Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

यजमान नाशिकचा संघ उपांत्य फेरीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, मुंबई आणि फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या १४ वर्षांआतील मुलांसाठी राज्यस्तरीय सबज्युनियर फुटबॉल स्पर्धेमध्ये मंगळवारी नाशिक संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

रविवारच्या विश्रांतीनंतर सोमवारी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सकाळी सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मुंबई विरुद्ध सातारा संघात झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये मुंबईने दमदार खेळाचे प्रदर्शन करत, आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सातारा संघाचा ८ विरुद्ध ० गोल फरकाने दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत नागपूर आणि जालना या दोन संघांत सामना रंगला, सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी चांगला खेळ केला. नागपूर संघाने अखेर ३ विरुद्ध १ अशा गोल फरकाने सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दुपारच्या सत्रात दुपारी १ वाजता गोंदिया व पुणे या संघांमध्ये झालेल्या सामन्यात पुणे संघाने १० विरुद्ध ० अशा मोठ्या फरकाने एकतर्फी विजय प्राप्त केला.

राज्य स्पर्धेत प्रथमच खेळत असलेल्या नाशिक व या स्पर्धेमध्ये सीडिंग मिळालेल्या अकोला संघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत नाशिककरांना बघायला मिळाली, सामन्यांच्या निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन गोल करून सामना बरोबरीत राहिला, त्यानंतर झालेल्या टायब्रेकरमध्ये नाशिक संघाने ५ पैकी ३ गोल केले तर अकोला संघाचे आक्रमण नाशिकच्या गोल रक्षकाने थोपवून अकोला संघाला ५ पैकी फक्त २ गोल करण्याची संधी दिली. नाशिक संघाने हा सामना ५ विरुद्ध ४ गोलने जिंकून राज्यस्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. या सामन्यांच्या उपांत्य फेरीचे सामने मंगळवारी सकाळी १० वाजता मुंबई विरुद्ध नागपूर तर दुपारी १२ वाजता नाशिक विरुद्ध पुणे या संघांमध्ये रंगणार आहेत.
सामन्याचा निकाल खालीलप्रमाणे

सामना स्कोअर

मुंबई विरुद्ध सातारा मुंबई ८ विरुद्ध ० गोलने विजयी

नागपूर विरुद्ध जालना नागपूर ३ विरुद्ध १ गोलने विजयी

पुणे विरुद्ध गोंदिया पुणे १० विरुद्ध ० गोलने विजयी

नाशिक विरुद्ध अकोला नाशिक ५ विरुद्ध ४ गोलने विजयी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंजिनीअरिंगचे विद्यार्थीच निघाले लुटारू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

इंजिनीअरिंग, मेडिकलसह अन्य उच्च ​शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पालकांना फार अपेक्षा असतात. पोटाला टाच देऊन आपण मुलांना शिकवतो, त्यामुळे तो आपल्या जीवनाचे सातर्क करेल अशी अपेक्षा पालकांनी ठेवणे रास्त आहे. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, पालकांनी सावध होण्याची गरज आहे. अंबड पोलिसांनी मॅकेनिकल व कम्प्युटर डिप्लोमा​चे शिक्षण घेत असलेल्या दोघा मुलांना ताब्यात घेतले असून, जुगार आणि पैसे उडवण्यासाठी ही मुले लुटमार करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.

गोरक्ष निवृत्ती भांगरे (वय २१) आणि आशिष हितू गौतम (वय २०) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. गोरक्ष मॅकेनिकल डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला, तर आशिषने कम्प्युटर अॅडमिन्ट्रेशनच्या डिप्लोमाला चालू वर्षाला प्रवेश घेतला. सातपूर आणि अंबड परिसरातच वास्तव्यास असलेल्या दोघा संशयितांची घरची परिस्थिती ठिकठाक आहे. मात्र, कॉलेजची हवा डोक्यात गेलेल्या दोघा विद्यार्थ्यांना महागडे मोबाइल, पैसा यांचा नाद लागला. त्यांच्या सोबतीला आणखी एक मित्र जोडला गेला. या मित्राला पत्त्यांचा नाद होताच. हळूहळू या त्रिकुटाला पैशांची गरज सतावू लागली. यातून त्यांनी अंबड व सातपूर एमआयडीसीतील कामगारांना लक्ष्य करण्याची योजना आखली. रात्री अपरात्री कामावरून परतणाऱ्या कामगारांना चाकूचा धाक दाखवून तिघे पैशांची लूट करीत होते. विशेषतः कामगारांचे वेतन झाल्यानंतर असे प्रकार जास्तच होत होते. रविवारी रात्री एक दोन ठिकाणी कामगारांची लूट झाल्याची माहिती पोलिसांना कळली. त्यावेळी या भागात एएसआय भदाणे आणि कॉन्स्टेबल आव्हाड यांचे पथक गस्तीवर होते. त्यांना रात्रीच्या अंधारात एका दुचाकीवर तिघे व्यक्ती संशयास्पद पध्दतीने जाताना दिसले. पोलिसांना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयितांनी अंधारात धूम ठोकली. पोलिसांनी आपला पाठलाग सुरू ठेवला. चिंचोली शिवारात पोहचल्यानंतर दुचाकी स्लिप झाली. यावेळी एक संशयितांनी अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. तर, गोरक्ष आणि आशिषला पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून चाकू व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या मुलांना पैशांची चटक लागली. त्यात त्यांना जुगाराचा नाद असलेल्या मित्रांची संगत लाभली. त्यातून लुटमारीचे प्रकार या मुलांनी केल्याचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.

सामाजिक दृष्टीने अतिशय गंभीर प्रकार म्हणावा लागेल. या घटनेतील तिसरा संशयित फरार असून, अनेक दिवसांपासून आम्ही कामगारांना लुटणाऱ्या टोळीचा शोध घेत होतो. त्यात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सापडतील, याची अपेक्षा नव्हती. अंबड पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याने या त्रिकुटापर्यंत पोहचता आले.

- श्रीकांत धिवरे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबे सुकेणे येथे क्रीडा महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ व सुंदरी क्रिकेट क्लब कसबे सुकेणे यांच्यातर्फे कसबे सुकेणे येथे २० ते २६ डिसेंबर या कालावधीत क्रीडा महोत्सव होत आहे.

या क्रीडा महोत्सवाचे हे पाचवे ‍वर्ष असून यात खुल्या कबड्डी स्पर्धा, जिल्हास्तरीय केसरी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा त्याच प्रमाणे मॅरेथॉन स्पर्धाही होणार आहेत. क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक २१ हजार रुपये, तृतीय पारितोषिक ११ हजार रुपये, चतुर्थ पारितोषिक ५ हजार रुपये देण्यात येईल. तसेच वैयक्तिक 'मॅन ऑफ द सिरीज', उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ट यष्टीरक्षक, अंतिम सामना, मॅन ऑफ द मॅच इत्यादी वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. क्रिकेटच्या स्पर्धेत फक्त ३२ संघांना प्रवेश दिले जाणार आहे.

माधवराव जाधव नाशिक जिल्हास्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा रविवार, २० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत होणार आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ७ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ५ हजार रुपये तर तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई यासाठी देखील पारितोषिके देण्यात येणार आहे.

माधवराव जाधव नाशिक जिल्हास्तरीय केसरी कुस्ती स्पर्धा कुमार व वरिष्ठ गटात होईल. ही स्पर्धा २३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५ या कालावधीत होईल. स्पर्धेत प्रथम बक्षीस ७ हजार रुपये, द्वितीय बक्षीस ५ हजार रुपये देण्यात येणार आहे. गादी स्पर्धेसाठी ५७, ६१, ६५, ७०, ७४,८६, ९७, १२५ व माती गटासाठी ५७, ६१, ६५, ७०, ७४, ८६, ९७, १२५ कुमार गटासाठी ४६, ५०, ५५, ६०, ६६, ७४, ८४, ९६ या वयोगटात स्पर्धा होतील.

मॅरेथॉन स्पर्धा खुला वयोगट, मुले मुली (अंतर ७ कि.मी), १८ वयोगट मुले (अंतर ५ कि.मी.) १६ वयोगट मुले मुली ( अंतर ३ कि. मी), १४ वयोगट मुले मुली( अंतर २ कि.मी) या सर्व वयोगटांना प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाची बक्षीसे देऊन गौरविण्यात येणार आहे. या सर्व स्पर्धा छत्रपती संभाजी महाराज मैदान येथे होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्रांतिवीरांविषयीच्या इतिहासाचे पुनर्लेखन व्हावे’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रांतीवीर वसंतराव नाईक यांनी समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व सामाजिक न्यायाची पेरणी केली. समाजातील विषमतेच्या विरोधात ते लढले. स्वातंत्र्यापूर्वी गांधींच्या तत्त्वज्ञानाला जोडून घेत समाजासाठी कार्यरत राहिले. परंतु, त्यांच्या योगदानाची नोंद इतिहासाने घेतली नाही. त्यामुळे इतिहासाचे पुनर्लेखन करून क्रांतिविरांचा खरा इतिहास देशापुढे मांडला पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.

क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या ४७ व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कॉलेजच्या प्रांगणात या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड होते. सबनीस पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी वसंतराव नाईक यांनी विविध आंदोलनात सहभागी होत तसेच, स्वातंत्र्योत्तर कालखंडात कामगार, शेतमजूर, शेतकरी व उपेक्षितांना सामाजिक न्याय देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांचे कार्य हे समाजातील प्रत्येक पिढीसाठी आदर्श असेच आहे.

कोंडाजीमाना आव्हाड यांनी वसंतराव नाईक यांचा जीवनपट उलगडला. तसेच विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. क्रीडा व शिक्षण क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा, देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रास्तविक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी केले. त्यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा सादर केला. क्रांतिवीर नाईक यांच्या नावाला साजेसेच काम भविष्यात संस्था करील, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली. गीता बागूल यांनी सूत्रसंचालन केले. े विश्वस्त बाळासाहेब गामणे यांनी आभार मानले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा, तानाजी जायभावे, एन. एम. आव्हाडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात होणार इनोव्हेशन सेंटर

$
0
0

व्यापक स्तरावर प्रयोग राबविण्यासाठी होणार मदत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध क्षेत्रात व्यक्तीगत पातळीवर होणारे समाजोपयोगी प्रयोग व्यापक स्तरावर राबविता यावेत, यासाठी जिल्ह्यात इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात येणार आहे. अशा प्रयोगांच्या व्यापक अंमलबजावणीतून सर्वांचेच जीवन सुकर होण्यास मदत होऊ शकते, असा विश्वास जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी व्यक्त केला.

‍‌जिल्ह्यात विविध क्षेत्रांत होणाऱ्या प्रयोगांची व्यापक स्तरावर दखल घेतली जावी, समाजोपयोगी प्रयोग प्रत्यक्ष अंमलात यावेत यासाठी जिल्हास्तरावर इनोव्हेशन सेंटर सुरू करण्याचा निर्णय सरकारने एक वर्षापूर्वी घेतला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यापामुळे हे सेंटर कार्यान्वित करण्यास विलंब झाला असला तरी आता त्यासाठी पाऊले उचलली जाऊ लागली आहेत. या विषयासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कुशवाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर आयोजित विज्ञान प्रदर्शनांमध्ये अनेक प्रयोग सादर केले जातात. त्यापैकी काही प्रयोग व्यापक स्तरावर राबविल्यास त्याचा लाभ समाजातील विविध घटकांना होणे शक्य असते. मात्र ते प्रयोग केवळ प्रदर्शनापुरते किंवा फारतर त्या शाळेपूरतेच मर्यादीत राहतात. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतांमध्ये अनेक प्रयोग यशस्वी केलेले असतात. पाणी बचतीबाबत, मलनि:सरणाबाबत, इतकेच नव्हे तर शिक्षण क्षेत्रातही अशा प्रकारचे प्रयोग कोठे ना कोठे होत असतात. हे प्रयोग लोकांपर्यंत पोहोचले तर व्यापक स्तरावर ते राबविणे शक्य असते. अशा विविध क्षेत्रात होणारे नाविन्यपूर्ण प्रयोग समाजातील बहुतांश घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी इनोव्हेशन सेंटर सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांना तसेच तेथे होणाऱ्या प्रयोगांना त्यामुळे व्यापक स्वरुपाचे व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास कुशवाह यांनी व्यक्त केला.


पाणीपुरवठा, शिक्षण, कृषी, अन्न प्रक्र‌यिा, मलनि:सारण, विद्युत अशा विविध क्षेत्रांमध्ये अनेक प्रयोग होत असतात. त्यातून स्थानिक पातळीवर काही व्यापक उपाययोजना राबविण्यासाठी आम्ही इनोव्हेशन सेंटर सुरू करणार आहोत. त्यासाठी वेबपोर्टल, सोशल नेटवर्किंग साईट तयार करणार आहोत. अशा प्रयोगकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावर स्पर्धा भरविण्यात येईल. यासाठी विविध तज्ज्ञांच्या समित्या बनवून किमान तीन महिन्यातुन एकदा बैठकीत आढावा घेतला जाईल.

दीपेन्द्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अलंकारिक शैलीतील ‘आनंद‌’चित्रे

$
0
0

कुणाल गोराणकर

चित्रकार व चित्ररसिकांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या या जगप्रसिद्ध आर्ट गॅलरीत एकट्याने चौदा प्रदर्शने भरवणे हे नक्कीच एक मोठे दिव्य आहे. खरंतर या गॅलरी सहजासहजी जागा उपलब्ध होत नाही. त्यासाठी किमान चार ते पाच वर्षे वाट पाहाण्याची तयारी कलाकारांना दाखवावी लागते. येथून पुढे देखील कठीण असे नियम पार केल्यावर गॅलरी उपलब्ध होते. मात्र सोनार यांची चिकाटी व चित्र निर्मितीतील सातत्य वाखाणण्याजोगे आहे. म्हणूनच त्यांनी १९७७ ते २०१५ या कालावधीत चौदा चित्र प्रदर्शने भरविली आहेत. नाशिक शहरातील सर्वाधिक चित्र प्रदर्शने भरवणारे ते एकमेव चित्रकार असावेत. यापूर्वी जहाँगीरमध्ये अनेक चित्रकारांनी भरवलेली प्रदर्शने ग्रुपने किंवा दोघांनी एकत्रपणे केलेली आहेत. दोन-पाच चित्र प्रदर्शनानंतर अनेकजण थांबलेले आहेत

सोनार यांचे ग्रुप शोदेखील बऱ्याच ठिकाणी झाले असून, देशात व परदेशात त्यांच्या चित्रांना मागणी व आदराचे स्थान आहे. निसर्गचित्रे, व्यक्तीचित्रे, क्रिएटिव्ह रचना चित्रे या विषयांवर अनेक चित्रकार चित्र निर्मिती करतात. त्यांना समोर प्रत्यक्ष वस्तू वा संदर्भ असतो. मात्र सोनारांना वा. गो. कुलकर्णी यांच्या सारख्या चित्रमहर्षी गुरूंचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभल्याने त्यांनी निसर्गचित्रे, व्यक्तीचित्रे या विषयातही प्रगती साधली आणि वेगळी वाट निवडली. लहानपणी मनात ठसलेल्या धार्मिक कथांच्या अभ्यासातून व लघुचित्रे निरीक्षणातून स्वतंत्र अशी भारतीय अलंकारिक चित्रशैली विकसित केली. त्यात अनेक प्रयोग केल्याने त्यांना हे यश मिळाले.

याविषयी सोनार म्हणतात, निसर्ग चित्र, व्यक्तीचित्रांसाठी समोर संदर्भ आकार पाहून दृश्य रेखाटून चित्रे रंगवली जातात, पण निव्वळ स्वकल्पनेने रचलेला एखादा विषय आकर्षकपणे मांडून कुठलाही संदर्भ न घेता चित्रनिर्मिती करणे अवघड आहे. गुरूवर्य वा. गो. कुलकर्णी यांनी त्यांना नाशकात आणले, तेव्हा सोनार चाळीशीच्या आसपास होते. जिद्द व चिकाटीने त्यांनी भारतीय अलंकारिक शैलीची मुहूर्तमेढ रोवली. आज जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांची चित्रे पोहोचली आहेत. हे नाशिकसाठी भूषणावह आहे. अनेक विदेशी चित्ररसिक त्यांच्या घरी आवर्जून येत असतात. वयाच्या ऐंशीत पोहोचलेले सोनार

प्रसिद्धीचा गाजावाजा न करता सातत्याने चित्रनिर्मितीत मग्न असतात. त्यासाठी लागणारे श्रम, चिकाटी व कमालीची बैठक एका चित्रासाठी किमान महिना वेळ देतात. तरीही त्यांची चित्रसंख्या वाढती आहे. एखादे चित्र विकले गेले तर त्याच थीमचे दुसरे पेंटिंग ते थोड्याफार फरकाने पुन्हा निर्माण करुन ठेवतात, हे त्यांचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.

अशा मोठ्या चित्रप्रदर्शनातून त्यांची असंख्य चित्रे देशात, परदेशात गेली आहेत. इंग्लंड व पॅरिसच्या खासगी आर्ट गॅलरीच्या चित्ररसिक मालकांनी त्यांची बरीच चित्रे विकत घेऊन प्रदर्शने भरवली आहेत. देशातील अनेक मान्यवर संस्था व चित्रप्रेमींच्या दिवाणखान्यात त्यांची चित्रे सजली आहेत. त्यांचे गुरू व मित्र स्व. चित्रकार शिवाजी तुपे त्यांच्या विषयी नेहमी सांगत 'चित्र तपस्वी वा. गो. कुलकर्णींच्या मार्गदर्शनाखाली गुरूकुल पद्धतीने पाच वर्षांचा पेंटिंगचा डिप्लोमा केलेल्या या माणसाने चित्रप्रदर्शने करुन आर्थिक दुर्बलतेवर विजय मिळविला. तसेच नाशिक शहरात स्वत:चा बंगला, गाडी व स्टुडिओ उभारला. एवढे असूनही वेबसाईट इंटरनेटचा लाभ न घेता प्रसिद्धीपासून लांब राहून स्वत:चे पाय जमिनीवर घट्ट रोवून उभा आहे.

सोनारांचे एकूण आयुष्यच थरारक अनुभवांनी समृद्ध आहे हे त्यांच्या 'सोनचित्रे' या पुस्तकातील आत्मकथनातून उलगडते. डांगच्या घनदाट जंगलात १९५७ मध्ये त्यांनी तलाठ्याची नोकरी पत्करली. ग्रामसेवक, क्लर्क, ट्रेसर, ड्राफ्टसमन, चित्रकला महाविद्यालयात प्रोफेसर, कलाध्यापक अशा पदांवर त्यांनी काम केले आहे. कलेसाठी पंधरा वर्षांची शासकीय नोकरी सोडून धाडसाने कला प्रांतात रमणारा हा एक अवलियाच म्हणावा. अनेक ठिकाणी विद्यार्थी व रसिकांसाठी त्यांनी चित्र प्रात्यक्षिके सादर केली आहेत. कला कार्यशाळा, कलामेळांमध्ये सक्रिय भाग घेतला आहे. अनेक मान्यवर संस्थांनी त्यांचा यथोचित गौरव करून मानपत्रे दिली आहेत. खूपशी पारितोषिके त्यांच्या स्टुडिओत मांडलेली दिसतात. जून २०१५ मध्ये पुणे येथील जे डब्ल्यू मेरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये सिल्वर एज युटोपीन पुणे, या संस्थेतर्फे मानाचा 'आर्टिस्ट अॅवॉर्ड २०१४' हा पुरस्कार भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते सोनारांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या चौदाव्या चित्रप्रदर्शनासाठी खूप शुभेच्छा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅपल स्कूलच्या विद्यार्थ्यांची अॅथलेटिक्ससाठी निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पिंपळगाव बसवंत येथील अॅपल मीडियम स्कूलने मालेगाव येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने शाळेच्या १९ खेळाडूंची राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली. राज्यस्तरीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धा सांगली येथे होणार असून, या स्पर्धेसाठी निवड झालेल्या अॅपल स्कूलच्या १९ खेळाडूंचा सत्कार संस्थेचे संचालक विनोद मराठे, प्राचार्या प्रियांका मराठे यांनी केला. क्रीडाशिक्षक योगेश जठार यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले

निवड झालेले खेळाडू ः श्लोक जाधव, वेदान्त रणशिंगे, रवी प्रसाद, नील देशमुख, देवाशिष कोहक, आदित्य शिंदे, पुष्कर राठी, ओम काळे, पीयूष आहेर, मोहीब शेख, शिवकार्तिक, कुमुदिनी बोरसे, श्रद्धा तलवारे, स्वस्तिक मोरे, सानिका सुडके, मनराज धारिवाल, प्राजक्ता जाधव, सिद्धिका निफाडे आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७५ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रादेशिक परिवहन विभागाने पुन्हा शहरात हेल्मेट सक्तीची मोहीम हाती घेतली आहे. पहिल्याच दिवशी सोमवारी ७५ बेशिस्त आणि बेफिकीर वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

हेल्मेट सक्ती मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्यास सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी पेठ रोड आणि मुंबई-आग्रा महामार्गावर ही मोहीम राबविण्यात आली. हेल्मेटचा वापर न करणारे ७२ मोटरसायकलस्वार आणि सीटबेल्टचा वापर टाळणाऱ्या तीन कारचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली.

संबंधित वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. वाहन चालविण्याचा परवाना आणि आरसी बुक जप्त करण्यात आले असून, संबंधित वाहनधारकांना समुपदेशनासाठी शनिवारी पेठरोड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

आज दिंडोरी, त्र्यंबक रोड

मंगळवारी दिंडोरी रोड आणि त्र्यंबकेश्वर रस्त्यावर ही कारवाई करण्यात येणार असून, वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विज्ञानाची परंपरा सशक्त करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशाच्या विकासासाठी विज्ञान हे महत्त्वाचे माध्यम आहे. करिअर आणि राष्ट्रसेवा यांचा ताळमेळ विज्ञानामधील करिअरमध्ये निश्चितच जमू शकतो. देशामध्ये विज्ञानाची परंपरा अधिकाधिक सशक्त करा, असे आवाहन सपकाळ नॉलेज हबमध्ये आयोजित पाच दिवसीय कॅम्पमध्ये तज्ज्ञांमार्फत करण्यात आले.

या कॅम्पमध्ये आयोजित विविध सत्रांमध्ये डॉ. चंद्रशील भागवत, डॉ. सुवर्णा कुलकर्णी, डॉ. अविनाश खरे, डॉ. पुष्पा खरे, डॉ. शेखर मांडे, डॉ. उर्मिला मांडे, डॉ. आनंद पटवर्धन, डॉ. अंजन बॅनर्जी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. या पाच दिवसीय सत्रात लेखी, प्रात्यक्षिक तसेच सामान्यज्ञान अशा विविध स्पर्धा पार पडल्या. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत तारांगण, मुद्रा संग्रहालय या स्थळांना भेटी दिल्या. सांयकाळच्या सत्रातही विज्ञान विषयक चित्रपट व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

'वॉक द टॉक' या विशेष सत्रात विद्यार्थ्यानी तज्ज्ञांसोबत मुक्तसंवाद साधला. समारोपाच्या सत्रात पद्मश्री डॉ. शरद काळे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. व्ही. जे. गोंड यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी-नाशिक जिमखानामध्ये अंतिम लढत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित कै. भाऊ मालुसरे टी-२० चषक स्पर्धेत दिंडोरी क्रिकेट अकॅडमी व नाशिक जिमखाना यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरी गाठली.

महात्मानगर क्रिकेट मैदानावर ही बाद फेरी खेळविण्यात आली. कै. भाऊ मालुसरे टी-२० चषक संजय मालुसरे व त्यांच्या कुटुंबीयांतर्फे गेल्या पाच वर्षांपासून पुरस्कृत करण्यात येत आहे. या मोसमात एकंदर ६० संघांचे १६ गट करण्यात आले होते. प्रत्येक संघास ३ साखळी सामने खेळावयास मिळाले, त्यातूनच सर्वाधिक गुणविजेते १६ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले. त्यामध्ये उपउपांत्य पूर्व, उपउपांत्य व उपांत्य फेरी खेळविण्यात आली. नाशिक प्रिमियर लीगसाठी निवड करताना स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार केला जाणार आहे. उपांत्य फेरीत दिंडोरीने पंचवटी संघावर ५४ धावांनी तर नाशिक जिमखान्याने जंबो संघावर ७ गडी राखून विजय मिळविला.

पहिला उपांत्य सामना: दिंडोरी २० षटकांत ६ बाद १७२ धावा. (विराज ठाकूर ६८, प्रशांत नाठे ३९, जितेंद्र कालेकर ३ बळी) वि. पंचवटी २० षटकांत ९ बाद ११८ धावा (गालिब पटेल ३३, सलिल आघारकर व मुझमिल खान प्रत्येकी ३ बळी). दिंडोरी संघ ५४ धावांनी विजयी.

दुसरा उपांत्य सामना: जंबो २० षटकांत सर्वबाद १०६ धावा ( जय चौधरी २३ व मनोज परमार २१, रोहित परब ३ बळी) वि. नाशिक जिमखाना १८ षटकांत ३ बाद १०८ धावा (विकास वाघमारे नाबाद २३ व सौरभ देवरे नाबाद २१, वैभव पुरे २ बळी) नाशिक जिमखाना ७ गडी राखून विजयी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘या ही वळणावर’ १० जानेवारीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५५ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी २ जानेवारीपासून पनवेल येथे सुरू होणार आहे. राज्यभरात आयोजित नाट्यस्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या नाटकांचे सादरीकरण येथे होणार आहे. दि. २ ते २१ जानेवारी या दरम्यान ही स्पर्धा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होईल.

स्पर्धेत रविवार १० जानेवारी रोजी लोकहितवादी मंडळ निर्मित 'या ही वळणावर' हे ना‌शिकचे नाटक सादर करण्यात येणार आहे. नाटकाचे दिग्दर्शन हेमंत देशपांडे यांनी केले असून, लेखन मुकंद कुलकर्णी यांचे आहे. जे काही बरे वाईट घडेल ते पूर्वसंचितावर आधारित, प्रारब्धात असेल तरच घडते अन्यथा नाही अशा विचारांवर आधारित ओ हेन्री यांची 'अ रोड टू डेस्टिनी' ही कथा आहे. त्यावर 'या ही वळणावर' हे नाटक बेतलेले आहे.

नाटकात मिलिंद भणगे, नरेंद्र दाते, रसिका पुंड, हेमंत पवार, राजेंद्र सोनजे, स्वाती शेळके, शिरीष कठाळे, प्रशांत देशपांडे, डॉ. राजेश आहेर, पूजा चांदवडकर, गीतांजली घोरपडे, महेंद्र चौधरी, चारूदत्त कुलकर्णी, रमेश काळे, अनिकेत कुलकर्णी, विवेक पाटणकर, मुकुंद मोरे यांनी भूमिका केल्या.

नेपथ्य किरण समेळ, नेपथ्य निर्माण बाळकृष्ण तिडके, प्रकाशयोजना प्रबोध हिंगणे, प्रकाश योजना सहाय्य आकाश पाठक, पार्श्वसंगीत प्रसाद भालेराव, निषाद हलकर्णी, केशभूषा व वेशभूषा अपूर्व सौचे, सहाय्य शुभदा केळकर, रंगभूषा माणिक कानडे, नृत्य दिग्दर्शन चिरंतनी हलकर्णी यांचे आहे.

नाशिक विभागीय फेरीत 'या ही वळणावर' नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे अंतिम फेरीसाठी या नाटकाची निवड झाली आहे. गेल्या वर्षी अंतिम फेरीमध्येही लोकहितवादी संस्थेच्या 'न ही वैरेन वैरा‌नि' या नाटकाने पहिल्या क्रमांकाने बाजी मारली असल्याने यंदाही नाशिककर रंगकर्मींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्यनाट्य स्पर्धेतही हे नाटक छाप पाडले, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वीज पेरूया अंगात’ बालनाट्य अव्वल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकापेक्षा एक सरस सादर झालेल्या बालनाट्य स्पर्धांचा निकाल जाहीर झाला असून, १३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ या संस्थेच्या 'वीज पेरूया अंगात' या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले. याच नाटकाने दिग्दर्शनातील पहिले व प्रकाशयोजनेचे द्वितीय पारितोषिकही पटकावले.

सप्तरंग थिएटर्स, अहमदनगरच्या 'सर, तुम्ही गुरूजी व्हा' या नाटकाला द्वितीय तर नाशिकच्या प्रबोधिनी विद्यामंदिर संस्थेच्या 'शहाणपण देगा देवा' या नाटकाला अपंग उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. ही तीनही नाटके अंतिम फेरीसाठी निवडली गेली आहेत. दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक 'वीज पेरूया अंगात' या नाटकासाठी सोनाली वासकर हिला जाहीर झाले. द्वितीय पारितोषिक दीपक ओहोळ यांना 'सर, तुम्ही गुरूजी व्हा' या नाटकासाठी तर अपंग उत्तेजनार्थ पारितोषिक रमेश वनीस यांना 'शहाणपण देगा देवा' या नाटकासाठी जाहीर झाले.

प्रकाशयोजनेचे प्रथम पारितोषिक ईश्वर जगताप यांना 'सपान' नाटकासाठी तर द्वितीय पारितोषिक पीयूष रावळ यांना 'वीज पेरूया अंगात' या नाटकासाठी जाहीर झाले. नेपथ्य प्रथम नाना मोरे 'भेट' नाटकासाठी, द्वितीय राजेश भालेराव यांना सपान नाटकासाठी तर रंगभूषेचे प्रथम पारितोषिक माणिक कानडे यांना 'पुन्हा नको रे बाबा', द्वितीय नारायण देशपांडे यांना 'एबी-२' नाटकासाठी जाहीर झाले. उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक संस्कार गुंदेचा (सर तुम्ही गुरूजी व्हा) पंकजा कऱ्हाळे हिला भेट नाटकासाठी जाहीर तर अभनियासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे साक्षी भटकर (वीज पेरूया अंगात), मुग्धा घेवरीकर (अवताराची गोष्ट), सई मोराणकर (सपान), कृष्णा चव्हाण (मुलं देवाघरची फुलं), तेजस्विनी ठाकरे (पंखातील आभाळ), चिन्मय जगताप (जॅकी आणि तो), ऋषिकेश पर्वतीकर (सुटका), लक्ष वायकर (बुडबुडे), अजय सोनार (मु.पो, कळमसरा) तर मार्दव लोटके यास भेट नाटकासाठी जाहीर झाले.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ७ ते १२ डिसेंबर या काळात जल्लोषात या बालनाट्य स्पर्धा झाल्या. स्पर्धेत एकूण २९ प्रयोग सादर करण्यात आले.

परीक्षक म्हणून रमाकांत मुळे, के. ए. पुप्पुलवाड व नवीन कुलकर्णी यांनी काम पाहिले.

नाशिकच्या प्रबोधिनीला अपंग उत्तेजनार्थ

प्रबोधिनी विद्यामंदिरच्या 'शहाणपण देगा देवा' या नाटकाला अपंग उत्तेजनार्थ पारितोषिक सादर झाले. प्रबोधिनी ही मानसिक अपंगांची शाळा म्हणून प्रसिध्द आहे. पारितोषिक प्राप्त नाटकाचे लेखन मनीषा नलगे यांनी तर दिग्दर्शन रमेश वनीस यांनी केले होते. नेपथ्य मिलिंद मून, संगीत वसंत सानप, प्रकाशयोजना कांचन इप्पर, रंगभूषा प्रमिला पालवे, वेशभूषा आशा राजगुरू तर विशेष मार्गदर्शन रोहिणी ढवळे यांचे होते. नाटकात नवनीत वाघ, सौरभ साळुंके, हिमांशू गोस्वामी, निखील पवार, कौत्सुभ शर्मा, प्रतीक शिंदे, हर्ष जोशी यांनी भूमिका केल्या. केदारनाथ, बद्रीनाथ, माळीण, जम्मू, काश्मीर व चेन्नई येथे झालेल्या महाप्रलयाला निसर्गाचे बिघडलेले संतूलन कारणीभूत आहे. निसर्गाचे संतूलन बिघडण्यासाठी मानव जबाबदार आहे तो प्राण्यांच्या जागेवर अतिक्रमण करतो हे प्राण्यांनी अतिशय नाट्यमय रितीने नाटकात सादर केले.

राज्य बालनाट्यमध्ये काम करताना नॉर्मल मुलांच्या अटीशर्ती पाळून काम करावे लागते. नॉर्मल मुलांमध्ये उतरून बक्षिस मिळवले यामुळे आमच्या मुलांचा आत्मविश्वास वाढला. नाटकाच्या निमित्ताने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आम्ही केला.

- मनीषा नलगे, लेखिका, शहाणपण देगा देवा

या मुलांसमवेत काम करताना अधिक मेहनत घ्यावी लागते. कारण, ही मुले विसरण्याची शक्यता जास्त असते. लेखक, नेपथ्यकार व अन्य कलावंतांनीही खूप मेहनत घेतली. एकजुटीने काम केले त्याचे हे फळ आहे.

- रमेश वनीस, दिग्दर्शक, शहाणपण देगा देवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य शालेय फुटबॉल टेनिस स्पर्धेत सिम्बॉयसिस विजयी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र सरकारचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी, सोलापूर यांच्या वतीने अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल टेनिस स्पर्धेमध्ये येथील सिम्बॉयसिस शाळेच्या संघाने १९ वर्षांखालील मुलींच्या गटात डबल्स प्रकारात विजेतेपद मिळवले.

समृद्धी पवार, प्रतीक्षा देवांग, पूजा छाजेड यांच्या संघाने विजेतपद मिळविले तर सिंगल्समध्ये माधुरी सुलताने हिने रौप्य पदक मिळविले.

समृद्धी पवार, प्रतीक्षा देवांग यांची पुढील महिन्यात होणाऱ्या शालेय राष्ट्रीय फुटबॉल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. समृद्धी पवार हिची शालेय राष्ट्रीय फुटबॉल टेनिस स्पर्धेसाठी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. संघाच्या यशस्वी कामगिरीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सबरवाल, क्रीडाशिक्षक बी. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रासबिहारी’च्या विद्यार्थ्यांची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे शिवाजी स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या १४ वर्षांखालील वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचे तीन विद्यार्थी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सातवीतील यश गंगवाल, विप्लव माने आणि आठवीतील मितेश काळे यांचा समावेश आहे. राज्यस्तरीय शालेय स्पर्धेला विभागीय क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे. यात नाशिक संघाने उस्मानाबाद आणि बीड या संघांविरुद्ध ५-० ने, तर औरंगाबाद संघाविरुद्ध ३-१ ने असा दणदणीत विजय मिळवला. यात रासबिहारी शाळेच्या यश गंगवाल याने उस्मानाबाद संघाविरुद्ध उत्तम कामगिरी करत दोन गोल, तर बीड संघाविरुद्ध एक गोल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन हिवाळ्यात गावे तहानली

$
0
0

जिल्ह्यात १५ गावे, ६२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात सर्वाधिक धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकचा नावलौकीक असला तरी यंदा धरणेच तहानल्याने ऐन हिवाळ्यातही जिल्हा प्रशासनाला गावोगावी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जिल्ह्यातील १५ गावे आणि ६२ वाड्यांमध्ये १८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे गतवर्षी डिसेंबरमध्ये केवळ सिन्नर तालुक्यातील दोन गाव आणि ५३ वाड्यांमध्ये दुष्काळाच्या झळा बसत होत्या. तेथे नऊ टँकरची मदत घेण्यात येत होती. यंदा बागलाण, नांदगाव आणि मालेगाव तालुक्यांचीही त्यामध्ये भर पडली असून, टँकरची संख्याही दुप्पट झाली आहे.

यंदा मान्सूनने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील अनेक धरणे ५० टक्केही भरू शकली नाहीत. जिल्ह्यातील २३ धरणांमध्ये आजमितीस केवळ ३७ टक्के एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जून २०१६ पर्यंत जिल्ह्यातील ५० लाखांहून अधिक लोकसंख्येला पाणी पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. म्हणूनच शहरात पाणी कपातीला सुरुवात झाली असून, नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर, गंगापूर धरण समूहामध्ये ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पालखेड धरण समूहात ४७ टक्के तर गिरणा खोरे समूहामध्ये केवळ २४ टक्के एवढाच पाणीसाठा आहे. धरणांमध्ये २४ हजार ६३३ दशलक्ष घनफूट एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असला तरी त्यामध्ये जिल्हावासीयांची तहान कशी भागणार याची चिंता प्रशासनाला भेडसावत आहे.

सिन्नर तालुक्यात सर्वाधिक वाड्यांना पाण्याच्या दुर्भिक्ष्‍याचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात ६ गावे आणि ३१ वाड्या अशा एकूण ३२ ठिकाणी आठ सरकारी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्याखालोखाल बागलाण तालुक्यातील ६ गावे आणि एक वाडी पाण्यासाठी तहानलेली आहे. तेथे पाच टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. नांदगावमध्ये दोन गावे आणि ३२ वाड्यांमधील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तेथे चार पाणी पुरविण्यासाठी प्रशासनाने चार टँकरची मदत घेतली आहे. याच तालुक्यातील बाणगाववासीयांनीही टँकरची मागणी केली आहे. मालेगाव तालुक्यातील एक गावही यंदा पाणी टंचाईचा सामना करीत आहे. तेथेही एका टँकरची मदत घेण्यात येत आहे. सध्या सिन्नरमध्ये २५, नांदगावमध्ये १९ आणि बागलाणमध्ये १७ आणि मालेगावात टँकरच्या दोन फेऱ्या होत आहेत.

आठ विहिरींचे अधिग्रहण

केवळ टँकरने पाणीपुरवठा करून तहान भागत नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून विहिरींचेही अधिग्रहण करण्यात येते. जिल्ह्यात एकूण १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यापैकी एकट्या बागलाण तालुक्यात सहा, मालेगाव आणि नांदगाव तालुक्यात प्रत्येकी एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. एकट्या बागलाण तालुक्यात दोन विहिरी केवळ टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगाव शहरात स्वच्छता अभियान राबविणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप येणे गरजेचे आहे. शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानात शासकीय विभागांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

मनपा सभागृहात स्वच्छता अभियानासंदर्भात आयोजित विभागप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे, उपविभागीय अधिकारी अजय मोरे, कमरुद्दीन शेख आदी उपस्थित होते. दिलीप स्वामी म्हणाले की, अस्वच्छतेमुळे आरोग्याचे विविध प्रश्न निर्माण होत असल्याने देशपातळीवर शहर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. देशासह राज्यात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शहराची विविध भागात विभागणी करावी. लोकप्रतिनिधींनी आपापल्या वॉर्डात स्वच्छता अभियान विषयक जनजागृती करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. अभियानाच्या यशस्वीतेसाठी शाळा, कॉलेजांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येतील आणि अभियानाचा आढावा स्वत: जिल्हाधिकारी घेतील. अभियानात लोकसहभाग, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सहभाग असणार आहे. विविध संघटना, सेवाभावी संस्था यांचीही मदत घेण्यात येईल. महानगरपालिकेने शहराचे सर्वेक्षण करून नियोजन करावे. स्वच्छता अभियानासाठी काय आवश्यक आहे याचा आराखडा महानगरपालिकेने तयार करावा. प्रत्येक विभागाने नव्या संकल्पना सूचवाव्यात, खुल्या प्लॉटवरील स्वच्छतेसाठी संबंधित मालकांना नोटिसा बजवाव्यात. त्यांनी सूचनांचे पालन केले नाही, तर महानगरपालिकेने तो भाग स्वच्छ करून त्याचा खर्च प्लॉट धारकाकडून वसूल करावा, असेही स्वामी यांनी नमूद केले.

यावेळी आयुक्त बोर्डे यांनी मालेगाव शहरात स्वच्छता अभियानाचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगून शहर स्वच्छता व मोसम नदी स्वच्छतेचे लवकरच नियोजन करण्यात येईल, असे सांगितले. मालेगाव शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रत्येकाने या अभियानात आपले योगदान नोंदविले पाहिजे, अशी अपेक्षा प्रांताधिकारी अजय मोरे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला टोल नाक्यावर ४० प्रवाशी तासभर वेठीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारातील टोलनाक्यावर रविवारी रात्री टोल व्यवस्थापकाच्या तसेच तेथील कर्मचाऱ्यांच्या अरेरावी व दंडेलशाहीमुळे मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बसला मोठा त्रास सहन करावा लागला.

मध्यप्रदेश परिवहन मंडळाची (एमपी-११,पी -४४५५) आराम बस रविवारी पिंपळगाव जलाल शिवारातील टोलनाक्यावर आली. येथील कर्मचारी व व्यवस्थापक यांनी तू आम्हाला कट मारला, असे म्हणत बसचालकाला मारहाण केली. कंडक्टर शेखर यांनाच खाली उतरविण्यात आल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. येवला पोलिस ठाण्याचे निरीक्षक वाघमारे यांच्यासह सरपंच विनोद ठोंबरे, स्नेहल गायकवाड यांनी मध्यस्थी करीत वाद मिटवून ही गाडी पुढे रवाना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीचा ठेका पुन्हा अधांतरी

$
0
0

नगरविकास विभागाकडून हस्तक्षेप; स्थायी समितीकडून महिनाभराची मुदतवाढ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचा वादग्रस्त घंटागाडीचा ठेका दहा वर्षावरून पाच वर्ष करण्यावर थेट मंत्रालयात आक्षेप घेण्यात आल्याने हा ठेका पुन्हा अंधातरी लटकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगर विकास विभागाने या संदर्भात आयुक्तांना तूर्त तरी कारवाई थांबविण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. त्यामुळे घंटागाडी ठेक्याचा वाद कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थायी समितीने मंगळवारी घंटागाडी ठेक्याला एक महिन्याची मुदतवाढ देत, महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

महापालिकेच्या घंटागाडी ठेक्यामागील शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. महासभेने घंटागाडी ठेक्याला दहा वर्षांसाठी देण्याचा निर्णय दिला होता. मात्र, मनसेसह सत्ताधारी महाआघाडीतल्या सदस्यांनी दहा वर्षांना विरोध केल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी ठेका पुन्हा पाच वर्षासाठी करण्याचा ठराव प्रशासनाला दिला. महासभेत ३०० कोटींच्या या ठरावावर दहा वर्षांचे रुलिंग असतांना ठेका पुन्हा पाच वर्षाचा केल्याने त्या विरोधात नगरविकास विभागाकडे धाव घेण्यात आली आहे. त्यामुळे नगरविकास विभागातल्या अव्वर सचिवांना या ठेक्यांसदर्भात अभ्यास करून निर्णय घेण्याचे तोंडी आदेश आयुक्तांना देण्यात आले आहेत. भाजपच्या आमदारांसह गटनेत्यांनीही घंटागाडीच्या ठेक्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे भाजपने सरकारकडे या संदर्भात तक्रार केली असण्याची शक्यता आहे. मात्र, या संदर्भात अद्याप लिखित आदेश प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्थायी समितीत सांगितले. आपण या संदर्भातील माहिती तपासून निविदा प्रक्रियेची कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा ठरावच आता अधांतरी लटकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तीन आठवड्यात राबवा निविदा प्रक्रिया

नव्या घंटागाडीच्या ठेक्याची निविदा प्रक्रिया होईपर्यंत वर्तमान घंटागाडीच्या ठेक्यांना चार महिन्याची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात आला होता. त्याला सदस्यांनी आक्षेप घेतला. वारंवार मुदतवाढ देणे योग्य नसल्याचे सदस्यांचे मत होते. मात्र, निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी आयुक्तांनी केली. त्यावर तीन आठवड्याच्या आत तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश सभापती शिवाजी चुंभळे यांनी देत सध्याच्या ठेकेदारांना एक महिन्याची मुदतवाढीला मंजुरी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बांधकाम पाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

मखमलाबाद शिवारातील घाडगे मळा समोरील श्रीहरी विठ्ठल सोसायटीमधील तुळशीराम भगत यांचे अनधिकृत बांधकाम महापालिका प्रशासनाने मंगळवारी पाडले. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त आर. एम. बहिरम यांच्या अधिपत्याखाली पंचवटी विभागीय अधिकारी ए. पी. वाघ आणि नगररचना विभागाचे शाखा अभियंता जगताप यांच्या उपस्थितीत बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटविले. यापूर्वी, भागत यांना सूचना देण्यात आल्या होत्या. बांधकाम वा अतिक्रमण निमूर्लन विभागाची सूचना मिळाली असल्यास त्वरित वाढीव अतिक्रमण काढून घ्यावे आणि तसा अहवाल संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना पाठविण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा गाळ्यांची परस्पर विक्री

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूरमधील श्री छत्रपती शिवाजी मंडई मधील महापालिकेच्या मालकीचे गाळे परस्पर विकले जात असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य राहुल ढिकले यांनी केली आहे. गाळेधारकांना हा गाळा विकण्याची जाहिरात थेट सोशल मीडियावर टाकल्याचे पुरावे त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी या प्रकरणात संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत राहुल दिवे यांनी छत्रपती शिवाजी मंडईतील गाळे विक्रीचा विषय आयुक्तांसमोर मांडला. गाळा क्रमांक ५२ च्या गाळेधारकाने छत्रपती शिवाजी मंडई या व्हॉट्सअप ग्रुपवर गाळा विकणे असल्याचे टाकून संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. संबंधित गाळे हे महापालिकेच्या मालकीचे आहेत. त्यांची परस्पर विक्री व पोटभाडेकरू ठेवता येत नाही. तरीही संबंधितांने गाळे परस्पर विकल्याचा आरोप अमित अशोक पाटील या तक्रारदाराने केला आहे. दिवे यांनी या संबंधीचे पुरावे आयुक्त डॉ. गेडाम यांना दिले. आयुक्तांनी तत्काळ चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपायुक्त आर. एस. बहिरम यांना दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images