Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उपनगरला सिग्नलची कसोटी

$
0
0

उपनगर येथे गेल्या महिन्यात आईसह बालक ट्रकखाली सापडून ठार झाले होते. दीड वर्षापूर्वी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. सिग्नल नसल्यामुळे लहान मोठे अपघात येथे कायम घडत असतात. गेल्या महिन्यात राजकीय पक्षांनी स्पीडब्रेकरसाठी रस्ता खोदण्याचे आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने अखेर सिग्नल बसविले.

तब्बल सहा सिग्नल

उपनगर येथे यापूर्वीही सिग्नल व्यवस्था उभारण्यात आली होती. मात्र, या चौकाला जयभवानी रोडचा रस्ताही येऊन मिळतो. त्यातच चौकात दोन्ही बाजूला बसस्टॉप आहेत. त्यामुळे सिग्नल व्यवस्था फेल झाली होती.

परिणामी निष्पापांचे बळी गेले होते. आता सहा सिग्नल उभारण्यात आले असून ते लवकरच कार्यान्वित केले जाणार आहेत. मात्र, वाहनचालक किती व कसे सहकार्य करतात यावर सिग्नलचे यश अवलंबून आहे.

000000 सर, एन्काऊंटर का ऑर्डर कौन देता है? म. टा. प्रतिनिधी, सातपूर 'सर, आपके एन्काऊंटर का ऑर्डर कौन देता है? असा निरागस प्रश्न चौथीच्या विद्यार्थ्यांनी थेट पोलिसांनाच विचारला आणि पोलिसांसह उपस्थित शाळेचे शिक्षकही अवाक् झाले. निमित्त होते 'रेझिंग डे'चे. गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये घडलेल्या या संवादामुळे नव्या पिढीवर प्रसार माध्यमांचा होणारा भडिमार आणि त्यांच्या मनामध्ये पोलिस प्रशासनाबद्दल निर्माण झालेले आकर्षण दर्शविणारे आहे. शहरातील सर्व शाळा, कॉलेजेसमध्ये 'रेझिंग डे'निमित्त विद्यार्थ्यांना पोलिसांकडून सुरक्षेबाबत माहिती दिली जात आहे. यात काही विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी पोलिस ठाण्यात आणले जात आहेत. गंगापूररोडवरील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी गंगापूर पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी माहिती दिल्यावर विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास प्रश्न विचारण्यास सांगण्यात आले. यावर एका विद्यार्थ्यांने 'सर आपको एन्काऊंटर का ऑर्डर कौन देता है?' असा प्रश्न करीत सर्वांनाच आर्श्चयात टाकले. यावर पोलिस निरिक्षक रमेश यादव यांनी असे कोणीही ऑर्डर देत नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांचे समाधान होईल असे स्पष्टीकरण दिले. कारवाई करीत असतांना गुन्हेगारांकडून गोळीबार झाला तर पोलिस आपल्या बचाव करण्यासाठी प्रत्युत्तर देतात. यात काही वेळा फायरिंग देखील केले जाते. तसेच चित्रपटात दाखविले जाणारे प्रसंग काल्पनिक असतात. त्यावर विश्वास ठेवू नका, असेही यादव यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन याप्रसंगी पोलिसांनी पोलिस ठाण्यात कशा प्रकारे कामकाज चालते. स्वतःची सुरक्षा कशी घ्यावी, शस्त्रांची हातळणी कशी करतात याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. ऐरवी चित्रपटात किंवा सिरियलमध्ये दिसणाऱ्या बंदुका, रायफल खऱ्या समोर बघायला मिळाल्यावर विद्यार्थी हरखून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निर्माता संघ करंडक दीर्घांक स्पर्धेचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक


मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ आणि झलक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय दीर्घांक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. निर्माता संघ करंडक दीर्घांक स्पर्धा ही गुणवंतांचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे.


झलक हा एक मराठी कलाविश्वात सादर होणाऱ्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या प्रचार आणि प्रचारासाठी निर्माण केलेला सांस्कृतिक उपक्रम आहे. याद्वारे मराठी कलाविश्व अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे म्हणून सोशल मीडियाच्या प्रत्येक शाखेद्वारे प्रसार केला जातो. झलकच्या या कार्याची दखल घेऊन मराठी नाट्य व्यावासायिक निर्माता संघाने यावर्षी या स्पर्धेच्या आयोजनात सहभागी होण्याचा मान झलकला दिला आहे. यंदा स्पर्धेचे तिसरे वर्ष असून, प्राथमिक फेरी ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी नाशिक, कणकवली, पुणे, मुंबई या चार शहरांमध्ये होणार आहे. शेवटच्या फेरीमध्ये १५ दीर्घांकाची निवड केली जाइल. निवड झालेल्या दीर्घांकाची अंतिम फेरी ४, ५, ६, ७ एप्रिल या कालावधीत मुंबई येथे होणार आहे.


दीर्घांक स्पर्धेतील प्रथम पुरस्काराचे स्वरूप रोख एक लाख रुपये व मानचिन्ह, तर द्वितीय आणि तृतीय पुरस्कार अनुक्रमे ७५ हजार व ५० हजार असे आहे. सर्वोत्कृष्ट लेखक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनय यांना प्रत्येकी ११ हजार रुपये तसेच संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा यासाठी पाच हजार रुपये असे बक्षिस देण्यात येणार आहे.


स्पर्धेसंबंधी विस्तृत माहिती, नियमावली व अर्ज झलकमराठी डॉट कॉम वर उपलब्ध आहे. दिनांक १५ जानेवारीपर्यंत प्रवेश अर्ज व इतर संबंधित गोष्टी जोडून माहिती लिहिलेल्या पत्त्यावर पोहोचले पाहिजे. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. अधिक माहितीसाठी संदीप विचारे (९८२१३३२४११), सई काळे (९१६७८४८५८६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर, एन्काऊंटर का ऑर्डर कौन देता है?

$
0
0

'रेझिंग डे' उपक्रमात विद्यार्थ्यांचा पोलिसांना सवाल


म. टा. प्रतिनिधी, सातपूर


'सर, आपके एन्काऊंटर का ऑर्डर कौन देता है? असा निरागस प्रश्न चौथीच्या विद्यार्थ्यांनी थेट पोलिसांनाच विचारला आणि पोलिसांसह उपस्थित शाळेचे शिक्षकही अवाक् झाले. निमित्त होते 'रेझिंग डे'चे. गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये घडलेल्या या संवादामुळे नव्या पिढीवर प्रसार माध्यमांचा होणारा भडिमार आणि त्यांच्या मनामध्ये पोलिस प्रशासनाबद्दल निर्माण झालेले आकर्षण दर्शविणारे आहे.


शहरातील सर्व शाळा, कॉलेजेसमध्ये 'रेझिंग डे'निमित्त विद्यार्थ्यांना पोलिसांकडून सुरक्षेबाबत माहिती दिली जात आहे. यात काही विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी पोलिस ठाण्यात आणले जात आहेत. गंगापूररोडवरील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी गंगापूर पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी माहिती दिल्यावर विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास प्रश्न विचारण्यास सांगण्यात आले. यावर एका विद्यार्थ्यांने 'सर आपको एन्काऊंटर का ऑर्डर कौन देता है?' असा प्रश्न करीत सर्वांनाच आर्श्चयात टाकले. यावर पोलिस निरिक्षक रमेश यादव यांनी असे कोणीही ऑर्डर देत नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांचे समाधान होईल असे स्पष्टीकरण दिले. कारवाई करीत असतांना गुन्हेगारांकडून गोळीबार झाला तर पोलिस आपल्या बचाव करण्यासाठी प्रत्युत्तर देतात. यात काही वेळा फायरिंग देखील केले जाते. तसेच चित्रपटात दाखविले जाणारे प्रसंग काल्पनिक असतात. त्यावर विश्वास ठेवू नका, असेही यादव यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन

याप्रसंगी पोलिसांनी पोलिस ठाण्यात कशा प्रकारे कामकाज चालते. स्वतःची सुरक्षा कशी घ्यावी, शस्त्रांची हातळणी कशी करतात याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. ऐरवी चित्रपटात किंवा सिरियलमध्ये दिसणाऱ्या बंदुका, रायफल खऱ्या समोर बघायला मिळाल्यावर विद्यार्थी हरखून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांच्या अतिक्रमणामुळे कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक


जुने नाशिकच्या मुख्य रसत्यांवर बेशिस्तपणे तासनतास उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीचा फज्जा उडत आहे. या वाहनांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहतूक पोलिस मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याने बेशिस्त वाहनचालकांचे फावले आहे. यामुळे रस्ते अरुंद होऊन अपघात वाढले आहेत.


नाशिकचे प्रवेशद्वार समजला जाणारे द्वारका परिसर येथून ते थेट गोल्फ क्लबच्या गडकरी चौक पर्यंतच्या दरम्यान मुख्य रस्ता दुकानदार, गॅरेज, कार दुरुस्ती व्यावसायिक यांच्या अतिक्रमणांमुळे गजबजलेला आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. भर रस्त्यावर वाहने उभी करून ती दुरुस्ती केली जातात. शिंगाडा तलाव परिसरातील कार दुरूस्ती दुकानांसमोर तर वाहनांचा गराडा कायम असतो. वडाळानाका परिसरात गॅरेज, वेल्डिंग वर्क्स आदींचे कामे केली जातात. सारडा सर्कल येथून द्वारका मार्गावर देखील दुकानदार, गॅरेज व चिकन मटण विक्रेत्यांचे अतिक्रमणे केली आहेत.

गादी, उशी भरणारे व्यावसायिक तर रस्त्यावर गादी पिंजत असतात. यामुळे रस्ता अरुंद झाला असून अनेक अपघात घडतात. अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरला सिग्नलची कसोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जवळपास दररोज होणऱ्या अपघातांमध्ये अनेक बळी गेल्यानंतर उपनगर नाका सिग्नल व्यवस्था उभारण्यात आली आहे. मात्र, येथे चारपेक्षा अधिक रस्ते येऊन मिळत असल्याने सहा सिग्नल उभारावे लागले आहेत. वाहनचालकांबरोबरच सिग्नलचही कसोटी लागणार आहे.

उपनगर येथे गेल्या महिन्यात आईसह बालक ट्रकखाली सापडून ठार झाले होते. दीड वर्षापूर्वी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. सिग्नल नसल्यामुळे लहान मोठे अपघात येथे कायम घडत असतात. गेल्या महिन्यात राजकीय पक्षांनी स्पीडब्रेकरसाठी रस्ता खोदण्याचे आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने अखेर सिग्नल बसविले.

तब्बल सहा सिग्नल

उपनगर येथे यापूर्वीही सिग्नल व्यवस्था उभारण्यात आली होती. मात्र, या चौकाला जयभवानी रोडचा रस्ताही येऊन मिळतो. त्यातच चौकात दोन्ही बाजूला बसस्टॉप आहेत. त्यामुळे सिग्नल व्यवस्था फेल झाली होती.
परिणामी निष्पापांचे बळी गेले होते. आता सहा सिग्नल उभारण्यात आले असून ते लवकरच कार्यान्वित केले जाणार आहेत. मात्र, वाहनचालक किती व कसे सहकार्य करतात यावर सिग्नलचे यश अवलंबून आहे.


सहकार्याचे आवाहन

नगरसेविका सुमन ओहोळ म्हणाल्या, की प्रचंड वाहतूक आणि चौकाची विचित्र परिस्थिती यामुळे वाहतूक नियमन आव्हानच आहे. सिग्नल व्यवस्था यशस्वी होण्यासाठी वाहनचालकांनी सहकार्य करावे. सिग्नल १२ जानेवारीपर्यंत कार्यान्वित होतील. बसस्टॉपमुळे सिग्नल फेल होऊ शकतात हे लक्षात घेऊन महापालिका कार्यकारी अभियंता संजय पवार, विजय ओहोळ यांनी पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वत:च्याच जिवाशी खेळ

$
0
0

वाहनचालक, पादचाऱ्यांचा आडमुठेपणा; उड्डाणपुलाखाली दुभाजकास विरोध

म. टा. प्रतिनिधी, सिडको


उड्डाणपुलाखाली वाहनचालक व पादचाऱ्यांनी ठिकठिकाणी दुभाजकांना तोडल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम महामार्ग प्राधिकरणाने सुरू केले आहे. मात्र, त्यास नागरिकांकडून विरोध केला जात आहे. पार्थडी फाटा, राणेनगर ते लेखानगर कार्नरपर्यंत अनेक ठिकाणी पंक्चर आहेत. यामुळे अनेकदा अपघात होतो. या परिस्थितीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या महापालिकेच्या प्रयत्नांना खीळ घातत नागरिक स्वत:च्या जिवाशी खेळत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.


पार्थडी फाटा, राणेनगर ते लेखानगर कार्नरपर्यंत उड्डाणपुलाखाली टाकण्यात आलेले सर्व्हिस रोडचे दुभाजक वाहनचालक व पादचाऱ्यांनी पंक्चर केले आहेत. यामुळे उड्डाणपुलाखालून शॉर्टकट मारतांना अनेकदा अपघात झाले आहेत. याबाबत प्रसिद्धी माध्यमांनी उड्डाणपुलाखाली सर्व्हिसरोडवरून शॉर्टकट मारतांना होणाऱ्या अपघातांची देखल घेत वाहनचालक घातक प्रवास करत असल्याचे मांडले होते. मात्र, यापासून बोध न घेता आजही वाहनचालक व पादचारी जीव धोक्यात घालून प्रवास करतांना दिसतात. महामार्ग प्राधिकरणाने विविध ठिकाणी पंक्चर केलेले दुभाजक दुरुस्ती करण्याचे काम ठेकेदाराकडे सोपविले आहे. मात्र, या दुभाजकांची दुरुस्ती करत असतांना वाहनचालक, पादचारी व उड्डाणपुलाखाली वाहने पार्क करणाऱ्यांकडून विरोध केला जात असल्याचे ठेकेदाराच्या कामगारांनी सांगितले. शार्टकट मारतांना होणाऱ्या अपघाताबाबत वाहनचालक व पादचाऱ्यांना माहिती असून दुभाजकांना विरोध करत असल्याने ते आपल्या जिवाशीच खेळ करत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. महामार्ग प्राधिकरणाने विरोध करणाऱ्यांवर पोलिस कारवाईची मागणी केली जात आहे.


नागरिकांच्या सुरक्षेसाठी उड्डाणपुलाखाली दुभाजक टाकण्यात आले आहेत. शॉर्टकट मारण्यासाठी दुभाजकांची अनेक ठिकाणी तोडफोड केली आहे. यात महामार्ग प्राधिकरणाने दुभाजक टाकले पाहिजे. भविष्यात अपघातात जीव गेल्यास जबाबदार कोण राहिल?
- नितीन अमृतकर, सिडको

उड्डाणपुलाखाली चारचाकी वाहने पार्क करता यावीत म्हणून काही वाहतूकदार दुभाजकांना विरोध करत आहेत. परंतु, तोडलेल्या दुभाजकातून सर्व्हिसरोडवर येतांना अनेक अपघात झाले आहेत. असा जीव धोक्यात घालणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे.
- चेतन नेहते, रहिवाशी, राणेनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर, एन्काऊंटर का ऑर्डर कौन देता है?

$
0
0

शहरातील सर्व शाळा, कॉलेजेसमध्ये 'रेझिंग डे'निमित्त विद्यार्थ्यांना पोलिसांकडून सुरक्षेबाबत माहिती दिली जात आहे. यात काही विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी पोलिस ठाण्यात आणले जात आहेत. गंगापूररोडवरील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी गंगापूर पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी माहिती दिल्यावर विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास प्रश्न विचारण्यास सांगण्यात आले. यावर एका विद्यार्थ्यांने 'सर आपको एन्काऊंटर का ऑर्डर कौन देता है?' असा प्रश्न करीत सर्वांनाच आर्श्चयात टाकले. यावर पोलिस निरिक्षक रमेश यादव यांनी असे कोणीही ऑर्डर देत नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांचे समाधान होईल असे स्पष्टीकरण दिले. कारवाई करीत असतांना गुन्हेगारांकडून गोळीबार झाला तर पोलिस आपल्या बचाव करण्यासाठी प्रत्युत्तर देतात. यात काही वेळा फायरिंग देखील केले जाते. तसेच चित्रपटात दाखविले जाणारे प्रसंग काल्पनिक असतात. त्यावर विश्वास ठेवू नका, असेही यादव यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन

याप्रसंगी पोलिसांनी पोलिस ठाण्यात कशा प्रकारे कामकाज चालते. स्वतःची सुरक्षा कशी घ्यावी, शस्त्रांची हातळणी कशी करतात याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. ऐरवी चित्रपटात किंवा सिरियलमध्ये दिसणाऱ्या बंदुका, रायफल खऱ्या समोर बघायला मिळाल्यावर विद्यार्थी हरखून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासासाठी घेतला मंदिरांचा आसरा

$
0
0

अमळनेरमधील मंदिरांत विद्यार्थ्यांची गर्दी

म. टा. वृत्तसेवा, अमळनेर
शालेय आणि स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासाशिवाय तरणोपाय नाही. तसेच विविधस्तरातील परीक्षेला सामोरे जातांना कठीण अभ्यास असतो. जर घरात अभ्यासाला पोषक वातावरण नसेल तर विद्यार्थी वेगवेगळी शांत ठिकाणे शोधतात. अशीच काहीशी पद्धत अमळनेरमधील विद्यार्थ्यांनी अवलंबली आहे. चोपडा रस्त्यावरील गायत्री मंदिरात भक्तांपेक्षा विद्यार्थ्यांचीच अधिक गर्दी दिसायला लागली आहे. त्यांना अभ्यासासाठी याठिकाणी शांतता मिळत असल्याने विद्यार्थी याठिकाणी रमत आहेत.


शहरातून बाहेरच्या भागात असलेल्या गायत्री मंदिरात पैलाड, ताडेपुरा, शनिपेठ, आंबेडकर हॉस्टेल, आणि देवळी येथील विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. या भागातील बहुसंख्य कुटुंब ही दारिद्र्ये रेषेखालील आहेत. शिवाय या भागात घरे जवळजवळ असल्याने अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी शांत आणि चांगले वातावरणच्या शोधात असतात.

समस्यांवर उपाय

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिकाही उपलब्ध नाहीत. म्हणून विद्यार्थी अभ्यासासाठी शाळा, महाविद्यालयाच्या लायब्ररीत जातात. तर पैलाड भागातील विद्यार्थी हे गायत्री मंदिर आणि परिसरात वेगवेगळ्या मंदिरात येतात. हा पर्याय त्यांच्या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणून सिद्ध होत आहे. तसेच हा परिसर शहरापासून लांब असल्याने येथे खूप शांतता असते. मंदिर परिसरातील झाडांच्या सावलीत विद्यार्थी अभ्यास करत आहेत. अभ्यासाला कंटाळला आला तर एकत्रितपणे अभ्यासावर चर्चा करतात. ग्रुपने अभ्यासाची चर्चा केली तर अभ्यास अधिक लक्षात राहतो, असेही
त्यांचे मत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आराईच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा तालुक्यातील आराई ग्रामपंचायतीचे सरपंच विजय सोनवणे यांच्याविरूध्द दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. आराई ग्रामपंचायतीचे सरपंच सोनवणे हे सदस्यांना कामकाजात विश्वासात घेत नाहीत, तसेच कामकाज करीत असतांना मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्या कारणाने १२ सदस्यांनी त्यांच्या विरूद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.


आराई ग्रामपंचातीच्या कार्यालयात तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करून अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. सभेस ग्रामपंचातीचे १५ सदस्य उपस्थित होते. त्यापैकी त्यांच्या विरूध्द १२ सदस्यांनी मतदान केल्याने सरंपच सोनवणे यांच्यावरील अविश्वास बहुमताने मंजूर करण्यात आला. यावेळी माजी सरपंच दिलीप सोनवणे, सदस्य छाया तलवारे, ज्योती अहिरे, एकनाथ अहिरे, साधना वसंत अहिरे आदि उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीला जाळून मारले; पतीला जन्मठेपेची शिक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पत्नीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून ठार मारल्या प्रकरणी निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने एकास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संजय संपत मोरे, रा. वडाळीभोई, ता. चांदवड असे आरोपीचे नाव आहे.


१२ डिसेंबर २०१२ रोजी पती संजय संपत मोरे याने त्याने दारु पिण्यासाठी पैसे मागितले होते. पत्नी शोभाने पैसे नकार दिल्यानंतर संजयने घरातील स्टोव्हमधून रॉकेल तिच्या अंगावर फेकले. त्यानंतर घरातील पेटता दिवा अंगास लागल्याने आपण भाजलो असल्याचा जबाब शोभा हिने उपचारांदरम्यान दिला होता. त्यानंतर शोभाचा मृत्यू झाला होता. संपत मोरे याच्याविरुध्द वडाळीभोई पोलिस स्टेशनला भादवि कलम ३०७ अन्वये, तर उपचारादरम्यान शोभाचा मृत्यू झाल्याने भादवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपासाअंती सदर खटल्याचे आरोपपत्र निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अॅड यू. डी. गवांदे यांनी तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रिया थोरात यांच्यासह एकूण बारा साक्षिदारांची साक्ष नोंदविली.


सदर खटल्याची अंतिम सुनावणी होऊन आरोपी संजय संपत मोरे यास भादवि कलम ३०२ अन्वये दोषी ठरवत जन्मठेप व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. जे. मंत्री यांनी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनाच्या धडकेत चिमुरडे बहीणभाऊ ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही शिवारात अज्ञात वाहनाने मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चिमुरड्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चांदवड पोलिसांत बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. फरारी पिकअप व्हॅनचालकाचा पोलिस शोध घेत आहेत. या अपघातात २ जण जखमी झाले आहेत.

कातरणी येथील केशव दशरथ सूर्यवंशी मुलगा प्रेम (६ वर्षे) आणि मुलगी अर्पिता (४ वर्षे) या दोन मुलांसह मोटारसायकल (एमएच १५ एफसी २०७३)ने समिट रेल्वे स्थानकाकडे जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात प्रेम व अर्पित जागीच ठार झाले. तर केशव सूर्यवंशी व हनुमान कुशारे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर चांदवड येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नाशिक सिव्हिलला रवाना करण्यात आले आहे. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या दोन बालकांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन

$
0
0

पोलिसांकडून वृध्दांना स्वेटर, ब्लँकेट व फळांचे वाटप

म. टा. वृत्तसेवा, येवला

खाकी वर्दीच्या आत देखील माणसातील माणूसपण जपणारं मन असते. हे येवला तालुका पोलिसांनी
दाखवून देताना तालुक्यातील एका वृद्धाश्रमातील वृद्धांना मदतीचा हात दिला. समाजातील उपेक्षित घटकांसाठी आपणही काहीतरी देणं लागतो या भावनेतून येवला तालुका पोलिसांनी तालुक्यातील शिरसगांव लौकी येथील सैंग ऋषी वृध्दाश्रम गाठताना तेथील वृध्दांना स्वेटर, ब्लँकेटसह फळांचे वाटप केले. तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रुपचंद वाघमारे यांच्या संकल्पनेतून 'रेझिंग डे' सप्ताहातंर्गत हा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

शिरसगांव लौकी येथील नवनाथ नारायण जऱ्हाड यांनी स्वखर्चाने सैंग ऋषी वृध्दाश्रमाची स्थापना केली आहे. जऱ्हाड यांनी आदीगुरु दत्तात्रेय प्रभू कृपा फाऊंडेशनची स्थापना केलेली असून शासनाकडून अथवा कोणाकडून कशाचीही अपेक्षा न बाळगता ८ ते ९ वृध्दांना सहारा दिला आहे. १५ बाय ३० फुट आकाराच्या या आश्रमात नव्याने ३० बाय १०० फुटाचे बांधकाम सुरु आहे.याच आश्रमाला येवला तालुका पोलिसांनी भेट देत तेथील वृद्धांना स्वेटर, ब्लँकेटसह फळांचे वाटप केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेरिब्रल पाल्सीवर स्टेमसेल उपचार शक्य’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेरिब्रल पाल्सी हा आजार बराच होऊ शकत नाही असा समाजात गैरसमज आहे. मात्र, नवनव्या संशोधनांमुळे या आजारातून पेशंटला काही प्रमाणात बाहेर काढणे शक्य आहे. त्यासाठी स्टेमसेल थेरपी उपयोगी ठरत असल्याचा दावा न्युरोजेन ब्रेन अॅण्ड स्पाईन इन्स्टिट्यूटच्या उपसंचालक डॉ. नंदिनी गोकुळचंद्रन यांनी बुधवारी पत्रकार प‌रिषदेत केला.


डॉ. गोकुळचंद्रन म्हणाल्या, 'सेरिब्रल पाल्सीबाबत समाजातील अनेक गैरसमजामुळे पेशंट आयुष्यभर आपल्या कुटुंबीयांवर अवलंबून रहातो. सेरिब्रल पाल्सीवर उपचारच नाहीत, असाही अपप्रचार केला जातो. मात्र, स्टेमसेल थेरपीच्या माध्यमातून सेरिब्रल पाल्सीवर उपचार शक्य आहेत. लहान वयात सेरिब्रल पाल्सीवर उपचार सुरू केल्यास चांगले परिणाम पहायला मिळतात.' यावेळी स्टेमसेलच्या माध्यमातून उपचार झालेल्या नाशिकच्या दोन पेशंटची माहिती यावेळी देण्यात आली. स्टेमसेल थेरपीनेच सेरिब्रल पाल्सी या आजारावर नियंत्रण आणणे शक्य नाही तर त्याबरोबर इतरही थेरपी व समुपदेशनाची गरज पडते. यात न्युरोजेन ब्रेन अॅण्ड स्पाईन इन्स्टिट्यूट महत्त्वाचे भूमिका पारपाडत असल्याचे डॉ. गोकुळचंद्रन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारमच्या आरोग्य केंद्राला स्टाफ देण्याचे आश्वासन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य शासनाची मंजुरी मिळतानाच नव्या वास्तूचे बांधकाम होऊन उभ्या राहिलेल्या येवला तालुक्यातील भारम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरच सर्व स्टाफ मिळणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्वच स्टाफ देण्याची ग्वाही त्यांच्या भेटीसाठी मुंबईत गेलेल्या येवल्यातील शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली.

आरोग्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे केवळ अधिकारी अन् कर्मचाऱ्यांअभावी बंद असलेले भारमचे प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच या भागातील जनतेच्या सेवेत कार्यान्वित होईल, असा विश्वास येवला पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी व्यक्त केला आहे. येवला तालुक्याच्या पूर्व भागातील भारम येथे राज्य शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले जाताना या केंद्राच्या इमारतीचे बांधकामही गेल्या आठ महिन्यांपूर्वी पूर्ण झालेले आहे. इमारत उभी राहिली खरी मात्र या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी वर्गाची अद्यापपावेतो नियुक्ती झालेली नसल्याने हे आरोग्य केंद्र बंदच आहे. येवला पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, पंचायत समिती सदस्य दिलीप मेंगळ तसेच साहेबराव सैद, रवी काळे या शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने मुंबईत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची भेट घेत या प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत त्यांचे लक्ष वेधले. यावेळी संभाजी पवार यांनी येवला तालुक्यातील इतर ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधील दुरवस्थेची तपशीलवर माहितीही दिली. आरोग्यमंत्र्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.


येवला शहरात सध्या कार्यान्वित असलेल्या येवला ग्रामिण रुग्णालयाच्या इमारतीतच राज्य शासनाने मागे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी दिली आहे. मात्र, याबाबत स्टाफ व इतर अत्याधुनिक सोयीसुविधांच्या बाबतीत पुढील कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याकडेही यावेळी शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे लक्ष वेधले. येवला तालुक्यातील कुसूर येथे राज्य शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे, असे साकडेही एका लेखी निवेदनाद्वारे यावेळी शिष्टमंडळाने डॉ. सावंत यांना घातले. या भेटीप्रसंगी निफाडचे आमदार अनिल कदम हेही उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध नळजोडण्यांवर संक्रांत

$
0
0

मालेगाव महापालिकेने राबवली मोहीम; १६ लाखाहून अधिक रुपयांचा दंड वसूल


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहराच्या मनपा हद्दीतील अवैध नळजोडणी धारकांवर पालिका प्रशासनाने सलग तीन दिवस कारवाई करून १६ लाख रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे. शहरातील चारही प्रभागांमध्ये एकावेळी मनपा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईने अवैध नळजोडणीधारकांचे धाबे दाणाले आहे. शहरात होणारी पाणीचोरी आणि पालिकेच्या महसुली नुकसानीला आळा बसणार असल्याने नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

सलग तिस-या दिवशी चारही प्रभागात मनपाच्या नियंत्रण अधिकारी आणि कर्मचा-यांनी कारवाई सुरू ठेवली. चारही प्रभागात एकूण ११ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या, तर १०२ नळ जोडणीधारकांकडून ९ लाख ५० हजार ६१६ रुपये तिसऱ्या दिवशी वसूल करण्यात आले. सुरुवातीच्या दोन दिवसात कारवाई पथकाला अनेक ठिकाणी नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. मात्र, तिसऱ्या दिवशी अनेकांनी दंड भरून नळजोडणी अधिकृत करून घेण्यास प्राधान्य दिले. मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी भेटीदेवून पाहणी केली आहे.

या कारवाईत मनपा उपायुक्त कमरुद्दीन शेख, पाणी पुरवठा अभियंता जाहीर अंसारी, शहर अभियंता कैलास बच्छाव, पंकज सोनवणे, अनिल पारेख, जयपाल त्रिभुवन, मंगेश गवांदे आदींसह वर्ड लिपिक व कर्मचारी यांनी काम पहिले आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असताना पाणी चोरीद्वारे कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. शिवाय, पाणीचोरांना कोणताही धाक उरलेला नाही अशी ओरड सर्वत्र झाल्याने अखेर मनपाने केलेल्या या कारवाईला तीन दिवसांत चांगले यश येत आहे. या कारवाईत मनपाच्या महसुलातही भरघोस वाढ होणार आहे. तीन दिवसाच्या कारवाईत एकूण १६ लाख १५ हजार ९५७ रु इतका दंड वसूल झाला आहे.


कारवाईचा बडगा

खंडित नळ जोडणी- २६
एकूण अधिकृत केलेल्या
नळजोडणी- १८५
दंड वसुली- १६ लाख
१५ हजार ९५७ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१५३ अर्जांची विक्री; १५ दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अर्ज विक्री आणि दाखल करण्याच्या प्रक्रियेस सोमवारपासून सुरुवात झाली. गुरुवारी कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलचे प्रणेते आणि भाजप नेते अद्वय हिरे यांनी समर्थकांसह सोसायटी गटातून अर्ज दाखल केला. दरम्यान, शुक्रवारपर्यंत १५३ अर्जांची विक्री झाली, तर १५ अर्ज दाखल झाले.

गुरुवारी अर्ज दाखल केल्यानंतर अव्दय हिरे यांनी संपर्क कार्यालयात सभा घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार डॉ. अपूर्व हिरे, डॉ. प्रशांत हिरे, सुनील गायकवाड, धर्मा भामरे, शांताराम लाठर, भिकन शेळके, काशिनाथ पवार, संदीप पाटील, दीपक निकम, पवन ठाकरे, दीपक पवार, नितीन पोफळे आदी उपस्थित होते. बाजार समितीसाठी गेल्या चार दिवसात एकूण १५ अर्ज दाखल झाले आहेत. यात सोसायटी गटातून आठ, ग्रामपंचायत गटातून पाच व हमाल मापारी गटातून दोन अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या चार दिवसात इच्छुकांची चांगलीच गर्दी झाली असून, एकूण १५३ अर्ज विक्री झाल्याची माहिती बाजार समिती सचिव अशोक देसले यांनी दिली.

'परिवर्तन करणार'

देशाने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमुक्त भारत केला. आता आपल्याला शिवसेनामुक्त तालुका करायचा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीसह आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीवर सुध्दा भाजपची सत्ता स्थापन करायची आहे. तालुक्यात १५ वर्षांपासून रोजगार निर्मिती नाही, की रस्ते नाहीत. पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तो सगळा अनुशेष भरून काढायचा आहे. कृऊबावर कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलच्या सर्वच्या सर्व १८ जागा जिंकून परिवर्तनाची सुरुवात करणार आहोत, असे प्रतिपादन भाजप नेते अद्वय हिरे यांनी केले. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे नेते डॉ. अपूर्व हिरे व डॉ. अद्वय हिरे यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल निर्मित केले आहे. डॉ. अद्वय हिरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या पार्श्वभूमीवर आयोजीत सभेत ते बोलत होते.

माजी मंत्री डॉ. प्रशांत हिरे म्हणाले की, राजकारणासह समाजकारणात महिलांना समान न्याय देत त्यांना सक्रिय प्रवाहात आणावे. काटवण-माळमाथा असा प्रादेशिक वाद टाळून गटातटाचे राजकारण न करता सर्व समावेशक असे माधवराजा या न्यायाने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देत कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलची बांधणी करावी. आमदार डॉ. अपूर्व हिरे म्हणाले की, जिल्हा बँक, शेतकरी संघ, जिल्हा कृषी औद्योगिक संघ आदी निवडणुकांत आपण सक्षम उमेदवार दिल्याने त्याची परिणिती विजयात झाली. कृऊबामध्ये त्याची पुनरावृत्ती घडवायची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिमकार्डमुळे सापडले खूनप्रकरणातील संशयित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

भरवस फाटा-शिर्डी रस्त्यावर बुधवारी आढळून आलेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी चार संशयितांना लासलगाव पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. घटनास्थळी सापडलेल्या मोबाइलच्या सिमकार्डवरून मृत तरुणाची ओळख पटली. घटनास्थळी दगडी गोटा व बॅटरी आढळून आली.

मृत तरुणाचे नाव रोहन दिवे (देवपूर, ता. सिन्नर) असे आहे. त्याच्या सिमकार्डवरून मंगेश रावसाहेब गडाख (रा. देवपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. चोरीच्या वाहनांवरून दिवे याने, तुमची नावे पोलिसांना सांगतो अशी धमकी दिल्याने कैलास दत्तात्रय जगताप, सागर चांगदेव जगताप, गणेश दिगंबर जाधव, मंगेश गडाख यांनी रोहनला बोलावून विंचूर वाइन पार्क येथे बिअरमधून विषारी औषध पाजले. नंतर भरवस फाटा येथे नेऊन डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची कबुली या चौघांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यापैकी कैलास व सागर यांना पोलिसांनी अटक केली. कैलास व सागर यांना न्यायालयाने ११ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याची औषध कंपनीला नोटीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या निफाड तालुक्यात कॅमसन कंपनीच्या कॅलनोव्हा या औषधामुळे काळवंडलेल्या द्राक्षबागांची तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. द्राक्षांचे नमुने तपासण्यासाठी पुणे येथील लॅबमध्ये पाठवले आहेत. दरम्यान, विंचूर येथील संजय शेवाळे या शेतकऱ्याने कॅमसन कंपनीला साडेबारा लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी करून कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

कॅमसन कंपनीच्या औषधामुळे निफाड तालुक्यातील पिंपळगाव अंतरवेली, आहेरगाव, विंचूर, शिवडी, गाजरवाडी, कारसूळ, दावचवाडी, लोनवाडी, उगाव, नैताळ आदी गावातील अडीचशे ते तीनशेहून अधिक शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर द्राक्षबागांना फटका बसला आहे. हे औषध फवारल्याने द्राक्षमण्यांवर काळे ठिपके पडून त्याचे बाजारमूल्य शुन्य झाले आहे. शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. यामुळे तालुक्यातील आर्थिक घडी विस्कटणार आहे.

कॅमसन कंपनीच्या औषधामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे समजल्यानंतर कारसूळचे देवेंद्र काजळे आणि रौळसचे माणिकराव शिंदे यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यानंतर कृषी खात्याला जाग आली. उपविभागीय कृषी अधिकारी कानवडे, द्राक्ष संशोधन केंद्राचे डॉ. पाचनकर, डॉ. सोनवणे, तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे पंचायत समितीचे कृषी अधिकारी खेडकर, कॅमसन कंपनीचे आहेर यांनी कारसूळ, उगाव, शिवडी, विंचूर परिसरातील बाधित द्राक्षबागांची पाहणी करून द्राक्षमणी पुण्याला तपासणीसाठी पाठविले आहे.

निर्यातक्षम द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. काळवंडलेल्या द्राक्षबागांची पाहणी करून त्याचे नमुने पुणे येथे पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर नेमके काय ते समजू शकणार आहे.

- कैलास ढेपे, तालुका कृषी अधिकारी, निफाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फक्त कळवा; आम्ही छापे टाकू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

अवैध दारू विक्री संदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारी बघता आता गावोगावचे हे अड्डे बंद करण्यासाठी लवकरच बैठका आयोजित करून गावागावात दारुबंदी करण्यासाठी महिला मंडळांची स्थापना करण्यात येणार आहे. तुम्ही फक्त कळवा आम्ही विनाविलंब छापा टाकून दोषींना जेरबंद करू, असे प्रतिपादन मनमाड विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी केले.

येवला तालुका पोलिस स्टेशनच्या आवारात रेझिंग डे सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. राहुल खाडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे होते. पोलिस आणि जनता यामधील दुवा साधण्याचे काम पोलिस मित्र करीत असून, त्यांचे काम निश्‍चितच उल्लेखनीय आहे. पोलिस मित्रांना ओळख मिळावी, यासाठी त्यांना पोलिसांचा लोगो असलेल्या टोप्यांचे वितरण करणार आहोत, असे यावेळी यावेळी डॉ. राहुल खाडे म्हणाले.

अवैध दारू विक्रीबाबत आपण ठोस भूमिका घेणार असून, अधिकृत दारू दुकानदार त्यांची शासनमान्य वेळ पाळत नसल्यास त्या विरोधातही कारवाई केली जाईल, असा इशारा देखील यावेळी डॉ. खाडे यांनी दिला. गावात चालणाऱ्या अवैध दारू विक्रीसंदर्भात तुम्ही फक्त कळवा आम्ही विनाविलंब छापा टाकून दोषींना जेरबंद करू, असे आश्वासनही खाडे यांनी यावेळी दिले. यावेळी पोलिस निरीक्षक रूपचंद वाघमारे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, नरेंद्र खैरनार, एन. बी. सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलिस आणि जनतेचा संबंध वाढविण्यासाठ प्रयत्न केले पाहिजे. पोलिसांकडे कमीतकमी तक्रारी येतील याची काळजी घेतली पाहिजे. या संपूर्ण सप्ताहाभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जनमाणसात पोलिसांविषयी भीतीचे वातावरण कमी व्हावे, यासाठी गावोगाव बैठका घेण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक रुपचंद वाघमारे यांनी यावेळी स्पष्ट केले. मध्यस्त टाळून तक्रारी थेट आमच्याकडे करा, असे आवाहनही केले. भीतीपोटी आपण अवैध धंद्याविरोधात तक्रारी न करता त्या वाढीसाठी खतपाणीच घालीत असतो, असे वाघमारे म्हणाले. यावेळी पोलिस मित्र संदीप जाधव, कैलास घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नरेंद्र खैरनार, कैलास घोरपडे, प्रकाश वाघ, पोपटराव आव्हाड, लक्ष्मण घुगे यांचीही यावेळी भाषणे झाली.

सर्वांनी एकत्र यावे

सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, पोलिस जागतात म्हणून आपण सुखाने झोपतो. पोलिसही माणूसच आहे, त्यांना समजून घ्या. रात्रीच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मदत करा. त्यांच्याशी गप्पा मारा. आपल्या संपत्तीचे रक्षण करण्याचा प्रयत्न करा. ती आपली नैतिक जबाबदारी आहे. या सप्ताहातच नव्हे तर १२ ही महिने असे कार्यक्रम राबविले जातील, असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम परवानग्यांबाबत हरित लवादाकडे पुनर्विलोकन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बांधकाम परवाने थांबविण्याच्या पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाविरोधात महापालिका पुनर्विलोकन अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे. विविध उपाययोजनांसदर्भात पुनर्विलोकन अर्ज किंवा अपील करण्याचा विचार महापालिकेचा असून त्यासाठी वकीलाचा सल्ला मागविण्यात आला आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न महापालिकेने सुरू केल्याची माहिती आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली आहे.

पाथर्डी शिवारातील कचरा डेपातील कचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावली जात नाही, तोपर्यंत कोणत्याही बांधकामांना मंजुरी देऊ नका, असा आदेश पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. यामुळे महापालिकेचे धाबे दणाणले असून, परवानग्यांचे कामच थांबले होते. महिनाभरापासून सुमारे सव्वाशे परवानग्या रखडल्या आहेत. प्रथम उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय महापालिकेने स्वीकारला होता. मात्र, खत प्रकल्प कार्यान्वित होण्याच्या हालचाली असल्याने आता पुनर्विलोकन याचिका पुन्हा हरित लवादात दाखल करण्याचा विचार केला आहे.

त्यासाठी हरित लवादाच्या वकिलाकडे सल्ला मागितला असून त्याचा अहवाल आल्यानंतर तात्काळ पुनर्विलोकन अर्ज दाखल केले जाणार असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले. यासोबतच प्रकल्पही स्थलांतरित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. परंतु, ते शक्य नसल्याने यावर तोडगा काढण्यासंदर्भात लवादाकडेच भूमिका मांडली जाणार आहे. त्यामुळे यातून लवकर मार्ग निघेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images