Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दुहेरी हत्याकांडातील संशयितांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तडीपार अर्जुन महेश आव्हाड आणि सराईत गुन्हेगार निखिल विलास गवळी यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी अटक केलेल्या दोघा संशयितांना कोर्टाने १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या हत्याकांडामागे संशयांचे धुके अद्याप कायम असून, बाहेरगावावरून परतलेले पोलिस अधीक्षक संजय मोहिते, काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

किरकोळ वादातून सराईत गुन्हेगार आव्हाड आणि गवळीची ३१ डिसेंबररोजी हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडाची वाच्यता झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने पीएल ग्रुपच्या सनी उर्फ ललित अशोक विठ्ठलकर आणि निखिल मधुकर यांना अटक केली. या संशयितांना १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, रविवारी दुपारी पोलिसांनी प्रिन्स चित्रसेन सिंग आणि वतन शिवाजी पवार या दोघा संशयितांना पाथर्डी फाटा परिसरातून अटक केली. ते मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी त्यांना ‌शिताफिने अटक केली. सोमवारी नाशिक कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपास करण्यासाठी पोलिसांकडून संशयितांच्या कोठडीची मागणी करण्यात आली.

मूळ मुद्द्याला बगल

३१ डिसेंबररोजी शहर आणि ग्रामीण पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. या दिवशी शेकडो वाहनांची तपासणी करण्यात आल्याचा दावा शहर आणि ग्रामीण पोलिस दलाकडून करण्यात येत आहे. मग, कारमधील हे दोन मृतदेह पोलिसांच्या नजरेस कसे काय पडले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांच्या आशीर्वादानेच छोटे मोठे गुंड तयार होत असून, त्यातून एकमेकांचा जीव घेण्याची स्पर्धा लागली आहे. शहर पोलिस ग्रामीणकडे तर ग्रामीण पोलिस शहर पोलिस दलाकडे बोट दाखवत काहीतरी लपावाछपवी करीत असल्याचा दावा खुद्द पोलिसांकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दारणाचे पाणी नगरसाठी रवाना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

नगर जिल्ह्यातील फळबागा व पिके वाचविण्यासाठी दारणा धरणातून दोन टीएमसी पाणी सोडण्यात यावे, असे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानुसार रविवारी दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडण्यापूर्वी आंदोलनाचा इशारा देणारे पक्षांचे कार्यकर्ते यावेळी मात्र धरणाजवळ फिरकलेही नाहीत.

दारणा धरणातून पाणी सोडण्याचे जाहीर होताच इगतपुरी तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कुठल्याही परिस्थितीत पाणी सोडू देणार नाही, अशी भूमिका शेतकरी व राजकीय पक्षांनी घेतली होती. मात्र, पाणी सोडण्याच्या वेळी कुणीही धरणाकडे साधे फिरकलेही नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाटबंधारे विभागाने रविवारी दारणा धरणातून ११०० क्युसेकने पाणी सोडले. भावली धरणातून २५० क्युसेक तर काही पाणी वालदेवी धरणातून सोडण्यात आले आहे.

चालू वर्षी इगतपुरी तालुक्यात धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. दारणा धरणाची पाणी क्षमता ७१४९ दलघफू असताना केवळ ६८०० दलघफू साठा झाला. त्यात जायकवाडीला ३.२४ टीएमसी पाणी सोडले होते. त्यामुळे धरणात अवघे ३४०० दलघफू पाणी शिल्लक आहे. आता पुन्हा दोन टीएमसी पाणी नगरसाठी सोडण्यात आल्याने फक्त एक ते दीड टीएमसी पाणी धरणात शिल्लक राहणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरच्या औद्योगिकीकरणास गती द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यात औद्योगिक प्रगती अधिक वेगाने होण्यासाठी तालुक्याचे वर्गीकरण 'डी प्लस'मध्ये समावेश करावा. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून उद्योग आकर्षित होण्यास मदत होऊ शकेल. सिन्नरच्या औद्योगिकीकरणासाठी हा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

आमदार राजाभाऊ वाजे, मुसळगाव औद्योगिक सहकारी वसाहतीचे अध्यक्ष अरुण चव्हाणके, तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे, सुनील कुंदे यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन औद्योगिक प्रगतीबाबत चर्चा केली. यामध्ये तालुक्याचे वर्गीकरण सी विभागात केल्याने विकासाचा वेग मंदावला असल्याकडे लक्ष वेधून तालुक्यात सेझ विकसित होत असताना त्यासही या वर्गीकरणाचा फटका बसत असल्याचे सांगितले.

तसेच, उद्योगासाठी असलेली अभय योजना बंद झाल्याने पुनरुज्जीवनक्षम कारखाने बंद पडलेले सुरू करण्यात अडथळे येत आहेत. विशेष अभय योजना मार्च २०१५ मध्ये संपुष्टात आली असून, त्यास मुदतवाढ मिळाल्यास बंद पडलेले कारखाने सुरू करण्यास चालना मिळेल. बंद पडलेले उद्योग नवीन उद्योजकास विक्री झाल्यानंतर त्यातील १५ वर्षे उत्पादन सुरू ठेवण्याची अट शिथिल करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. शासकीय वसाहतींप्रमाणे चटई निर्देशांक १.५० करावा, संस्थेची जिरायत झोनमधील जमीन औद्योगिकमध्ये वर्ग करावी, विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांप्रमाणे सवलती मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली.

सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीस रोज दीड हजार घनमीटर पाणी मंजूर आहे. तथापि, उद्योग वाढले असून, पाण्याचीही मागणी वाढत आहे. ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. अजून एक हजार घनमीटर पाण्याची गरज असून, विस्तारित होणाऱ्या योजनेतून संस्थेस पाणी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रश्नाबाबत आपण तातडीने कारवाई करू असे आश्वासन ना. देसाई यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस जडीबुटी औषध विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अॅसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी तब्बल जडी बुटीचे १२ हजार रुपये किमतीचे बोगस औषधे विक्री करणाऱ्या तिघा जणांविरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील, एका जणास पोलिसांनी अटक केली असून, फसवणुकीच्या या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.

जडी बुटी विक्रीचे अनेक स्टॉल शहरातील कमी रहदारी असलेल्या रस्त्यांवर लावले जातात. असाध्य आजारांवर परिणामकारक औषधे मिळतील, असा दावा या विक्रेत्यांमार्फत केला जातो. अशाच प्रकारचा एक स्टॉल द्वारका येथील निवृत्ती कॉम्पलेक्स येथे लावण्यात आला होता.

या ठिकाणावर सिन्नर शहरातील गोंदेश्वररोडवर राहणारे रामा मारोती धनगर (वय ४५) पोहचले. अॅसिडीटीचा त्रास असल्याचे धनगर यांनी सांगितल्यानंतर मनोज मेश्राम, पुरूषोत्तम रामराव मेश्राम आणि स्वप्निल मेश्राम या जेलरोड परिसरात राहणाऱ्या संशयितांनी त्यांना ओमसाई जडी बुटीचे मिक्स औषध तयार करून दिले. यासाठी संशयितांनी फिर्यादीकडून १२ हजार रुपये उकळले. तीन नोव्हेंबर रोजी औषध घेऊन परतलेल्या फिर्यादीस १० जानेवारीपर्यंत कोणताही आराम मिळाला नाही. उलट अॅसिडीटीचा त्रास वाढतच गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर धनगर यांनी भद्रकाली पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दाखल केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी पुरूषोत्तम मेश्राम यास अटक केली. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत असून एफडीएने सुध्दा याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदोष नोटाप्रकरणाची समितीकडून चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

एक हजार रुपयाच्या दहा कोटी सदोष नोटा छापल्याप्रकरणी चौकशीसाठी प्रेसमध्ये त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात प्रामाणिक कामगारांना विनाकारण गोवून नाशिकरोडच्या प्रेसला बदनाम करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाही, असा इशारा कामगार नेत्यांनी दिला आहे.

रिझर्व्ह बँकेने हजाराच्या ५० कोटी नोटा छापण्याची मागणी नोंदवली होती. नाशिकरोडच्या प्रेसमध्ये एक हजाराच्या तीस कोटी नोटा छापण्यात आल्या. त्यापैकी दहा कोटी नोटा रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना वितरीत केल्या. मात्र, त्यात सुरक्षा तारच नसल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली. होशिंगाबाद (मध्यप्रदेश) येथून आलेल्या नोट छपाईच्या कागदामध्येच सुरक्षा तार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर होशिंगाबादच्या व्यवस्थापकासह दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. आता लक्ष नाशिकरोडच्या प्रेसकडे लागले आहे.

त्रिसदस्यीय समिती

नाशिकरोडला महाव्यवस्थापक म्हणून काम केलेले व आता होशिंगाबादची जबाबदारी सोपवलेले टी. आर. गौडा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. होशिंगाबादचे अधिकारी जबाबदार असले तरी नाशिकरोडचे वरिष्ठ कितपत दोषी आहेत व त्यांच्यावर कोणती कारवाई करायची याची पडताळणी ही समिती करीत आहे.

प्रेस महामंडळाचे कार्यकारी संचालक व नऊ प्रेसचे प्रमुख एम. एस. राणा यांनी नाशिकरोड मुद्रणालयात शुक्रवारी व शनिवारी सुपरवायझर दर्जाच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली.


कामगारांना दोष नको

सदोष नोटाप्रकरणी होशिंगाबादचे अधिकारी जबाबदार आहेत. नाशिकच्या कामगारांना या प्रकरणात गोवू नये, त्यांच्या प्रामाणिकपणा व कौशल्याबद्दल शंका घेऊ नये, अशी स्पष्ट भूमिका कामगार नेत्यांनी घेतली आहे. सध्या प्रेसमध्ये वर्क्स कमिटीची निवडणूक जाहीर झाली आहे. त्रिसदस्यीय समिती सध्या फक्त अधिकाऱ्यांची चौकशी करीत आहे. निवडणुकीमुळे समितीने कामगारांची चौकशी लांबवल्याचे समजते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी सुविधांसाठी धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहरातील विविध नागरी समस्यांचे निराकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी येथील सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने सोमवारी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयच्या प्रवेशद्वारासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिका, वीज वितरण कंपनी व सामान्य रुग्णालय अशा विविध आस्थापनांमध्ये सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

शहरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने गेल्याच महिन्यात सविस्तर निवेदनाद्वारे शहरातील नागरी समस्यांचे निराकरण व्हावे, अशी मागणी अप्पर जिल्हाधिकारी स्वामी यांच्याकडे केली होती. मात्र, याबाबत संबंधित विभागांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने समितीच्या वतीने सोमवारी एका दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, उपाध्यक्ष शरद ब्राह्मणकर, सचिव भालचंद्र खैरनार आदींच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, आपल्या मागण्यांबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला. या धरणे आंदोलनात समितीच्या हरिप्रसाद गुप्ता, कैलास शर्मा, पवन पाटील, तेजस जैन, सुरेश बडजाते, जितेंद्र जाधव, मनीष वाणी, विशाल सोनवणे, भरत बागुल, बापू महाजन आदींसह समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

समितीच्या प्रमुख मागण्या

मोसम नदी सुधार योजना कार्यान्वित करावी, मोसम नदीपत्रात येणारे रक्त मिश्रितपाणी थांबवावे, महादेव मंदिर ते संगमेश्वर पादचारी पूल व्हावा, संगमेश्वर विभागातील अनियमित पाणीपुरवठा सुरळीत व्हावा.वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करणे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

`त्या` आदिवासी पालकांच्या पदरी निखारेच!

$
0
0

vinod.patil@

timesgroup.com

नाशिक : ठेकेदारांवर कोट्यवधींची उधळण करणाऱ्या आदिवासी विभागाकडे शासकीय आश्रमशाळांमध्ये मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुबीयांच्या सांत्वनासाठी आर्थिक निधीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सर्पदंशासह विविध कारणांनी मृत्युमूखी पडलेल्या १०९ मुलांच्या कुटुबीयांच्या आर्थिक भरपाईपोटी आदिवासी विभागाकडे ८२ लाख रुपये थकले आहेत. बजेटमध्ये तरतूद नसल्याचे कारण अधिकारी पुढे करीत असले तरी अनुदानित आश्रमशाळांना मात्र हीच भरपाई तातडीने देण्याची सक्ती विभागाने केली आहे.

आदिवासी आश्रमशाळांमध्ये दरवर्षी विविध कारणांनी विद्यार्थी मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडतात. सर्पदंश, मलेरिया, टायफाईड, विषबाधा आदी कारणांनी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास विभागातर्फे मृत विद्यार्थ्याच्या कुटुबीयांना आर्थिक भरपाई देण्याची तरतूद आहे. राज्यातील शासकीय ५५४, तर अनुदानित अशा ५५२ आश्रमशाळांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी प्रतिविद्यार्थी ही तरतूद २५ हजार रुपये होती. त्यात वाढ करून ती आता ७५ हजार रुपये प्रतिविद्यार्थी करण्यात आली आहे. शासकीय अनुदानित आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी मृत पावल्यास तातडीने ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे.

शासकीय आश्रमशाळांमध्ये मात्र आलबेलची स्थिती आहे. बजेटमध्ये आर्थिक तरतूद नसल्याचे कारण देत, गेल्या दोन वर्षांपासून शासकीय आश्रमशाळांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या एकाही विद्यार्थ्याच्या कुटुबीयांना मदत देण्यात आलेली नाही. दोन वर्षात १०९ विद्यार्थ्यांच्या कुटुबीयांना मदत देण्याचे प्रस्ताव विभागाकडे आले आहेत. त्यासाठी विभागाला ८२ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. प्रस्ताव आयुक्तालयाकडून मंत्रालयात पाठविण्यात आला आहे. परंतु, त्याला आठ महिने लोटले तरी मंत्रालयातून प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे.
विभागाच्या बजेटमध्ये तरतूद नसल्याने अद्याप आर्थिक मदत देता आलेली नाही. मदतीसाठी ८२ लाखांचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला असून, त्याला लवकरच मंजुरी मिळेल.

सोनाली पोंक्षे वायंगणकर, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोटक्लब खरंच सुरू होणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गंगापूर धरणाच्या ठिकाणी साकारण्यात आलेला बोटक्लब कार्यान्वित करण्यासाठी येत्या २६ जानेवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) तशा हालचाली सुरू केल्या असल्या तरी नाशिककरांना यंदा बोटिंग करता येईल का, याबाबत संदिग्धता आहे. गंगापूर धरणात सध्या ४५ टक्केच पाणी असून, दिवाळीनंतरच बोटिंगचा लाभ मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिकमध्ये जागतिक दर्जाचे बोट क्लब पूर्ण होऊन दीड वर्ष झाले मात्र सरकारच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प अद्यापही कार्यान्वित झालेला नाही. गेल्या आठवड्यात माजी पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी बोट क्लब, लेक व्ह्यू नेचर्स रिसॉर्ट, पर्यटक निवास संकुल या प्रकल्पाची पाहणी करून कामाची सद्यस्थिती जाणून घेतली होती. नाशिक शहराच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला बोट क्लब हा महत्वाकांक्षी प्रकल्प आघाडी सरकारच्या कालावधीत साकारण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षांपासून बोट क्लबची सुसज्ज इमारत तयार आहे. पर्यटकांना बोटिंगसाठी अमेरिकन मेड युरो फोर नॉर्मच्या ४७ अत्याधुनिक बोटी धरणस्थळी दाखल झालेल्या आहेत. मात्र जलसंपदा विभाग व एमटीडीसी यांच्यातील कराराअभावी हा प्रकल्प अद्याप सुरु झालेला नाही. त्यामुळे हा विषय मार्गी लावण्यासाठी भुजबळ यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याशी सोमवारी चर्चा केली. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पराग जैन यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्क साधला. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरु करून पर्यटकांना त्याचा लाभ मिळवून देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जैन यांच्या निदर्शनास आणून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंगीबेरंगी पतंग व्यापणार आकाश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

पतंगोत्सवाची मोठी खासियत असलेले येवला शहर यंदाही या उत्सवासाठी सज्ज झाले आहे. देशात अहमदाबाद नंतर दुसरा अन् राज्यात पहिला क्रमांक असा पतंग उडविण्याबाबत नावलौकिक असलेल्या येवलेकरांनी यंदाही मकरसंक्रांतीच्या तब्बल तीन दिवस चालणाऱ्या पतंग उत्सवाची धूम उडविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. आवडीचे बहुरंगी-बहुढंगी पतंग उडविण्यासाठी लागणारी येथील स्थानिक येवला ब्रॅण्ड 'आसारी' खरेदी करण्यासह पतंगासाठीचा मांजा सुतविण्याकरिता पतंगवेड्या येवलेकरांची सध्या चांगलीच लगबग दिसत आहे.

भोगी, संक्रांत व कर या तीनही दिवशी सर्वच येवेलेकर अगदी आपली तहानभूक विसरत या पतंगोत्सवात सहभागी होतात. तीन दिवस विविध आकाराच्या पतंगांनी व्यापून जाणारं परिसरातील अवघं आकाश अन् 'अरे दे ढिल..ढिल देरे भैय्या' अशी आरोळीवजा साद घालतांना प्रतिस्पर्ध्याचा पतंग काटल्यावर दुमदुमणारा 'वक्काट' हा कर्णकर्कश आवाजही येथील पतंगोत्सवाची एक खासियतच.

आसारी एक मोठी खासियत

इतरत्र पतंग उडविण्यासाठी रीळ वापरला जातो. मात्र, येवल्यात पतंग उडविण्यासाठी वापरली जाते ती येवल्यातच बनलेली 'आसारी'. अस्सल येवला ब्रँड असलेली ही 'आसारी' बुरुड समाजातील कारागिर बांबूपासून तयार करतात. ही 'आसारी' खरेदी करण्यासाठी यंदाही येवलेकरांची गर्दी होतांना सध्या बुरुड गल्ली गजबजून गेली आहे. अनेक पाती आसारी बनविल्या जाताना यंदा सहा व आठ पाती आसरींना मागणी दिसत आहे. यावर्षी सहा पाती लहान आसारी ४० रुपये, मध्यम ६० तर मोठी ८० रुपयांना आहे. आठ पाती लहान आसारी ही १४० तर मोठी आसारी २०० ते २५० रुपयांना मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आसरीच्या किमतीत काहीशी वाढ झाली आहे.

कारागीर पतंग बनविण्यात गर्क

येवला शहरातील अनेक पतंग कारागिरांकडून त्यांच्या वैशिष्ट्यानुसार पतंग तयार केले जातात ही येवल्यातील एक विशेषतः आहे. विशेषतः बाळू पैलवान गवते यांचा 'लंगर' पतंग, अन्सारी यांचा 'फाईन' पतंग, प्रकाश भावसार यांचा 'प्रकाश' पतंग आदी पतंग शहरवासीयांमध्ये चांगलेच फेमस आहेत. सध्या हे पतंग कारागीर मागणीनुसार पतंग तयार करण्यात गर्क दिसत आहेत. बाजारात रेडिमेड पतंग देखील उपलब्ध आहेत. भीम, मोटू-पतलू, टॉम अॅण्‍ड जेरी आदी कार्टून्स असलेले पतंग तसेच गरुड, घार, कबूतर या आकारातील पतंग देखील चिमुकल्यांना आपलेसे करीत आहेत.

मांजासाठी धागा खरेदी

पतंगासाठी लागणारा 'मांजा' सुतविण्यासाठी सध्या येवलेकर पतंगप्रेमींची धावपळ सुरू आहे. मांजाकरिता लागणारा धागा हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. यावर्षी येथील बाजारपेठेत सुरती, बरेली, मैदानी, बिअर, पांडा, अग्नी, साखळी, वर्धमान, गन आदी धागे आलेले असून या धागा खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसत आहेत. चार पदरी, नऊ पदरी, बारा पदरी व सोळा पदरी दोरा बंडल बाजारात उपलब्ध आहेत.

येवला शहर हे जसे येथील पैठणीमुळे देशात प्रसिद्ध आहे तसेच येथील पतंग उत्सवामुळे देखील. सुमारे ११ महिने अगोदर आपण पतंगासाठीच्या बांबूच्या कामटी सिलण्याच्या कामास सुरुवात करतो. सप्टेंबरपासून पतंग तयार करायला सुरुवात होते. येवल्यात तयार होणारे पतंग खास खुबीचे असल्याने त्याला इतर ठिकाणावरून देखील मागणी असते.- बाळू गवते, पतंग कारागीर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदाचाळीचे अनुदान महिनाभरात मिळणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदाचाळ अनुदान त्वरित मिळावे यासाठी खासदार राजू शेट्टी प्रणित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदाचाळ अनुदान येत्या महिनाभरात मिळणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी दिली.

गत तीन महिन्यापूर्वी पणन संचालक कार्यालय नाशिक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कांदाभाकरी आंदोलन करून पणन संचालक सुभाष नागरे यांना घेराव घातला होता. तसेच, वरिष्ठांशी चर्चा करून पुढील दोन महिन्यात अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. या मागणीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार व ग्रामीण जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी सतत पाठपुरावा केला. अखेर या आंदोलनास यश मिळून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर १४ कोटी १९ लाखाचे अनुदान जमा होणार आहे. तर, कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन कोटी ११ लाखाचे अनुदान जमा होणार आहे. यामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

कांदाचाळ अनुदानासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. यामुळे लवकरच शेतकऱ्यांना या अनुदानाचे वाटप होईल. - गोविंद पगार, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वारबाबानगरात अघोषित शांतता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुहेरी हत्याकांडात तपास करीत असताना पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या पथकाने पीएल ग्रुपच्या कार्यालयाची सोमवारी झाडाझडती घेतली. नगरसेवक प्रकाश लोंढे यांचीही चौकशी झाल्याची चर्चा असून, यामुळे या परिसरात अघोषित शांतता प्रस्थापित झाल्याचे चित्र दिसून येते आहे.

सातपूर परिसरातील सराईत गुन्हेगार अर्जुन महेश आव्हाड आणि निखिल विलास गवळी यांच्या हत्याकांडाचे धागेदोरे स्वारबाबानगर परिसरातील पीएल ग्रुपच्या कार्यालयापर्यंत पोहचल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या दोघांचे मृतदेह ८ जानेवारी रोजी त्र्यंबकेश्वर-जव्हार रोडवरील तोरंगण घाटात सापडले होते. सोमवारी पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी फौजफाट्यासह पीएल ग्रुपच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. नगरसेवक प्रकाश लोंढे यांचीही कसून चौकशी केल्याचे समजते. पीएल ग्रुपचे अनेक सक्रिय सदस्य पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी गायब झाले आहेत. सामाजिक कार्यासाठी स्थापन झालेल्या पीएल ग्रुपमध्ये सराईत गुन्हेगारांचा शिरकाव झाला असून, सातपूर भागातील गुन्हेगारी कृत्यानंतर अनेकदा ग्रुपच्या सदस्यांकडे अंगुली निर्देश करण्यात येतो. स्थानिक पोलिसांकडून या छोट्या मोठ्या गुंडांना अभय मिळत असल्याने आता ते एकमेकांच्या जीवावर उठले असल्याचा आरोप सातपूरकरांकडून केला जात आहे. मृत आव्हाड आणि गवळी तसेच त्यांना मारणारे संशयित हे पीएल ग्रुपचे सदस्य आहेत.

तडीपार गुंड पीएल ग्रुपच्या कार्यालयात आश्रय कसे घेतात, असा प्रश्न निर्माण झाला असून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी हाच धागा पकडून तपास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या गुन्ह्यामागे आर्थिक कारणांची चर्चा देखील आहे. त्याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. गोळीबार करून दोघा सराईत गुन्हेगारांचा खून झाल्याचे उघड झाल्यापासून सातपूरमधील नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. झालेल्या घटनेची पोलिसांनी कसून चौकशी करीत गुन्हेगारांना कडक शिक्षा कशी होईल, याकडे लक्ष घालण्याची मागणी सातपूरकरांनी केली आहे. पोलिसांनी फौजफाट्यासह पीएल ग्रुपच्या कार्यालयाची झाडाझडती घेतल्याने स्वारबाबानगरमध्ये अघोषित शांततातच पसरली असून, या प्रकरणात पीएल ग्रुपच्या आणखी कोणाला अटक होते काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकच्या कचऱ्याची वाढती डोकेदुखी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

गोदावरीच्या उगमस्थानी प्रदूषण वाढले असून, नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गोदावरीच्या प्रदूषणाबाबत राष्ट्रीय हरित लवादाने प्रशासनाची वेळावेळी कानउघाडणी केली. मात्र, आदेशांची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे याचिकाकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेला पत्र पाठवून आठ दिवसांच्या आत कार्यवाही झाली नाही, तर अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळालाही पत्र देण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वर येथे तहसील कार्यालयाच्या परिसरात कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. गोदावरी नदीपात्राजवळच कचरा इतस्तः विखुरला आहे. गोदावरीच्या उगमस्थानी नदीप्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. गोदावरी प्रदूषणाबाबत निशिकांत पगारे, राजेश पंडित आणि ललिता शिंदे यांनी राष्ट्रीय हरित लवाद पश्चिम विभाग यांच्याकडे या‌चिका दाखल केली होती. याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने प्रशासनाची कानउघाडणी केली होती. तसेच, विविध आदेशही दिले आहेत. तथापि, या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे याचिकाकर्त्यांच्या निदर्शनास आले आहे. यामुळे त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले असून, आठ दिवसांच्या आत कार्यवाही झाली नाही, तर अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. असेच पत्र जिल्हाधिकारी आणि प्रदूषण नियंत्रक मंडळालाही दिले आहे.

त्र्यंबकेश्वर येथे कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असताना आणि नदीपात्राचे प्रदूषण होत असताना दीडवर्षापेक्षा अधिक वेळ कचरा डेपोकरिता जागा शोधण्यासाठी दवडला आहे. वेळकाढू धोरणामुळे आज त्र्यंबकचा कचरा न्यायचा काठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्र्यंबक येथे दररोज सात टन कचरा गोळा होतो. आगामी काळात होणाऱ्या यात्रांमुळे गर्दी वाढणार आहे. गत काही दिवसांपासून तहसील कार्यालयाजवळ हा कचरा जमा करण्यात येत होता. तथापि, कचरा रस्त्यावर आल्याने येथील काही नागरिकांनी येथे कचरा जमा करण्यास विरोध केला आहे. एकूणच कचऱ्याचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छाननीतील बाद अर्ज ठरले वैध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज छाननीत जिल्हा बँकेचे माजी संचालक चंद्रकांत गोगड व त्यांचे पुत्र दीपक गोगड तसेच समितीचे माजी सभापती प्रकाश घुगे, राजेंद्र पवार, व्यंकट आहेर आणि इतरांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले होते. मात्र, जिल्हा निबंधक टी. के. बनसोडे यांनी सुनावणीनंतर त्यांचे अर्ज मंजूर केल्याने बाजार समितीची निवडणूक आता रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. तेरा जानेवारी हा माघारीचा दिवस असून, त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

जिल्हा निबंधक बनसोडे यांनी प्रकाश घुगे, व्यंकट आहेर, राजेंद्र पवार यांचे अर्ज वैध ठरविण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे माजी आमदार संजय पवार यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे बाजार समितीची निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची शक्यता आहे. मनमाड बाजार समितीची निवडणूक ही सतत चर्चेचा व वादाचा विषय ठरत आली असल्याने यंदाची निवडणूक त्यास अपवाद नाही. आक्षेप, हरकती, आव्हान यांचा सिलसिला अजूनही सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुसुमाग्रज उद्यान बनणार ‘तेजाची लेणी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शब्दांची आभूषणे लेवून आलेली कुसुमाग्रजांची कविता संपूर्ण भारतभर ललामभूत ठरली. त्यांच्या या दिव्य व्यक्तित्त्वाने भारलेल्या नाशिकमध्ये त्यांच्याच नावे असलेल्या कुसुमाग्रज उद्यानाची काया आता पालटणार आहे. आतापर्यंत 'जीर्ण पाचोळा' असलेले हे उद्यान आता 'तेजाची लेणी' बनणार असून कॅफे, अॅम्पी थिएटर, तेथील झाडांना तात्यासाहेबांच्या कवितांची नावांनी अलंकारित करणार येणार आहे. उपमहापौर गुरूमीत बग्गा यांच्या प्रयत्नातून स्वप्नवत असलेले हे उद्यान विकसित होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याला बळ दिल्याने मराठी प्रेमींसाठी हे उद्यान नव्याने खुलणार आहे.

मंगळवारी झालेल्या महासभेत कवी कुसुमाग्रज उद्यानाचे नुतनीकरण व सुशोभिकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. १५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या उद्यानाची सध्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्याचे मेकओव्हर व्हावे यासाठी मराठीप्रेमीनी महापालिकेकडे धाव घेतली होता. या कामासाठी २ कोटी २४ लाख रुपये खर्चासही महासभेने मंजुरी दिली आहे. त्यात एक कोटी ९३ लाख त्यामुळे आता या उद्यानाचा कायापालट होणार आहे. उपमहापौर गुरूमित बग्गा यांनी या उद्यानाच्या नुतनीकरण व सुशोभिकरणासाठी पाठपुरावा केला होता. ओरीजीन आर्किटेक्ट यांनी या संदर्भात आराखडा तयार केला आहे.

नव्या आराखड्यानुसार या उद्यानाचा पूर्ण मेकओव्हर होणार आहे. ५९६० चौरस फूट जागेवर नव्याने प्रशस्त असे उद्यान साकारले जाणार आहे. या ठिकाणी दोन अॅम्पी थिएटर उभारले जाणार असून रॅम्पही तयार केले जाणार आहेत. नदीकाठावरील भाग हा सहा फुट उंच उचलून तो पूर्ण सपाट करण्याचा प्रस्ताव आहे. उद्यानात कमळकुंड तयार केले जाणार आहे. सोबतच सवांदकट्टाही साकारला जाणार आहे. कॅफे एरियासाठी स्वतंत्र जागा ठेवली जाणार आहे. पर्यटकांसाठी स्वंतत्र ट्रॅक तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे मराठी प्रेमींसाठी हे उद्याने नव्याने खुलणार आहे.

पुस्तके, कवितांची नावे

उद्यानातील विविध भागाना कुसुमाग्रजांची पुस्तके आणि कवितांची नावे दिली जाणार आहेत. किनारा, विशाखा, चाफा, छंदोमयी, जीवनलहरी, प्रवासी पक्षी, मारवा, श्रावण अशा पुस्तकांसह गाजलेल्या कवितांची नावे उद्यानातील भागांना दिली जाणार आहे. उद्यानातील १३२ झाडांना जीर्ण पालझाडे असे नाव देण्यात येणार आहे. उद्यानातील शिळांचे डिजाईन्सही बदलले जाणार आहे. त्यामुळे या उद्यानाला पूर्णतः साहित्यरुप दिले जाणार आहे.

कुसुमाग्रज उद्यानाची दुरवस्था झाली होती. ही बाब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्षात आणून दिली. त्यामुळे या उद्यानाच्या पुनर्वैभवाला पुन्हा चालना मिळाली आहे. महापौरांनी निधीची तरतूद करून दिली आहे.

- गुरूमीत बग्गा, उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममधील पाईपचा पुनर्वापर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील गंजलेल्या पाईपलाईन्समुळे पाण्याची गळती होत आहे. या पाईपलाईन्स बदलण्यासाठी महापालिकेने साधुग्राममधील पाईपचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीगळती रोखण्यासाठी साधुग्रामचे पाईप वापरल्याने साडे सहा कोटीची बचत होणार आहे. यासोबतच अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० टक्के वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला आहे. तर प्रायोजकांमार्फत महापालिका हद्दीत शौचालय बांधून त्यावर मोबाइल कंपन्याना टॉवर उभारण्याची परवानगी देण्याबाबतचा धोरणात्मक प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला आहे.

मंगळवारी झालेल्या महासभेत महत्त्वपूर्ण धोरणात्मक विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. परंतु, आयुक्तांअभावी या धोरणात्मक विषयांवर चर्चा झाली नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत साधुग्राममध्ये टाकण्यात आलेल्या पाईपचा पुनर्वापर शहरातील विविध प्रभागात करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यासाठी तीन कोटी १५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. शहरातील नगरसेवकांच्या मागणीनुसार प्रभागनिहाय या पाईपचा पुनर्वापर केला जाणार आहे. त्यासाठी सव्वा तीन कोटीचा खर्च येणार आहे. या पाईपचा शहरात पुनर्वापर केल्यानंतर महापालिकेचीच ६ कोटी ६८ लाख रुपयांची बचत होणार आहे. या पाईपचा पुनर्वापर झाल्यानंतर शहरातील पाणीगळतीच्या तक्रारी काही अंशी कमी होणार आहे. शहरातील सर्व सहा विभागात हे पाईप वापरले जाणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारी काही अंशी कमी होणार आहेत.


अंगणवाडी सेविकांना १० टक्के वेतनवाढ प्रस्ताव

शहरातील ४१८ अंगणावाडीमधील कार्यरत मुख्यसेविका, सेविका, मदतनीस यांच्या वेतनात १० टक्के वाढ देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र, तो स्थगित ठेवण्यात आला. पुढील महासभेत त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे अंगणवाडीतील एक हजार महिलांना त्याचा फायदा होणार आहे. जेहान सर्कल-महात्मानगर सिटी सेंटर रिंगरोडला जोडणाऱ्या रस्त्यासाठीचे क्षेत्र वाटाघाटीने करण्याबाबतचा धोरणात्मक प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. पाथर्डी शिवातील सर्व्हे नंबर २८१ मधील दोन हजार चौरस मीटर जागा विनामोबदला आजारी व मोकाट जनावरांना मोफत औषधोपचार करण्यासाठी शरण एज्युकशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटीला देण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेच्या उत्पन्नात पडणार भर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महापालिकेने अवैध नळ जोडणीधारकांवर केलेल्या कारवाईत २८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, ४३० अवैध नळ जोडणींवर कारवाई करून ३१ नळजोडण्या बंद, तर ३९९ नळ जोडणी दंड वसुलीसह अधिकृत करण्यात आल्या आहेत. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. अवैध नळजोडणीधारकांविरोधात मोहीम सुरूच राहणार आहे.

मनपा प्रशासनाने गेल्या आठवड्यात शहरातील पाणी चोरीला आळा घालण्यासाठी अवैध नळजोडणी धारकांवर सुरू केलेली कार्यावही मंगळवारी देखील होती. मंगळवारी चारही प्रभागात कार्यवाही सुरू होती. दिवसभर मनपा प्रशासनाकडून अयोध्यानगर, कलेक्टर पट्टा, सर्व्हे नं ५५, इंद्रकुट नगर, बलराम नगर भागात कारवाई करण्यात आली. दिवसभरात प्रभाग एक व चारमध्ये एक नळजोडणी बंद करण्यात आली. तर, ८२ नळजोडण्यांचा दंड वसूल करून अधिकृत करण्यात आल्या. दिवसभरच्या कारवाईत सहा लाख ५० हजार ४०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

मनपाच्या या कारवाईत सुरुवातीला अवैध नळ जोडणीधारकांकडून दंड भरण्यास तसेच, जोडणी बंद करण्यास विरोध होत होता. मात्र, दिवसेंदिवस दंड भरून नळजोडणी अधिकृत करून घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे पाणीचोरी मोठ्या प्रमाणात थांबणार असून, मनपाला बुडीत होणारा महसूल देखील प्राप्त होणार आहे. चार दिवस चाललेल्या या कारवाईत सोमवार अखेर चारही प्रभात मिळून एकूण ३१ अवैध नळजोडणी बंद करण्यात आल्या आहेत. तर, ३९९ नळ जोडणीधारकांनी दंड भरून आपले कनेक्शन अधिकृत करून घेतले आहे.

उपायुक्त कमरुद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रभाग एकमध्ये आठ लाखाहून अधिक सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला आहे. प्रभाग चारमध्ये सर्वाधिक नळजोडण्या अधिकृत करण्यात मनपाच्या कारवाई पथकाला यश आले आहे. मनपाची ही मोहीम सुरूच ठेवली जाणार असल्याचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी जाहीर केले आहे. अनधिकृत नळजोडणीधारकांनी दंड रक्कम भरून आपले कनेक्‍शन अधिकृत करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

-----

मालेगाव मनपा कारवाई (सोमवार अखेर)

प्रभाग बंद कनेक्‍शन अधिकृत केलेले दंड वसुली

१ ८ ९५ ८ लाख ९६ हजार ७५७

२ ७ ११२ ५ लाख २३ हजार १९२

३ ११ ७९ ६ लाख ४७ हजार

४ ५ ११३ ७ लाख ५३ हजार ७००

एकूण ३१ ३९९ २८ लाख २० हजार ६४९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा किशोर कैद्यांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील मध्यवस्तीतील किशोर सुधारालयातातून (ब्रोस्टल स्कूल) पळालेल्या १२ किशोरवयीन कैद्यांपैकी १० जणांना अटक करण्यात आली. या मुलांनी सोमवारी पहाटे सुधारालयातून पळ काढला होता.

दहीहंडीचा मनोरा करीत १२ अल्पवयीन गुन्हेगारांनी किशोर सुधारालयाच्या १६ फूट उंच भिंतीचा अडथळा पार केल्याची घटना सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली होती. या मुलांनी दहीहंडीप्रमाणे मनोरा तयार केला. यानंतर पांघरण्यासाठी दिलेल्या चादरीचा वापर करीत सर्व मुलांनी भिंतीच्या पलिकडे उड्या मारल्या. दरम्यान, ही घटना उघडकीस येताच सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पळालेल्या मुलांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने सरकारवाडा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ तपास सुरू केला. यात पुणे शहरातील कैद्यांचा सर्वाधिक समावेश होता. त्यामुळे पोलिसांनी आपला मोर्चा पुण्याकडेच वळवला. पोलिसांनी कसो​शिने तपास करीत मंगळवारी संध्याकाळपर्यंत १० मुलांना पुणे तसेच सातारा भागातून अटक केली. दरम्यान, बाहेर पडल्यानंतर या कैद्यांपैकी काहींनी राका कॉलनीतील पंचम स्वीटस जवळील देवांग कुल्फी सेंटर येथे घरफोडी करून १ हजार २०० रुपयांची रक्कम चोरी केली. याच ठिकाणी चोरटे कपडे बदलताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. दरम्यान, यातील चौघांनी दुचाकीने नाशिक ते पुणे असा प्रवास केला. या दुचाकीची चोरी आरोपींनी कुठे व कशी केली, याचाही तपास पोलिस करणार आहेत.

सोमवारी दिवसभरात चार मुलांना अटक करण्यात आली. तर सहा जणांना मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. उर्वरीत दोघांना लवकरच अटक करण्यात येणार असून यापुढे हे प्रकार घडू नयेत, म्हणून खबरदारीचे उपाय राबवण्यास सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाह-लाइफस्टाइल प्रदर्शनाला प्रतिसाद

$
0
0

लग्नसराई सुरु झाली आहे. दरवर्षीप्रमाणे राजस्थानी लेडीज सर्कल नाशिककरांना काही हटके देण्यासाठी सज्ज आहे. डिझायनर पेहराव, दागिने, फूटवेअर, अ‍ॅक्सेसरीज यातली अदभूत व्हरायटी प्रदर्शनात आहे. लग्न ठरलेल्या युवतींनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आरएलसीच्या अध्यक्षा सुजाता अटल यांनी केले आहे. प्रदर्शन गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स येथे सकाळी १० ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत खुले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जानेवारी अखेरीस कामे पूर्ण करण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मांगी-तुंगी सोहळ्यासाठी पूर्वतयारी समाधनकारक असली तरी सर्व कामे जानेवारी अखेर पूर्ण करा असे आदेश विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी मंगळवारी दिले.

भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्ती महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा डवले यांनी मांगी-तुंगी येथे घेतला. आढावा बैठकीला आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्रकीर्ती स्वामी, चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हाधिकारी महेश पाटील आदी उपस्थित होते.

पूर्ण झालेल्या आणि प्रगतीपथावर असलेल्या कामांची डवले यांनी माहिती घेतली. वाहनतळ आणि रस्त्यावरील माहिती फलकांची काम त्वरित पूर्ण करा असे आदेश जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिले. सिंहस्थ कुंभमेळ्यातील व्यवस्थेप्रमाणे आरोग्य व पिण्याच्या पिण्याची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले.

निवासाच्या प्रत्येक तंबूत अग्निशमक सिलिंडरची व्यवस्था करण्यात यावी व त्याबाबतचे प्रशिक्षण स्वयंसेवकांना देण्यात यावे अशी सूचना पोलिस अधीक्षक मोहिते यांनी केली. मूर्ती परिसरातील विद्युत व्यवस्था राज्य मार्ग क्रमांक सातला जोडणारे रस्ते, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आदींबाबत बैठकीत चर्चा झाली. आरोग्य व्यवस्थेसाठी १० बुथ, २ मोबाइल केंद्र, २ नियंत्रण कक्ष अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. समितीच्या मागणी प्रमाणेच राज्यातील विविध भागातील बसेची व्यवस्था करण्यात येईल, असे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वजन कमी करायचंय?

$
0
0

प्रत्येकजण रोजच्या कामातील वेळा सांभाळून आरोग्याच्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, योग्य मार्गदर्शन, माहिती न मिळाल्याने वेट लॉस करण्यात असंख्य अडचणी येतात. याच अनुषंगाने या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यात वेट लॉस व होमिओपॅथीक कन्सलटंट डॉ. प्रियांका लोकरे मार्गदर्शन करणार आहेत. हे सेमिनार फक्त महिलांसाठी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images