Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नगरकरांच्या कॅलेंडरची ‘गुगल’ने घेतली दखल

$
0
0

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

चित्रकार नयन नगरकर यांनी आपल्या रेखाचित्रातून गुगल नावाच्या मानवाकृती बरोबर सरमिसळ करून 'इन्वोलमेंट विथ गुगल' या संकल्पनेवर आधारित निवडक १२ रेखाचित्रांचे कॅलेंडर तयार केले आहे. याची दखल गुगल कार्यालयाने घेतली आहे. त्यांचे कॅलेंडर गुगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे.

वाढत्या वयाबरोबर काहीतरी चांगले करण्याची संकल्पना प्रत्येक कलाकाराच्या मनात असते. अशीच एक संकल्पना घेऊन पर्यावरणप्रेमी चित्रकार नयन नगरकर प्रत्येक चित्रातून निसर्गाला जपता यावे यासाठी प्रयत्न करीत असतात. पर्यावरणाचे संवर्धन कसे करावे यासाठी ते विविध ठिकाणी सादरीकरण करतात.

या वेळी त्यांनी ही १२ रेखाचित्रे तयार केली आहेत. या कॅलेंडरचा उद्देश येणाऱ्या प्रत्येक वर्षामध्ये माणसाने निसर्ग जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा हा आहे. हे कॅलेंडर नव्या वर्षामध्ये निसर्गाला हानी पोचवणाऱ्या वस्तूंचा वापर टाळण्याचा विचार देणार आहे. मानवाकृती छटा आपल्या संकल्पनेतून साकारल्या आहेत. यात महत्त्वाचे सण-उत्सव तारखेजवळ न दाखवता स्वतंत्रपणे दाखविण्यात आले आहेत. या रेखाचित्रांचे तसेच कॅलेंडरचे प्रदर्शन गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे भरविण्यात आले आहे. नाशिककरांना या प्रदर्शनाचा लाभ सोमवारपर्यंत (दि. २८) घेता येणार आहे.

माणसाने निसर्गासाठी काहीतरी करावे ही इच्छाशक्ती जोपर्यंत कृतीत उतरत नाही तोपर्यंत निसर्गाचा ऱ्हास थांबणार नाही. गरजेपेक्षा जास्त कमवून राजा होण्यापेक्षा निसर्गाला जपून निसर्गराजा होऊ या.

- नयन नगरकर, पर्यावरणप्रेमी चित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतमालाचे पैसे आडत दुकानातच द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व्यापाऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, कांदा विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना आडत दुकानातच देण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

कळवण बाजार समितीत कांदा विक्रीचे पैसे ३० नोव्हेंबरपासून २०१५ रोख स्वरुपात मिळत असले तरी कांदा व्यापाऱ्यांचे खळे, आडत दुकान यातील अंतरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांना विक्री केलेल्या कांद्याचे पैसे घेण्यासाठी नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. काही व्यापारी बाजार समितीच्या शेतकरी निवासात अदा करतात, तर काही व्यापारी बाजार समितीच्या कार्यालयात अदा करतात. त्यामुळे त्या ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसते. तसेच, शेतकऱ्यांचा खूप वेळ वाया जातो. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कांदा व्यापाऱ्यांनी आडत दुकानातच पैसे अदा केल्यास सर्वांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच, किरकोळ कारणावरून अर्ध्यावर कांद्याचे लिलाव व्यापारी कोणतीही

पूर्वसूचना न देता बंद करीत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत. तरी ठोस कारणाशिवाय लिलाव बंद ठेवू नये व निर्धारित वेळेत नियमित कांद्याचे लिलाव करण्यात येऊन शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळावे. याबाबत बाजार समितीच्या व्यवस्थापनाबरोबरच जिल्हा उपनिबंधक, तालुका सहाय्यक निबंधक यांनी वेळेत लक्ष घालावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकात देण्यात आला आहे.

कळवण बाजार समितीचा कारभार सुधारला असला तरी काही ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. शेतक-यांची हेळसांड होऊ नये, यासाठी रोख पैसे बाजार समितीतीच मिळतील, अशी व्यवस्था करायला हवी. तसेच शेतकरी व शेतमालाच्या सुरक्षेबाबतही उपाय योजण्याची गरज आहे, असे पगार यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'कलाकार काल्पनिक पात्रात जगतो'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कलाकार हा खोटे आयुष्य जगणारी व्यक्ती असतो. तो नेहमी खोटे पात्र व खोट्या विश्वात रमलेला असतो, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था व समाज सहाय्यक संस्थेच्या ४३ व्या वर्धापन समारंभ परशुराम सायखेडकर नाट्यगृहात संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिकचे सन्मार्ग मित्र या मुखपत्राचे पाहुण्यांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले. संस्थेच्या वतीने वैदिक परंपरा क्षेत्रातील भालचंद्र शास्त्री गोडसे,संगीत क्षेत्रातील रामाकांतजी परांजपे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.मीनाताई बापये, सामाजिक क्षेत्रातील शैला उघाडे यांना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.

याप्रसंगी सदगुरु श्रीराम महाराज यांची प्रमुख उपस्थित होती. या पुरस्कारांचे माझ्या हस्ते वितरण म्हणजे हा माझा सत्कार आहे, असे मनोगत पोंक्षे यांनी व्यक्त केले.

सर्व सत्कारार्थींनी त्यांच्या अनोख्या शैलीत संस्थेचे आभार मानले. गोडसे यांनी वैदिक पद्धतीने, परांजपे यांनी अनोख गीत सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय भाषणात गणेश गोखले यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. स्वतंत्रते भगवती या कलाविष्काराचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. स्वागत उदय कुमार मुंगी यांनी केले. आभार अजित चिपळूणकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद गांधी, सचिन दीक्षित, भालचंद्र दाते आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅटरी चोरांना रोखण्याचे आव्हान

$
0
0

गेल्या आठवड्यात पांडवलेणी परिसरात एकाच रात्री २० पेक्षा अधिक गाड्यांच्या बॅटरींची चोरी झाली होती. आता गंगापूर शिवारातील शिवाजीनगर भागात एकाच ठिकाणी पाच बॅटरी चोरट्यांनी लांबविल्या आहेत. यामुळे शहरात ठिकठिकाणी सक्रीय झालेल्या बॅटरीं चोरांवर पोलिसांनी अंकुश घालण्याची मागणी वाहनचालक व मालकांनी केले आहे. दरम्यान, गंगापूर पोलिस ठाण्यात बॅटरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको व सातपूर भागात गंगापूर-गोवर्धन, आनंदवली, कामगारनगर, सातपूरगाव, पिपंळगाव बहुला, अंबडगाव, चुंचाळे, कामटवाडे, मोरवाडी, पार्थडी गावांच्या शिवारातील शेतजमिनींवर मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वसली आहे. त्यातच रेती, मुरुम, डबरचे व्यावसाय करणारे बहुतांश शेतकरी कुंटुंबातील आहेत. सध्या हे व्यावसायिक गाड्यांमधून चोरी जाणाऱ्या बॅटरीमुळे हैराण झाले आहेत. यात मालवाहतूक करण्यासाठी अनेकांनी स्वतः व्यवसाय म्हणून चारचाकी ट्रक घेतले आहेत. मोकळ्या जागेत किंवा घराजवळ लावण्यात येणाऱ्या ट्रकच्या बॅटरीजची चोरी होण्याचे प्रमाण वाढत आहे. सिडको, सातपूरच्या कामगार वस्तीत भुरट्या चोऱ्या रोजच होत असतात. पंरतु, आता बॅटरीजच्या देखील चोरी होत आहे. त्यामुळे या चोरट्यांवर अंकुश ठेवणार कोण असा सवाल गाडीचालक, मालक यांनी उपस्थित केला आहे. गेल्या महिन्यात पाथर्डी, पांडवलेणी परिसरात २० पेक्षा अधिक गाड्यांच्या बॅटरी चोरट्यांनी लांबविल्या होत्या. आता गंगापूर शिवारातील शिवाजीनगर भागात काही महिन्यांपूर्वी चार गाड्यांच्या बॅटरी चोरट्यांनी चोरल्या. आता पुन्हा त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या तीन गाड्यांच्या एकूण पाच बॅटरी चोरट्यांनी चोरी केल्याचे उघड झाले आहे. याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात गाडी चालक रंगनाथ पुराणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

बॅटरी चोरट्यांचे रॅकेट? महागड्या गाड्यांमधील बॅटरी चोरून त्याची अन्यत्र विक्री करणाऱ्या टोळीचे मोठे रॅकेट सिडको आणि सातपूरमध्ये कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी ट्रकचालक व मालक यांनी केली आहेत.

गंगापूर, शिवाजीनगर पाझर तलावाच्या शेजारी अनेक वर्षांपासून ट्रक उभ्या केल्या जातात. तेथे कधी काही चोरी केले नाही. मात्र, आता तीन गाड्यांमधील पाच बॅटरीजची चोरी झाली आहे. याबाबत पोलिसांनी सखोल तपास केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येऊ शकते. - रंगनाथ पुराणे, ट्रकचालक

अनेक शेतकरी रेती, खडी, डबर, बांधकाम साहित्य वाहतूक करतात. मात्र, ट्रकमालकांना बॅटरी चोरट्यांनी हैराण केले आहे. शहरात पोलिसांनी लक्ष देत बॅटरी चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. - संदीप बाहुले, ट्रकमालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण विद्यार्थ्यांना हवे योग्य मार्गदर्शन’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शालेय जीवनातील विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती भरपूर असते. शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी खरे संशोधक म्हणून पुढे येथील, असे प्रतिपादन महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष बी. के. देवरे यांनी केले.

तिसगाव (ता. देवळा) येथील एल. व्ही. एच विद्यालयात देवळा तालुकास्तरीय चौदाव्या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती केदा शिरसाठ, पंचायत समितीचे सदस्य अशोक बोरसे, बाजार समितीचे माजी सभापती कान्हू जाधव, गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी, शिक्षण विस्तार अधिकारी सतीश बच्छाव, नंदू देवरे, विजया फलके, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष विनीत पवार, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जे. डी. सोनवणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, केंद्रप्रमुख हिरामण रौंदळ आदी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनाचे प्रास्ताविक पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी यांनी केले.

विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष विनीत पवार यांनी मागील वर्षी शासन स्तरावरून विज्ञान प्रदर्शन आयोजनासाठी निधीची उपलब्धता लोकप्रतिनिधिंनी करावी, अशी सूचना मांडली होती. जिल्हा परिषदेतील देवळा तालुक्यातील लोकप्रतीनिधिंनी एक लाख रुपये विशेष निधी म्हणून मंजूर केला. मात्र तो चुकून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाला. त्यामुळे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी हा निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या वर्षापासून तालुकास्तरावर विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. तसेच यावर्षी जिल्ह्यातून पहिलीच विज्ञान अविष्कार पुस्तिका अध्यापक संघाने तयार केली असल्याचे पवार यांनी यावेळी जाहीर केले. विज्ञान प्रदर्शन आयोजनासाठी गावाने दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक ‌निकाह

$
0
0

सामूहिक निकाहसारखे उपक्रम स्तुत्य आहे. मुस्लिम समाज कल्याणसाठी २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा खासदार हेमंत गोडसे यांनी केली. तर येत्या वर्षभरात शहरात अल्पसंख्यांकांसाठी पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करण्याचे आश्वासन आमदार देवयानी फरांदे यांनी दिले. संघटनेचे अध्यक्ष बबलू शेख यांनी प्रस्ताविक केले. अलहाज सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी सूत्रसंचालन केले.

सोहळ्यास आमदार बबन घोलप, आमदार अनिल कदम, हज कमेटीचे अध्यक्ष इब्राहिम भाईजान, हाजी मोहम्मद रऊफ पडेल, सुनील बागुल, निलेश चव्हाण, सुधाकर बडगुजर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख रफीक बबलू, समीर खतीब, मुश्ताक लालू, अमजद पठाण, जफर कादरी आदींचे सहकार्य मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅरिसच्या ट्रेनरकडून फिटनेसचे धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परदेशी ट्रेनरकडून फिटनेसविषयी नवनवीन टीप्स आणि खेळांविषयी मार्गदर्शनाची संधी सिडकोतील शांतारामबापू कॉलेजमधील विद्यार्थ्यांना नुकतीच मिळाली. निमित्त होते भारत-युरोप शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत पॅरिस विद्यापीठातील प्रा. विन्सेन फ्लोरान्स यांची कॉलेज भेट.

या भेटीमध्ये फ्लोरान्स यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कडकडीत थंडीला न जुमानता विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. फ्लोरान्स यांनी यावेळी व्यायामाच्या विविध टीप्स विद्यार्थ्यांना देत आयुष्यभर शरीर निरोगी ठेवण्याचा सल्ला दिला. व्यसनाधिनतेपासून दूर रहा आणि शरीरसंपदा कमावून समाजाच्याही उपयोगी पडा, असेही आवाहन त्यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांना मैदानावर घेऊन जात व्हॉलीबॉल खेळाच्या प्रात्यक्षिकात सहभागी होत त्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत केला.

प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन झाले. भारत-युरोप शैक्षणिक कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक मगरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे संयोजन जिमखाना विभाग प्रमुख प्रा. मिनाक्षी गवळी यांनी केले. यावेळी उपप्राचार्य एन. एम. शब्दे, शिक्षक व खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची वेबसाईट हॅक?

$
0
0

arvind.jadhav @timesgroup.com

नाशिक : नाशिक शहर पोलिसांची अद्ययावत वेबसाईट फेसबुकच्या कचाट्यात सापडली आहे. nashikpolice.com ही वेबसाईट उघडण्याचा प्रयत्न केला असता थेट फेसबुकचे पेज समोर येत असून, सायबर क्राइम रोखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या वेबसाईटला हॅकर्सने दणका तर दिला नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.

शहरवासीयांना आपली वाटावी, असे डिझाईन तयार केल्यानंतर नाशिक शहर पोलिसांच्या वेबसाईटचे कौतुक खुद्द पोलिस महासंचालकांनी केले. पोलिस विभागाचे चांगले कार्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी शहर पोलिसांकडून या वेबसाईटचा वापर होतो. विशेष म्हणजे दररोज या वेबसाईटवर माहिती सुध्दा अपडेट केली जाते. परदेशी नागरिक देखील या वेबसाईटचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. वाहतूक विभागाकडून होणारी कारवाई, दररोजच्या गुन्ह्यांची समरी, फरारी गुन्हेगारी, मिसिंग व्यक्ती, चोरीला गेलेली वाहने याबरोबर पोलिस विभागाची माहिती या वेबसाईटवर असते. मात्र, मागील तीन दिवसांपासून ही वेबसाईट सुरू करण्याचा प्रयत्न

केला असता तिथे फेसबुक पेज

समोर येते.

वेबसाईटचा कोणताही फायदा युजर्सला होत नाही. त्यामुळे हा तांत्रिक दोष आहे, की एखाद्या हॅकर्सने शहर पोलिसांच्या वेबसाईटला दणका दिला, असा प्रश्न समोर येत आहे. या वेबसाईटसंदर्भात काम पाहणाऱ्या क्राईम ब्रँचच्या शीतल भूषण सूर्यवंशी यांनी सांगितले की, संबंधित वेबसाईटचे तांत्रिक काम शारदा एंटरप्रायझेज ही कंपनी पाहते. तसेच, वेबसाईटच्या मेन्टेनन्सचे काम करण्याची जबाबदारी नि​श्चित करण्यात आली आहे. सुरक्षा प्रणाली उत्तम असून, ही वेबसाईट हॅक होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. तांत्रिक कारणांमुळे तीन दिवसांपासून वेबसाईटवर काम करणे शक्य नसून, याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले.



वेबसाईट हॅक होण्याची शक्यता कमी आहे. वेबसाईटची सुरक्षा प्रणाली चांगली असून, वेबसाईट सुरू करण्यात येणाऱ्या अडचणी लवकरच दूर केल्या जातील.

- सचिन गोरे,

सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'व्यायाम, छंदाची सांगड घाला'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपले मन वर्तमानात रमविण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास चिंता आणि तणावापासून मुक्त होणे शक्य होईल. वर्तमानात राहण्यासाठी व्यायाम, खेळ आणि छंद यांची सांगड घाला, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राचे विस्तार शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके यांनी केले.

सुशासन दिनाच्या निमत्ताने मुक्त विद्यापीठात आयोजित 'तणावमुक्ती व्यवस्थापन' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या यश इन सभागृहात हे व्याख्यान पार पडले. डॉ. ठोके म्हणाले, 'अनेक जण भूत आणि भविष्यकाळातील आनंदाच्या कल्पनांवर अवलंबून राहतात. परंतु यातून समाधान अन् तणावमुक्तीची प्रक्रिया घडून येत नाही. तणावमुक्तीसाठी प्रत्येकाने व्यायाम, योगासने करायला हवेत. त्यामुळे शरीराबरोबरच मनही प्रसन्न राहते. प्रत्येकाने आपले छंद जोपासावेत तसेच वाचनाची आवड, अध्यात्मिक गोडी निर्माण करावी आणि खेळाकडे वळावे, असेही विचार डॉ. ठोके यांनी मांडले.

आजच्या धकाधकीच्या आणि गतिमान युगात लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत तणावाखाली जाण्याचे प्रमाण तितक्याच गतीने वाढत आहे. तणावापासून मुक्त होण्यासाठी अनेकविध उपाय शोधले जातात. परंतु, काहीवेळा मद्यपान, धुम्रपान यासारख्याही गैरमार्गाचाही अवलंब करण्याकडे तरुणाईचा कल वाढत आहे व तो अतिशय घातक असल्याचे स्पष्ट करून तणावामुळे अपघात, दुर्धर आजार, नैराश्य, विकृत कृत्य अशा गोष्टी आपल्या नकळत घडत जातात. त्यामुळे तणावाची कारणे व त्यावरील उपाययोजना वेळीच करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष साबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रकाश कदम यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

व्यासपीठावर यशवार्ता मासिकाचे कार्यकारी संपादक संतोष साबळे, कृषिविज्ञान केंद्राचे डॉ. प्रकाश कदम उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीर्थक्षेत्र मांगीतुंगीसाठी १८ कोटींचा निधी मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मांगीतुंगी तीर्थक्षेत्र येथे भगवान श्री ऋषभदेवांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त प्राधान्याने करावयाच्या विकासकामांसाठी साडेअठरा कोटीच्या खर्चाला उच्चाधिकार समिती आणि राज्यस्तरीय शिखर समितीने मान्यता दिली आहे. ग्रामविकास विभाग हा निधी उपलब्ध करून देणार असून, ही कामे तातडीने हाती घ्यावीत, असे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

बागलाण तालुक्यातील श्री मांगी शिखराजवळ भगवान ऋषभदेवांची जगातील सर्वात उंच १०८ फूट उंचीची भव्य मूर्ती अखंड पाषाणात साकारण्यात येत आहे. शिखराच्या पायथ्यापासून १८०० फूट उंचीवर ही मूर्ती आहे. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि महामस्तकाभिषेक सोहळा ११ ते १६ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत होणार आहे. त्यासाठी देश विदेशातून १५ ते २० लाख भाविक येणार आहेत. भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी विकासकामांचा प्राधान्यक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सात नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी ४० कोटी रुपये किमतीचा आराखडा सादर केला. या आराखड्यापैकी १८ कोटी १८ लाखांचा निधी ग्रामविकास विभाग प्रशासकीय मान्यतेसह उपलब्ध करून देणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय शिखर समितीने प्राधान्याने करावयाच्या विकासकामांना आणि त्यासाठीच्या खर्चाला मान्यता दिली आहे. मंजूर निधीमधून तातडीची २२ कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वीजपुरवठा, अंतर्गत रस्ते, विद्युत विभागाची कामे, पर्यटकांसाठी लिफ्ट, रस्ता रुंदीकरण, पोलिस चौक्या तयार करणे, वैद्यकीय सुविधा पुरविणे, आपत्कालीन व्यवस्थापन, वाहनतळ, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे यासारख्या महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. ही कामे तातडीने मार्गी लावावीत, असे आदेश राज्य सरकारने दिले. त्याची जबाबदारी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीवर सोपविण्यात आली आहे. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यान्वित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे आणि ठरलेल्या कालावधीत कामे मार्गी लावण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धडपड्या शिक्षणतज्ज्ञ

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

आपल्याला शिक्षण घेताना असंख्य अडचणी आल्या, मुंबईत स्थिरावण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली हे हाल दुसऱ्याच्या वाट्याला येऊ नये म्हणून जितेंद्र गोस्वामी यांनी इगतपुरीत आश्रमशाळा काढली. आज वयाच्या सत्तरीत ते येथे राहून जास्तीत जास्त मुलांना शिक्षण मिळावे यासाठी झटत आहे.

नागपूर येथून एम.ए.पर्यंत पूर्ण केल्यानंतर मुंबईतील डॉक लिमिटेडमध्ये त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. रात्रपाळीची नोकरी करुन मुंबई विद्यापीठाची एम.एल.एस ही पदवी मिळवली. पण वेळेचे बंधन असलेल्या या कामात त्यांचे मन रमत नव्हते. भटक्या विमुक्तांसाठी कार्य करण्याची धडपड असल्याने समाजासाठी काम करायला सुरुवात केली. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम वाढल्याने १९९५ मध्ये अखेर नोकरीचा राजीनामा देऊन या कार्यात स्वतःला गुंतवून घेतले. धडपड्या वृत्तीच्या गोसावी यांनी सायन चुनाभट्टी येथे मुक्तादेवीच्या डोंगरावर एक शाळा उभी करण्याचा संकल्प केला. येथे एमएसके प्रथमिक विद्यालय व हायस्कूल उभारुन दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली.

प्रमिला गोस्वामी व जितेंद्र गोस्वामी यांनी डोंगर खोदून शिक्षणाचे काम सुरू केले. या शाळेला महाराष्ट्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या कार्याचेदेखील कौतूक केले आहे. शैक्षणिक काम करत असताना गोस्वामी यांना राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर काम करण्याची संधी दिली. त्या काळात केंद्रीय नियोजन मंडळाच्या सामाजिक न्याय आणि रोजगार संधी अपसमितीचे निमंत्रक म्हणून केंद्र सरकारने त्यांची नेमणूक केली होती. यापूर्वी वसंतराव नाईक महामंडळाचे संचालक म्हणून गोस्वामी यांनी काम केले आहे. कर्जदारांना कष्ट करणाऱ्यांना व शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळवून दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने त्यांना दलित मित्र पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. ते दलित मित्र आहेतच परंतु सर्वार्थाने समाजाच्या भल्यासाठी धडपडणारा, राजकारणातील चुकीच्या भूमिकांचे समर्थन न करणारा, आपले मत स्पष्ट मांडणारा आणि सामाजिक जाणिवा असलेला एक उत्साही कार्यकर्ता म्हणून गोस्वामी राजकारणातील सर्वांचे मित्र आहे.

भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी इगतपुरी येथे संजीवनी प्राथमिक आश्रमशाळा सुरू केली. याच समाजाच्या उत्कर्षासाठी पतपेढीही उभारली अगदी कमी दराने त्यांनी कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. शोषित, वंचित मुलांसाठी जास्त काम करता यावे यासाठी सध्या ते इगतपुरी येथे राहतात. या शाळेतील मुलांना मंगेश पाडगावकर ते भालचंद्र मुणगेकर इत्यादी मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे येथील मुलांचे आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी दर महिन्याला त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. शालेय ज्ञानाबरोबरच इतर बाबींचे ज्ञान व्हावे यासाठी मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. तसेच दर २६ जानेवारीला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची सहल काढण्यात येते. या मुलांना काही उणीव राहू नये सासाठी ते स्वतः जातीने लक्ष घालतात. स्वतः अन्नाचा नमुना तपासल्याशिवाय मुलांना जेऊ देत नाही. अनेकदा सरकारी गोदामातून येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असते. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. यासाठी त्यांनी खासगी व्यक्तींकडून किराणा भरला जातो. या परिसरात अनेक आश्रमशाळा आहेत, मात्र गोस्वामींच्या आश्रमशाळेत मुलांना प्रवेश मिळावा यासाठी दुरून लोक इगतपुरीला येत असतात. वयाच्या सत्तरीकडे झुकलेल्या जितेंद्र गोस्वामी यांचा उत्साह आजही दांडगा आहे. पहाटे पाचला सुरू झालेला दिनक्रम रात्री एक वाजता संपतो, आतापर्यंत राज्य सरकार तसेच देश विदेशातील सन्मान त्यांना मिळाले आहेत. त्यामुळे काही राहून गेले असे वाटत नाही. कामाचे समाधान हाच माझा पुरस्कार आहे असे म्हणतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगवेगळ्या अपघातांत चौघे ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील जुने नाशिकसह जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये एका पाच वर्षाच्या चिमुरडीसह तिघांचा मृत्यू झाला. उज्मा सलीम अन्सारी, सांतू भुरा कुशवाह, शुभम विष्णू ठाकरे आणि विलास पांडूरंग उगले, अशी मृतांची नावे आहेत.

जुने नाशिक भागातील कथडा येथे राहणारी पाच वर्षाची उज्मा अन्सारी घराजवळ खेळत असताना अंगावरून कार गेल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी साडेसात वाजेच्या सुमारास झाली. या प्रकरणी इनोव्हा कार चालक इम्रान सय्यद याच्या विरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. इम्रान आपल्याकडील कार (एमएच १५, बीएक्स २३४) पार्क करीत असताना हा अपघात झाला. उज्माच्या डोक्यास व तोंडास गंभीर दुखापत झाल्याने तातडीने तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

दुसऱ्या घटनेत सिडकोतील कारगिल चौकात भरधाव टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीवरील सांतू भुरा कुशवाह (वय २२) या युवकाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री सात वाजेच्या दरम्यान सांतू आपला भाऊ कपिल भुरा कुशवाह (वय २०) याच्यासोबत जात असताना अपघाताची घटना घडली. दत्तनगर परिसरात राहणारे दोघे भाऊ सायंकाळच्या सुमारास घराकडे परतत असताना त्यांना टेम्पोने धडक दिली. दोघांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सांतूचा मृत्यू झाला. जखमी कपिलवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेत संसारी, देवळाली कॅम्प येथे राहणारे विष्णू ठाकरे सातपूर औद्योगिक वसाहतीकडे जात असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडले. सातपूरमधील कार्बन नाका बस थांब्याजवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची चौथी घटना सिन्नर तालुक्यातील बारगाव पिंप्रीजवळ घडली. भरधाव वेगात जाणाऱ्या झायलो गाडीने दिलेल्या धडकेत सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील मोटरसायकलस्वार विलास उगले (वय ४०) यांचा मृत्यू झाला.

उगले हे शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान दुचाकीवरून जात असताना बारगाव पिंप्रीरोडवर खिंडीजवळील परिसरात भरधाव येणाऱ्या एमएच १५, डीएम १७९० क्रमाकांच्या झायलो कारने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने त्यांना सुरुवातीस खासगी व नंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अंकुर’ची सांगता

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंकुर फिल्म फेस्टिव्हलचा तिसरा आणि शेवटचा दिवस पर्यावरण, सामाजिक, धार्मिक आणि मानवतावादी विषयावर जागृती करणारा आणि भाष्य करणाऱ्या चित्रपटांचा ठरला. गोध्रा दंगल घडल्यानंतर भारतातील समाजमन मुळापासून हलले. त्या समाज मनाचा ठाव 'हद-अनहद' या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या माहितीपटाने घेतला. निर्मात्या शबनम वीरमणी यांच्या संगीत मैफलीने अंकुर फिल्म फेस्टिव्हल २०१५ ची सांगता झाली.

गोदावरीचे भविष्य हे आपले कर्तव्य असल्याचे सांगणारी 'हरितकुंभ' ही नाशिकमध्ये निर्मित केलेली फिल्म होती. यामध्ये गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी आवाहन करण्यात आले. 'पहिली भेट' हा प्रेम कसे असते हे दाखविणारा माहितीपट होता. 'पणती-द गर्ल' मध्ये स्त्री भ्रूण हत्या विषयावर प्रकाश टाकला आहे. त्यानंतर दो पल, चमत्कारिक पक्षी विश्व, गंगा माँ को दर्द, आम्रपाली ड्रेनेज प्रोब्लेम स्लोव्ह, बहुरूपी समुदाय, व्हिक्टरी आफ्टर कन्टीन्यूअस एफर्ट, विस्तापिताना आधी पुनर्वसन वे, विकास पर्व ऑफ वन मॉर्डन लेज, अनहोनी, डॉ. जे, पुस्तकी आदी या फिल्म दाखविण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक घटल्याने भाज्या कडाडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आवक घटू लागल्याने पालेभाज्या व फळभाज्यांचे दर हळूहळू वाढू लागले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. सध्या वांगे, कारले, गिलके, दोडके व गवार यांचे दर पन्नास रुपयांपर्यंत पोहोचले आहेत तर पालेभाज्यांचे दर दहा ते पंधरा रुपयांनी वाढले आहेत. मात्र, कांदा आणि बटाटा यांचे दर घसरले आहेत. आणखी काही दिवस ​तरीत्यांचे दर फारसे वाढण्याची शक्यता नाही.

आवक व मागणीनुसार कुठल्याही वस्तूचे दर ठरत असतात. गेल्या आठवड्यापर्यंत भाज्यांचे दर पन्नास रुपये किलोच्या आत होते. मात्र, पाणीटंचाईमुळे भाजीपाला लागवडीवर परिणाम झाला आहे. यामुळे आवक घटू लागली आहे. पालेभाज्या मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक यांचे दर पंधरा रुपयांवरून पंचवीस ते तीस रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मेथी व कोथिंबीर २५ ते ३० रुपये जुडीप्रमाणे मिळत आहे. टोमॅटोचीही आवक घटल्याने दर पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. गाजराची आवक मर्यादीत असल्याने वीस रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहेत. समाधानाची बाब म्हणजे रोजच्या वापरातील कांदा आणि बटाटा यांच्या किमती कमी झाल्या आहेत. लाल कांद्याची भरमसाठ आवक होत असल्याने दहा रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. तर, नवीन बटाटा दहा ते पंधरा रुपये किलोने मिळत आहे.

काकडी तीस रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. कोबी व फ्लॉवरचेही दर दहा रुपयांनी वाढले आहेत. मुळा वीस रुपयाला आठ मिळत आहेत.



संत्री, पपईची भरमसाठ आवक

बाजारपेठेत संत्री व पपईची भरमसाठी आवक होत असून, दरही कमी आहेत. संत्री दहा ते वीस रुपये किलो तर, पपई दहा ते पंचवीस रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. चौकाचौकात पपई व संत्री विक्रेते दिसत असून दारोदारी विकणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. यामुळे सध्या नाशिककर या दोन्ही फळांवर ताव मारत आहेत. इतर फळांची आवक मर्यादीत असल्याने त्यांच्या किमती मात्र जैसे थे आहेत.

‌सध्या नाशकात संत्री व पपईची आवक खूपच होत आहे. यामुळे पंधरा ते वीस दिवसांपूर्वी चाळीस रुपये किलोने मिळणारी संत्री आत दहा ते वीस रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. पपईचीही तीच अवस्‍था आहे. दहा रुपये किलो तसेच नगानेप्रमाणेही पपईची विक्री होत आहे. मकरसंक्रातीपर्यंत आवक टिकून राहण्याची चिन्हे असून, दरात वाढ होण्याची शक्यता धूसर आहे. सफरचंदचे दर टिकून असून ८० ते १२० रुपये किलोप्रमाणे मिळत आहेत. चिकू व सिताफळ ६० रुपये किलोने मिळत आहेत. केळीचे दर जैसे थे आहेत.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण करून मुलाला लुटण्याचा प्रयत्न

$
0
0



नाशिक : रस्त्याने पायी जाणाऱ्या अल्पवयीन मुलास मारहाण करून त्यास लुटण्याचा प्रयत्न झाला. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास गंगापूररोडवर घडली. या प्रकरणी तिघा संशयितांविरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गंगापूररोड परिसरातील सौभाग्य नगर येथे राहणारा रवि निजाम सिद्धीकी (वय १७) हा सायंकाळी घराकडे जात असताना पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हावरून शेखर विटकरसह दोघे संशयित त्याच्या जवळ आले. तुझ्या खिशात काय

आहे ते आम्हाला दे, असे म्हणून तिघांनी रविला मारहाण केली. तसेच, त्याच्या गळ्यातील पितळी चेन ओरबाडण्याचा प्रयत्न केला.

स्टोव्हच्या भडक्याने तिघे भाजले

नाशिक : स्टोव्हच्या भडक्यात तीन महिन्यांच्या बालिकेसह दोनजण भाजल्याची घटना मालेगाव येथे घडली. जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पुष्पा सतीश देवरे, सतीश सखाराम देवरे व त्यांची तीन महिन्याची मुलगी वैष्णवी, अशी जखमींची नावे आहते. शनिवारी देवरेंच्या घरात स्टोव्हवर स्वयंपाक होत असताना स्टोव्हचा अचानक भडका उडाला. त्यामुळे पुष्पा यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. त्यात त्या ९० टक्के गंभीररीत्या भाजल्या. तर, सतीश व वैष्णवी ३० टक्के भाजले आहेत.

ज्वेलरी दुकान फोडले

काझीपुरा भागातील मुरलीगंगा अपार्टमेंट येथील ज्वेलरी शॉप चोरट्यांनी शनिवारी रात्री फोडले. या घरफोडीत २८ हजार ६०० रुपयांचे चांदीचे दागिने आणि मोबाइल असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी दुकानमालक महमंद ए. रहमान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकला दर्शनासाठी भाविकांची रीघ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

सलग चार दिवस सुटी आल्याने रविवारी त्र्यंबकेश्वर भाविकांनी गजबजले होते. गर्दीचा उच्चांक झाला असून, शहर पर्यटकांनी व्यापले आहे. मंदिर चौकात उभे राहण्यास देखील जागा शिल्लक नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.

नाताळच्या सुटींमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दीत वाढ झाली आहे. शालेय सहली आणि सलग शासकीय सुटी आल्याने पर्यटक व भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे. सोमवारपासून काही प्रमाणात गर्दी ओसरायला सुरुवात होईल. मंदिरात दर्शनासाठी किमान चार तास लागत आहेत. भाविक पूर्वदरवाजाच्या दर्शन रांगेतून दर्शनास जात होते. अर्थात उत्तर दरवाजाने देणगी दर्शन सुरू होते. मात्र, या रांगेत देखील चांगलीच गर्दी असून तेथे देखील दोन तास थांबावे लागल्याचे भाविकांनी सांगितले.

-

लॉकर सुविधेचा अभाव

भाविकांना मोबाइल आणि बॅग ठेवण्यासाठी येथे खासगी लॉकर सुविधा आहे. मात्र, त्याचा नाहक खर्च भाविकांना करावा लागतो. याकरिता देवस्थान ट्रस्टने विनामूल्य व्यवस्था करावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

--

वाहनांची वर्दळ वाढली

वाहनांची संख्या वाढल्याने नगरपालिकेचे उत्पन्न वाढले आहे. जव्हार फाट्यावर वाहनतळ फी वसूल केली जाते. येथे दोन ते तीन ठिकाणी पोलिस वाहनांची रहदारी नियमन करण्यासाठी असतात. तरी देखील शहरात वाहने दाखल होतात. थेट मंदिराच्या मागील बाजूस वाहने उभी केली जातात.

--

पाणीपुरवठा विस्कळीत

त्र्यंबक शहरात गर्दी वाढली असताना शहराच्या मध्यवस्तीत पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरास अंबोली, गौतमी बेझे आणि अहिल्या अशा तीन धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. अंबोली धरणावर मेन्टेनन्स सुरू केली आहे. म्हणून शहात पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. गर्दीच्या कालावधीत दुरुस्तीचा मुहूर्त काढला म्हणून नागरिकांनी नापसंती व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिकची मदार ज्येष्ठांवरच

$
0
0

प्रशांत भरवीरकर, नाशिक

पूर्वी नाशिक मंत्रभूमी म्हणून ओळखले जायचे, कालांतराने ते तंत्रभूमी म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र फार पूर्वीपासून नाशिकला सांस्कृतिक भूमी अशी ओळख होती, जी आजतागायत टिकून आहे व आता ही सांस्कृतिक भूमी दिवसेंदिवस प्रगतीची शिखरे गाठत आहे. शहराचा नावलौकिक वाढविणाऱ्या अनेक संस्थांपासून अगदी बॉलीवूडचेही शूटिंग होणाऱ्या गोदाघाटापर्यंत सर्वच वास्तू अथवा ठिकाणे प्रगतीचा हा आलेख आणखी उंचावत नेण्यास मदत करीत आहे. एका नव्या महानगराचा विस्तार व विकास जितका वेगाने होऊ पहातोय तितकाच किंबहुना त्याहून अधिक वेग सांस्कृतिक प्रगतीने घेतलाय.

सार्वजनिक वाचनालय

गेली कित्येक वर्षे वाचकांची सेवा करणारे सार्वजनिक वाचनालय सध्या कोर्टकचेरीच्या वादांमध्ये अधिक अडकले आहे. गेल्या वेळच्या कार्यकारिणीने सध्याच्या कार्यकारिणीवर आगपाखड कायम ठेवली आहे. त्यात मधुकर झेंडे आणि श्रीकांत बेणी यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. त्यांनीही माहितीच्या अधिकारात माहिती घेत अर्जफाटे केले. त्यातून कर्नल देशपांडे यांना दंड झाला. 'सावाना' ही वाचकांची संस्था आहे. येणाऱ्या वाचकांच्या हिताचा विचार त्यातून झाला तर अधिक बरे होईल. त्यादृष्टीने या नववर्षात काम होणे गरजेचे आहे.

परशुराम साईखेडकर नाट्यगृह

सार्वजनिक वाचनालयाच्या मालकीचे असलेल्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहाने आता कात टाकलीय. गेल्या अनेक वर्षांपासून रिनोव्हेशनचे काम अडकून पडले होते, मात्र नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी तसेच कार्यकारिणीने चित्रकार आनंद ढाकिफळे यांचे मार्गदर्शन घेत आता हे रूपडे पालटण्यास सुरुवात केली आहे. येत्या वर्षात अनेक बदल 'पसा'मध्ये पहायला मिळतील.

त्यासोबतच नाशिकच्या प्रसिध्द संस्थांमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, संवाद, नाशिक कवी, संस्कृती वैभव, संस्कृती नाशिक, लोकहितवादी मंडळ, दीपक मंडळ, कीर्ती कलामंदिर, कलानंद नृत्यसंस्था, महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिकरोड शाखा, चित्रपट महामंडळ, अश्वमेध थिएटर्स, बाबाज थिएटर्स, ललित कला कॉलेज यांच्यातर्फे अनेकाविध कार्यक्रमांचे आयोजन नेहमीच केले जाते. वर्षभरात अनेक कार्यक्रम होत असतातच त्यात आणखी भरजरी कार्यक्रम या संस्थांनी घ्यावेत अशी सर्वसाधारण अपेक्षा वाचकांची आहे. नाशिकचे सांस्कृतिक नाव सर्वच क्षेत्रात मानाने घेण्यात यावे यासाठी भविष्यकाळात अनेक चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याची वरील संस्थांनी तयारी ठेवावी.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या वर्षभरात नाटक विभाग अधिक कार्यरत राहून अनेक नाटकांचे आयोजन झाले. रंगालय हा उपक्रम त्यापैकीच एक. संगीत व साहित्य विभागानेही काही कार्यक्रम घेत आपले अस्तित्त्व सिध्द केले. नवीन वर्षात प्रतिष्ठानने अनेक नवनवीन उपक्रम हाती घ्यावेत अशी रसिकांची इच्छा आहे. साहित्याच्या क्षेत्रात भरीव योगदान द्यावे असे रसिकांचे म्हणणे असून त्यादृष्टीने प्रतिष्ठानने प्रयत्न करण्याची गरज आहे.

महाकवी कालिदास कलामंदिर

संस्कृती सादरीकरणाला नाट्यमंदिरांचाच आधार असतो. त्यात नाशिकला लाभलेले महापालिकेचे नाट्यमंदिर म्हणजे महाकवी कालिदास कलामंदिर. यंदा वेगवगळ्या वादांनी 'कालिदास' चांगलेच गाजले. कालिदासच्या दूरवस्थेकडे लक्ष खेचल्याने अभिनेते प्रशांत दामले व भरत जाधव यांचे सर्वत्र अभिनंदन झाले. कारण त्यांच्या प्रयत्नातूनच कालिदासला नवीन व्यवस्थापक मिळाला. जुने व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांची बदली करून तेथे प्रकाश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. नव्या वर्षात कालिदासमध्ये अनेक बदल अपेक्षित आहेत. रंगकर्मींच्या जेवणखाण्यासाठी टेबलच्या व्यवस्थेपासून स्टेजवरील स्टेप्स बदलापर्यंत अनेक गोष्टी विचाराधिन आहेत.

गेल्या वर्षात काही ठळक...!

सरत्या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. त्यातील काही महत्त्वाच्या घडमोडींचा उल्लेख केल्याशिवाय सांस्कृतिक वर्तुळ पूर्ण होणार नाही.

जानेवारी

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या नाट्यविभागातर्फे रंगालय या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. रंगालय म्हणजे रंगभूमीचा सांगोपांग विचार. पुणे, मुंबई व महाराष्ट्रातील इतर ठिकाणचेही रंगकर्मी काय विचार करतात, त्यांच्या रंगभूमीच्या कल्पना काय, ते नेपथ्यामध्ये काय प्रयोग करतात?, त्यांची संवादफेक कशी आहे? या सर्वच गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. सुरुवातीला एक विषय घेऊन त्याबाबत व्याख्यान, त्यानंतर नाटकाचा प्रयोग, लगेचच त्यावर प्रेक्षकांशी चर्चा होते. यात रंगकर्मीही सहभाग घेऊन आपापल्या शंका निरसन करून घेतात.

जानेवारीमध्ये कामगार कल्याण नाट्यस्पर्धा हा महत्त्वाचा इव्हेंट असतो. यंदा या स्पर्धेत सखाराम बाईंडरने बाजी मारली. हे नाटक दिग्दर्शनासह ९ पारितोषिकांचे मानकरी ठरले.

फेब्रुवारी

वारकरी सत्कार समिती तसेच विविध संस्थांच्यावतीने ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता मात्र प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने डॉ.मोरे त्यासाठी येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्याचा मानस नाशिककरांच्या मनात राहून गेला.

कुसुमाग्रज स्मारकातर्फे कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ते स्मरणदिन अशा दहा दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गायन, नाट्य तसेच विविध मुलाखतींची मेजवानी यादरम्यान मिळाली. मराठी दिनानिमित्त हा सप्ताह दरवर्षी होतो.

नटसम्राट या नाटकावर बेतलेल्या नटसम्राट या चित्रपटाचा मुहूर्त २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे झाला. त्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी हजेरी लावली.

फेब्रुवारी महिन्यातील आणखी एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे जनस्थान पुरस्कार वितरण. यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अरूण साधू यांना देण्यात आला. मराठी जिवंत ठेवण्यासाठी तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची आज गरज नसून तिचा व्यवहारात कसा उपयोग करून घेता येईल याकडे लक्ष केंद्रित करायला हवे. या कार्यक्रमासाठी प्रथमच मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची हजेरी लाभली.

मार्च

कुसुमाग्रज स्मारकातर्फे 'रिमझिम रिमझिम' नाटक.

प्रा तेरेमसुला यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार.

एप्रिल

एप्रिल महिन्यामध्ये गिरणा गौरव पुरस्काराचे वितरण झाले. या पुरस्कारामध्ये यंदाच्या वर्षापासून जीवनगौरव पुरस्काराची सुरूवात करण्यात आली. पहिला जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रा. भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नेमाडे आले सुध्दा. आपल्या भाषणात ते म्हणाले की, इंग्रजी शाळांचे आक्रमण ही चिंतेची बाब आहे. साम, दाम, दंड, भेद वापरा परंतु इंग्रजीचे हे वर्चस्व झुगारून द्या. आपल्या मुलांना मराठी शाळेत घाला, इंग्रजी शाळेत घालून त्यांचे प्राण घेऊ नका, अफूवर जशी बंदी घालण्यात आली आहे तशी आपण एकजूट करून इंग्रजीवर बंदी आणण्यासाठी चळवळ उभी करा.

मे

नाशिकमधील सांस्कृतिक चळवळीला गती देण्याचा वसा स्वीकारणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाने स्थानिक धडपड्या कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी 'परशुराम सायखेडकर नाट्ययज्ञ २०१५ -१६'चे आयोजन केले. त्याअंतर्गत वर्षभरात बारा दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार होते. काही नाटके झाली, फेब्रुवारी २०१६ पर्यंत काही होणार आहेत. स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी हा नाट्ययज्ञ आयोजित केला आहे. त्यामध्ये एकांकीका, दीर्घांक, नृत्यनाटक, संगीत नाटक, संस्कृत नाटक, तसेच दोन अंकी नाटक यांचे सादरीकरण झाले.

रंगभूमी, नाटकाचा अनुभव असणाऱ्या २० ते ३५ वयोगटाकरिता कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे २२ ते २४ मे या दरम्यान नाट्य जाणीव कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत सुप्रसिध्द दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, नाटककार प्रदीप दळवी तसेच सुप्रसिध्द अभिनेता जितेंद्र जोशी यांनी मार्गदर्शन केले.

सांस्कृतिक भूमी असलेल्या नाशिकच्या आश्रयाला गेली वीस पंचवीस वर्षे राहिलेली महाराष्ट्र साहित्य परिषदेची (मसाप) शाखा एका बड्या हस्तीच्या एका फोनमुळे हस्तांतरीत झाली. परंतु त्यानंतर वर्षभरात एकही कार्यक्रम त्यांच्यातर्फे झाला नाही.

सार्वजनिक वाचनालयामार्फत माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. झेंडे यांनी अनेक अवैधानिक गोष्टी केल्याचा ठपका ठेवत सावानाच्या कार्यकारिणीने त्यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द केले.

जून

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव २०१४-१५ चा विभागीय पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे नाटक 'न ही वैरेन वैरानि' ला नाट्यनिर्मितीच्या पहिल्या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट, मुंबई आयोजित सहाव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे सुरू करण्यात आलेल्या लाख रूपयांच्या अभ्यासवृत्तीसाठी २०१५-१६ या वर्षासाठी प्रणव सखदेव (पुणे) यांची निवड करण्यात आली. मराठीचे संवर्धन, अनुवाद, संशोधन तसेच लेखन यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे २७ फेब्रुवारी २०१३ या मराठी दिनापासून काव्य अभ्यासवृत्ती सुरू करण्यात आली, त्यातील हे तिसरे मानकरी आहेत.

महाकवी कालिदास कलामंदिरातील ढिसाळ व्यवस्थापन, ढासळलेल्या नियोजन व दादासाहेब फाळके स्मारकाच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने तीन दिवस पाच राज्यस्तरीय विजेत्या नाटकांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यात 'न हि वैरेन वैराणि', 'चिंधी बाजार', 'म्या बी शंकर हाय' ही स्पर्धेतील विजेती नाटके सादर झाली.

जुलै

किर्लोस्कर व वसुंधरा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कुसुमाग्रज फिल्म सोसायटी व विश्वास बँक यांच्या सहकार्याने ७ ते १० जुलै दरम्यान किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय महोत्सव झाला. यंदा वसुंधरा मित्र पुरस्कार सुप्रिया आगाशे, संदीप चव्हाण व शिवकार्य गडकोट मोहीम यांना जाहीर करण्यात

आला.

ऑगस्ट

कीर्ती कलामंदिरातर्फे पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सव.

देशभरातल्या १७ पदवीधर स्नातकांना स्मार्ट पदवी. त्यात नाशिकच्या प्रवीण काळोखेंचा समावेश

नृत्यांगना कथक नृत्य संस्थेतर्फे दोन दिवसीय आवर्तन संगीत समारोह.

सप्टेंबर

नाट्यपरिषदेतर्फे ६ नव्या पुरस्कारांची घोषण करण्यात आली.

कालिदासमध्ये प्रथमच प्रायोगिक हिंदी नाटक सादर झाले.

कुसुमाग्रज वाचनालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाची सुरूवात अटलांटाला करण्यात आली.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यवाहपदी मकरंद हिंगणे व उपाध्यणपदी आर्किटेक्ट संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

ऑक्टोबर

सार्वजनिक वाचनालय नाशिकची सर्वसाधारण सभा वादळी झाली. त्यात वाचक वर्गणी दुप्पट करण्यात आली. हा महत्त्वाचा निर्णय होता.

संस्कृती वैभवतर्फे व्याख्यानमाला घेण्यात आली.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ख्याल गायन स्पर्धा.

ज्योती स्टोअर्सतर्फे लेखक तुमच्या भेटीला हा कार्यक्रम झाला. अत्यंत दर्जेदार लेखकांना यात मुलाखतीसाठी बोलाविण्यात येते.

सावाना जिल्हा साहित्यिक मेळावा झाला. यंदा डॉ. विद्यागौरी टिळक व प्रवासवर्णन लेखिका डॉ. मीना प्रभू यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले होते.

महाराष्ट्र २०२५ साहित्य संस्कृती आणि कला सामाजिक पर्यावरण आणि शासकीय धोरण परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक दिग्गजांना बोलाविण्यात आले होते.

मंत्रावळ या व्यावसायिक नाटकाचा शुभारंभ कालिदास कलामंदिरमध्ये करण्यात आला.

नोव्हेंबर

सावाना अमृतस्वर स्पर्धेचे आयोजन.

कुसुमाग्रज स्मारकातर्फे प्रकाशयात्रा कार्यक्रम झाला. यात आतापर्यंतच्या दिवंगतांना एक आकाशकंदिल लावून आदरांजली वाहण्यात आली.

राज्य सरकारतर्फे हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा.

राज्य सरकारतर्फे बालनाट्य स्पर्धा.

डिसेंबर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे कला क्षेत्रातील गौरव पुरस्काराने प्रा. मकरंद हिंगणे यांचा सन्मान.

ख्याल गायन स्पर्धेत रोहित धारप, कौस्तुभ कुलकर्णी प्रथम.

मुरलीधर खैरनार यांची एक्झिट.

लोकहितवादी मंडळाचे 'या ही वळणावर' नाटक राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम.

बालनाट्य स्पर्धेत 'वीज पेरू या अंगात' प्रथम व प्रबोधिनी विद्यामंदिराचे 'शहाणपण देगा देवा' अपंज उत्तेजनार्थ पारितोषिक.

५५ वी महाराष्ट्र राज्य हौशी संस्कृत नाट्यस्पर्धा.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

केळझर धरणातून सटाणा शहरासाठी पिण्याचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. या पाण्याचा वापर शेती सिंचनासाठी धरण व नदीलाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून होऊ नये म्हणून तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील निकवलेसह पसिरातील दहिंदुले, चाफापाडा व डांगसौंदाणे या गावांमध्ये तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे रविवारी (दि. २७) डांगसौदाणे वीजपुरवठा कार्यालयावर शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना घेराव घालून आंदोलन छेडले. संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

निकवेलसह परिसरात दहिंदुले, चाफापाडा, डांगसौदाणे आदी गावांना डांगसौदाणे येथून विद्युत पुरवठा होत असतो. मात्र, डांगसौदाणे सबस्टेशन येथे तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारपासून रविवारपर्यंत वीजपुरवठा खंडित आहे. या कालावधीमध्ये वीजपुरवठा सुरळीत झाला का नाही याची खात्री करण्यासाठी एक ते दोन तास वीजपुरवठा देण्यात आला. त्यानंतर परत वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने कांदा लागवड वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सटाणा शहराला गत काही दिवसांपासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरातील पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता केळझर धरणातून आरम नदीपात्राद्वारे पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याची मागणी वाढण्याचे संकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

निर्यातमूल्य हटविल्यानंतर सोमवारी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरात दोनशे ते तीनशे रुपयांनी सुधारणा झाली. परदेशातून कांद्याला होणारी मागणी लक्षात घेता यापुढील काळात कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दिवाळीनंतर लाल कांद्याची भरमसाट आवक सुरू झाल्याने दरात घसरण झाली. निर्यात मंदावल्यानंतर या महिन्यात सातशे रुपयांपर्यंत भाव घसरले. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने निर्यातमूल्य शुन्य केले. दरम्यान, कांद्याला कोलंबो, दुबई, मलेशिया या बाजारपेठींसह देशांतर्गत बिहार, कोलकाता, गुवाहाटी, दक्षिण भारती आदी ठिकाणाहून मागणी वाढली आहे. नाशिकचा कांदा स्थानिक बाजारपेठेबरोबरच निर्यात होत आहे. पिंपळगाव, लासलगाव, मनमाड या ठिकाणाहून दररोज एक हजार टन कांदा कोलंबो, मलेशिया, दुबई या ठिकाणी निर्यात होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक नगराध्यक्षपदी भाजपच्या लढ्ढा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेल्या त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत शिवसेना नगरसेवकाच्या जिवावर भाजपने सत्ता मिळवली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या विजया दीपक लढ्ढा यांनी शिवसेनेच्या सिंधू दत्ता मधे यांचा एका मताने पराभव केला.

नगराध्यक्ष निवडणुकीमुळे त्र्यंबक नगरपरिषद प्रांगणास पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. बॅरिकेडिंगसह पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. शिवसेनेचे दोन उमेदवारी अर्ज होते त्यापैकी अंजनाबाई मधुकर कडलग या प्रमुख दावेदार मानल्या जात होत्या. त्यांनी आपला अर्ज माघारी घेतला तेव्हाच खऱ्या अर्थाने भाजपचा विजय झाल्याचे चित्र दिसत होते. दुपारी दीड वाजता विजया लढ्ढा आणि त्यांचे समर्थक गटनेते योगेश तुंगार, धनंजय तुंगार, यशोदा अडसरे, आशा झोंबाड, अनघा फडके, यशवंत भोये, अभिजीत काण्णव हे सोबत आले. त्यानंतर जवळपास दहा मिनिटांनी संतोष कदम एकटेच आले. त्यांच्या समवेत सशस्त्र बंदोबस्त होता.

शिवसेनेच्या सिंधू मधे आणि त्यांच्या समवेत गटनेते रवींद्र सोनवणे, रवींद्र गमे, अंजना कडलग, अलका शिरसाठ, तृप्ती धारणे, शकुंतला वाटाणे, ललित लोहगावकर हे होते. दुपारी दोन वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. प्रथम सिंधू मधे यांना त्यांच्या गटाने हात उंचावून मतदान केले. त्यांना आठ मते मिळाली. नंतर विजया लढ्ढा यांच्या गटाने हात उंचावून मतदान केले. त्यांना नऊ मते मिळाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी विजया लढ्ढा यांना विजयी घोषित केले. यामध्ये संतोष कदम हे उपनगराध्यक्षपदी कायम आहेत.

निवड प्रक्रिया पीठासन अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, प्रांताधिकारी यांनी पार पाडली. त्यांच्या समवेत निवासी नायब तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी व मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांनी सहकार्य केले. पोलिस उपाधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, पोलिस निरीक्षक देवीदास पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला. निवड झाल्यानंतर विजया लढ्ढा, दीपक लढ्ढा आणि संजय लढ्ढा यांनी आभार व्यक्त केले. शहरातील प्रमुख मार्गावर मिरवणूक काढण्यात आली.

साधारणत: महिन्याभरापूर्वी अनघा फडके यांनी राजीनामा दिल्यानंतर नाट्यमय प्रसंग घडत गेले. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप सदस्यांनी सेनेत प्रवेश केला. यामध्ये भाजपाकडून दखल घेतली नाही म्हणून तृप्ती धारणे यांनी पुढाकार घेत थेट मातोश्रीवर दाखल होऊन पक्षांतर केले. तोपर्यंत सेनेचा एकमेव सदस्य असलेले संतोष कदम हे भाजपाच्या विजया लढ्ढा यांच्या नगराध्यक्षपदावरील दावेदारीसाठी अज्ञातस्थळी रवाना झाले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा, सेना प्रवेश सेनेतील काही स्थानिक शिवसैनिकांना मान्य नव्हता. त्यामुळे संतोष कदम हे भाजपच्याच गटात राहतील, यावर ठाम राहिले.

कदम ठरले किंगमेकर भाजपाच्या विजया लढ्ढा यांना विजयी करण्यासाठी सेनेचे संतोष कदम यांचे मत निर्णायक ठरले. अर्थात त्यांचे सत्तासमीकरण जुळविण्यासाठी आरपीआयचे शांताराम बागुल आणि त्यांचे सहकारी यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images