेक गावातून चारा छावण्यांसाठी मागणी येवू शकते या पार्शवाभूमीवर प्रशासन तयारीला लागले आहे .

- तालुक्यावर आलेले दुष्काळाचे भीषण संकट लक्षात घेता स्वतः सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी मागील आठवड्यात प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत दुष्काळ आढावा बैठक घेतली. दिवसेंदिवस गंभीर होत असलेली परिस्थिति लक्षात घेता प्रत्येक गाव पातळीवर दुष्काळासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केल्या आहेत .

- दुष्काळाच्या भीषण संकटाला सामोरे जात असतांना मालेगाव शहर व परिसरात गेल्या काही दिवसात अधूनमधून आकाशात दाटून येताना परतीच्या पावसाची आशा लागली असली आहे. या आठवड्यात मंगळवारी पावसाने अचानक हजेरी लावल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पावसाच्या परतीच्या प्रवासात तरी काही कृपा होईल या आशने बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे .

टँकरची मागणी

पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने गावाकडे असलेले तलाव विहीरी आटू लागले आहेत. अद्याप तालुक्यात दुंधे गावाला तळवाडे डॅममधून २३ एप्रिल पासूनच शासकीय ट्रँकरद्वारे रोज २ फेऱ्यांत पाणीपुरवठा केला जातो आहे. तसेच ,तालुक्याच्या संभाव्य पाणी टंचाई आराखड्यात एकूण १२ गावे टँकरग्रस्त असून त्याठिकाणी देखील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता टँकरने पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती दुष्काळजन्य परिस्थितीमुळे ओढवू शकते.

विहीर अधिग्रहण

तालुक्यातील रावळगाव, वडनेर, खाकुर्डी, चंदनपुरी, वाजिरखेडे, वळवाडे, झोडगे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत चालली असल्याने रावळगाव येथे आधीपासूनच एक विहीर अधिग्रहीत करण्यात आली आहे. वडनेर गावात खाजगी विहिरीचा प्रस्ताव तहसील कार्यालकडे सादर करण्यात आला आहे तर अन्य गावात देखील संभाव्य विहीरींचे अधिग्रहण केले जावू शकते, अशी परिस्थिती सध्या आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिनेमॅक्समधील फास्टफूडकडून लूट

$
0
0

आनंद करंजीकर, नाशिक

सिनेमॅक्सच्या फूड स्टॉलवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मल्टिप्लेक्समध्ये विकले जाणारे खाद्यपदार्थ मूळ किमतीपेक्षा दुप्पट किंमतीने सर्रास विकल्या जातात. सिनेमॅक्समध्ये या पद्धतीने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे चित्र आहे.

सिनेमॅक्समध्ये असलेल्या काही पदार्थांच्या किंमती अक्षरशः बाजारभावापेक्षा चार पटीने विकल्या जातात. समोसा ३५ रुपये प्रती नग ज्याचा बाजारभाव १२ रुपये आहे. बरं इथे ग्राहकांना निर्णय स्वातंत्र्यही नाही. तिकीट काऊंटरवर तुम्हाला जबरदस्तीने कॉम्बो पॅक दिला जातो. ज्यामध्ये तिकीटाच्या बिलासोबत या पदार्थांचीही किंमत ग्राहकांना मोजावी लागते.

यामध्ये इतर पदार्थांचा विचार करायला गेले तर पॉपकॉर्न १८० रुपये ज्याची मूळ किंमत बाजाराच ४० रुपये इतकी आहे. बाजारात कुठेही स्पेशल चहा १५ रुपयांपेक्षा अधिक नाही. मात्र, सिनेमॅक्समध्ये चहाच्या एका कपासाठी ७० रुपये वसूल केले जातात तर सॅन्डवीच चक्क १२० रुपयांना. बाजारात कुठेही ४० रुपयांपेक्षा अधिक किंमतीला सॅन्डवीच मिळत नसेल. पाण्याची बाटली सुद्धा ४० रुपये विक्री करून ग्राहकांची उघडपणे लुबाडणूक केली जात आहे.

बरं थिएटर असलेल्या मॉलमधून खरेदी केलेले खाद्यपदार्थही सिनेमॅक्सच्या आवारात आणण्यास विरोध केला जातो. ही दुहेरी अडवणूक. पण यापेक्षा विशेष आश्चर्यकारक बाब म्हणजे कुणीही सिनेमॅक्सच्या या मुजोरीला विरोध करीत नाही. कारण प्रत्येक जण हाच विचार करतो की कुठे आपल्याला रोज यायचे आहे. कुठे पाच पन्नास रुपयांसाठी भांडण करायचे? अहो प्रश्न रोज न येण्याचा अथवा पाच पन्नास रुपयांसाठीचा नसून तेथील खाद्य पदार्थांना बाजारभावापेक्षा चार पटीने पैसे जास्त देणे हा तर चुकीचे आहे. पण तिकीटापेक्षा खाद्यपदार्थच महाग असल्याचे चित्र आहे. बाजारात भाजी किंवा दोन-चार रुपयांसाठी घासघीस करणारे मात्र अशा ठिकाणी मूग गिळून बसतात. त्यांच्यामुळेच सिनेमॅक्समधील फास्टफूडवाल्यांची मुजोरी वाढत चालली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ सुविधांवर चोरट्यांचा डोळा

$
0
0

नामदेव पवार, सातपूर

सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक आणि त्र्यंबकमध्ये येणाऱ्या भाविकांसह साधू महंतांच्या सोयीसाठी प्रशासनाने ठिकठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, या सुविधांचा लाभ सामान्यांपेक्षा चोरट्यांनीच घेण्यास सुरुवात केली आहे. चोरट्यांनी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, शौचालयातील साहित्य आणि कचरा टाकण्यासाठी ठेवलेले ड्रमवर यांची चोरी केली आहे. दरम्यान, पुढील दोन पर्वणीत तरी प्रशासनाने उभारलेल्या या सुविधा राहतील का, असा प्रश्न निर्मार झाला आहे.

त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून लाखो भाविक येत आहेत. त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाकडून खास काळजी घेतली जात आहे. यामध्ये पार्किंगची व्यवस्था, स्वच्छतागृहे, वस्त्रांतरगृहे, शौचालये, पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था केले जातात. मात्र, पहिली पर्वणी उलटल्यानंतर प्रशासनाने उभारलेल्या अनेक सुविधांवर चोरट्यांकडून हात साफ केला जात आहे. यामध्ये मुख्य म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या टाक्यातच चोरट्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. शौचालये व कचरा टाकण्यासाठी ठेवलेल्या ड्रमची देखील चोट्यांकडून चोरी होत केल्याचे त्र्यंबकेश्वर रस्त्यावर दिसून आले आहे. यामुळे पुढील दोन सिंहस्थ पर्वणी शाहीस्नान काळात प्रशासनाने भाविकांसाठी उभारलेल्या सुविधांची देखभाल करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

खंबाळेत नळ-पाईपच गायब

त्र्यंबकेश्वरला सिंहस्थाच्या शाहीस्नानाला जाण्यासाठी खंबाळे येथे प्रशासनाने वाहने पार्किंगची व्यवस्था केली आहे. मात्र, पोलिसांच्या अतिसुरक्षेमुळे अनेक भाविकांनी पहिल्या शाहीपर्वणीत पाठ फिरवली. खंबाळे येथे भाविकांसाठी निवारा शेडसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व शौचालयाची निर्मिती केली. मात्र, अनेक पाण्याच्या टाक्या, पाईप आणि नळांची चोरी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवा कल्याणार्थ ५१ मठांची स्थापना

$
0
0

शंकराचार्य अधोक्षजानंद यांची घोषणा

म. टा. प्रतिनिधी नाशिक

देशातील युवा पिढी भरकटत असून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी ५१ मठांची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा शंकराचार्य अधोक्षजानंद यांनी केली. गोवर्धन पीठाचे जगदगुरू शंकराचार्य अधोक्षाजानंद स्वामी महाराजांच्या वतीने धर्मसंमेलन झाले. यावेळी विविध आखाड्यातील साधू महंतांनी हजेरी लावत धर्मरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर उहापोह केला.

साधुग्राम येथे धर्म संसद संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री गेगांग अपांग हजर होते. यावेळी बोलतांना अधोक्षजानंद म्हणाले, की देशात अराजकता माजली आहे. तरुणांना योग्य दिशा नाही. मानवाच्या हातून सत्कृत्य घडावे. तरुणांमध्ये देशभक्ती वाढीस लागावी, व्यसनमुक्त तरुण घडावा यासाठी संपूर्ण भारतात ५१ मठांची स्थापना करण्यात येणार आहे. यातील मणीपूर, सिक्कीम, आसाम, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, मेघालय या ठिकाणी १५ मठ स्थापण्यात येणार आहेत. तसेच जम्मू व काश्मिरमधील युवक व्यसनाधिन होत असून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी १० मठांची स्थापना करण्यात येणार आहे. या मठांमधून भरकटलेल्या तरुणांना समाजात परतण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. राजस्थान, पंजाब, गुजरात येथे काही लोकांकडून मोठ्या प्रमाणात राष्ट्र विरोधी कारवाया होत असून तेथील तरुणांनी योग्य दिशा मिळावी यासाठी तेथे विशेष प्रयत्न केले जात आहेत. जीवनापासून भरकटलेल्या तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी हा एकमेव उद्देश असल्याचे स्वामी म्हणाले.

गेगांग अपांग म्हणाले, की सीमेबाबत अनेक कपोलकल्पित बातम्या पसरवल्या जात आहे. भारत आणि चीन यांच्यात १९६२ आणि १९८४ मध्ये काही प्रमाणात वाद झाले होते. मात्र, त्यानंतर गंभीर परिस्थिती उद्भवलेली नाही त्यामुळे भारतातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे ते म्हणाले. यावेळी अपांग यांनी साधुग्राममधील विविध आखाड्यांना भेटी दिल्या. तसेच विविध राजकीय कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वक्फ’ला मिळाला सीईओ

$
0
0

खान नजमुल इस्लाम, जुने नाशिक

अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याविना निराधार झालेल्या राज्य वक्फ बोर्डाला तात्पुरता पदभार स्वीकारण्यासाठी शिलेदार मिळाला आहे. औरंगाबाद येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अधीक्षक नसीमबानो पटेल यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

वक्फ बोर्डाचे अध्यक्षपद रिक्त असतानाच सीईओ म्हणून रुजू झालेल्या सय्यद एजाज हुसेन यांनी धाडसी निर्णय घेत आपल्या कामाची वेगळी छाप पाडली. मात्र, वक्फ बोर्डाच्या ‌जमिनींवर डोळा असलेल्या भूखंडमाफियांसह बोर्डच्या काही सदस्यांकडूनच हुसेन यांची कोंडी करण्यात आली. नेहमी होणाऱ्या या त्रासाला कंटाळून हुसेन यांनी बदली मागून घेतली. त्यामुळे अगोदरच अध्यक्ष नसलेल्या बोर्डचा कारभार पाहण्यासाठी कुणाचे नेतृत्वच शिल्लक राहिले नाही. या प्रश्नावर 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रकाश टाकल्यानंतर त्यांची सरकारी पातळीवर दखल घेण्यात आली. औरंगाबाद येथील भूमी अभिलेख विभागातील अधीक्षक नसीमबानो पटेल यांच्याकडे बोर्डच्या 'सीईओ'चा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला. त्यांनीही तो पदभार स्वीकारला आहे.

भूमाफियांची बेबंदशाही

वक्फ बोर्डाच्या मालकीच्या राज्यभरात सुमारे एक लाख एकर जमिनी आहेत. त्यापैकी सुमारे ७० टक्के जमिनींवर भूमाफीयांनी अतिक्रमणे केले आहे. याबाबत चौकशी समितीने राज्य सरकारला अहवालाद्वारे माहिती देखील दिली आहे. पुढील कारवाईसाठी या अहवालास विधीमंडळाची परवानगी मिळणे आवश्यक आहे. दरम्यान, राज्य सरकारने सात वर्षांपासून रिक्त असलेले वक्फ बोर्डच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली. मात्र, त्यावर नवव्यांदा अखेरच्या क्षणी स्थगित दिली. या सर्व घडामोडींमुळे भूमाफीयांचे फावले होते.

विविध समस्यांचा सामना

बोर्डाचे तत्कालीन 'सीईओ' सय्यद एजाज हुसेन यांनी औरंगाबाद जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून बदली करून घेतल्यानंतर त्यांच्या जागी येण्यास कुणीही इच्छूक नसल्याचे दिसून आले. हुसेन यांच्याजागेवर रेहान काझी यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, भूमाफीयांची दहशतीमुळे त्यांनी सीईओचे प्रभारी पदभारही स्वीकारालाच नाही. अपुरे कर्मचारी आणि अनेक वर्षांपासून अनुदानच मिळत नसल्याने राज्य वक्फ बोर्ड विविध समस्यांना तोंड देत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज घडणार ‘बाप्पासाठी ज्वेलरी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणरायाच्या आगमनाची घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. बाप्पाच्या आगमनात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने तयारीला लागला आहे. याच पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फेही 'बाप्पासाठी ज्वेलरी' हे हटके ज्वेलरी मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

आज (दि. ११) दुपारी ३ ते ५ या वेळात शालिमार येथील आयएमए हॉलमध्ये हे वर्कशॉप होणार आहे. नेहा खरे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या लाडक्या बाप्पासाठी स्वतः तयार केलेली ज्वेलरी घालण्याची मजा वेगळीच आहे. पण अनेकदा ही ज्वेलरी बनवायची कशी? याची माहिती नसल्यामुळे ज्वेलरी बनविण्यास आपण धजवत नाही. हा विश्वास या वर्कशॉपद्वारे निर्माण होऊन प्रत्येकजण आकर्षक ज्वेलरी करण्यास शिकता येणार आहे.

मुकूट, बांगड्या, बाजुबंद, तोडी, पैंजण, नथ, कुड्या, हार, गजरा, कंबरपट्टा, अंगठी असे अनेक आकर्षक दागिने शिकण्याची संधी या वर्कशॉपमध्ये मिळणार आहे. कल्चर क्लब सदस्यांसाठी ५० रुपये तर इतरांसाठी १०० रुपये फी ठेवण्यात आलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालिदासला आज ‘जरा हवा येऊ द्या’

$
0
0

म.टा खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्यावतीने खास वाचकांसाठी आज शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे संतोष पवार यांचे प्रसिध्द नाटक 'जरा हवा येऊ द्या' चे सादरीकरण होणार आहे.

या नाटकात संतोष पवार, मुकेश जाधव, श्रृती कुलकर्णी यांनी भूमिका केलेल्या आहेत. नाटकाचे दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना व संगीत संतोष पवार यांचेच आहे. नाटकाची निर्मिती समीर चौगुले यांनी केलेली आहे. नाटक वन्समोअर या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आले आहे.

जे कल्चर क्लब सदस्य आहेत व ज्यांनी या नाटकाची तिकिटे नेलेली नाहीत ते आज, शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी साडे अकरा ते एक या वेळेत मटा कार्यालयातून (महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड ) तिकिटे घेऊन जाऊ शकतात.

या नाटकाची तिकिटे पूर्वीच कल्चर क्लब सदस्यांना देण्यात आली आहेत. त्याच तिकिटांवर प्रवेश देण्यात येणार आहे. ज्यांनी आधी तिकिट नेले असतील त्यांना पुन्हा तिकिटे घेता येणार नाहीत. तिकिट हरवले असल्यास ती संपूर्ण जबाबदारी सदस्याची राहील. ही ऑफर फक्त कल्चर क्लब सदस्यांसाठीच आहे. त्यांना एका कार्डवर दोन तिकिटे मिळणार आहेत. ही ऑफर तिकिट संपेपर्यंत व दिलेल्या वेळेपुरतीच मर्यादित आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

दहा महिन्यांपूर्वी लहवित गावात किरकोळ कारणावरून आपसात झालेल्या वादातून तरुणाला जखमी केल्याप्रकरणातील आरोपीला देवळाली कॅम्प पोलिसांनी निफाड येथून अटक केली. गणपत नामदेव मुंडे (२७) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गणपतने त्यांच्याच गावातील रहिवासी व मित्र असलेल्या सचिन गणपत काळे याच्यावर चाकूने हल्ला केला होता. सचिन गंभीर जखमी झाला होता. घटना ८ ऑक्टोबर २०१४ रोजी घडली होती. तेव्हापासून गणपत फरार होता. गणपत निफाड तालुक्यातील चाटोरी गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक प्रकाश निकम यांच्यासह शिपाई अल्लाउद्दिन शेख, झाडे, डांगळे यांनी त्याला अटक केली. गणपतविरोधात गुन्हा दाखल करून त्याची नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, जखमी सचिनवर उपचारासाठी आतापर्यंत आठ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images